मुंबैकर.......... आंदण म्हणून गेलेल्या बेटावर रहाणारा मुंबैकर.. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात हिरिरीने भाग घेणारा मुंबैकर.. स्वातंत्र्या नंतर मुंबईला महाराष्ट्रातच राहू द्या म्हणणारा... संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रक्त सांडणारा मुंबैकर.. अनेक मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दींचा साक्षीदार मुंबैकर... डाव, प्रतिडावाचे राजकारण स्थितप्रज्ञ पणे पहाणारा मुंबैकर... प्रसंगी त्यात भाग घेणारा मुंबैकर... अनेक सामाजिक चळवळी चालू करणारा... मुंबैकर आधुनिकता चटकन अंगी बाळगणारा मुंबैकर.... मुंबैकर... सिनेनट नट्यांचे चाळे झेलणारा... अन् कधी कधी त्यांचे लाड करणारा मुंबैकर... लाडक्या सुनील च्या शतकी खेळीचा मनमुराद आनंद लुटणारा... अन् त्याहूनही लाडक्या सचिनच्या टोलेबाजीत वानखेडेवर बेहोष होणारा मुंबैकर... जागेची गैरसोय बाजूला ठेवून आगंतुक पणे आलेल्या पाहुण्याचा यथोचित पाहुणचार करणारा मुंबैकर... सात सदतीस ची फास्ट पकडून ऑफिस गाठणारा अन् त्याचवेळी घरच्या जबाबदार्या सांभाळणारा...मुंबैकर... समोर समुद्राच्या लाटांच्या अन् मागे आख्ख्या दुनियेच्या साक्षीने वरळी सी फेस वर प्रेमालाप करणारा बिनधास्त मुंबैकर.. लोकलच्या विस्कळित सेवेने संतप्त होऊन दंगा करणारा मुंबैकर.. बिहार, यूपी वाल्या भैयाला आपल्यात सामावून घेणार मुंबैकर.. सिद्धिविनायकासमोर रांगा लावून माझे जगणे सुसह्य कर असे मागणं मागणारा मुंबैकर... लालबागच्या "राजाला" मोरया म्हणत मिरवणारा मुंबैकर... चार पैसे जास्त आले तर ऐश करणारा मुंबैकर... वीक एंड ला पुणेकरापेक्षा लोणावळा खंडाळ्याला जास्त गर्दी करणारा मुंबैकर... धांदल करू नका म्हणणारा मुंबैकर... मिनर्व्हाला शोलेचे खेळ सतत सहा वर्षे पहाणारा मुंबैकर.. भाईगिरीशी सोयरसुतक नसलेला पण त्यात होरपळलेला मुंबैकर.. दोन मोठे अनेक छोटे बॉम्बस्फोट पचवून परत उभा रहाणारा धीरोदात्त मुंबैकर... २६ जुलैच्या पावसात रोड डिव्हायडरला दोर लावून, जाणार्यांची सोय करणारा डोकेबाज मुंबैकर.. त्याच पावसात माणुसकीने वडा पाव विकणारा मुंबैकर.. आणि आता थोडा जरी पाऊस झाला तरी ज्याच्या पोटात धस्स होते तो मुंबैकर... तर मुंबैकरा तुला या परभणीकराचा सलाम... मंडळी... पहिलाच प्रयत्न आहे थोडक्याच वेळेत लिहून काढले आहे.. चूक झाली असेल तर सांभाळून घ्या..
|
अतिशय समर्पक वर्णन!! आणि आम्हाला आपला वाटतो... आपल्या लेखासाठी काही मुंबईची क्षणचित्रे मी पाठवत आहे...
|
महेश... लाजवाब मुंबईकराची छाती अभिमानने फ़ुलली मुंबईच्या या वैविध्यातच मुंबईचे वेगळेपण स्पष्ट होते...
|
R_joshi
| |
| Friday, June 02, 2006 - 4:59 am: |
| 
|
महेश खुपच छान लिहिले आहेस. मुबईकराच यथोचित शब्दात मर्म माडले आहेस. असच यानंतरही लिहित रहा.
|
Poojas
| |
| Friday, June 02, 2006 - 5:09 am: |
| 
|
महेश.. छान लिहिलय. मी मुंबईकर आहे.. याचा अभिमान द्विगुणित व्हावा इतकं सहज शब्दांत मांडलय सगळं.
|
Gurudasb
| |
| Friday, June 02, 2006 - 5:13 am: |
| 
|
महेश , अरे ही तर काव्यात्मक स्फ़ुर्ती आहे . खूप चांगले वर्णन केले आहेस . वाटून गेलं की वर्णनाशी सुसंगत व्यक्तिचित्रे , शब्दचित्रे एकत्र आली तर एक लघुकादंबरी खरंच लिहिशिल . आगे बढो . प्रयत्न करीत रहा .
|
Bee
| |
| Friday, June 02, 2006 - 6:42 am: |
| 
|
छान रे महेश.. मी मुंबईकर नाही पण मला तुझे प्रत्येक वाक्य आपण हे नक्की अनुभवले आहे मुंबईत असे म्हणत म्हणत पटून गेले. आणि एक अनुभव म्हणजे.. मुंबईच्या मुली मुलांसोबत छान गप्पा मारतात. कुठे चाचरत नाहीत.
|
महेशा, तुला मुंबईकराचा सलाम!
|
Abhi_
| |
| Friday, June 02, 2006 - 6:57 am: |
| 
|
महेश छान लिहिलं आहेस
|
Puru
| |
| Friday, June 02, 2006 - 7:55 am: |
| 
|
सही परभणीकर! एक शंका Is 'starting a new thread' facility available only for paid-members? I'm trying to create a new topic under Lalit, but getting error message.
|
नाही... ते वैयक्तिक (जालिनिशी..) लिखाणासाठी आहे... इथे तुम्ही नवीन थ्रेड चालू करू शकता..
|
पुरु, गुलमोहोर सर्व युजर्स साठी आहे. तुम्ही इथे कोणत्याही विभागात नविन थ्रेड चालू करू शकता. ललित मधेही चालतेय की ती लिन्क! पुन्हा एकदा Try करून पहा..
|
मुम्बैकर... चांगलं लिहिलय... .. .. .. .. .. .. !!!
|
Chinnu
| |
| Friday, June 02, 2006 - 9:41 am: |
| 
|
सुंदर लिहीलस महेश. मुम्बैतले दिवस आठवले!
|
Ninavi
| |
| Friday, June 02, 2006 - 10:11 am: |
| 
|
महेश, परभणीकराला हे सगळं कसं कळलं रे? 
|
Dineshvs
| |
| Friday, June 02, 2006 - 1:33 pm: |
| 
|
महेश, छान आहे. यापेक्षा सविस्तर लिहिता आले असते.
|
Smi_dod
| |
| Saturday, June 03, 2006 - 12:05 am: |
| 
|
महेश छान लिहिलेस.. मी मुबैकर नाही पन काही काळा साठी अनुभवले आहे मुम्बैपण..त्यामुळे अगदी अगदी पटले
|
Shyamli
| |
| Saturday, June 03, 2006 - 2:39 am: |
| 
|
भले परभणिकरा... महेश सही...
|
महेश,सही रे.... छान लिहीलयस रे
|
Moodi
| |
| Saturday, June 03, 2006 - 10:50 am: |
| 
|
महेश एकदम जोरदार, मुंबई फारच आवडलेली दिसतेय, हो अजुन भर टाकता आली असती. पण सुरुवात एकदम मस्त केलीत. अजुन येऊ द्या. 
|
तुम्हा सगळ्यांच्या जोरदार प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे... नवा हुरूप आला आहे... आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार...
|