Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
मी, अन्या आणि लग्न वगैरे... ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » कथा कादंबरी » मी, अन्या आणि लग्न वगैरे... « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 04, 200620 07-04-06  7:59 am

Lampan
Wednesday, July 05, 2006 - 12:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकांना फार वेळ वाट पहायला लावल्यामुळे हा thread बंद करण्यात येत आहे ......

Shraddhak
Wednesday, July 05, 2006 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" सन.. ही घे कॉफी. " अन्याने माझ्या हातात एक मग देत पुन्हा दिवाणावर बसकण मारली. अन्याचा मूड कसाही असो, कॉफी नेहमीच अप्रतिम असते. अन्याचं लक्ष माझ्या हातातल्या मासिकावर गेलं.

" काही विशेष लेख वगैरे? "
" अं हं... नेहमीचेच टॉपिक्स! आवर्जून वाचावा असा कुठला लेख नाही. तुझा मूड नॉर्मलला आला का पण? "
" घ्या... माझ्या मूडला काय झालं होतं? "
" अन्या नाटकं करू नकोस. मघापासून आपण ज्या विषयावर discuss करतोय त्याने तुझा मूड गेलाय. खरं की नाही? "

अन्याने पहिल्यांदाच इतक्या कमी वेळात पराभव मान्य केला.
" खरंय सन... माझा मूड खरोखरच गेलाय. "
" पण हा तर न टाळता येणारा विषय आहे नं अन्या? मग तू दरवेळी का मूड घालवतोस यावरनं? "
" मलाही नक्की नाही सांगता येत. मे बी, ज्या पद्धतीने माझ्या बाबतीत हा विषय हाताळला जातोय, ती माझ्या पचनी पडत नाहीये. "
" बापरे, तुझ्यासारख्या उत्तम पचनशक्ती असलेल्या माणसाच्या देखील ' पचनी ' न पडणारी गोष्ट म्हणजे भलतीच हेवी असणार. "
" सन, अगदी टुकार PJ मारू नकोस. " बापरे! दिवसातनं दुसर्‍यांदा अन्या गंभीर मूडमध्ये चालला होता. ही लक्षणं खरोखर चिंताजनक होती.
" बरं अन्या, चुकलं. थांबवूयात इथे हा विषय आपण! पण एक सांगते, आपण आपल्या ग्रुपमध्ये जरी यावर विचार करायचा नाही असं ठरवलं तरी अविनाशकाका तो विषय काढायचं थांबवणार नाहीतच! "
" तेच तर.. त्यांना किती वेळा सांगितलंय की मी माझं पाहीन काय ते! पण ते ऐकायलाच तयार नाहीत. सन, तू सांगशील का त्यांना समजावून प्लीज? तुझं ते बर्‍यापैकी ऐकतात. "

बापरे! अविनाशकाकांशी बोलायचं तेही अन्याच्या लग्नासारख्या त्यांच्या अतिजिव्हाळ्याच्या विषयावर????? तसे ते फार छान आहेत स्वभावाने, अन्या म्हणाला त्यातही बरंच तथ्य आहे.. अन्यापेक्षादेखील ते माझं कधीकधी जास्त ऐकतात. पण म्हणून या विषयावर त्यांच्याशी बोलायचं धैर्य मला होईल असं वाटेना. इकडे अन्या अपेक्षेने माझ्याकडे बघत होता.

" अन्या, मला एकच सांग, त्यांना तुझी बाजू पटवून देण्यासाठी कारण काय सांगू? "

अन्या विचारात पडला. आधीच त्याला भरल्या पोटी विचार करता येत नाही. त्यातून दोन प्लेट गाजर का हलवा पोटात असल्यावर अन्याला काहीही व्यवस्थित सुचणं अशक्य! आताही त्याचं लगेचच प्रत्यंतर आलं.

" तू त्यांना सांग, की मुलांसाठी २५ हे लग्नाचं योग्य वय नाही म्हणून! "

ते ऐकून मी परत हसायला लागले आणि अन्या चिडलाच...
" तुला हसू येणारच सन.. तुझ्या मागे कोणी असा धोशा लावला नाहीय ना अजून! तेव्हा तुला हसू येणारच! "
अन्याचा तो तीव्र स्वर ऐकून मी एकदम चपापले.

" अन्या, माझ्या मागे कुणी धोशा लावला नाहीय लग्नाचा हे खरंय. खरंतर धोशा लावायला देखील कुणी नाहीय ही वस्तुस्थिती आहे. डॅड त्यांच्या कामात गुंग असतात. त्यांचं बाकी गोष्टींशी फारसं घेणंदेणं नाही. मॉम असती तर एव्हाना तिने माझ्या लग्नाची चिंता सुरु केली असती, पण तीच नाही म्हटल्यावर... "

मी एकाएकी गप्प झाले. ' मॉम नाही ' या विषयावर बोलताना मला कधीकधी अवघड जातं अजूनही. ती गेली तेव्हा मी सहावीत होते. त्यानंतर बराच काळ कुठलीही गोष्ट नीट झाली नाही की ' मॉम असती तर.. '( सगळं व्यवस्थित झालं असतं), या विचाराच्या आधाराने मी घालवला. नंतर माझी मीच प्रत्येक गोष्ट सांभाळायला शिकले. मॉम नसल्याची जाणीव हळूहळू कमी व्हायला लागली. मग आज या विषयासंदर्भात बोलताना तिची उणीव प्रकर्षानं का बरं जाणवावी? गप्प झालेल्या माझ्याकडे बघून अन्या बराच निवळला होता.

"I am sorry San... माझ्या बोलण्यानं दुखावली गेलीस तू. "
" जाऊ दे रे अन्या.. होतं असं कधी कधी. आणि तसंही माझाच वेडेपणा झाला तो. मॉमला जाऊन इतकी वर्षं झालीत... त्यामुळे मॉम असती तर.. च्या विचारांना अर्थच राहिला नाहीय... "

पण अन्याचं लक्ष माझ्या बोलण्याकडे कमी आणि खिडकीबाहेर जास्त असावं बहुधा! एकदम तो किंचाळलाच.
" सन, आभाळ कसलं भरून आलंय बघ. "

खरंच की! बाहेर आभाळ गच्च भरून आलं होतं...

क्रमशः


Bee
Thursday, July 06, 2006 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chhan khup chhan flow aahe kathecha. matra khup ushir kelas pudhala bhag lihayala.

Manutai
Friday, July 07, 2006 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Shraddhak, Katha changli ahe ani oghwatihi. Pan gap khup padla ki link tutte. Please complete as early as possible. Pushkal vachak utsuktene vaat baghat ahet.

Ninavi
Saturday, July 08, 2006 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र, मस्त लिहीत्येस गं, पण पुढे लिही की पटापट.

आणि मला पण ह्या दोघांचंच जुळायची लक्षणं दिसतायत.


Rachana_barve
Tuesday, July 11, 2006 - 8:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र का थांबलीस? लिही की पुढे :-) छान लिहिते आहेस

Fulpakhru
Tuesday, July 11, 2006 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र लवकर येऊदे ग पुढचे

छान लिहिते आहेस


Parinita
Wednesday, July 12, 2006 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए किति मस्ते गोष्ट. मला अंदाज की अन्या तिलाच प्रोपोज करनार. हो ना ?

Fulpakhru
Wednesday, July 12, 2006 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मलाही तसच वाटतय
श्र लवकर टाक न ग पुढचा भाग


Shraddhak
Thursday, July 13, 2006 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड्स, कृपया हा BB लॉक करता येईल का? कारण सध्यातरी मला ह्या कथेचा पुढचा भाग टाकणं जमत नाहीये.
धन्यवाद.


सॉरी लोक्स. :-(






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators