|
Giriraj
| |
| Thursday, June 15, 2006 - 4:04 am: |
| 
|
मानसी,छानच कविता... लय अगदी जमून आलिय... फ़क्त एका ठिकाणी अडखळायला होतय.... इन्द्रधनू खुलू दे क्षितिजावर ... धृवा,आवडत्या रंगातली कविता खूपच आवडली! एक शंका... सलग कविता म्हणून तुला अभिप्रेत आहे की वेगवेगळ्या भावनांचं एक्सुत्रिकरण आहे? चिन्नु,टाकतो २,४,६,८,२० दिवसांत सुचलि की!
|
सगळेजण अतिशय सुंदर लिहिताय.. कयास काय असेल हो पलिकडे खरंच काय असेल हो तिकडे असेल एखादं झाड फळाफुलांनी डवरलेलं असेल उन्मुक्त रान हिरवंगार बहरलेलं असेल मोकळं आकाश उडणारे अनंत पक्षी असेल संथ नदी का असेल खवळलेला सागर असतिल असेच अनेक निसर्गाच्या चमत्काराचे साक्षी का असेल कोणी माझ्यासारखा अंधार्या कोठडीत बंदिस्त आणि बंद खिडकीतून आरपार पहाणारा???
|
Meenu
| |
| Thursday, June 15, 2006 - 4:24 am: |
| 
|
वा देवा क्या बात है ...? सही
|
Shyamli
| |
| Thursday, June 15, 2006 - 4:27 am: |
| 
|
अंधार्या कोठडीत बंदिस्त आणि बंद खिडकीतून आरपार पहाणारा??? >>> सहि पंच. रे देवा...
|
Aaftaab
| |
| Thursday, June 15, 2006 - 5:00 am: |
| 
|
मंडळी आणखी एक वाक्य आहे, त्यावर कविता होऊन जाउ द्यात "Adolescence is the age when the boy notices, that the girl is noticing, that he notices her"....
|
मस्त रे देवा ....
|
Dhruv1
| |
| Thursday, June 15, 2006 - 5:08 am: |
| 
|
गिरीराज.... एकाच प्रकारच्या भावनांचे कोष एका छोट्याशा काळखंडाने विणुन आपल्या भोवती ऊभे करावेत तसेच काहिसे झाले होते.... त्याचा अएकसंघ परिणाम.... बाकी एक कविता असो किंवा अनेक.... काही विशेष फ़रक पडणार आहे का त्याने?
|
नाहि हल्ली मी कुठेच जात नाही रोज दिसतात नविन वाटा खुणावतात त्या मला सुंदर सुंदर बागा रोज बोलावतात मला मी नाही म्हटलं की हसतात आपसात खिदळतात.. निघुन जातात खरंतर.. एकदा गेलो होतो अशा वाटेनं झालो होतो बेहोश त्या वाटेच्या अनुभवाने झालो होतो रोमांचीत उपभोगले सारे सुखदु:खांचे क्षण त्यातल्याच दोन क्षणांचा आज माझ्यावर पहारा आहे म्हणूनच मी हल्ली कुठेच जात नाही
|
वाह ... मस्तच रे ... धृव ... मलाही ते जाणवलं होतं आणि मी ही अगदी ह्याच निष्कर्षाला आलो की कविता एक असो वा अनेक ... काय फरक पडतो ? पण खूप सुंदर उतरलीय ती
|
Meenu
| |
| Thursday, June 15, 2006 - 5:17 am: |
| 
|
देवा सुंदर आज बरोबर सापडलाय सुर तुला धृव खरच छान आहे ती कविता
|
Giriraj
| |
| Thursday, June 15, 2006 - 5:33 am: |
| 
|
देवा,कयास मस्तच! धृवा,फ़रक नाही पड्णार! कविता एकदा उतरली की रसिकाची होऊन जाते हे खरं असलं तरी कविला नक्की काय अभिप्रेत आहे ते शोधण्याचा एक जुनाच खेळ आहे हा! अर्चना,चाफ़ा सुरेख! स्वरा,वैभव म्हणतोय तसंच... शेवटपर्यन्त खिळवून ठेवते झुळूक! तुषार,पहिली 'लिहित जा' फ़ारच ओघवति आलीय!
|
Ninavi
| |
| Thursday, June 15, 2006 - 9:20 am: |
| 
|
स्वर, छान आहे तुमची कविता. देवा, ' कयास' आणि ' पहारा' दोन्ही सुरेख उतरल्यात. मीनू म्हणाली तसा छान सूर लागलाय. ध्रुव, सगळ्याच सुंदर आहेत.
|
Devadatta दोन्ही कविता आवडल्या. बापू
|
ओंजळीतले आभाळ चिमुकल्या हातांकडे पाहून आभाळ हसून मला म्हणाले छोटी तुझी बोटे अन मोठे आहेत तारे! गगनभरारीचे स्वप्न पाहतेस... तुझ्या पंखाना सोसवेल का वेगाचे वारे? जा माघारी निघून जा आहेत विजेचे सपकारे.. नाही जमायचे तुला सारे!...... पण हे म्हणताना त्याला कळलेच नव्हते की त्याच छोट्या ओंजळीत आपण सामावलो आहोत !
|
Swara
| |
| Thursday, June 15, 2006 - 6:54 pm: |
| 
|
आभार... तुमच्या सारख्या guru कवींनी दखल घ्यावी ह्यातच सार्थक.
|
Menikhil
| |
| Thursday, June 15, 2006 - 9:23 pm: |
| 
|
एक तरी दिवस माझा म्हणुन उगवेल का? एकदा तरी पाउस माझ्याच अंगणी पडेल का? बागेतली फुले माझ्यचसाठी हसतील का? पाकळ्यांवरचे अश्रू माझ्यासाठी पुसतील का? एकदा तरी खडक बांध बनुन राहिल का? आपटणार्या लाटा माझ्यसाठी झेलेल का? कन्टाळवाणे ऊन ढगांमागे लपेल का? तिरिपे एव्हडेच किरण घरावर माझ्या पडतील का? घोन्गावणारा वारा मन्द झुळुक बनेल का? वर्षानुवर्षांचे चित्कार भजन बनुन गातील का? थकलेले पाय आता घरापर्यंत तरी जातील का? जमीनित रुतुन, दल्दलीत फसुन....इथेच सम्पुन जातील का?
|
वैभव, देवदत्त, मानसी, निखील छान कविता, सगळ्याच कविता छान आहेत. खूप आवडल्या.
|
Adolescence is the age when the boy notices, that the girl is noticing, that he notices her यावर कविता करण्याचा प्रयत्न गगनी तोच चांद होता सभोती आसमंत तोच होता पण माझाच चेहरा मजला का भासला नवीन होता? ती तीच होती, माझ्या परिचयाची भाव नयनातला गड्या वेगळाच होता वारे तसेच होते,इशारे तसेच होते पाहुनी तिच्यासवे फुलायाचे होते तिच्यासवे फुलायाचे होते
|
Devdattag
| |
| Thursday, June 15, 2006 - 11:56 pm: |
| 
|
धन्यवाद श्यामली, मीनु, वैभव, गिरी, निनावि, बापू, मुक्ता..
|
Adolescence is the age, when the boy notices, that the girl is noticing, that he notices her हळवे कठिण, वय लागले तारुण्य रस, मी वाहतो कळते मला, कळते तिला चोरून तिला, मी पाहतो, धडधड उरी, का होतसे? हृदयी तिच्या, मी राहतो तुषार जोशी, नागपूर
|
|
|