Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
फुटबॉल... दुसरे काय? ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » ललित » फुटबॉल... दुसरे काय? « Previous Next »

Yog
Wednesday, June 21, 2006 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फुटबॉल च्या निमित्ताने..

महाराष्ट्राच्या (किम्बहुना भारताच्या) राजकारणात एक तरी "पुरुष" नेता शिल्लक आहे तर. अन्गावर येणारे प्रश्ण सतत टोलवू पाहणार्‍या अपाल्या सारख्या खास मध्यमवर्गीय हिन्दूला त्यान्नी अगदी उचित वेळी हाक दिली आहे. आता हा विटी "दान्डू" बन्द करून हातात खरे दान्डूके घ्यायची वेळ लवकरच येणार (छे आलीच आहे) यावर पूर्ण विश्वास आहे.
आपल्याला तसाही पुन्हा एकदा फुटबॉल फ़िवर जडलाच आहे नव्हे मला तर वाटत त्या फुट्बॉल मधे अन आपल्यात काहीच फ़रक नाही. या तन्गडीतून त्या तन्गडीवर, लाथा खात नुसत फ़ुटायच अन रापायच. बघे टाळ्या पिटतात, करोडोनी लोक त्या भावनेच्या हौदात रात्रन्दिवस डुम्बत रहातात (अर्थात युरोपात साध्या नाही तर "रन्गीत" पाण्याचे हौद असतात, हव तर डॉ. चम्पक ला विचारा) अन त्यातून एका गटाचा विजय झाला की सर्व कस परत नेमेची येतो उन्हाळा या न्यायाने चालतं.

मूठभर मूर्ख राजकारण्यानी सध्ध्या तर एकावर एक होम गोल करून आपल्या देशाला कधीच चारी मुन्ड्या चीत केले आहे अन त्यान्च्या पायावर चढलेले हिरवे मोजे अन अधाशागत तो होम गोल गिळायला हपापलेले हिरवे गोली या भयावह fixing पुढे तो तिरन्गा किती दिवस स्पर्धेत टिकेल देवालाच माहीत.("सबका मालिक एक",तो एकच आहे, मग त्यालाही अलिकडे प्रश्णच पडला असावा की या खेळात रेफ़री म्हणून कुणाच्या बाजूने शिट्टी फ़ुन्कावी?) एकीकडे आरक्षणाचा बडगा अन दुसरीकडे वन्दे मातरम चा फ़तवा, हि कुठली हरितक्रान्ती आमच्या घशात कोम्बली जात आहे? असे किती वर्ष अजून आम्ही फुट्बॉल सारखे इकडून तिकडे अस्तित्वहीन होवून घरन्गळणार आहोत? का ढोणि आणि कम्पनीने कधी चुकून दाखवलेल्या सातव्या आसमानातच आम्हाला समाधानी आहे अन जमिनीवरील उघड दिसत्या, उडणार्‍या, चामड्याच्या चिन्धड्या बघायला आम्हाला फुट्बॉल एव्हडे मोठे डोळे हवे आहेत?
बचेन्गे तो और भी लढेन्गे म्हणणारे दत्ताजी, अभी नही तो कभी नही म्हणणारा मन्गल पान्डे, बैलागत तेलाचे घाणे ओढणारे स्वातन्त्र्यवीर सावरकर, कारगिल मधे ये दिल मान्गे मोर म्हणत मृत्त्यूला कवटाळणारे आमचे वीर, काय हा फ़ुटबॉलचा निर्ल्लज खेळ बघायला शहीद झाले?
आज अमेरिकेत इतक्या मशिदी आहेत पण एकाची हिम्मत आहे का चार चौघात भर दिवसा दुपारी रात्री बान्ग द्यायची? मग इथे आणि इतर परकीय राष्ट्रात गुमान आपल्या चार भिन्तीन्मधे राहणारे अल्लाके बन्दे भारतात एव्हडा माज दाखवतात कसे? भारत हे स्वतन्त्र हिन्दू राष्ट्र आहे का..? स्वातन्त्र्याची एक लढाई ब्रिटीशान्विरुध्ध झाली अन आता ही दुसरी कुणाबरोबर? स्वताच्या घरातले तर सोडाच अमेरीका अन इतर त्यान्ची रखेल राष्ट्रे,"हम सब खतरेमे" अशी उलटी बान्ग देवून इराक, अफ़घाणीस्तान ला बेचिराख करत सुटले आहेत, त्यान्च्या देशात घुसून त्यान्च्यावर सगळा आण्विक कचरा फ़ेकत आहेत अन हिन्दू मेजॉरिटी (?) असलेल्या देशात काय होते तर गली मुहल्ल्यातून अतीरेक्यान्शी "इमाम" ठेवणारे मूठभर सत्ताकारणी, इतर पासष्ट, का पन्नास का चाळीस करोड(आकडा क्रमाने घटतोय) गोन्धळलेल्या हिन्दून्च्या तोन्डावर नुसत्या फ़्री किक्स मारत आहेत (एकावर एक फ़्री या आजकालच्या मॉल संस्कृतीचा तर यात हात नाही ना?)अन आम्ही वाट पहातोय कधि एकदा आम्हाला पेनल्टी कीक मिळतीये याची? या मित्र राष्ट्रान्ची नजर आता इराण वर पडतेच आहे. एक वेळ अशी येईल की तिकडे थप्पड अरबाला अन इकडे उलटे फ़टके आम्च्याच देशात हिन्दूला. अरबान्ची पण काय जरब! ओ.बि.ला. गॅन्ग तर खास आरेन्गेत्रम करणार्‍या अप्सरेगत फक्त हावभाव अन अचाट हस्तमुद्रा करून (त्यान्ची भाषा फक्त अल्लालाच समजते, अन सबटायटल्स वाचेपर्यन्त तान्डवनृत्त्य सम्पलेले असते)अख्ख्या अमेरिकेला हादरवून सोडते. पण अरबान्च्या प्रत्त्येक बोटातून तेल काढणारी मित्र राष्ट्रे कुणाच्याही परवानगी शिवाय बेधडक वाळवन्टातील निष्पाप जीवान्चे देखिल भुईनळे बनवतात पण माझ्या भारतात काय होते? तर कैलासावर बसून महादेवाने तान्डव करावे तसे हा अरब कम्पू कुठल्याश्या पर्वतरान्गान्वरून ("मुश."पो. पाकिस्तान)सैतानी तान्डव रचत असतो अन पश्चिम मुम्बैतील कुठल्यातरी "अल झवेरी" बाजारात खास फटाके फुटत असतात अन पाकिस्तानातील हिन्दून्चे एकमेव मन्दिर जाळले जाते.

एकीकडे हा प्रकार तर दुसरीकडे आरक्षणाच्या पुन्ग्या वाजवून कुठल्या सापाना आम्ही पोसतो आहोत? आरक्षण कुणापासून, कुणाचे, कशासाठी? माझ्याच इतर बान्धवाना माझ्यापासून फ़ोडायची ही कुटीलनिती म्हणजे "फोडा अन राज्य करा" या ब्रिटीश्तत्वप्रणालीची शिल्लक मस्तवाल औलाद तर नव्हे ना? ते गेले अन मागे उरले हे असले कुण्या मस्तानीच्या (बारबालान्च्या) मैफ़िलीत ब्राह्मणाला पायातील वहाणेगत विकून येणारे दिवटे बाजीराव. उद्या सरसकट ब्राहमण डॉक्टरानी स्वयमरचीत आरक्षण जाहीर केले की ईतर जातीय रुग्णाना हात लावणार नाही किव्वा हिरव्या रोगावर हिरवा, लाल रोगावर लाल डॉक्टर आणा, तर सर्व इस्पितळात फ़क्त रन्गीबेरन्गी मेन्ढ्या शिल्लक उरतील. IT च्या नळाला सध्ध्या चोवीस तास पाणी येतय, अन भैय्याच्या म्हशी विप्रो अन इन्फ़ो चे स्टॉक्स खावून भरपूर दूधाबाईट्स देत आहेत म्हणून शेजारच्या गल्लीत पेटलेले हे इतर भस्मासूर दुर्लक्षित करून चालणार नाहीत. सध्ध्या ज्याच्या पायात अवजड बूट त्याची कीक भक्कम असा न्याय आहे अन जोवर खेळ आपल्या बाजूने चालू आहे तोवरच रेफ़रीच्या पिवळ्या अन लाल कार्डाचा मान आहे. एकदा का खेळ उलटला की सोयीसकर रीत्या कलरब्लाईन्ड होवून पिवळे अन रेड कुठलेच कार्ड न बघता सरळ रेफ़रीलाच sudden death कार्ड दाखवायला हा दणकट कम्पू कमी करणार नाही.

मी भारतीय सन्घात आहे, हिन्दू, मुसलमान, जे जे कुणी माझ्या सन्घात माझ्या बरोबर धावत आहेत ते सारे माझेच सन्घबहाद्दर आहेत. ज्याना अजून आपण स्वतः हिन्दू का मुसलमान का भारतीय हे ठरवता येत नाही किव्वा उघड सान्गण्याची लाज वाटते, किव्वा नुसतेच commentry box मधे बसून हवेतल्या गप्पा अन (धर्मनिरपेक्षतेच्या) पोकळ टीका अन वाद करायची हौस आहे त्यानी या खेळात पडूच नये. पण गड्यान्नो, आयुष्यभर घाम गाळून, चाबूक मारलेल्या जनावरागत मान खाली घालून त्या फुट्बॉलच्या मागे नुसते पळून उपयोग नाही, माझे इतर सन्घ बान्धव पाठीमागून तन्गडी घालून आपल्याच पार्टीत गोल करत आहेत तोवर ही macth पण fix आहे. तेव्हा माझ्या सार्वभौम सन्घाचे तुकडे करणार्‍या या गनिमीकाव्या प्रवृत्तिन्चा (व्यक्तीन्चा नव्हे)कोथळा बाहेर काढायचा तर वाघनखच लागतील, नुसत्या दोन वेळच्या forward चढाया, लुटुपुटुचा central field चा खेळ अन भक्कम भिन्तीन्चा defense ठेवून उपयोग नाही.

वन्दे मातरम!


Manish2703
Thursday, June 22, 2006 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिले आहेस योग... especially शेवटचा paragraph ...

Champak
Thursday, June 22, 2006 - 8:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाउ दे रे योग, हल्ली विशुद्ध रं. पा. कुठे शिल्लक / मिळते आहे? त्यामुळे च असे होते!

Gs1
Friday, June 23, 2006 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, अगदी रोखठोक लिहिले आहेस.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators