Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 02, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » काव्यधारा » कविता » Archive through June 02, 2006 « Previous Next »

Badbadi
Wednesday, May 31, 2006 - 11:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे काय ते नाही कळलं >> कळेल मोठी झालीस कि..

Ameyadeshpande
Wednesday, May 31, 2006 - 11:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडबडी तुला एक मेतकुटाचं पाकीट फ़्री मधे

Meenu
Thursday, June 01, 2006 - 12:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापु ईतक्या छान कर्यक्रमाच्या आमंत्रणाबद्दल धन्यवाद .... .... यायचं असेल तर तुम्हाला मेल करु का... ... कि तसच आलेलं चालेल ?

Devdattag
Thursday, June 01, 2006 - 12:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि... तुला मेल केली आहे

Badbadi
Thursday, June 01, 2006 - 1:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स अमेय :-) .... ......

Lopamudraa
Thursday, June 01, 2006 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे.. वा... दोन चार दिवस गावाला गेले होते.. तर इथे महापुर येउन गेलाय... अजुन वाचल्या नाहित सगळ्या...
मीनु मलाही GS1 च्या post वरुन कळले.. माझ्या कवितेबद्दल...तीन पाठवल्या होत्या... त्यातली कोणती आली कळले नाहीये... बघुन सांगते ह...!!! meenu, GS धन्यवाद..!!!


Ninavi
Thursday, June 01, 2006 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बड्स, दोस्त, तू असं म्हणावंस? मेतकुटासाठी??
मला सांगायचं.. मी पाठवलं असतं.. तेही घरचं.. बेडेकरांचं नव्हे!!

अमेय, काकू फटके देते हं चिडली की.
असो, मॉड यायच्या आत पळते.

देवदत्त, धन्यवाद, उत्तर पाठवते तुला.


Mavla
Thursday, June 01, 2006 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा प्राण.

निर्गुणात शोधला जो, सजिव ठेचला होता,
अवतार घडविन्यास तो, मी शतजन्म वेचला होता ...

अहिंसा गर्जनारा जो, अंतरीचा साज होता,
" हे राम " ऐकला तो,माझाच आवाज होता ...

द्यानाचा प्रकाश जो, क्रुसावरही गात होता,
हाती ठोकला खिळा तो, माझाच हात होता ...

प्रेमाचा दुत जो, शांतिचा दास होता,
विषाने कोंदला तो, माझाच श्वास होता ...

क्षण शापित होता जो, अम्रुताचे दान होता,
लख लखुन गेला तो, माझाच प्राण होता ...

मावळा.


Poojas
Thursday, June 01, 2006 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'' पहिल्या पावसात भिजताना...''

जलधारांचे तुषार झेलित
सुगंधासवे सजताना..
मृदा पांघरे हिरवा शालू
पहिल्या पावसात भिजताना...

ग्रीष्म ऋतूचा दाह सोसूनी
रणरण उन्हात शिजताना..
कणकण वेचे सुखद शहारा
पहिल्या पावसात भिजताना...

बीज तृणातील इवले नाजूक
थेंब शोषूनी रुजताना..
अंकुर बदले रोप होऊनी
पहिल्या पावसात भिजताना...

चिमणपाखरे भिरभिरणारी
किलबिलचिव कुजबुजताना..
थवा विखुरला दहा दिशांना
पहिल्या पावसात भिजताना...

गतवर्षीचा पहिला पाऊस
मनात अलगद निजताना..
आठवणींना फुले पिसारा
पहिल्या पावसात भिजताना... !!!


Lopamudraa
Thursday, June 01, 2006 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूजा....... मनासारखी ग!!! मस्त...
मावळा... निर्गुणात....!!! खरच छान!!


Ameyadeshpande
Thursday, June 01, 2006 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मावळा कवितेत प्राण आहे तुमच्या अगदीच :-)

पूजा... नेहमी इतकीच झकास... पण वृत्तात एक शंका...पहिल्याच पावसात मृदा हिरवा शालू कसा पांघरेल?

मी लहानपणी एक निबंध लिहिला होता पहिल्या पावसावर तर त्यात शेवटी धरती नी हिरवागार शेला पांघरलाय असं लिहिलं होतं त्यावर माझे एक शिक्षक असंच म्हणाले होते त्यावरून आठवलं :-)
कवितेत चालायला हरकत नसावी पण...


Meenu
Friday, June 02, 2006 - 12:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरुजींचा राग अमेय असा पुजावर कशाला रे काढतोस..... दिवे...

Jo_s
Friday, June 02, 2006 - 12:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मावळा, पुजाज अप्रतीम कविता

सुधीर


Sakhii
Friday, June 02, 2006 - 1:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मावळा..... छान!

पुजा,
खूपच सुंदर कविता.....
शब्द, भाव, लय, रचना सारंच अगदी जमुन आलं आहे....उच्च!

सखी



Vaibhav_joshi
Friday, June 02, 2006 - 1:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कविता,गीत आणि गज़ल ह्यांच्या अध्येमध्ये कुठेतरी असणारा एक नज़्म नावाचा प्रकार आहे उर्दूमध्ये . जगजीतसिंगच्या आवाजात "तेरी खुशबू में बसे खत मै जलाता कैसे प्यार में डुबे हुए खत मैं जलाता कैसे " ही फक्त बेस गिटार वर गायलेली नज़्म ऐकल्यापासून मी ह्या काव्यप्रकाराच्या प्रेमात पडलो. आर्तता हा स्थायीभाव असलेल्या नज़्म मध्ये एखादं माणूस स्वगत बोलत असल्यासारख्या विचारांच्या लडी घरंगळत जातात. सुरुवातीलाच ह्या वरती दिलेल्या ओळींप्रमाणे एक PLATFORM/MOOD सेट करून वाचकाला/श्रोत्याला आपल्या पातळीवर आणायचं,गज़ल सारखे टाळ्या घेणारे शेर नाहीत, गीतांसारखं आकर्षक धृपदावर जाण्याला जागा नाही, कविता वाचल्यासारखं मुक्तछंदात जायचं नाही इतपत गेयता सांभाळायची ...सगळीच तारेवरची कसरत. अणि हे सगळं उत्स्फूर्त हवंच हवं. मराठीमध्ये मला हा प्रकार फार कमी पहायला मिळाला. आणि मला स्वतःला अशी एखादी नज़्म सुचायला फार वाट पहावी लागली. पण जेव्हा आली तेव्हा एक सुखद अनुभव होता.समोर बसून कुणीतरी सहज सोप्या शब्दात बोलत आपली व्यथा मांडावी आणि शेवटी अगदी रोज बोलतो त्याप्रमाणे बोलत pinnacle गाठावं हा प्रकार मलातरी नवा होता. एखादा गलिचा हळूहळू उघडावा त्याप्रमाणे दोन दोन ओळी जेव्हा सुचत गेल्या तेव्हा अशी वारंवार उत्कटता अनुभवताना एक वेगळाच आनंद मिळाला.दीर्घ दीर्घ र्‍हस्व दीर्घ (काही काही ठिकाणी दोन र्‍हस्व=एक दीर्घ)अश्या एका शब्दानंतर एक pause अश्या पध्दतीने ही वाचत जाताना मी एक तरलता अनुभवली आहे . आणखी कुणाला जाणवेल न जाणवेल पण नेहेमीप्रमाणेच हा ही प्रयत्न सर्व मित्रांसमोर ठेवत आहे
===========

प्लीज .....?

माझ्याविना माझी सखी आहे कशी सांगाल का?
ती आजही स्मरते मला इतके तरी बोलाल का?

कोणीतरी जाऊन या पाहून या दिसते कशी
येथे कधी होती जशी अद्याप का आहे तशी?
की हासणे डोळ्यांतले गेलेच सारे वाहुनी?
सर्वांसवे बोलूनही जातेच काही राहुनी?
जा जाउनी सांगा तिला मी ऐकतो सारे इथे
मौनातले ते हुंदके वार्‍यासवे येती इथे
नाकामध्ये ती मोरणी, हिरवा चुडा किणकिण करी
त्या रेशमी पदरावरी ती साजिरी नक्षी जरी
डोळ्यांतल्या पाण्याविना श्रुंगार ना होतो पुरा
सार्‍याअलंकाराहुनी लखलख तिचा मोती खरा
कळते मला तिज चैन ना, वेड्या जिवा आराम ना
जाई सुना सारा दिवस, संध्या सुनी रात्री सुन्या
हे ही कळे ती वावरे ऐसे जसे तेथे न ती
भवतालच्या गर्दीतही ती एकटी.. ती एकटी
मी एकटा आहे जसा तुमच्यासवे राहूनही
काहीच ना वाटे तुम्हां माझ्याकडे पाहूनही?
बोला तरी इतक्यात मी दिसलो कधी? हसलो कधी?
गेले तिच्यासोबत जिणे नंतर खरा जगलो कधी?
जा एकदा सांगा तिला " त्याला अता विसरून जा
पूर्वी जसा होता तसा उरला नसे, समजून जा"
जा देउनी या हो खुळ्या पाशातुनी मुक्ती तिला
जगण्यास ती ही मोकळी , मरण्यास मी ही मोकळा
"अपुल्या घराला पाहुनी ती हासली " सांगाल का?
"पूर्वी जशी हासायची अगदी तशी " बोलाल का?
नंतर तुम्हांलाही कधी देणार नाही त्रास मी
ते हासणे आणून द्या घेऊन जा हा श्वास ही

माझ्याविना माझी सखी रमली तिथे सांगाल का?
" आता तुला स्मरणार ना " इतके तरी बोलाल का?

सांगाल का.......?
बोलाल का......?

प्लीज ......................?





Shyamli
Friday, June 02, 2006 - 1:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखी मंद आठवलं.......उगाचच.... ...
मनाला अगदि भिडणारं आहे....


Maudee
Friday, June 02, 2006 - 1:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मावळा,
"निर्गुणात शोधला जो, सजीव ठेचला होता" याचा अर्थ काय???


Meenu
Friday, June 02, 2006 - 1:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतिम वैभव ............. केवळ अप्रतिम ......... खरचं खुप सुंदर अनुभव होता हे वाचण्याचा ........... अंगावर शहारा आला रे वाचताना ......

Devdattag
Friday, June 02, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव सहिच...:-)
पुजा छानच आहे गं..
मावळा उत्तम..


Kmayuresh2002
Friday, June 02, 2006 - 2:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा, सुंदर रे.. एक वेगळाच उत्कट भाव अनुभवला वाचताना..:-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators