|
सरस्वती 'सरस्वती म्हणजे ज्ञानाचं दैवत.... सर्व विद्यांची देवी.'मास्तर तिला म्हणाले होते. आबांपासून लपून दादाने तिला शाळेत आणून सोडलं होतं. 'शिकलीस तर सुटशील बये'दादा तिला शाळेत नेताना म्हणाला होता. ती शाळेच्या दारापाशी आली आणि शाळेच्या पहिल्याच दर्शनाने ती शाळेच्या प्रेमात पडली. रंगव्लेल्या भिंती.त्यावर्ची चित्रं,अक्षरं,अंक..शाळेची पक्की बैठी इमारत आणि त्यावर खाली घरंगळत येणारं मातीच्या लाल कौलांच छत सगळं तिला मोहवून गेलं. शळेच्या अनेक खिड्क्यांतून आत बसलेल्य मुलंची डोकी तिला दिसत होती.गात,घोकत,शांत.प्रत्येक दारातून आत्ले मास्तर दिसत होते.उभे,बसलेले,फळ्यावर काहितरी लिहीत असलेले.तिला त्या वर्गांत जाऊन बसायच होतं.त्या मुलांबरोबर. तिथल्या मास्तरांसमोर. त्यांच्याबरोबर गायचं,घोकायचं होतं.ती भारावून शाळेकदे पाहत होती. दादा आणि ती शाळेच्या पायरीपाशी पोहोच्ले.शाळेच्या कुंपणात शिरताना लांब वाटलेला शाळेच्या ईमारतीजवळचा झेंड्याचा चवथरा दोघांनी केव्हाच मागे टाकळा होता. दादा गोंधळून इथे तिथे पाहू लागला.आत जावं कि नाही या पेचात तो पडला होता.कुणीतरी जाणती व्यक्ती तिथे आहे का ते तो पाहत होता.त्याची नजर शाळेच्या एका टोकापासून दूसर्या टोकापर्यंत भिरभिरत होती. इत्क्यात त्याला एक मास्तर तिथ्ल्या एका वर्गातून बाहेर येताना त्याला दिसले. 'मास्तर...वो मास्तर'दादाने त्यांना हाकारलं. मास्तरांनी हातानेच त्या दोघांना तिथेच उभ रहायला खूणावलं.मास्तर भराभर चालत त्यांच्याजवळ आले. ती भारावून मास्तरांकडे पाहत होती. त्यांचा पेहराव,त्यांची टोपी, डोळ्यांवरचा चष्मा आणि त्यामागचे मायाळू डोळे आणि चेहर्यावरून न ढळणारं, त्यांच्या नितळपणाची, प्रेमळपणाची साक्ष देणारं त्यांचं हास्य पाहून ती भुरळून गेली होती.आपला आबा असा असता तर असा एक लहान्सा विचार तिच्या मनात डोकावून गेला. 'काय झालं'मास्तरांनी चष्म्यातून डोळे मिचमिचे करून त्यांच्याख़्डे पाहत विचार्लं. 'ही माझी भईन.... हिला शाळ्येत षिकाया पाठ्वायच हाय.'दादा त्यांना म्हणाला. मास्तरांनी तिच्याकडे नीट पाहिलं आणि दादाकडे वळून ते म्हणाले. 'वय काय हिचं?' त्या प्रश्नाने दादा गोंधळला. 'वय....काय म्हाईत न्हाई बुवा'तो डोकं खाजवत म्हणाला.'पन आय आबा हिचं फुडच्या वरिसाला लगीन करून द्यायचं म्हनत व्हते.' काहीतरी महत्त्वचं ऐक्ल्यागत मास्तरांनी त्यांची मान हलवली.मग त्यांनी काही क्षण विचार केला आणि ते म्हणाले, 'ठीक आहे....उद्यापासून पाथव तिला रोज शळेत...तिच्या वर्गाचं वगैरे मी बघतो नंतर.' इतका वेळ डोक्याला लागून राहिलेल ताण मास्तरांच्या या वाक्याने पार हलका झाला. रणरणत्या ऊन्हात एकाएकी वार्याच्या थंडगार झुळूकेने अंगाला स्पर्श करावा तसं तिला मस्तरांचे ते शब्द ऐकून वटलं.आतला आनंद अनावर झालेली ती स्वतःशीच हसू लागली. मास्तर तिच्याकडे केव्हा वळले तिला कळलच नाही. 'नाव कय ग तुझं?'त्यांनी तिला विचरलं. ती आधी दचकली.मग लाजत हळूवर उत्तरली. 'सरस्वती' 'अरे व्वा!!.... छान नाव आहे...सरस्वती...सरस्वती म्हणजे कोण माहिती आहे का?'त्यांनी तिला विचरलं. तिने लाजत नाही म्हंटलं. 'सरस्वती म्हणजे विद्येच दैवत...सर्व विद्यांची देवी.'मास्तर तिला म्हणाले. दुसर्या दिवसापासून ती शाळेत जाओऊ लागली. मास्तरांनी शिकवलेलं तिला लगेच कळायचं.मास्तरांनी दिलेली गणितं ती भराभर सोडवायची.कविता तिला शिकता क्षणीच पाठ व्हायच्या. 'तू नुसती नावानं सरस्वती नाहीस तर बुद्धीनेही सरस्वती आहेस'मास्तर तिला म्हणायचे. ती वर्गात सर्वांत मोठी असल्याने वर्गातली मुलं तिला 'ताई' म्हणत.वर्गातील सर्व मुलांच्या अंगावर पांढरा निळा गणवेश असायचा.ती मात्र रोज ठेवणीतला,सणासुदीला घालायचा परकर पोलका घालून शळेत जायची.दोन वर्षांपूर्वी शिवलेला.छातीवर जरासा घट्ट होत असला तरिही.तिला त्याचं अजिबात वाईट वाटायचं नाही.त्या दिवशी बाहेरून दिसलेल्या मुलांमध्ये आपल्याला बसायाला मिळते आहे याचा तिला जास्त आनंद वाटायचा.बाहेरून आपलंही डोकं खिडकीतून दिसत असेल या कल्पनेने तिल गंमत वाटायची.ती शाळेत चांगलीच रुजू लागली होती. एक दिवस शाळेत जाताना तिओच्या अन दादाच्या शेजारून एक गाडी गेली.दोघं अचंब्याने त्या गाडीकडे नुसते पाहत राहिले.ती गाडी एक बाई एकटीच चलवत होती.शहरातून येणार्या जाणार्या अनेक गाड्या त्यांनी याआधी पाहिल्या होत्या.पन एका बाईला गाडी चालवताना ती दोघं आज पहिल्यांदाच पाहत होती. 'पायलं का गं?....बाय मानूस गाडी चालवतिया...'दाद तिला म्हणाला. 'या बया....कसं बुवा करती रं ती?'ती अचंब्याने म्हणाली. 'शिक्षन!!!!'दादा म्हणाला,'शिक्षनानं मानूस कायबी करू शक्तोया....तू शिकलीस तर तू बी गाडी चालवू शकशिला' 'खरंच??' 'मंग... निस्ती गाडी न्हाई....ईमान बी चालवशीला' 'ईमान?!'तिनं आश्चर्याने तोंडावर हात ठेवला. 'व्हय मंग' 'खरच का रं दादा?' 'मंग काय खोटं बोलतुया का मी?' त्या दिवशी तिला वाटलं होतं,आपणही शिकून मोठ्ठं व्हायच आणि एक दिवस अशीच गाडी चालवायची. आठव्या दिवशी आबानं तिला मारत मारत शाळेच्या दारावरनं घरी आणलं होतं.दादा शहराला गेल्यानं ती शळेला एकटीच जात होती. आबाला घरात नसलेलं पाहून ती घरातून बाहेर पडली होती.ती शाळेच्या दारापाशी पोहोचते तोच आबानं पाठलाग करून तिला शाळेच्या दारापाशी येऊन गाठलं. 'पुरं झाली साळा फिळा.... निस्ते नुकसानीचे धन्दे...उद्यापास्नं कामाला लागायचं.साळेमंदी पैकं घालिवण्यापरी चार पैकं घरात जास्तीचं कसं येशीला त्ये बघ रांदे.'म्हणत त्याने जे तिला बदडायला सुरु केलं ते तो बदडतच राहिला.पार घरी पोहोचेपर्यंत. दादाला शहरात काम मिळालं होतं.आता आबांशी भांडून तिला शाळेत घेऊन जायला तो तिच्याबरोबर नव्हता.आबा तर शाळेच नाव जरी घेतलं तरी तिच्या अंगावर धाऊन जायचे. आबा तिची शाळा सोडवून तिला स्वत अन तिच्या आयेसोबत रस्त्याच्या कामाला घेऊन जाऊ लागले.कंत्राटदाराच्या डांबर पोहोचवैण्याच्या मोडक्या ट्रकमधून ती मग रोज आय्-आबाबरोबर रस्त्यावर कामाला जाऊ लागली आनि तिची शाळा कयमची सुटली. आबानं पहिल्यांदा कामाला नेलं त्या दिवशी तो तिला कंत्राटदाराला भेटायाल घेऊन गेला होता. तिला मागे उभं करून आधी तो एकटाच त्याच्याशी बोलायाला गेला. 'सयेब..कामावर येका मानसासाठी जागा हय का?' 'काय रं आनी किती मन्सं ठेवायची म्या कामावर? हां?...तुम्हास्नी कामं भेटाया हवी म्हनून का रं कंत्राटं घ्येतो म्या?.्आं?... जा जा.. न्हाई जागा'कंत्राट्दार आबावर डाफ़रला.ती लांबून त्या दोघांचं बोलणं ऐकत होती. 'सायेब... असं करु नका... अवं बघा की.... असल येकादी जागा' 'आरं न्हाई म्हंटलं ना बाबा... उगा कशापयी दोस्कं खातुया?हां?' 'सायेब.. बघा ना... पोरगी हाय माझी.... तिच्यासाठी काय काम असल तर बघा की.'आबा काकुळतीला येऊन म्हणाला. आबाचं ते वाक्य ऐक्ताच कंत्राटदार एकाएकी आप्ला हेका सोडून आवजाची पट्टी खाली आणून म्हणाला. 'कुठं हाय ती?' 'ती काय तिथं उभी हाय.'आबानं तिच्याकदं हात केला,'ये गं... ये हितं'आबाने तिला जवळ बोलावलं. ती जराशी बिच्कतच त्यांच्यापाशी आलि. 'सायबांना नमसकार कर'आबा तिला म्हणाले. तिनं कंत्राटदाराला नमसकार केला.पण तिला तो लांबूनच आवडला नव्हता.तो मास्तरांसारखा नव्हता.त्याची नजर सतत तिच्या अंगावरून धावत असल्यासरखी तिला वाटत होति.तिला भेटताच त्याचे डोळे सरखे तिच्या छातीकडे पाहत असल्याचे जाणवले.आजही तिने ती शाळेत जातना नेसायचा पर्कर पोलका नेसला होता.दोन वर्शांपुर्वी शिवलेला.छातीवर घट्ट होणारा.आज पहिल्यांदाच तिला आपली छाती कशानेतरी झाकून घ्याविशी वाटत होती.त्याची नजर जशी तिला तिथे झोंबत होती.पण तिच्यकडे तिला झाकायला तेव्हा काहीच नव्हतं.तिचे हात तिच्या नकळत तिची छाती झाकयला वर आले.पण आबांच्या आणि कंत्राटदाराच्या भितीने ते पोटापर्यंतच येऊन थंबले. कंत्राटदार तिच्या जवळ गेला.तिच्या पाठीवरून हात फिरवत त्याने तिला विचारलं. 'नाव काय ग तुझं?' 'स... स.. सरस्वती'ती चाचरत उत्तरली. तिच्या पाठेवरून फिरणारा हात आता तिची पाठ चोळू लागला.तो हात तिच्या पाठीची सालटं काढत असल्यागत तिला भासला.तिला तो झिडकारून त्याला दूर लोटावसं वाटत होतं.पण भितीने गारठलेल्या तिच्या शरीराने तिला जखदून ठेवलं होतं. तिच्या पाठीवरून मनसोक्त हात चोळून झाल्यावर कंत्राटदाराने तिच्या खांद्याच्या उघड्या भागावर हात ठेवून म्हण्टलं, 'उद्यापासून ये कामाला...'मग आबाकडे वळऊन तो म्हणाला'ठेवलं बर का हिला कामावर.... उद्या घमेलं दे हिला अन खडी उचलाया लाव' 'क्रुपा झाली साहेब'आबा त्याला वकून नमसकार करत म्हणाला. 'काय ग?.... उचल्शील ना खडी?'तिच्या त्या उघड्या भागावर चिमटा काढत त्याने गलिच्छ हसत तिला विचारलं. तिने आपलं दुखणं न कळवळता सोसत हुंकाअरून मान डोलावली. तिथे त्याचा दुसरा सहकारी आला आणि त्याने या दोघांना चालतं केलं.ती अद्यापही बिथरलेलीच होती.या स्पर्शाला ती पहिल्यांदाच सामोरी जात होती. 'याची पोरगी का?'त्या सहकार्याने कंत्राटदाराला विचारलम. 'व्हय'कंत्राटदार उत्तरला. 'वयात येतिया.'दुसरा मिस्किल हसत म्हणाला. 'येतिया?!.. आलिया... कसली मुस्मुस्ली हाय बघ.... हिचं नाव सरस्वती नाय... रसवती असाया हवं हुतं' दोघे यावर गडगडून हसले.तिनं त्यांचं हे बोलणं जाता जाता ऐकलं होतं.त्यांच्या नजरा आपल्याला पाठून नागव करत असल्यागत तिला भासत होत्याअ. दुसर्या दिवशी ती कामावर गेली होती.दिवस कलायला लागल्यावर काम बंद झालंर्अस्त जवळ्पास पूर्ण झाला होता.ती अखेरच घमेलं उचलून नुकतीच मोकळी झाली होती.इत्क्यात त्यांच्यातला एक कामगार तिच्याकडे आला. 'सरस्वती तूच का ग?'त्याने तिला विचारलं. 'व्हय'ती घाबरत उत्तरली. 'तुला सायबांनी त्या झादाखाली उभं रहाया सांगितलं हाय.'तो रस्त्याशेजारच्या एका झादाकडे बोट दाखवत म्हणाला. 'हं'हुंकारून ती त्या झाडाच्या दिशेने चालू लगली. त्या झाडाकडे पोहचून ती रस्त्याकडे तोंड करून,त्याच्या नव्या रूपाकडे एक्टक पाहत उभि राहिली.तिच्या,तिच्या आय्-आबाच्या आनि त्यांच्यासारख्या एतर अनेकांच्या घाम,रक्त शोषून,आटवून ते सजलं होतंऽचानक एक गडी वेगाने त्या रस्त्यावरून धावताना तिला दिसली.तिने ती गाडी लगेच ओळखलींअव्याने तयार झालेल्या रस्त्यावर येताच गाडीचा वेग ओसरला.त्यामुळे तिला आत पाहता आलं.आजही ती गादी तीच बाई चालवत होती. तिला दद आठवला,मास्तर आठवले, आणि तिचं स्वप्न आठवलंऽचानक मागून दोन दणकत हातांनी येऊन आपल्या तळव्यात तिच्या छातीला आवळून धरलं.ती कळवळ्ली.पण भितीने तिच्या कंठातून आवाज उमटेना.वेदनेने तिचे डोळे पाण्याने चटकन भरले.तिला मदतीसाठी कुणालातरी हाकारावसं वाटत होतं. आये, आबा, दादा,मास्तर...पण ती हाक तिच्या आतून निसटतच नव्हती.ती तो आघात सोसत तशीच निःशब्द उभी राहिली.त्या हातांनी मग तिला घट्ट कवटाळून धरलं.तिचा देह थंडगार पडत गेला.तिची नजर रस्त्यावरच खिळून राहिली.मागे वलून पाहण्याचं धैर्य तिच्यात नव्हतं.आनि ते हात कुणाचे होते हे तिला पाहण्याची गरजही नव्हती.तिने त्यांना त्यांच्या स्पर्शानेच ओळखलं होतं. समोर रस्त्यावर डांबर उकळत होतं.त्याच्या भांड्यातून निघणार्या जर्द काळ्या धुरात ती गाडी हळूहळू अद्रुष्य झाली.ते हात तिच्या परकरात शिरले.तिला सगळं आठवू लागलं. दादाचं बोल्णं,शाळा,आबांचा मार,कविता,गणितं आणि मास्तरांचे शब्द.ते हात तिच्या परकरात खोल खोल शिरत गेले. 'सर्स्वती म्हणजे विद्येच दैवत....सर्व विद्यांची देवी'मास्तर तिला म्हणाले होते.
|
Moodi
| |
| Thursday, June 15, 2006 - 10:16 am: |
| 
|
वाचायला भयाण वाटत रे, पण हे वास्तव देखील आहे हे आठवुन संताप होतो अन हे आपण सध्या तरी बदलु शकत नाही याची खिन्न जाणिव होते. 
|
Mrinmayee
| |
| Thursday, June 15, 2006 - 10:22 am: |
| 
|
सलील, मनाला भिडणारं लिहिलय हे वास्तव. हे सगळं घडतय अन आपण यासाठी काहीही करत नाही या शंढपणाची लाज जास्तच भेडसवते अश्या वेळी.
|
Dineshvs
| |
| Thursday, June 15, 2006 - 1:28 pm: |
| 
|
आपल्या डोळ्यासमोर घडत असलं तरी काय करणार आपण ? पण आजकाल मुली प्रतिकार करताना दिसतात. सगळ्याच अश्या हार मानत नाहीत.
|
Sonalip
| |
| Friday, June 16, 2006 - 12:54 am: |
| 
|
सलिल ही गोष्ट पण तुज़्ह्या बाकिच्या गोष्टीसारखीच आहे. शेवट दुःखी. मला वाटलेल ती तिच स्वप्न पूर्ण करु शकेल.
|
सलील, ओघवत लिहिल हेस! तपशील अचुक, मोजक्या शब्दात! पण मला दुःखी शेवट वाचायला आवडत नाही रे भो! आता कृती बोथट झाल्या असल्या तरी मन अजुन नाही ना झालेल बोथट, बथ्थड! फार जिव्हारी लागतात असल्या कथा! आणि आमच्या पोरीबाळीन्च्या भविष्यात काय वाढुन ठेवल हे या जाणिवेने मन भयकम्पित होते! वेळ आली हे की निघुन गेली हे विचार करायला अवधी नाही पण आता कृतीला धार काढायलाच हवी! हे एकिकडे अस वास्तव अन दुसरीकडे आरक्षणावरुन गोन्धळ! हे प्रकार आरक्षण थाम्बवु शकणारेत का? आरक्षण मिळाले तरी नेमक्या गरजुन्पर्यन्त पोचते का? पोचले तर त्याची क्वालीटी काय असते? जिथे शालेय शिक्षणच नीटपणे पुरवले जाऊ शकत नाही तिथे उच्च शिक्षणाच्या आरक्षणाचा उपयोग काय? शालेय शिक्षणाच्या पुस्तकी ढाच्यात जीवनोपयोगी उपजिविकेस योग्य शिक्षण आम्ही कधी देणार? की इन्ग्रजान्नी ठरवुन दिलेली कारकुन बनविणारी शिक्षण पद्धती राबवणार? ज्या शिक्षणातुन पोट भरण्यायेवढीही उपजिविका स्वतन्त्रपणे न करता येवुन केवळ अन केवळ नोकर्यान्च्या पाठी लागुन परावलम्बी व्हावे लागते ती शिक्षण पद्धती काय कामाची? अनेकानेक भौतिक सुखसोइच्या साधनान्नी युक्त हा समाज मला तरी उध्वस्त चिन्नविछीन्न झालेला दिसतो तुझ्या गोष्टीने त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली! या बीबीचा किन्वा कथेचा कदाचित सम्बन्ध नसेल, पण तुझ्या गोष्टीतील तपशील वगळता हे विचार मला सुचले, ते मान्डले! कदाचित असेही विचार सुचावेत ही तुझ्या कथाशैलीची आणि कथेतील तपशीलाच्या अभिव्यक्तीची ताकद म्हणावी लागेल
|
सरस्वती...! अर्थातच वरील कथेतील अहमदनगर बीबी वर Smi_dod या आयडीबरोबर झालेल्या चर्चेत अशी कल्पना निघाली की ललितमधिल कथेतल्या व्यक्तिरेखान्चे चित्र काढावे! वरील चित्र त्याचाच एक प्रकार हे! प्रश्ण असे हेत की.... १. अशी चित्रे त्या त्या कथेच्याच बीबीवर टाकावीत का? त्यामुळे मुळ लेखन, लेखक यान्ना काही बाधा तर नाही पोचणार? २. की चित्रकलेच्या बीबीवर टाकुन दोन्ही ठिकाणी आपापसातील लिन्क द्यावी? ३. मूळात असले उपद्व्याप करावेतच का? माझ्या मते दोन नम्बरची बाब योग्य ठरेल पण आत्तापुरते हे चित्र मी इथे टाकतो हे, मॉड्स, कृपया अयोग्य वाटल्यास योग्य जागी हलवावे! तसेच वरील दोन मुद्द्यान्बद्दल मार्गदर्शनही करावे!
|
Smi_dod
| |
| Friday, June 16, 2006 - 4:45 am: |
| 
|
सलिल...सुन्न व्हायला झाले कथा वाचुन.... हे अजुनही चालु आहे हे खेदजनक.....लिंबु चित्र बोलक आलय मुख्यत्: भाव लक्ष्यात येतात... मला वाटते कि कथे बरोबर चित्र टाकले तर ते अधिक समर्पक होते... म्हणजे सगळे संदर्भ लागतात... त्यामुले चित्राला आक्षेप नसावा..
|
सलील, काय प्रतिक्रिया द्यायची.. अशी चित्रे त्या त्या कथेच्याच बीबीवर टाकावीत का? त्यामुळे मुळ लेखन, लेखक यान्ना काही बाधा तर नाही पोचणार? <<< LT बरोबर, त्याचाही विचार झाला पाहिजे.
|
लिम्बु चित्र कथेला शोभेल असे आहे..., सुरेख काढलेय.ऽजुन काढत रहा...!!! कथा सुन्न करणारी वाटली पण आता मुली प्रतीकार करायला हवा.. सुरवातही झालीये... सत्याला सामोरे जायला नको का वाटते कधी कधी? दुखद शेवट नको वाटतात, सुखद शेवट नेहमिच होतो अस नाही पण प्रत्येक गोष्टीतुन आशेचा किरण निघाला तर बर वाटते..!!!
|
Champak
| |
| Friday, June 16, 2006 - 6:04 am: |
| 
|
शाब्दिक प्रतिक्रिया जर स्विकारार्ह असेल तर चित्रातुन्/ ईतर कलाकृतीतुन व्यक्त केलेली प्रतीक्रिया ही ग्राह्य च मानली गेली पाहीजे! हे करत असताना मुळ कलाकृतीचा अथवा कलाकाराचा अपमान होणार नाही हे मात्र काळजीपुर्वक पाहिले पाहीजे!
|
चम्पक, तार्किक दृष्ट्या तुझे म्हणणे बरोबर वाटते पण.... पुढील मुद्दे विचारात घ्यायला हवेत १. मुळ कथा ही एक कलाकृती असते २. तर त्यावरच्या शाब्दिक प्रतिक्रिया या कलाकृती नसुन चर्चात्मक किन्वा टिकात्मक असतात! फार क्वचित वेळेस प्रतिक्रिया देखिल कलाकृतीसारखाच "दर्जा" घेवुन येतात. ३. कथेच्या अनुषन्गाने काढलेले चित्र मात्र केवळ प्रतिक्रियात्मक नसुन एक स्वतन्त्र कलाकृतीही असते ४. चित्रकारीते करिता स्वतन्त्र बीबी असताना कथेच्या मूळ बीबी वर चित्र टाकणे मला अजुनही पटत नाही जरी वरचे टाकले ५. मागे दोनतीनदा असे अनुभवास आले की कथा सोडुन चित्रावरच चर्चा प्रतिक्रिया सुरु होतात आणि कथालेखकाचा कथा लिहिण्यामागचा मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातो! ६. त्यामुळे कथेबद्दलची प्रतिक्रिया कथेच्या बीबीवर असावि अन चित्राबद्दलची प्रतिक्रिया चित्राच्या बीबी वर असावी! ७. त्यातुनही ही वाचली कथा अन हे पाहीले चित्र असेच होण्यासाठी चित्र कथेच्याच बीबीवर असावे असे वाटु शकते, पण लिन्क द्यायची उत्कृष्ट सोपी सोय असताना त्याची तितकिशी गरज वाटत नाही ८. या प्रश्णान्बद्दल मॉड्स मार्गदर्शन करतीलच!
|
Dineshvs
| |
| Friday, June 16, 2006 - 9:16 pm: |
| 
|
कुसुम मनोहर लेले, नाटक बघितलेय का कुणी ? त्या नाटकात सुखांत केला आहे, आणि मग निवेदनात वास्तवात काय घडले ते सांगितले जाते. मला तो प्रकार फार परिणामकारक वाटला.
|
वरील कथेवर आधारीत एक चित्र येथे टाकले आहे ५० केबीच्या आत बसवताना मूळ चित्र जसेच्या तसे न दिसता खराब दिसते आहे, तरी क्षमस्व! पुढील वेळेस सुधारुन प्रयत्न करीन! आणि जमल्यास वेबशॉत किन्वा याहू ग्रुप मधे चित्रे टाकुन त्याची लिन्क द्यायचा प्रयत्न करीन दिनेश, खरच ती आयडिया परिणामकारक हे! मी बघितल नाही नाटक पण इमॅजिन केल!
|
Paragkan
| |
| Saturday, June 17, 2006 - 2:45 pm: |
| 
|
!!!!!!
|
Vijayvvd
| |
| Tuesday, June 20, 2006 - 3:39 am: |
| 
|
मी पाहीले आहे-कुसुम पण कथा अगदी सुन न करुन गेली. प्राथमीक शिक्षण सुद्धा घेउ न शकणारा ९० टक्के समाज आणी त्याचे होणारे शोशण हि जाणिवच अन्गावर काटा आणुन गेली. चित्र समर्पक. विजय
|
भयानक वास्तव; सलिल अगदि प्रत्येक प्रसंग जिवंत केलास... पण शोषण हे फ़क्त गरिबांचेच होत असते अस नाही. कित्येक शिक्षित, हायली क्वालिफ़ाईड माणसेसुद्धा अशी असभ्य वागतात अशी उदाहरणे बघुन आणी ऐकुन आहे मी. बदलली पहिजे ती फ़क्त परिश्तिति आणि लोकांचा त्याकडे बघण्याच दृष्टीकोन. जाउ दे माॅडस विष्यांतर होत असेल तर तुम्ही ही पोस्ट डिलिट करु शकता. लिंबुभाव चित्र अगदी समर्पक आहे. दुसरे लिंकवर दिलेलेही चित्र अतिशय सुंदर..
|
Aj_onnet
| |
| Friday, June 23, 2006 - 9:53 am: |
| 
|
सुन्न करणारी कथा आहे! काही दिवसापुर्वीच एका मुलीची अशीच दुःखद बातमी वाचली होती, की दहावीला शाळेची फी द्यायला घरचे तयार नसल्याने अन ते तिला शिक्षण सोडून कामावर जायची जबरदस्ती करत असल्याने तिने बिचारीने आत्महत्या केली. त्याच्या बरोबर शेजारीच कुठल्या तरी संस्थानने देवाला रत्नखचित मुकुट केल्याची बातमी होती! बर्याचदा तेव्हढ्यापुरते वाटुन जाते की ह्यावर काही करायलाच हवे. पण खरेच काहितरी करायला हवे, किमान लोकांना प्राथमिक शिक्षण तरी मिळालेच पाहीजे! अन ज्यांची इच्छा आहे त्यांना तर नक्कीच! गरिबी सगळ्यात मोठा शत्रू आहे. त्याचा पहिला सामना केला पाहीजे. बाकी गोष्टी नंतर!
|
|
|