|
Asmaani
| |
| Sunday, July 02, 2006 - 5:16 pm: |
| 
|
अरे काय झाले पुढे लिहाना! छान मजा येत होती राव!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
|
Mi_anu
| |
| Sunday, July 02, 2006 - 11:03 pm: |
| 
|
जुने भाग या दुव्यावर आहेत. कृपया नविन भाग लिहून मालिकेला अमर करावे. /hitguj/messages/75/109878.html?1151307313
|
अनू तूच लिही ना पुढचं... सहीच लिहित होतीस.
|
Mi_anu
| |
| Monday, July 03, 2006 - 8:21 am: |
| 
|
प्रथम शुद्धीवर येतो. 'खम्मा घणी, व्हॉट इज माय नेम??' (सर्व एकमेकांकडे चमकून पाहतात. राजपूत परिवार असल्याने आंग्ल भाषा कोणालाच येत नसते.मंगलाभाभीने कान्व्हेंटात दुसरीपर्यंत शिक्षण घेतल्याने तिला कळते. ती पुढे सरसावते.) 'प्रथम, क्या सचमुच तुम्हे कुछ भी याद नही?'(खुंटा बळकट करुन घेते.) 'नो.' (कार्ट्याला विमानात गोरा साहेब चावलेला दिसतो!! ब.मा. पुटपुटतात.) 'प्रथम, फिलहाल तुम इतना समझ लो की तुम्हारा नाम प्रथम है. बाकी आय विल एक्सप्लेन धीरेधीरे लटर.' (मं. भा. बर्याच वर्षांनी आंग्ल भाषेची तलवार म्यानातून काढत असल्याने त्याला गंज लागला आहे.) हळूहळू प्रथम 'खम्मा घणी' 'थारे धण्णे'(ही मं. भां. ची ट्रेडमार्क शिवी आहे) आणि इतर 'भूख लगी' वगैरे बेसिक वाक्यं शिकतो. एक दिवस मं. भा. प्रथमला आपले स्लमबुक भरायला देते. प्रथम त्यात फक्त सहि करतो. म. भा. नंतर स्लमबुकात ठेवलेला कार्बन कागद आणि त्याखाली ठेवलेले मरेज सर्टीफिकेट बाहेर काढते आणि विजयी चेहर्याने हसते. वि. त. प्रथमच्या मोबाइलवर फोन करते. प्रथम त्यावेळी डोकं तपासून घ्यायला डॉ कडे गेलेला आहे. मं. भा. फोन उचलते. मं. भा. : हलो, खम्मा घणी वि.त. : ए कामवाली बाई, राजस्थानीत शिव्या द्यायचं काम नाय काय?? मला प्रथमशी बोलायचं आहे. (हे सर्व ती आंग्ल भाषेत बोलते, पण सर्व थरातल्या वाचकांपर्यंत मालिका पोहचावी या उदात्त हेतूने मी हे मराठीत लिहीते.) मं. भा.: ए एलिझाबेथ,मेरी,सूझी या कोईभी अंग्रेजी सटवी, यहॉं कोई प्रथम नही, हां, मेरा बेटा तिसरीकी युनिट टेस्ट मे द्वितीय है. उसको फोन दूं क्या? वि.त.: (कचकचीत आंग्ल शिवी देऊन फोन ठेवते.) एका कमर्यात दिवे मंद करुन आणि दार लावून ब. मा. आणी म. भा. बोलत आहेत. ब. मा.: लेकीन क्या उसको विश्वास होगा? म. भा.: क्यों नही, मेरे पास मरेज सर्टीफ़िकेट है.. तितक्यात दार कर्रऽ आवाज करुन उघडते. मागे ढ्याण. कमेरा पैंजण घातलेल्या पायांवर. मग त्यावर घातलेल्या निळ्या ३ ४ जीन्सवर. मग त्यावर घातलेल्या पाठीच्या एका नाडीवर टिकून असलेल्या लाल आणि हिरव्या आरशांच्या बॅकलेस वर..मग गळ्यात अडकवलेल्या क्रॉसवर.. मग हनुवटीवर..(प्रत्येक कमेरा बदलाला एक ढ्याण.) आणी एपिसोड समाप्त. मागे जोरात ढ्याण ढ्याण!!
|
अनू, जबरी. चालू दे. 
|
Mi_anu
| |
| Monday, July 03, 2006 - 10:59 pm: |
| 
|
मी माझ्या वरील लिखाणात ॅ टंकीत केले होते पण ते उमटलेले दिसत नाहीत. तरी कृपया कमेरा मरेज इ.इ. असे उमटलेले शब्द योग्य प्रकारे समजून घ्यावेत ही विनंती.
|
अन्नु जबरी लिहिल आहेस..
|
Asmaani
| |
| Wednesday, July 05, 2006 - 12:44 pm: |
| 
|
अनु, एपिसोडचा शेवट एकदम सही रे सही.(सही सही)
|
Kashi
| |
| Wednesday, July 19, 2006 - 3:21 am: |
| 
|
आरे पुढचा एपिसोड टाका ना रे छानच रन्गत आली आहे
|
Jhuluuk
| |
| Friday, November 17, 2006 - 2:18 am: |
| 
|
अरे, काय भन्नाट मालिका चालु होती. खर्या 'क' मालिकापेक्षा मजेदार!! आता बंद का बरे झाली??
|
|
|