Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
PaavsaaLaa

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » ललित » PaavsaaLaa « Previous Next »

Mrunmayi
Monday, May 29, 2006 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यात पावसाच्या सरी आल्या आणि आता पावसाळा काही फ़ार दूर नाही ही जाणीव आणखीन धृड करून गेल्या. पावसाळा.... माझा सर्वांत आवडता ऋतू! ऊन्हाने करपलेल्या धरित्रिला, मनाला थंडावा देणारा...

पावसाळा येतोच मुळी भरभराटीची नांदी घेऊन. आता पाऊस पडणार म्हणजे जिकडे तिकडे हिरवेगार होणार. अगदी खडकातल्या भेगेतही इवले इवले गवत उगवून त्याचे रंगरूप पार बदलून जाणार.... या विचारांनीच मोहरून जायला होते नाही ?

पावसाळ्यात सृष्टि खरोखरच सुजलाम सुफ़लाम व्ह्यायला लागते. हिरवीगार शेते वार्‍यावर डोलायला लागतात आणि सगळीकडे नुसता आनंदी आनंद भरुन रहतो.

पावसाळा आला कि शेतकरी खुश होतो कारण त्याचे पेरलेले बियाणे आता चांगले रुजणार असते, त्याच्या कष्टाचे चीज होणार असते. ट्रेकर्स नवीन नवीन ट्रेकस काढायला कधिच सज्ज झालेले असतात. घरोघरी छोट्या छोट्या सहलींचे आयोजन करायला सुरवात झालेली असते.. रोज कामावर जाताना पावसाचा चिकचिकाट अगदी नकोसा झाला असला तरी सहलीला गेल्यावर तोच पाऊस एक्दम हवाहवासा वाटतो. आपले मायबोलीकरांचे वा.वि. कडे डोळे लागतात नाही का ? शाळेतली पोरे देखील मोठ्या सुट्टीनंतर शाळेत जाण्यासाठी ऊत्सुक असतात. नवीन मित्र, नवीन पुस्तके, नवीन वर्ग... सगळ काही नवं नवं..
पावसाळा म्हटलं की दोन वास हमखास आठवतात. एक ओल्या मातीचा आणि दुसरा म्हणजे कोर्‍या पुस्तकांचा. माझी शाळा सुरु व्ह्यायची ती हे दोन वास नाकात भरुनच..

मला तर मुसळधार पाऊस बघून एकदम आतून भरून येते आणि त्या पावसात चिंब भिजल्याशिवाय हा जन्मच व्यर्थ आहे असे होऊन जाते. पावसाच्या धारांमधे भिजून त्यांच्यामधलेच एक होता आले असते तर.. आपणही पाण्यासारखे इकडुन तिकडे, धबधब्यांबरोबर ओसंडून अक्षरशः उधळावे असच वाटायला लागते. ही तहान मात्र पावसात भिजण्यातच मी भागवते. पाऊस अगदी रोमरोमात साठवून....

बाहेर मुसळधार पाऊस कोसळत असावा, हातात कॉफ़ी चा कप आणि समोर नजर संपेपर्यंत पसरलेली हिरवी गर्द वनराई.... काय अप्रतीम दृश्य आहे नाही ?

हल्ली पावसाबरोबर आठवते की काम जोरात सुरु होणार.. आयकराची विवरण पत्रे भरण्याची अंतिम तारीख जवळ यायला लागलेली असते. मग कोसळणार्‍या पावसच्या तालावर काम सुरु होते. दुपारी चहा पिण्यासाठी gallery मधली चांगली जागा पटकवण्याची माझी गडबड सुरु होते. पाऊस बघायला मिळावा म्हणून... त्या ५मि. मधे सुद्धा थकवा कुठच्या कुठे पळून जातो.

पावसांत एकच नको वाटतं मला ते म्हणजे सर्दी आणि ताप. पण पावसाचा आनंद लुटायचा म्हणजे याकडे काणाडोळा करणेच बरे नाही का ? असंच पावसामुळे कधीकधी नुकसानही होतं. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे नको हा पावसाळा असंच अगदी सगळ्यांना झालं होतं. पण तरीही गेल्या दोन दिवसांच्या सरींनी मला मात्र उल्हसित केलंय. आणि यावेळी जास्तीत जास्त ट्रेक्स करायचा संकल्प मी कधीच करुन टाकलाय. (काय GS राजमाचीला कधी जायचं ? ) मग मित्रहो, तुम्हीही असेच ताजेतवाने झालात ना पाऊस येणार म्हणून? चला तर मग, पावसाचा आनंद लुटण्यासाठी सज्ज होऊया...


Mrunmayi
Monday, May 29, 2006 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वरती लिहिताना काही शब्द अडलेत ते कसे लिहायचे कळाल नाही उदा. अक्शरश:, coffee . कृपया कोणाला येत असल्यास ते दुरुस्त करावेत.. तसंच लेखाच नाव मराठीत कसं लिहायच ?


Sampada_oke
Monday, May 29, 2006 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, अक्षरशः असे लिही. akshharashaH.
कॉफ़ी= kOfii.
लेखाचे नाव नेहमीप्रमाणे dev2 मध्ये घालून लिही.

Mrunmayi
Monday, May 29, 2006 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dhanyavaad sampada. te naav badlaayche kahi jamale nahi.

Arun
Tuesday, May 30, 2006 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृणमयी : खूप छान लिहिलं आहेस ........... :-)

बाहेर मुसळधार पाऊस कोसळत असावा, हातात कॉफ़ी चा कप आणि समोर नजर संपेपर्यंत पसरलेली हिरवी गर्द वनराई.... काय अप्रतीम दृश्य आहे नाही ? >>>>>>>>>>>> मस्तच ......... वाह, क्या बात है .................. :-)

Cool
Friday, June 02, 2006 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> एक ओल्या मातीचा आणि दुसरा म्हणजे कोर्‍या पुस्तकांचा.
>>>>>> सुंदर

>>>> आयकराची विवरण पत्रे भरण्याची अंतिम तारीख जवळ यायला लागलेली असते. >>>>
इकडेही तेच का

छान लिहिलय..


Manali_frd
Friday, June 02, 2006 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी छान लिहलयस. :-) मलाही कोर्‍या पुस्तकाचा वास खुप आवडायचा.


Lopamudraa
Friday, June 02, 2006 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्रुणमयी, हे सुध्दा आवडले ग... लिहित जा अजुन...!!!

Moodi
Saturday, June 03, 2006 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी डोळ्यासमोर उभा केलास राजमाची. मी नाही गेले कधी पण आधी जे फोटो बघितलेत त्यात तुझ्या मन चिंब भिजवणार्‍या लेखाची भर पडल्याने अजुन पावसाळा जास्त वेड लावतोय. आता जरूर ट्रेक करुन फोटो पण टाक इथे.

Shyamli
Saturday, June 03, 2006 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी... अजुन येऊ दे ग


Phdixit
Sunday, June 04, 2006 - 12:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>पावसाच्या धारांमधे भिजून त्यांच्यामधलेच एक होता आले असते तर..

मृ मस्तच लिहीले आहेस,
आता काही दिवसातच डोंगर हिरवेगार दिसू लागतील, मधुनच खळाळत वहाणार्‍या शुभ्र जलाधारा पाहिल्यावर निश्चितच ह्या निसर्गामधे एकरुप व्हावेसे वाटते

कधी एकदा बाहेर पडायला मिळणार असे झाले आहे. ऑफिस मधुन कधी सुट्टी मिळ्णार ह्यावर सगळे अवलंबुन आहे.


Dineshvs
Sunday, June 04, 2006 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या पावसाने मला वेडच लावलेय. ईथे तर घराच्या चहुबाजुने भिडतोय, पण तो कमी पडला म्हणुन आज सावंतवाडी, अंबोली, बेळगाव, कोल्हापुर असा दौरा करुन आलो, फक्त या जिवलगला भेटण्यासाठी.

Gs1
Monday, June 05, 2006 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच पावसाळा तो पावसाळा चांगला पाउस झाला तर २४ - २५ ला राजमाची..



Itsme
Tuesday, June 06, 2006 - 2:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

are kay re GS .... kalach tar mhanalas 24-25 "harishchandra" gad :-(

mrunmayi, mastach .....

Mrunmayi
Thursday, June 08, 2006 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dhanyavad mandali. yes, GS 24-25 raajmachi. julymadhe nako mala nahi yeta yenar mag:-(
Lopa : he sudha amhanje he asa kahi lihaychga mi pahilyandach prayatna kela aahe. tari pan dhanyavad :-)

Rachana_barve
Thursday, June 08, 2006 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच ग म्रुण्मयी. छान लिहिल आहेस. US चा पाऊस आपल्या भारतासारखा रिमझिम रिमझिम पडत नाही. आणि पडतो तो थंडीत भरपुर वारा घेऊन आणि अती मोठे थेंब असतात. भिजायला गेलो तर ते थेंब चक्क टोचतात इतक्या जोरात पडतो :-O त्यामुळे इथे भिजायचा नाद सोडला मी.

Rupali_rahul
Friday, June 09, 2006 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>मला तर मुसळधार पाऊस बघून एकदम आतून भरून येते आणि त्या पावसात चिंब भिजल्याशिवाय हा जन्मच व्यर्थ आहे असे होऊन जाते. पावसाच्या धारांमधे भिजून त्यांच्यामधलेच एक होता आले असते तर.. आपणही पाण्यासारखे इकडुन तिकडे, धबधब्यांबरोबर ओसंडून अक्षरशः उधळावे असच वाटायला लागते. ही तहान मात्र पावसात भिजण्यातच मी भागवते. पाऊस अगदी रोमरोमात साठवून.... <<<<<< मृणमयी अगदी अगदी... माझ्य मनातल्या भावना जिवंत झाल्या...
अप्रतिम लेख..





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators