|
Meenu
| |
| Friday, June 30, 2006 - 2:55 am: |
| 
|
नेमेची येतो मग पावसाळा त्याचप्रमाणे दर पावसाळ्यात हे ललीतही कोणी न कोणी लिहीतच. तर या वेळी मी नंबर लावते. या लेखाच स्वरुपही साधारण ठरलेलं असतं अगदी बरोब्बर तेच ते असतं. म्हणजे पुणेकरांच्या सहनशक्तीला दाद द्यायची .. महानगरपालीकेच्या रस्ते विभाग व ईतर विभाग जे रस्त्यांची दुर्दशा होण्यासाठी मोलाच योगदान देतात त्यांना कोपरखळ्या मारणे (ज्यांची त्यांना हवाही लागत नाही तरी...). म्हणलच आहे ना ' व्यासोच्छीष्टं जगद सर्वम ' (मी म्हणते पण व्यासांनी तरी अस का कराव म्हणजे सर्व काही त्यांनीच लिहुन आमच्यासारख्या भावी अनेक पिढ्यांमधल्या so called साहित्यिकांच्या पोटावर एकदमच पाय द्यायचा म्हणजे too much हं अगदी). सांगायचा मुद्दा हा की काल बर्याच दिवसांनी कोथरुडच्या रस्त्यावरुन दुचाकीवरुन व चालत जाण्याची वेळ माझ्यावर आली (वैर्यावरही येऊ नये अशी वेळ खर तर). एकंदरीतच पुणेकरांच्या सहनशीलतेच कौतुक कीती करु असं मला होऊन गेलं. म्हणजे रस्ता नीट व्यवस्थीतपणे पावसाळ्याची वेळ बघुन खणलेला (मनपाच्या सातत्याच आणी चिकाटीचही तितकच कौतुक करावं लागेल ... ). साधारण घोट्यापर्यंत येईल ईतका चिखल आणी त्या खड्ड्यांवर खर्या झुलत्या पुलालाही लाजवतील असे झुलणारे पुल. मनपाच्या रसिकपणालाही दाद द्यावी लागेल. पावसाळ्याच्या दिवसात ईतर ठिकाणी नद्या, नाले त्यावरचे पुल वगैरे पाहण्यासाठी जनतेला पर्यटन करावे लागु नये म्हणुन ते ईथे प्रत्यक्ष अनुभुतीची सोय करतात. वा वा क्या बात है .. आमच्या ईथला बधाईचा चौक ही मनपाची समेची जागा आहे. फिरुन फिरुन त्यांचा कुठला ना कुठला विभाग तीथे येऊन खणुन ठेवतो .. कधी सुशोभनासाठिच बांधकाम करण्यासाठी, मग त्यांनी केलेलं सुशोभन हे वीज आणि टेलीफोन विभागाला अजिबात आवडलं नाही म्हणुन पुण्याला साजेस सुशोभन कराव या अतिशय निर्मळ हेतुने त्यांनी तो परत खणुन छान उंचसखल अश्या पद्धतीनी खड्डे बुझवले. सगळीकडे सारखच दिसायला हव ना ... कोथरुड, कर्वे रस्ता, सदाशीव पेठ असे सर्वच विभाग सारखे असले म्हणजे कुठेही गेलं तरी लोकांना आपल्याच घराजवळ असल्यासारख वाटतं. शिवाय कुठल्याच विभागाच्या लोकांवर अन्यायही होत नाही. तर सारांश हा की या सर्व प्रकारामुळे पुणेकरांची सहनशीलता दिन प्रतीदिन वाढत आहे .. पावसाळ्याच्या दिवसात पोहत अथवा नौकानयन करुन पुणेकर रस्ते पार करत आहेत असं काहिस स्वप्नही पडलं मला काल रात्री ................ पावसाळ्याच्या शुभेच्छा !!!! (समाप्त)
|
Jyotip
| |
| Tuesday, July 04, 2006 - 7:47 am: |
| 
|
मीनु पावसाळा आणी पुणे..उत्तम समीकरण मांडल आहेस.. अशीच लिहित रहा.. 
|
Jo_s
| |
| Wednesday, July 05, 2006 - 6:40 am: |
| 
|
मिनू मस्तच, छान लिहीलयस. ही माझी कविता वाचली आहेस का ? /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=75&post=671557#POST671557
|
मीनू, अजुन तू बधाईच्या सरळ पुढे जाऊन पुढचा चौक बघितला नाहीस का? त्या प्रसिद्ध कोपर्यावरच्या खड्याजवळच माझ घर आहे(आता पुण्यात खड्ड्याच्या खुणा द्याव्या लागतात), या खड्ड्यात एक अख्खा माणूस सायकलसकट पडला होता गेल्यावर्षी पण अजुनही परिस्थितीत काही फ़रक नाही आणि खेदाची गोष्ट अशी की या रस्त्यावर लहान मुलांची शाळा आहे. पण खरच ही सहनशक्ती की असहाय्यता?
|
Meenu
| |
| Wednesday, July 05, 2006 - 12:28 pm: |
| 
|
सुधीर मी नव्हती वाचली कविता .. पण अगदी खरय रे ... श्रुती खेदाचीच गोष्ट आहे गं .. अति झालं आणी हसु आलं म्हणुन उगीच विनोदी लिहीलय .. खर सांगायच तर मला माझाच राग येतो हे सगळ अस बघुन .. कीती तरी लोकांची उदाहरणं आहेत आपल्या समोर जस गाडगेबाबा स्वच्छतेसाठी ज्यांनी हातात झाडु घेतला .. आपण सगळे इतके महानगरपालिकेवर का dependent असतो ...? त्या त्या area मधले लोक मिळुन काही करु शकत नाही का ...?
|
|
|