|
Ninavi
| |
| Tuesday, June 20, 2006 - 12:10 pm: |
| 
|
>>>> त्या क्षणाचा मी, त्या क्षणाची ती... >>>> हुलकावणार्या उत्तरांच्या मागे, कविने धावायचे. क्या बात है!
|
Meenu
| |
| Tuesday, June 20, 2006 - 12:36 pm: |
| 
|
अपराध कधी, कोणता नव्हताच केला, झाले आरोप तरी, बचावहि नव्हता केला. मीच माझ्या मला, खूप सुनावल्या शिक्षा, जीवनाकडून केंव्हा केली न्यायाची अपेक्षा? >>> वा बापु सुंदर
|
Aparna, Simply Great. Zaad, अरुण कोलटकरांची आठवण करून देणारी कविता. ह्याहून मोठा compliment मी तरी देउ शकत नाहीये. Ninavi, Meenu, आभार! बापू
|
Yog
| |
| Tuesday, June 20, 2006 - 2:06 pm: |
| 
|
Zaad, मस्त लिहीली आहेस कविता, शेवट तर खासच!
|
माझी एखादी कविता आलो होतो मी कुठे, सांगायला तुम्हाला की मी लिहितो, तुमच्यासाठी? पण भेटलोच आहोत तर, थांबा की जराशी, वाचून पहा, माझी एखादी कविता? नका बसू लावत अर्थ तिचे अशानेच होतात अनर्थ अर्थांचे. निरर्थक प्रवासाची जुजबी टिपणे, तेव्हढ्याच निरर्थक अव्याहताची. करून तिरपी सुरई चांगली, घ्याल भरून प्याला काठोकाठी, हाता-तोंडाशी लावण्या खारे चणे, जोडीला तशाच माझ्या रुबाया-गज़ला. जाईल चढत घेऊन ती वरवर, जशी विस्मृतीच्या हल्लक ढगांवर तरंगाल, तुम्ही जेंव्हा, किंवा इरसाल ती बया उतरेल,बघता बघता, वास्तवाच्या पोकळीचा मस्त सपका बसून फुटेल थोबाड, रक्त येइल, तेंव्हाही असू द्या सोबतीला, माझी एखादी कविता. तेवढंच बरं वाटेल, जीवाला. -बापू
|
सॉरी दोस्तहो, 'माझी एखादी कविता' मधल्या दोन ओळी टाईप करायच्या राहून गेल्या. "तेव्हढ्याच निरर्थक अब्याहताची" नंतरच्या दोन ओळी अशा आहेत:- "अथांग, अनंत पसरट रेतीवरची, बडेजावी पाऊले, एका हव्यासाची" तसं पाहू गेलं तर ह्या दोन ओळींनी (किंवा संपूर्ण कवितेनेही) फारसा फरक पडत नाही, तरीही. -बापू,
|
बापू,अगदी अगदी... कविता मस्त अपर्णा,झाड सहीच
|
Aparnas
| |
| Wednesday, June 21, 2006 - 12:20 am: |
| 
|
मानसी, मुक्तछंद, बापू, मयूर सगळ्यांना मनापसून धन्यवाद... बापू मी पण करंदीकर च आहे माहेरची
|
बडेजावी पाऊले, एका हव्यासाची" vaa kaay chaan lihiley.. baapu aajun baakichaa maahaapur vaachalaa naahii, vaachate ni pmag prateekriyaa dete.
|
Naadamay
| |
| Wednesday, June 21, 2006 - 3:59 am: |
| 
|
चांगले लिहिलेय बापू, `वास्तवाच्या पोकळीचा सपका बसून.."
|
पुसटतं आयुष्य म्हणजे कुणी आपलं वाटत नाही थांबलेलं वाटलं तरी संपलं वाटत नाही दुखत असलं खूप तरी दुखलं वाटत नाही वर्षाव झाला अगदी तरी शिंपलं वाटत नाही खोल खोल गेलं तरी रूजलं वाटत नाही आपलं आपलं म्हणतानाच परकं वाटत रहातं कितीही सांभाळलं तरी पोरकं वाटत रहातं गडद गडद केलं तरी भुरकं वाटत रहातं कुठेतरी चुकतंय असं सारखं वाटत रहातं शोधावं म्हटलं तर मिळत नाही जुळवावं म्हटलं तर जुळत नाही पुसटतं आयुष्य... म्हणजे काय ते कळत नाही.
|
antyaachii saamaajik kavitaa khup aavadalii, jhaad,meenu,naadamay,archanaa,aprnaa,mansii, ekaahun ek varachadh kavitaa aahet.!!!
|
Manasi
| |
| Wednesday, June 21, 2006 - 8:33 am: |
| 
|
वा अर्चना छान. गडद गडद केलं तरी भुरकं वाटत रहातं ... बापू तुमचि कविता पण आवडली बडेजावी पाऊले, एका हव्यासाची... खरेच छान आहे
|
Zaad
| |
| Wednesday, June 21, 2006 - 8:43 am: |
| 
|
अमेय, योग, मयुरेश, लोपा प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! निनावी, खरंय. चित्रकवितेतही चालली असती ही कविता. मी आधी पाहिलं नव्हतं ते चित्र. प्रभाकर, प्रतिक्रिया खूपच मोठी आहे रे तुझी... पण खरं सांगायचं तर मलासुद्धा ही कविता लिहून झाल्यावर कोलटकरांचीच आठवण झाली! आता ह्या कवितेबद्दल थोडंसं.... एका अज्ञात निराकार शक्तीला माणूस मानत आलेला आहे. त्या शक्तीला माणसाने 'आपापला देव' ह्या संकल्पनेत गुंफून धर्माची एक 'तीक्ष्ण' परंपरा निर्माण केली. ही परंपरा तीक्ष्ण एवढ्यासाठी की माणसाच्या या (धार्मिक) भावनांना एक प्रखर धार आहे. तिच्या वाटेला कुणी गेलं तर प्रसंगी रक्तपातही होऊ शकतो हे सिद्ध झालं आहे. ही परंपरा कधीतरी कोलमडून पडेल असं मला वाटलं, कारण ह्या परंपरेत ईश्वरच दिसेना झाला... पण धर्माच्या या भिंती इतक्या कट्टर की, उंच दरीतून खाली सोडलेले फोलपट जसे खाली न जाता वर वरच येत राहते तशी माणसाने आपापली 'देव' ही संकल्पना उचलून धरली. परंतु जेव्हा मी या शक्तीला सर्व परंपरेतून मुक्त करून पाहिलं, ही शक्ती चराचरात पसरली असल्याची जाणीव मला झाली. फक्त चिमटीतून निसटलेल्या उन्हाप्रमाणे, मी ती धरून ठेऊ शकत नाही. ईश्वराच्या अमूर्त, निराकार रुपाची कितीही जाणीव असली तरी त्याला मूर्त रुप देण्याची माझी सनातन भूक मला टाळता येत नाही. कुणावर तरी भक्ती असावी, श्रद्धा असावी अशी प्रत्येकच माणसाची मुलभूत प्रेरणा असते. या प्रेरणेतूनच आपण त्या शक्तीला निरनिराळ्या रुपात पाहत असतो. आणि 'भगवंत'ही आपल्या याच भक्तीसाठी भुकेला असतो!!! फक्त होतं असं की, या प्रत्येक गोष्टीची एकेक परंपरा निर्माण होते आणि माणूस मूळ हेतू विसरून परंपरेवरच प्रेम करायला लागतो. परंपरेचा अनाठायी दुराग्रह विसरून खर्या भक्तीभावाने येणार्या भक्तासाठी पांडुरंग विटेवर उभा राहून वाट पाहत आहे...
|
Zaad
| |
| Wednesday, June 21, 2006 - 8:49 am: |
| 
|
बापू, दोन्ही कविता आवडल्या. अर्चना छानच! अमेय, "श्री तशी सौ" मधली ती कविता मला कुठे मिळेल?
|
Manasi
| |
| Wednesday, June 21, 2006 - 8:54 am: |
| 
|
एकाकी अर्ध्या वळणावरि सोबती जुळवित जाती नातीगोती परि पाहता मागे वळुनि सावलीच ती पडते दृष्टी कधी भावे संगती कुणाची मनी कामना सहवासाची कधी नित्य सहवास असोनि साथ तयाची जाई विरुनि असो साथ वा असो संगती अंती तर कायाही परकी अज्ञाताचे प्रवासी आपण आधारास हे एकाकीपण
|
Zaad
| |
| Wednesday, June 21, 2006 - 9:10 am: |
| 
|
मानसी अप्रतिम आहे कविता!!
|
Vaibhu
| |
| Wednesday, June 21, 2006 - 10:37 am: |
| 
|
अर्चनामन्दार छान कविता आहे
|
Archana, Manasi, छान अर्थघन कविता आहेत. Zaad, Lopa, Manasi, आभार. बापू
|
Archana, Manasi, छान अर्थघन कविता आहेत. Zaad, Lopa, Manasi, आभार. बापू
|
|
|