Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
खड्डा

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » विनोदी साहित्य » खड्डा « Previous Next »

Mi_anu
Tuesday, July 04, 2006 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाव:
उलटा गतिरोधक
वर्णन:
आपला नेहमीचा गतिरोधक असतो ना, त्याला (घट्ट सदरा उलटा करुन काढतो तसे) उलटा केल्यावर हा अंतर्वक्र खड्डा तयार होतो.
संभाव्य धोके:
गतिरोधकावर कधीकधी(म्हणजे मंत्रीमहाशयांचा दौरा होण्याच्या आदल्या दिवशी)चांगले रंगवलेले पट्टे असतात आणि ते दुरुन दिसतातही. पण अंतर्वक्र गतिरोधकावर झेब्रा पट्टे काढणार कसे? 'हा झेंडू मनुष्य इतका सावकाश का जातोय' म्हणून आपण भरवेगात त्याला मागे टाकावे आणि पुढे असलेल्या अंतर्वक्र गतिरोधकाने मणक्यापर्यंत हादरा द्यावा..(पुढचा मनुष्य मूर्ख म्हणून सावकाश जात नव्हता!!) त्यात मनपाने हा गतिरोधक सपाट करण्याच्या दृष्टीने त्यात दगडे अथवा वाळू भरली असली तर दुधात साखर!!खड्डा,खड्ड्यात गेल्यावर त्यातल्या भरावावरुन घसरणे आणि अणकुचीदार दगडांनी दुचाकीच्या रबरचक्राला गुदगुल्या करणे हे रोमांचक अनुभव एकत्र घ्या.
*************************************************************************
नाव:
टेंगूळाच्या प्रेमात पडलेला खड्डा
वर्णन:
क्लियरेसीलच्या जाहिरातीत दाखवतात तसा टेण्या मुरुम(पिंपल हो!) रस्त्याच्या त्वचेवर. आणि या मुरुमाच्या प्रेमात पडून 'मी तुझ्या शेजारी तुला चिकटून बसणार' या हट्टाने खेटलेला खड्डा.
संभाव्य धोके:
नृत्य करणारी रमणी कमरेत लवावी तसा आपल्या पुढचा सारथी अचानक दुचाकी कमरेत लववून हा खड्डा टाळतो. आणि बावरलेले आपण या सारथ्याला (आणि संभाव्य भांडणाला) टाळण्यासाठी करकचून दुचाकीचा गतिअवरोधक दाबतो. 'पुढच्या टेंगळावरुन दुचाकी चढत नाहीये' हा अनुभव घेऊन आपण गति वाढवतो आणि अलगद पुढच्या खड्ड्यात जाऊन पोटातले पाणी आणि आतडी हलल्याचा अनुभव घेतो..
*************************************************************************
नाव:
विवर
वर्णन:
'रस्त्यावर एखादी छोटी उल्का पडली असावी का' अशी शंका निर्माण करणारा गोल आणि खोल खड्डा. या खड्ड्याला सामोरे जाण्याचा एकच उपायः गति कमीतकमी ठेऊन निधड्या छातीने खड्ड्यात जाणे व खड्ड्याच्या अंताला आल्यावर गति वाढवून त्यातून बाहेर येणे.
संभाव्य धोके:
पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यावर हा प्रयोग करु नये. विवर हे अर्ध्या चाकाच्या उंचीइतके असेल किंवा दूरध्वनीच्या कामासाठी खोदलेला महाखड्डाही असेल. (सावधान!पुढे खड्डा आहे! ची पाटी आपण पडल्यानंतर पाण्यात पडलेली पाहून उपयोग नाही.)
*************************************************************************
नाव:
पराग खड्डा
वर्णन:
खड्डे मे खड्डा, पराग खड्डा! मोठ्या व्यासाच्या खड्ड्यात असलेला लहानसा खड्डा.
संभाव्य धोके:
खड्ड्यात पण जायचे, खड्ड्यात गेल्यावर परत लहान खड्डा टाळण्यासाठी हातपाय पण हलवायचे,(हातपाय म्हणजे दुचाकीचे हो! आपले हातपाय हलवून काय उपयोग?) म्हणजे जरा मंद डोक्याला जास्तच ताण झाला. अर्थात दुचाकी दुसऱ्याची असल्यास किंवा दुचाकीचा विमा उतरवला असल्यास घाला बेधडक हर हर महादेव!! म्हणून खड्ड्यात!!

(हे लिखाण पहिल्यांदा एका मराठी संकेतस्थळावर मी प्रसिद्ध केले आहे.)

Athak
Tuesday, July 04, 2006 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

good one अनु
आजकाल दिसणारे पावसाळी खड्डे , विवर कसले swimming pool :-)


Giriraj
Tuesday, July 04, 2006 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनु,निरिक्षण चांगलेच आहे तुझे... अजून संशोधन करत रहा.. लवकरच डॉ. ही उपाधी तुझ्या नावामागे लागेल!:-)

Jyotip
Tuesday, July 04, 2006 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनु सहि उत्तम वर्णन...

Aashu29
Tuesday, July 04, 2006 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनु, मला माझ्या औफ़िसला जाताना साकिनाका एरियातले खड्डे तुडवावे लागायचे .....ते आठवले तुझे लिखाण वाचुन!!!

Dineshvs
Tuesday, July 04, 2006 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनु, या लेखासाठी लिंबुने चित्रे काढावीत अशी जाहिर विनंति करतोय मी.

Limbutimbu
Tuesday, July 04, 2006 - 11:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, वेळ मिळताच मी जरुर प्रयत्न करीन! :-)
अनु, छान लिहिल हेस
मी कधी पुणे मुम्बै रस्त्याने वाकडेवाडीकडुन जात नाही नॉर्मली सिन्हगड रोड किन्वा चान्दणी चौकातून कात्रज देहु बायपासला लागुन पुण्याबाहेर पडतो! काल तुझा लेख वाचला अन खडकी कन्टोन्मेन्टच्या हद्दीतील मृत्युचा सापळा बनलेल्या पुणे मुम्बै रस्त्याने गेलो तर तुझ्या लेखातील सर्व खड्डे माझ्या स्वागताला हजर होते! दोन पायान्चे लॅन्डिन्ग गियर वापरीत कसा बसा तो टप्पा पार केला आणि जिवात जीव येवुन ही पोस्ट करायला हजर होऊ शकलो!


Rupali_rahul
Wednesday, July 05, 2006 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनु फ़ारच अनुभव दिसतोय तुला "खड्ड्यांचा" पण एकदम सही वर्णन...

Kmayuresh2002
Friday, July 07, 2006 - 11:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनु,सहीच लिहिलयस.. वाचताना मजा आली आणि खड्डे चुकवताना जी सर्कस करावी लागते त्याची आठवण झाली:-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators