|
Aaftaab
| |
| Wednesday, June 21, 2006 - 4:57 am: |
| 
|
हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तेव्हा जरा सम्भाळून घ्या ---------------- पूर्वी वेडी माणसे दिसायची. म्हणजे आमच्या गावात तरी दिसायची.. नाही नाही, मी कुठल्यातरी ध्येयाच्या प्रेरणेने किंवा एखाद्या कलेच्या प्रेमापोटी वेड्या झालेल्या माणसांबद्दल बोलत नाहिये, खर्या खुर्या वेड्यांबद्दल बोलतोय. अशी बायका आणि माणसे गलीबोळातून विचित्र अवस्थेत हातवारे करत काहीतरी स्वत:शीच बडबडत जाताना दिसायची. तसं ह्यांचं प्रमाण खूप जास्तही नव्हतं, पण आता इतक्या वर्षानंतरही आठवण येते म्हणजे आमच्य गावात पुरेशी वेडी माणसे होती असं म्हणायला हरकत नाही! त्यातली एक म्हातारी आठवते, ती बिचारी सत्तरीच्या घरातली असेल त्यावेळी.. खरंतर लोकांनीच तिला वेडी ठरवलेली.. तिच्या छोट्याच्या अम्बाड्यामुळे तिला 'बुचडा' हे नाव आसपासच्या टारगट पोरांनी ठेवलं होतं. ती जिकडे जाईल तिकडे स्वत:शीच काहीतरी बडबडत जायची, आणि तिच्या मागे हमखास एक सात-आठ पोरान्चा घोळका 'बुचडा', 'बुचडा' करत तिला चिडवत असायचा.. मग ती त्यान्च्यावर ओरडायची, आणि गलीतल्या मोठ्या माणसांना विनन्ती करायची 'जरा दापा की ओ त्यांना'. कुणीच तिला दाद द्यायचं नाही.. बिचारी... खूप वाईट वाटायचं तेव्हा.. आणखी एक मनुष्य होता.. तो आमच्या गावातल्या भगवंत मंदीराशेजारच्या मैदानाच्या पायर्यांवर बसून 'सत्यम शिवम सुंदरम, बाबा नाम केवलम' असं काहिसं तालात म्हणत असे. कधीकधी त्याच्या बरोबर तीन्-चार टाळकी सुद्धा बसून कोरस देताना दिसत. बहुदा तो कुठल्यातरी पंथाचा प्रचार करत असावा, पण त्यावेळी आम्हा मुलांना त्याच्या वागण्यावरून तो एखाद्या वेड्यासारखाच वाटायचा.. आणखीही बरीच ठार वेडी मंडळी होती.. कपडे फाटलेले, चाल अडखळणारी, आणि पुन्हा स्वत:शीच बडबड चालुच.. या सर्वांमधे स्वत:शी बडबडणे हा एक समान भाग.. मजेची गोष्ट म्हणजे आजकालही शहराशहरातून असे स्वत:शी मोठ्याने बडबडत जाणारी मंडळी दिसतात.. त्यात अगदी चांगल्या घरची मुलंमुलीही दिसतात. परवा अशीच एक मुलगी "आज कुठे भेटायचं, अरे ते नको रे, आपण तिकडे जाऊ या" असच काहितरी बोलत थेट माझ्याकडे येत होती. माझ्या मनाची द्विधा अवस्था झाली.. मुलगी तर चांगली दिसत होती, आणि दिसायलाही चांगली होती.. मग मी तिला आणखी जवळून पाहिलं आणि घोळ लक्षात आला. तिच्या कानावर नाकात नथ घालतात तसं एक यंत्र होतं.. त्याला काय 'ब्ल्यु टूथ' कि काय म्हणतात.. ती बया तिच्या मोबाईल वर कुणाशीतरी बोलत होती मी नि:श्वास आणि उसासा एकदम टाकला असे लोक आजकाल कुठेही दिसतात.. त्यांना आपण कुठे आहोत, आपल्या बोलण्याचा कुणाला त्रास होतोय का याची काहीही तमा नसते.. असाच एक जण बसमध्ये 'प्रकल्प व्यवस्थापने' बद्दल कुणाशी तरी मोठ्यामोठाने एवढा वेळ बोलत होता, की आजुबाजुचे सगळे त्या विषयामध्ये पारंगत झाले..! आजकाल मला बरेच लोक जिकडे जातील तिकडे कानात काहीतरी खुपसून बसलेली दिसतात. लांबून बघितलं तर वाटतं की ते दोन्ही कानात श्रवणयंत्र घालून बसलेत की काय, पण पुन्हा लक्षात येतं की ते त्यान्च्या वॉकमन वर, नाहितर आयपॉड किंवा मोबाईल वरच गाणी ऐकत असतात.. बहिर्या लोकांना कानात श्रवणयंत्र घातलं की ऐकू यायला लागतं, पण यांना कानात त्यांचं 'श्रवण-यंत्र' घातलं की दुसरं काही ऐकू येणच बंद होतं.. खरच, या तंत्रज्ञानाचं तंत्रच अजब आहे.. माझा एक मित्र कायम ऑफ़िसच्या टेलीकॉन्फ़रन्स (टेलीकॉन) मधे असतो.. म्हणजे अगदी संडासात बसूनही त्याने टेलीकॉन्स एटेन्ड केल्या आहेत असं तोच अभिमानाने सांगतो.. मग मी कल्पना केली की अशा वेळी सम्भाषण कसं असेल? "yes sir, I am looking into the matter personally !" "yes sir, I am taking the notes" "yes sir, it will be done, I am pushing as hard as I can" "Don't worry about the sound sir, I am in a traffic so you must have heard some horn or something ..." =======================
|
आफ़ताब अचुक निरिक्षण... खरच कधीकधी कळत नाही समोरच नक्की कुणाशी बोलत आहे ते...
|
good one आफताब... पहिलाच मस्त प्रयत्न
|
|
|