|
Manasi
| |
| Friday, June 09, 2006 - 9:06 am: |
| 
|
छेडिले सूर तेच गीत उमटे न तेचि फुल आजही तेच गन्ध दरवळे न तोचि विरहात जीव तळमळे मीलनातहि अत्रुप्ती झुरणे कणाकणाने प्रीतीच्या प्राक्तनी हेचि
|
मी जरा नवीन आहे इथे.... मला 'झालेली' पहिली कविता पाठवतोय. सगळ्यांच्या कविता जाम गोड आहेत यार. क्या बात है! ... वास्तविक वैभव, झाड वगैरेंच्या कवितांपाठोपाठ माझ्यासारख्याच्या कविता हा विनोद आहे... असो! By the way, मी एक (किरकोळ का असेना!) बासरीवादक आहे, आणि मला थोडाफार चाली लावण्याचा छंद आहे. so if anybody interested, mail me up! तर कविता आठवण येता तुझी, वाजे पाऊस मनात त्यात भिजूनिया जाई तुझ्या आठवांची रात आठवण येता तुझी झुले मनात हिंदोळा आठवे ती निरागस तुझी बाळमिठी गळा आठवण येता तुझी चिंता एकच सलते आधाराला कोण तेथे... येई मनात भलते आठवण येता तुझी कर जुळती देवाला म्हणे देवा देई बळ माझ्या भाबड्या लेकीला...
|
Ninavi
| |
| Friday, June 09, 2006 - 10:55 am: |
| 
|
क्या बात है, अभय!!! सुंदर आहे कविता. गुलमोहोरावर तुमचं स्वागत. मानसी आणि अर्चनाचंही. आणि तुमची कविता हा विनोद नाहीये. ( असला तर चांगला विनोद नाहीये) वैभव, सुंदर. नेहेमीप्रमाणेच. 
|
Meenu
| |
| Friday, June 09, 2006 - 11:22 am: |
| 
|
अभय निनावीला अनुमोदन तुमची कविता फार छान आहे ...
|
Hems
| |
| Friday, June 09, 2006 - 11:49 am: |
| 
|
अभय, छान आहे कविता !
|
वैभव, व्वा, क्या बात है! मूळ कवितेपेक्षा तुझी प्रतिक्रिया जास्त सुन्दर आहे. ही प्रतिक्रिया आहे की, प्रिती-क्रिया? शान्ताबाइंच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, त्यांच्या बर्याच कविता वाचल्या. अरुण म्हात्रेंच्या आग्रहाखातर इंदिरा संतांच्या काही वाचल्या (इंदिरा संतांवरहि असाच एक कार्यक्रम करण्याची सूचना आलीय). निष्ठूर वास्तवाचा न खचता, न डगमगता, धैर्याने स्वीकार करत असतानाही आपलं निखळ, नितळ आणि हळवं भावविश्व एकसंध ठेवणार्या धीरोदात्त स्त्रीची एक प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहिली. त्या प्रतिमेला सलाम म्हणजे 'कदाचित' ही कविता. खूप मायबोलिकरांना ती आवडली, तू तर सर्वांवर कडी केलीस! खरंतर ह्या सगळ्या पावत्या शांता शेळके आणि इंदिरा संत ह्या थोर कवियत्रींना पोचत्या करायला हव्यात पण तेवढ्यासाठी इतक्यातच वरती जाण्याचा माझा तरी काही इरादा नाहिये! बापू
|
Abhay, आई ह्या विषयावर खूपजणांनी छान छान कविता लिहिल्या आहेत. पण आपल्या लेकीकडे पहाणार्या आईवर इतकी सुन्दर कविता माझ्या तरी वाचनात नाही, आगे बढो! बापू.
|
(पुन्हा) कदाचित (हा सलाम वैभवला) ---------------------- कदाचित, माणसांच्या अनोळखी भाउगर्दीत आपल्याच घराचा पत्ता चुकत असेल. कदाचित, व्यवहारांच्या निबिड्-दाट कोलाहलात स्वरांची एकेक शलाका झाकोळत असेल. कदाचित, शब्दांचा निसटता हात घट्ट पकडून म्हणूनच, आपण आपल्याला चाचपायचे. बापू. }
|
Jo_s
| |
| Friday, June 09, 2006 - 11:42 pm: |
| 
|
बापू, तुम्ही गद्यही छान लिहीताय, आणि ही कविताही मस्त, माझीही कार्यक्रमाला यायची इच्छा होती पण.. .. .. नाही जमल. आणि पुढच्या कार्यक्रमालाही जमण्याची शक्यता कमीच दिसत्ये
|
Chinnu
| |
| Saturday, June 10, 2006 - 12:00 am: |
| 
|
वा वा बापु. शेवटच्या ओळी तर खासच!
|
मीनू, सगळ्याच कविता आवडल्या.सारं काही थेट सांगण्यची तुमची शैली आहे. तीच गोष्ट थोड्याशा सूचक पद्धतीनं मंडली तर वाचक आणखी काही क्षण अन्तर्मुख होतो आणि माझ्या मते, तेच कवितेचं खरं यश असतं. अर्चना, खरच छन. बापू.
|
Vaibhav, गेल्या रविवारी आपण माझ्या घरी भेटलो, तेंव्हा आपल्या बोलण्यात एक विषय ओझरता आला होत.त्याचंच एक उदहरण तुझी 'वेस कोरडी' ही ताजी कविता. पहिला अन्तरा ग्रेटच आहे पण दोन कडव्यांतच खरा सगळा आशय येऊन जातो, मग नन्तरची कडवी कशाला? शब्द, लय, प्रतिमांचा ताजेपणा, परीणाम या सगळ्याच द्रुष्टीने, कवितेची चार कडवी उतरत्या भाजणीने येतात, असं मला आपलं प्रमाणिकपणे वाटलं. रागावू नकोस. कविता आवडली नसती तर एव्हढ्या मोठ्या प्रतिक्रियेचा खटाटोप केलाच नसता! बापू.
|
Ninavi
| |
| Saturday, June 10, 2006 - 1:07 am: |
| 
|
निरोप.. ज्यांनी पंख पसरलेत त्यांना हसून निरोप द्यावा हे खरं.. चार दिवस रमली होती पापण्यांच्या आडोश्याआड हे सूखही कमी नाही.. आणि लागलीच त्यांना तहान पुन्हा, तर येतीलच की पाणी शोधत.. स्वप्नं बांधून कुठं घालता येतात??
|
निनावि ... एकदम मस्त क्या बात है !!! अभय सुंदर कविता ... चाल घेऊनच उतरलिय खरोखर ... बापू .... राग ? तुमच्यावर ? अहो हे असं कुणीतरी लिहावं म्हणून मी आणि निनवि ने खटाटोप केला होता की समीक्षण व्हावं कवितांचं ... तुमचं म्हणणं पटलंय .. एक विचार असा आला मनामध्ये की दोन प्रकारच्या कविता लिहील्या जातात ( माझ्याकडून तरी ) . वरती निनावीची जी कविता आहे ती काही ओळीत सर्व काही सांगून जाते तश्या कविता आणि दुसरा प्रकार म्हणजे वेस कोरडी ... मध्यंतरी अश्या काही ओळींत सर्व सांगून जाणार्या कविताही लिहील्या गेल्या आहेत त्या ही पोस्ट करेनच .. असो .. सविस्तर बोलूच ... तुमच्या ह्याच निरीक्षणाच्या अनुषंगाने मी इथल्या सर्व मित्रांना सांगू इच्छितो की ह्या पुढे माझी प्रत्येक कविता समीक्षणासाठी open असेल .. आधी नव्हती असं मुळीच नाही पण आपल्या इथे ते होत नाही आणि प्रगती होतेय की नाही ते कळत नाही ... व्यक्तीसापेक्ष चर्चा सोडून पोस्ट केलेल्या त्या कलाकृती संदर्भात सर्व शंका ... चर्चा ... प्रतिक्रिया ह्यांचे मी स्वागत करतो
|
Meenu
| |
| Saturday, June 10, 2006 - 2:02 am: |
| 
|
सगळ्याच कविता आवडल्या.सारं काही थेट सांगण्यची तुमची शैली आहे. तीच गोष्ट थोड्याशा सूचक पद्धतीनं मंडली तर वाचक आणखी काही क्षण अन्तर्मुख होतो >>> बापु, तुम्ही प्रतीक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद.तुमची प्रतीक्रिया मिळाली हेही एकप्रकारे माझ्यासठि यशच आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सुचकपणे मांडणं जमेल की नाही ते माहीत नाही ... पण प्रयत्न करुन बघीन ...
|
Naadamay
| |
| Saturday, June 10, 2006 - 2:48 am: |
| 
|
वेडावून तुझ्या बाळशाने मी यशोदा झाले नि दंगले आनंदून तुझ्या कर्तृत्वाने मी यमुना झाले नि वाहिले नादावून तुझ्या बासरीने मी राधा झाले नि बावरले भारावून तुझ्या दिव्यतेने मी मीरा झाले नि हरवले लपेटून तुझ्या वसनाने मी द्रौपदी झाले नि वाचले मोहरून तुझ्या संगतीने मी सखी झाले नि सामावले...
|
प्रेमाचे आर्जव... पौर्णिमेचा चंद्र माझ्या मनात भरला जीवनात माझ्या या तुझा सहवास ठरला रात्रदिन फ़क्त आत्ता तुझीच आराधना तुच माझ्या आयुष्याची जोडिदार हा विचार पक्का केला या निर्णयात आत्ता फ़क्त तुझी संमती हवी देशील ना ग साथ सखे तुझीच प्रिती हवी... रुप...
|
प्रियेचा होकार... तु हे मला काय विचारलेस??? माझिया मनाचे शब्द ओठांतुन मांडलेस अगणित रात्री बघितली तुझ्यासंगे स्वप्ने नवी प्रत्येक वळणावर होई तुझीच भेट तुझ्या या बोलण्याने बावरले, लाजले मी न कळे का रे तुला??? मुकेपणातला अर्थ हा... ऐकुन होते मी प्रेमात डोळे बोलतात अजुनही त्यांची भाषा तुला अगम्य का??? रुप...
|
Naadamay
| |
| Saturday, June 10, 2006 - 5:37 am: |
| 
|
वैभव, निनावी, अभय,............सर्वच जण छान लिहिताय!
|
अभय खास आहे कविता तुझी! नादमयं... बापू, वैभव... गप्पा ऐकायला सुद्धा छान वाटतयं एकदम... निनावी... खरंच... तुझ्या छोट्या कवितेत खूप मोठं काहितरी दडलं असतं हे खरंच आहे... सरळ सोपं आणि तितकंच खोल... काहीतरी हलतं आतमधे वाचताना प्रत्येकवेळी... म्हणूनच की काय तळातलं काहीतरी वरती येतं... तुझी माफ़ी मागूनच... निरोप ज्यांनी पंख पसरलेत त्यांना हसून निरोप द्यावा हे खरंच नजरेपल्याड झालेल्या पाखरांना लागलीच तहान कधी तर शोधतील एखादा अमृताचा नवा स्त्रोत किंवा लाही लाही होऊन जातील एखाद्या तप्त मृगजळात पण जर ध्यास घेतलाच असेल उंच उंच झेपावण्याचा तर तहानभूक विसरून आकाशही पालथं घालतील अख्खं निरोपाचं एवढं ते काय... आज ना उद्या... तो तर सगळ्यांनाच घ्यावा लागणार ना?
|
|
|