|
Jo_s
| |
| Tuesday, May 30, 2006 - 2:29 am: |
| 
|
काही ई-तिहास संशोधकांना उत्खनन करताना ई-स्क्रॅपमधे सापड्लेल्या काही ओव्या. खरतर त्या सापडल्यावर आणताना ईं-द्रायणीत पडल्या, बुडणारच होत्या, पण लिहीणार्या अज्ञात संताची पुंण्याई म्हणून परत मिळाल्या.(त्या ठिकाणी पाणीच नव्हतं नदीत). त्या पुढे देत आहोत. आता पावसाळा, नेमेची येईल त्याच त्या मेल, होतील गोळा पाठवू पुढे वा, जरी उडवू त्यास पावसाच्या आनंदास, न द्यावा तडा ---------------------------- असु नेटवरी, जरी दिसभरी वास्तवाचे तरी, ठेवावे भान ---------------------------- उदास असता, मायबोलिसी जाता मिळे त्वरे साठा, चैतंन्याचा ---------------------------- सुविचारयुक्त मेल्स, सुळसुळाट भारी न दिसे आचरणी, प्रत्यक्षात ---------------------------- सुंदर निसर्गाची, सुंदर ती चित्रे नित्य दिसता जाणीवा, बोथट झाल्या ---------------------------- त्याच त्या मेल्स, सारख्या पाठवती आणि गोठवती, बॉक्स लिमीट ---------------------------- ई-देव म्हणे आता, येईल वारेमाप ईमेलचे पीक, बॉक्स मध्ये
|
सहीच रे सुधीर ... मस्त
|
Aj_onnet
| |
| Tuesday, May 30, 2006 - 7:31 am: |
| 
|
सुधीर सहीच! खूपच छान
|
Chinnu
| |
| Tuesday, May 30, 2006 - 4:16 pm: |
| 
|
सुधीर लयी झ्याक हो!
|
मस्तय रे .... ....
|
Hems
| |
| Tuesday, May 30, 2006 - 9:42 pm: |
| 
|
छानच रे सुधीर... अजूनही वाढवता येईल हा विषय तुला ... "ई-रिटेट " न करता!
|
Jo_s
| |
| Wednesday, May 31, 2006 - 1:31 am: |
| 
|
वैभव, एजे, चिनु,अमेय, हेम्स मित्र हो धन्यवाद आता विषय सुरु झालाच आहे तर तुम्हीही भर घालू शकता . . . . सुधीर
|
हवेतला गारवा देहात झिरपला मोगर्याचा गजरा मिठीत थरारला
|
Mavla
| |
| Thursday, June 01, 2006 - 1:57 pm: |
| 
|
आता पाऊस येणार... मंद गंध दरवळनारा, माती हुंकार देनार वीज झेलन्यास आतुर, मेघ कवेत घेनार वाहुन गेले घरटे की, घरट्याचा अर्थ समजनार.... आता पाऊस येणार... सागारत उठतिल लाटा, ढवळुन किनारा निघनार, अंतरातले शिंपले, थेंबातुन मोती घडवनार, स्रुष्टिचा वाली आता, बिजा बिजातुन अंकुरनार... आता पाऊस येणार... कुंद या जगन्याला नव चैतन्य आता येनार शापित हे क्षण जगण्याचे, उ:शापित मन होणार कोमेजलेल्या कळिचा, गर्भात जन्म होनार... आता पाऊस येणार... अगम्य हा जन्म, अधुरत्व जागे होनार मुक्तिची आस पण मी, मरणाला भिणार निसर्गापुढे थिटेच आम्ही थिटेच आम्ही रहानार... आता पाऊस येणार... मावळा.
|
Ninavi
| |
| Thursday, June 01, 2006 - 2:01 pm: |
| 
|
मावळा, ही इथे का? कवितेवर टाका ना.
|
Mavla
| |
| Thursday, June 01, 2006 - 2:11 pm: |
| 
|
आमचा पाउस ईकडेच बरा, काहीच्य काही मधेच ती शोभतेय.
|
Poojas
| |
| Thursday, June 01, 2006 - 3:16 pm: |
| 
|
व्वा मावळा.. क्या बात है.. !!! सुधीर.. बढीया है..
|
सुधिर... छान आहे!!! मावळा... best ,भ्रमर आणि मावळ तुमच्या काव्यरत्नांची किंमत... तिकडे आहे... कविता आणि झुळकेवर...!!!
|
Jo_s
| |
| Friday, June 02, 2006 - 12:09 am: |
| 
|
मावळा, खुपच छान. पुजाज, लोपा धन्यवाद सुधीर
|
Cool
| |
| Saturday, June 03, 2006 - 4:09 am: |
| 
|
मुक्तिची आस पण मी, मरणाला भिणार >>>> मावळा.. सहीच! खूपच छान
|
Gajanan1
| |
| Sunday, June 04, 2006 - 4:10 am: |
| 
|
खन्त..[भारतीय डॉक्टरान्ची!] अभिनय तुझा पाहताना मधुबालाच आठवते तुझ्या प्रत्येक गाण्यातून मधुशाळाच उघडते एक दो तीन म्हणत सारा भारत नाचला पण सन्सार माण्डताना मात्र तुला बरा अमेरिका आठवला! सार्या भारतीयाना ना ना करत नेनेन्चा हात धरला. डॉक्टर नवराच हवा होता, तर भारतात काय दुष्काळ होता पडला? हम आपके है कौन सवाल तुझा सही आहे. काय करू माझेच नशीब मी डॉक्टर नेने नाही आहे!
|
.. .. .. .. ..
|
Shyamli
| |
| Sunday, June 04, 2006 - 5:01 am: |
| 
|
सहीच.. गजानन..तुम्ही डॉक्टर आहात का हो?
|
Gajanan1
| |
| Sunday, June 04, 2006 - 10:35 am: |
| 
|
होय मी डॉक्टरच आहे. ही माझी वैयक्तिक खन्त आहे. पण सर्व डॉक्टराची असे मुद्दामच लिहिले आहे. म्हणजे कविता वाचून उद्या नेने मार द्यायला भारतात आले, तर माझ्याबरोबर सगळ्यानाच दणके बसतील!
|
Meenu
| |
| Monday, June 05, 2006 - 12:12 am: |
| 
|
काय हे गजानन पण हे वाचुन भारतातल्या इतर सुंदरींना काय वाटेल ..... ते मी लिहायला घेते ... दिवा घ्या
|
|
|