|
आता नाही पुन्हा ती रिमझिम आता नाही हुरहुर मनी दाटणे आता नाही. वाहुन गेल्या वेदना.. काही जपलेल्या संवेदना... त्या... मुसळधार पावसात.. आता ते कोसळणे पुन्हा नाही..!!! भिजणे आता नाही.. भिजुन पेटणे आता नाही विझलेले क्षण ते तेवणे आता नाही.. पहिल्या पावसाची धगही आता नाही.. धगधगत्या ह्रुदयाची स्पंदने ओल्या मिठित ऐकणे आता नाही ती ओली मिठी सोडवणे पुन्हा नाही..!!! रेशमी धारात तरसणे.. आता नाही.. प्रत्येक धारेत विरघळणे आता नाही म्रुदगंध श्वासात भरुन धुंद होणे आता नाही.. मुसळधार पावसाचा जीवास घोर आता नाही... ती सखी पुन्हा भेटणे आता नाही..... ती पुर्वीची सखी पुन्हा भेटणे आता नाही...!!!
|
जया,रुपाली,मृदा,अद्वैत,सुधीर,प्रिती,देवा,दिनेश,स्वरा,बनी,अमेय अणि नादमय.. धन्यवाद.. !!!
|
Jayavi
| |
| Wednesday, June 28, 2006 - 5:34 am: |
| 
|
आई गं लोपा, नुसती पेटली आहेस खूप सुरेख! लिहीत रहा गं...... ठिणगी चांगलीच पेट घेतेय. सारंग, एकदम भिजवून टाकलंस रे! मस्त!
|
लोपा कविता मस्तच.. सारंग एकदम सुंदर...
|
Sarang23
| |
| Wednesday, June 28, 2006 - 5:51 am: |
| 
|
मृदा, सुधीर, नादमय, अमेय, जया, रुपाली धन्यवाद! लोपा, भावना छान आहेत!
|
R_joshi
| |
| Wednesday, June 28, 2006 - 6:05 am: |
| 
|
लोपा कविता फारच छान लिहितेस
|
जया.. अग मी कच्चा लिंबु आहे तुम्च्यात अजुन.....!!!!
|
Meenu
| |
| Wednesday, June 28, 2006 - 6:43 am: |
| 
|
लोपा मस्त गं छान लिहीलयस
|
Sarang23
| |
| Wednesday, June 28, 2006 - 7:19 am: |
| 
|
चिमणीच पिल्लु "बरं वाटतय का रे तुला?" अस म्हणत खिडकीकडे पहात कळवळतेस एकाएकी... "अरेरे, अरे चारच दिवसांत कसं जळालं हे झाड? नुक्तच तर घरट बांधल होत ना चिमण्यांनी!? आणि किती छान पिल्लु पण चिवचिवत होतं रे..." खिडकीपाशी जातेस आणि हरवतेस... किमान तासभर तरी तिथे उभी रहातेस कसला एवढा विचार करतेस कोण जाणे? आणि क्षणात काही झालच नाही अशा अविर्भावात म्हणतेस जाऊ दे झाल ते झाल, आणि वळतेस... माझे डोळे डबडबलेले असतात, मग बावळट म्हणतेस मला... हलक्या आवाजात, पुर्वी हळवा म्हणायचीस! अचानक माझा खोकला उफाळून येतो आणि तुझा त्रासलेला चेहरा पाहून लालबुंद चेहरा देऊन निघून जातो थोडा वेळ भांड्यांचा आवाज... मग तू येतेस स्वच्छ आवरून! सगळी मरगळ झटकून!! म्हणतेस "अरे सोडून दे रे झालं गेलं ते सगळ बघ, कालच्या दिवसाबरोबरच गेलं चूक कुणाची हे आता कशाला उगाळायचं?" तुझं हे उत्तर ऐकून, मग पुष्कळ सांगावसं वाटतं... "जा जरा झाडाच्या पुढ्यात बघ, बघ मुंग्या पोखरतायत चिमणीच पिल्लु..." सारंग
|
Maudee
| |
| Wednesday, June 28, 2006 - 7:34 am: |
| 
|
सारंग छान लिहिलं आहेस पण मुंग्या पोखरतायत चिमणीच पिल्लु... - इतकं वास्तव नका रे मांडू शब्दात पेलणं कठीण जातं 
|
सारंग अगदी डोळे भरुन आले.
|
Chinnu
| |
| Wednesday, June 28, 2006 - 9:07 am: |
| 
|
सारंग अगदी नेटाने लिहिताय! ही आणि आदल्या पानावरची पण छान आहे. लोपा रात आणि दिवसाची प्रीतिभेट घडवलीस रात्र मध्ये. छान आहे.
|
Swaroop
| |
| Wednesday, June 28, 2006 - 10:26 am: |
| 
|
सारंग खुप छान लिहलीयस रे ही कविता.... शेवट तर अगदी.. व पु काळ्यांच्या कथांच्या शेवटासारखा..... चटका लावणारा....
|
Lampan
| |
| Thursday, June 29, 2006 - 12:12 am: |
| 
|
सारंग ... मस्तं लिहिलयस !! माचीवरला बुधाची आठवण झाली ...
|
Ninavi
| |
| Thursday, June 29, 2006 - 12:22 am: |
| 
|
सारंग, सुंदर. पुनरागमन दणक्यात आहे अगदी!! ( तू पण निळाच का? मला आता नवीन रंग शोधायला हवा. ) लोपा, छान गं.
|
लोपा.... दोन्ही कविता फारच सुन्दर. सारन्ग, पावसाच्या खूप कविता येतात दरवर्षी, छत्र्यांसारख्या. तुझी कविता उठून दिसते. -बापू
|
Jayavi
| |
| Thursday, June 29, 2006 - 4:59 am: |
| 
|
मन मन उनाड पाखरु त्याची कशी भिरभिर उडे क्षणात नभात कधी सूर पाचोळ्यात मन मोठं सुपापरी कधी ससा तो सानुला कधी आकळे सकला कधी नाकळे कुणाला मन रंगांची भिंगरी खुले इंद्रधनुपरी कधी उदास एकली भासे सावळी सावळी सोडवावे कशाला हे कोडे मनाचे मनाचे न्हावे रंगात तयाच्या गीत गावे त्या रंगाचे
|
रेल्वेच्या डब्यातून वाकून पाहिलं रुळांच्या अगदी जवळच एक खुरटं काटेरी झुडुप होतं वारा नव्हता; झुळुक नव्हती तरीसुध्दा डुलत होतं वाळू दगड बांधकामाचे खांब अवती भवती विखुरले होते तरीसुद्धा एकटच कसं खुलत झुलत हलत होतं जवळच असलेली गवताची पाती इतर काही काटेरी झडती आश्चयाने पहात होती कसला आनंद असेल त्याला? असेल ते नुकतंच वयात आलेलं आणि सगळंच सुंदर भासत असलेलं कदाचित जवळचा दगड, बांधकामाचा खांब गुणगुणत असेल पावसाचं गाणं नुकत्याच आलेल्या रिपरिप पावसानं अंग अंग मोहरलं असेल कि असेल ते मलाच खुणावत जीवनाचं गाणं माझ्यासाठीच गात...
|
मन रंगांची भिंगरी खुले इंद्रधनुपरी कधी उदास एकली भासे सावळी सावळी>>>....जयावी काय छान उपमा दिल्यात मनाला... नाजुक कविता अगदी..!!!
|
Sarang23
| |
| Thursday, June 29, 2006 - 8:13 am: |
| 
|
प्रश्न "झाडे रडतात का रे माणसासारखी?" "नाही रे माझ्या राजा, ती काय माणसं आहेत?" असल्या फालतू उत्तरावरही मान डोलवत, गालाचा चंबू करुन सगळं काही कळल्याचा आव आणून तो आईकडे गेला... परत काही तरी आठवून म्हणाला "मरण म्हणजे काय रे?" क्षणभर सुन्न झाल्यावर, मी म्हणून गेलो - "गाढ झोप!" अन मग न राहवून मी बोललो, "आता आईला प्रश्न विचार हं." ...मग रात्री कधीतरी दचकून जागं झाल्यावर, परत झोप आलीच नाही... "भाकरी कशी तयार होते ग आई?" आणि त्याची आई सांगत होती- कानठाळ्या बसणार्या आवाजात... "झाडासारखं न रडता रोज रोज मेल्यावर... झाडासारखं न रडता रोज रोज मेल्यावर..." सारंग
|
|
|