|
>>>>सब कुछ छोड छाड के त्या बेटा वर जाउन रहावस वाटत आहे.. cast away मधला tom hanks व्हायचं आहे का?
|
भाग्य, फ़ोटो मात्र सुंदर आहेत!
|
बाप्पा मोरया मित्रांनो ग्रेस... गोदा उच्च एकदम... संपदा... जर्मनी का व्वा.. World Cup ला जातीयेस का मग.. भाग्या, beaches मस्त ग एकदम.. Down Under Rocks मित्रांनो हा घ्या अजून एक Swiss चा फ़ोटो.. स्थळ St. Antonien, East Switzerland मला 50 KB मुळे size आणि resolution कमी करावे लागले आहे हवा असल्यास सांगा original पाठवून देतो 
|
Moodi
| |
| Tuesday, May 30, 2006 - 10:31 am: |
| 
|
भाग्या तुझा ऑस्ट्रेलीया क्या बात है.. हिरवट निळाई, गर्द सभोवती रानसाजणी.. व्वा!! पाणी तर माझा वीक पॉइंट. जास्वंद लोळावेसे वाटतेय तिथे. हरीत तृणांच्या मखमलीचा गालिचा. तो यश चोप्रा बहुतेक तिथेच येत असावा शुटींगकरता.. 
|
Ninavi
| |
| Tuesday, May 30, 2006 - 10:45 am: |
| 
|
संपदा, ग्रेस, भाग्य, जास्वंद, सगळेख फोटो खास आहेत. जास्वंदा, रंगसंगती मस्त टिपली आहेस या लास्ट फोटोत. आर्च, म्हातार्या माणसांच्या पूर्णपणे सुरकुतलेल्या चेहेर्यांचे फोटो पाहिले असशील ना National Geographic किंवा Time मधे? तसाच वाटला मला तो जर्बेरा. पूर्ण म्लानही झालेला नव्हता, त्याच्या त्या सुकलेपणातही एक डौल होता, असं नाही वाटलं बघताना?
|
सर्वांना धन्यवाद. काही सूचना असतील तर जरूर द्या. मूडी, स्वीस सरकारने यश चोप्राचा गौरव केला होता, त्याने स्वीस एव्हढे लोकप्रिय केले म्हणून. पण मला स्वतःला, ऑस्ट्रिया जास्त आवडते....(प. अ. अ.) जास्वंद, तिकीटाची किंमत बघून डोळे पांढरे झाले. कोस्टा रिकाच्या टीमचे आमचे गांव होस्ट आहे, त्यांचीच मॅच बघून समाधान करुन घेईन.
|
Bhagya
| |
| Tuesday, May 30, 2006 - 9:34 pm: |
| 
|
माधूरि, इथे batemans bay नावाचे गाव आहे, तिथले हे फ़ोटो. आणि इथे एका ओळीत बरेच बीचेस आहेत. मी पण त्याच जागी पाण्यात पाय सोडून बसले होते. अमेय, हे गाव मुळीच निर्जन नाही. पण आख्खा ऑस्ट्रेलिया under populated आहे म्हणून निवांत वाटते हे खरे. आणि वसुमती, तुम्हाला फ़ोटो इतके आवडले तर इकडे येत का नाही? आणि शेखर, तुझ्या swiss ची सर नाही रे बाबा या देशाला. हा खर्या अर्थाने दगडांचा आणि राकट देश आहे. निनावी, फ़ोटो आवडून घेतल्याबद्दल धन्यवाद.
|
भाग्या शेवटचे २ फोटू मस्तच आहेत. जास्वंद खरच स्विस म्हणजे स्वर्ग आहे. नशिबवान आहेस. 
|
Arun
| |
| Tuesday, May 30, 2006 - 10:41 pm: |
| 
|
१. ही वाट दूर जाते .....
२. धुके दाटले हे .....
३. हिरवे हिरवे गार गालिचे .....

|
मुडी, हो ग मला पण जास्वंद चा swiss चा हा फ़ोटो पाहुन एकदम माधुरी दिक्षित चाच चेहरा डोळ्या समोर आला आणी यश चोप्राची आठवण झाली पण खरच खुप cute फ़ोटो आला आहे. संपदा, हो मी पन ऐकल आहे की swiss पेक्शा ऑस्ट्रिया खुप सुंदर आहे म्हणुन. last trip मधे swiss पाहिला, आता next time ऑस्ट्रिया भाग्या अरुण, दुसरा पोटो too good , आपल्याच देशातला वाटतोय हो ना
|
संपदा, माधुरी.. मी पण ऐकलय आणि वाचलय... कि आॅस्ट्रिया Swiss पेक्षा उच्च आहे म्हणून... म्हणून तर.. भेट द्यायचीय त्याला.. बघू कधी योग येतो ते
|
Arun
| |
| Wednesday, May 31, 2006 - 2:08 am: |
| 
|
Mukman2004: थॅंक्स. हो. तीनही फोटो महाबळेश्वरला काढलेले आहेत.
|
बाप्पा मोरया मित्रांनो हा घ्या थोडासा वेगळा फ़ोटो... त्यावेळी असचं वाटले कि खरचच डोंगरमाथ्यावरून ज्वालामुखीचा उद्रेक होतोय... पण.. ढगांनी केलेली एक सुंदर थट्टा होती ती 
|
जास्वंद, तू स्वीस चे एक कलेक्शन च अपलोड कर ना. कारण अजून अनेक सुंदर फोटो असणार हे नक्की. हा फोटो कुठला आहे? युंगफ़्राऊ किंवा टिटलिस किंवा मॉंट ब्लॉंक चा फोटो असेल तर आवर्जून टाक.
|
हाय संपदा हा फ़ोटो ना, Interlaken area मधला आहे... अग फ़ोटो खूप आहेत.. पण टाकणार कधी अन किती हा मोठ्ठा प्रश्न आहे तसेच इथे 50 KB ची मर्यादा आहे न.. त्यामुळे edit करायला ही थोडा वेळ जातो पण हो.. मी नक्कि try करीन, जमतील तेवढे टाकायचा हे collection uploading नवा funDaa आहे का... तू असेच normal uploading म्हणतीयेस ???
|
अरे मला म्हणायचे होते, इथे एक एक फोटो अपलोड करण्यापेक्षा एखाद्या साईटवर सगळेच्या सगळे फोटो अपलोड कर. म्हणजे इथे सर्व्हरवर लोड नको यायला आणि आम्हांला सुद्धा अनेक छान फोटोज पाहायला मिळतील. मात्र सर्व फोटोजवर तुझे नाव असेल असे बघ.
|
Psg
| |
| Wednesday, May 31, 2006 - 4:27 am: |
| 
|
जास्वन्द, पॉश फोटो आहे! अरुण, मस्त फोटो, जरा मोठे कर ना ते. जास्त appreciate होतील!
|
अरुण, २९ मे चे १ ला आणि ३ रा फोटो एकदम मस्त आलेत.'ही वाट दूर जाते' सुद्धा आवडला. फोटोज डिजीटल ने काढलेस का?
|
Moodi
| |
| Wednesday, May 31, 2006 - 4:39 am: |
| 
|
जास्वंद या सीनमध्ये असे गाणे म्हणावेसे वाटते, ये पर्बतोके दायरे.. युरोपमधील बर्याच ठिकाणचे हवामान सारखे असल्याने सकाळ, की दुपार की संध्याकाळ हा पत्ताच लागत नाही. नुसती पावसाळी हवा.. पण मस्त आल्हाददायक वातावरण आहे. 
|
Grace
| |
| Wednesday, May 31, 2006 - 5:49 am: |
| 
|
जास्वंदा..... तुझा हेवा वाटतो रे.. असे वाटते की पंख असते तर नुसताच त्या डोंगरंवर उंचच उंच उडत राहीलो असतो. स्विस सरकार यश चोप्रा प्रमाणे एक दिवस तुझा देखिल सत्कार करेल, तु फक्त असेच सुंदर सुंदर फोटो अपलोड करत रहा.
|
|
|