|
Meenu
| |
| Thursday, June 22, 2006 - 12:12 pm: |
| 
|
अजुनही अर्थ आहे थोडी आशा ठेवायला ... अळवाच्या पानाकडुन शिकतेय मीही , कोरडं रहायला ... आता बरसु दे पाऊस भुतकाळातल्या सार्या क्षणांचा , येऊ दे वादळ तुझ्या आठवांचं , मी तटस्थपणे पाहणार त्यांच येणं जाणं .... जमेल मलाही लवकरच वर्तमानाशी प्रामाणिक राहणं ...
|
Meenu
| |
| Thursday, June 22, 2006 - 12:22 pm: |
| 
|
वा: मिनू. पण अर्धी-अर्धी का वाटत्ये कविता? I mean काहीतरा सघन फील येत असतानाच थांबते! >> हो मलाही असच वाटल पहिल्यांदा वाचताना .. पण विचार केल्यावर मला अस वाटलं की एवढच सांगायचय मला. अजुन काही lines add केल्या तरी अर्थ ईतकाच आहे .. आणि त्याहुन महत्वाच म्हणजे खोलात शिरणं सोडुन दिलय ना ....
|
Shyamli
| |
| Thursday, June 22, 2006 - 12:24 pm: |
| 
|
वा!!! मीनु....क्या बात है स्वरूप.. आवडली अभय....
|
Ninavi
| |
| Thursday, June 22, 2006 - 12:56 pm: |
| 
|
वा, अभय! सुंदर. अर्थ आणि लय दोन्ही मस्त साधली आहेस. वैभव, तुझ्या लौकिकाला साजेशी अजून एक कविता आहे ही. विशेषतः ' कुशीत तर घ्यायचं पण झोपू द्यायचं नाही...' सुंदर!! मीनू, ' पाऊस नाही कोसळला की झालं' आवडली मला. झाड, मनापासून धन्यवाद. खूप छान अर्थ आहे हा. ध्रूव, आभारी आहे. पण शब्दार्थ कळूनही मी कविता समजून घेण्यात कमी पडत्ये, म्हणून अभिप्राय नाही देऊ शकत आहे. अभयची कविता वाचून माझी एक जुनीच आठवली ती टाकत्ये. फुलाफुलांच्या रांगोळीवर फूलपाखरू अलगद बसले आखीव रेखीव चित्र जणू ते विसकटताना उगाच हसले रंगांचा रेषांचा आणिक डौल बिघडला जरी आकृतिचा स्पर्श हवासा वाटे तरिही अचेतनाला चैतन्याचा उडे पाखरू लेवुनी पंखी नकळत थोडे कण रंगांचे रांगोळीला आणिक लेणे इवल्या त्याच्या पदचिन्हांचे..
|
Dineshvs
| |
| Thursday, June 22, 2006 - 1:17 pm: |
| 
|
मीनु मला " अजुनहि अर्थ आहे, " खुप आवडली. मला हे असे खंबीर राहणारे लोक नेहमीच आवडतात.
|
Dhruv दोन्ही कविता मन लवून, पुन: पुन्हा वचाव्या आणि विचार कराव्या अशा होत्या. Minoo, दोन्ही कविता छान, हळुवार आणि भावपूर्ण. बापू
|
मला तू... तुला मी... किती आवडावे मला तू... तुला मी... तरी का छळावे मला तू... तुला मी... जसा चातका आठवे पावसाळा तसे आठवावे मला तू... तुला मी... सखे पारिजाता सवे देत राहू हळू हेलकावे मला तू... तुला मी... सदा दर्पणी पाहतो एकमेकां अता ओळखावे मला तू... तुला मी... जगू ग्रीष्मही हा वसंताप्रमाणे ऋतू पांघरावे... मला तू... तुला मी... जसा हात द्यावा धरेला नभाने तसे सावरावे मला तू... तुला मी... जिथे प्रेम आहे, तिथे ईश आहे सदा आळवावे मला तू... तुला मी...
|
Chinnu
| |
| Thursday, June 22, 2006 - 11:16 pm: |
| 
|
प्रसाद, गोड गाणच आहे रे हे! खुप छान वाटलं वाचुन.
|
Ninavi, रांगोळी ग्रेटच आहे, खूप आवडली. 'अचेतनाला चैतन्याचा स्पर्श '... एका साध्या प्रतिमेला खूप वेगळे परीमाण दिलेय. बापू
|
Meenu
| |
| Friday, June 23, 2006 - 12:13 am: |
| 
|
निनावी, बापु, दिनेश, श्यामली, अभय धन्यवाद .. वा प्रसाद खरच चिनुनी म्हणल्याप्रमणे हे एक गोड गाणे आहे ...
|
वैभव भई वाह मीनु सही गं.. निनावि मस्तच.. प्रसाद नेहमीप्रमाणेच सुंदर रोज रात्रीचा अंधार त्या शांत आणि भयावह कोशामधून मी रोज बाहेर येण्याचा प्रयत्न करतो पण तेंव्हा रक्तिम उगवतीचं रूपही विषण्ण वाटत असतं त्या दिशेकडून येणारे पक्षीही ज्वालामुखीच्या भितीने घाबरतात उडतात आपले प्राण पणाला लावून त्यांचे चित्कार भंडावून सोडतात रानाला तो वातावरणाचा थंडपणा रूतत जातो सर्वांगात बधीर करतो प्रत्येक संवेदना मग कुठूनतरी एक हुंकार ऐकु येतो एका दशग्रंथी खर्जामधला आणि पिसावलेलं माझं मन शोधत रहत त्या हुंकाराचं मूर्त रूप एखाद्या कस्तुरी मृगासारखं
|
Jyotip
| |
| Friday, June 23, 2006 - 12:46 am: |
| 
|
मीनु सहि ग़..... वैभव, प्रसाद, निनावी,देव...छान 
|
साजणा.... जरा थांब ना साजणा, नको नको ना जाऊस बघ सुटला गारवा, आता येईल पाऊस आता येईल पाऊस, रिमझिम गाणे गात घे ना तू ही लपेटून, मला तुझ्या वर्षावात मला तुझ्या वर्षावात, कर भिजरी बावरी लकाकून जाता जाता, झाली वीजही लाजरी झाली वीजही लाजरी, इंद्रधनु लपेटून आणि विखुरली खाली, अलगद उतरून अलगद उतरून, सार्या चांदण्या सांडल्या मखमली पायघड्या, सांग कुणी रे मांडल्या सांग कुणी रे मांडल्या, गात सांजवेळी गाणी नको जाऊ रे साजणा, जप डोळ्यांतले पाणी जप डोळ्यांतले पाणी, अन फिर ना माघारी असा निघून तू जाता, कोण उरेल देव्हारी.
|
Meenu
| |
| Friday, June 23, 2006 - 1:47 am: |
| 
|
सुमती सुंदरच आहे हे .. शेवटची अर्धी ओळ उचलुन पुढे नेणं खुप छान वाटतय वाचायला फक्त " सांग कुणी रे मांडल्या, गात सांजवेळी गाणी " ही ओळ जरा अर्थाच्या दृष्टीने गडबडलीये असं वाटतय मला .. बाकी छानच !!!
|
Zaad
| |
| Friday, June 23, 2006 - 2:47 am: |
| 
|
मीनू,'अजूनही अर्थ आहे' खूप आवडली. निनावी, रांगोळी ने इंदिरा संतांच्या कविता आठवल्या. खरंच खूप मस्त आहे. प्रसाद आणि सुमती, खूपच छान!! देवदत्त, छान जमली आहे कविता...
|
Manasi
| |
| Friday, June 23, 2006 - 5:59 am: |
| 
|
स्वरूप छान. अभय फूल कविता खुपच गोड आहे. आणि निनावी रान्गोळी खरेच अप्रतिम. फक्त 'डौल बिघडला जरी आकृतिचा' हो ओळ जरा मोठी वाटतेय. 'स्पर्श हवासा वाटे तरिही अचेतनाला चैतन्याचा ' हे तर फारच सुन्दर आहे. प्रसाद, सुमती छान.
|
Manasi
| |
| Friday, June 23, 2006 - 6:10 am: |
| 
|
मला वाटते सुमतीच्या कवितेतील " सांग कुणी रे मांडल्या, गात सांजवेळी गाणी " याचा अर्थ सांजवेळी गाणी गात कुणी चांदण्या मांडल्या (पायघड्या प्रमाणे)असा असावा. बरोबर आहे का सुमती?
|
वा एकाहुन एक वरचढ कविता!!!कोणाकोणाचे नाव लिहावे असा प्रश्न पडतो..सगळेच छान.. निनावी,वैभव आणि इतरही रसग्रहण करतात त्यामुळे आनंद द्विगुणीत होतोय...
|
Ninavi
| |
| Friday, June 23, 2006 - 6:37 am: |
| 
|
धन्यवाद, दोस्त्स. मानसी, मी जशी म्हणून बघत्ये ती लय त्याप्रमाणे ती ओळ बसत्ये असं वाटतंय. चुभूद्याघ्या. प्रसाद, गज़ल छान आहे. हळुवार. सुमतीताई, मला ' नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी माझे घर चंद्रमौळी आणि दारात सायली' ची आठवण झाली. आधीच्या अर्ध्या चरणाने पुढची द्विपंक्ती पुढे चालवायची कल्पना आवडली. देवा, काय झालं एवढं विषण्ण व्हायला? 
|
Sania
| |
| Friday, June 23, 2006 - 7:53 am: |
| 
|
निनावी, कविता छानच जमल्ये, एक साधी कल्पना खूपच छान मांडल्येस. अचेतनाला स्पर्श चैतन्याचा ही कल्पना खूप आवडली.
|
|
|