Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 24, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » काव्यधारा » कविता » Archive through May 24, 2006 « Previous Next »

Naadamay
Wednesday, May 24, 2006 - 12:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, अश्विनी, पूजा, चिन्नू सगळ्यांचाच एकदम उत्साह वाढलेला दिसतोय.सर्वांच्याच सुंदर कविता... लगे रहो.

Meenu
Wednesday, May 24, 2006 - 12:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केपी शी अगदी सहमत.. कुणाकुणाला वाह म्हणावं..... खुप सुंदर... सहज विचार आला... आपण समोरासमोर नसुनही ईतकि मजा येतीये.. प्रत्यक्ष भेटायचा योग आला तर काय बहार येईल..

Mukman2004
Wednesday, May 24, 2006 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच आहे कुणाकुणाला वाह!!! म्हणावे.
निनावी, अश्विनी पुजा, जया, वैभव, चिनु, देवा सगळेच great
तुमच्या कडे असलेल्या शब्दांचा साठा पाहुन खरच कौतुक वाटत.
दाद द्यायला पण शब्द अपुरे पडतात
Simply Great!!
असाच गोलमोहर फ़ुलु द्या वरचेवर.


Princess
Wednesday, May 24, 2006 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनुला अनुमोदन!!! खरच सगळ्याना जमवुन मैफिल जमवली तर काय बहार येइल ना. काय छान लिहिताय... पुजा simply superb !!! निनावि, माझे शब्द हरवलेत... खुप छान लिहिलय तू.

प्रिन्सेस


Sumati_wankhede
Wednesday, May 24, 2006 - 2:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पैसा रे पैसा...

हल्ली सारखं वाटत रहातं...
पैसा काळा नसतो वा गोराही नसतो;
पैसा फक्त पैसा असतो.

पेट्रोलपंपावर पेट्रोल भरायला
गाडी थांबवली तशी...
सरकन पुढे आला त्याचा सराईत हात
अन मीटर सुरू करून
तहानलेल्या गाडीच्या तोंडात
त्यानं झरकन सोडली धार
कोर्‍या करकरीत नोटा मोजणं झाल्यावर
लगेच कोरा झालेला त्याचा चेहरा बघताना
सतत जाणवत राहिलं...
पैसा काळा नसतो वा गोराही नसतो;
पैसा फक्त पैसा असतो.

दवाखान्यात...
ऍक्सिडेंट झालेल्या नवर्‍याचं शरीर
ठणठणीत झालेलं नसतानाही
भरगच्च नोटांची बंडलं
बिल काऊंटरवर ठेवताना
समोरच्यानं नाहीच विचारलं मला;
हा पैसा काळा की गोरा;
वा उसनवारीनं आणलेला.

आणि त्या दिवशी...
गाडीवाल्याकडून भाजी घेताना
शंभराची हिरवी नोट
त्याच्या स्वाधीन करताना
उगाच कचरला हात माझा
त्याचा मात्र... चेहरा खुलला
अन नेमकं तेव्हाच....
बाजूला उभ्या असलेल्या म्हातारीनं
लुगड्याच्या आंब्यातून काढलेली
चुरगळलेली; काहिशी फाटलेली
विशीची नोट बघून तो खेकसला,
'नाही चालणार' म्हणून.
तेव्हा तर प्रकर्षानं जाणवून गेलं
खरंच नसतो...
पैसा काळा वा गोरा नसतोच;
पैसा फक्त पैसा असतो.


Zaad
Wednesday, May 24, 2006 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"आता बरसशील तेव्हा त्यात मीही वाहून जाईन म्हणते..
" khoopach sahi! keep it up...

Sumati_wankhede
Wednesday, May 24, 2006 - 3:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि,
तू नसताना.... ची आर्तता...
अप्रतिम...


Naadamay
Wednesday, May 24, 2006 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तुझ्या नसण्याची सवयच झालीय आता

नाही राहत दारामधे तासनतास मी उभा
नाही बसत डोळे लावून मी वाटेकडे तुझ्या
इतरही कामं जास्त महत्त्वाची आहेत अशा
गोड समजुतीने मी बांधून टाकलंय मला

तशी काही कमी वाट मी पाहिली नव्हती तुझी
विसरून गेलो होतो झोप असते तरी कशी
झुलत रमत राहायचो आशेच्या झुल्यावरी
शेजारी मात्र असायच्या फक्त तुझ्या आठवणी

डोळे तुला साठवूनसुद्धा रिकामेच राहिले
नाहीतर त्यात एवढे अश्रू कुठून भरले
रडायचीही त्यामुळे खरी भीतीच मला वाटे
तुझी मूर्तीही निसटून गेली तर.....कोण जाणे!

मग मात्र संपूर्णच आटलं डोळ्यातलं पाणी
निर्जीवच झालं मन या माझ्या सजीव शरीरी
निर्जीवाला भाव कसले यातना ती कसली!
यंत्र व्हायचं तंत्र साधून जगतो कसातरी

आणि आता जर तू परत आलीसही चुकूनी
देऊच नको ओळख मला, वाग परक्यापरी
मला शंका आहे जर पुन्हा गुंतलो तुझ्यात मी
पुन्हा सोडून गेलीस तर सोडीन स्वतःलाही...


Mukman2004
Wednesday, May 24, 2006 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

करुनी शब्दाच्या सुंदर रचना
उच्च कवीता आल्या जन्माला
खंत आहे मात्र आमुची
न सुचे शब्द दाद द्यायाला

हे इथल्या सगळ्या कवीकवयित्री साठी बर का.. :-)


Princess
Wednesday, May 24, 2006 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे नादमय,
कसे कौतुक करु तुझ्या या कवितेचे?? पुरुष सुद्धा इतके भावनाप्रधान असतात का? खुप छान लिहिलेय. असे वाटतय, हे असे सगळे मला सुद्धा वाटत असते ना.. पण तुझ्यासारखे शब्दात नाही बाबा कधी मांडता आले. हे असे सुचण्यासाठी प्रेमात पडावे लागते का?:-)


Jayavi
Wednesday, May 24, 2006 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी.........जबरदस्त. नको गं देऊस सगळं काही, थोडं राखून ठेव ना.......पुन्हा विरहात त्याला आठवायला काही तरी हवे मनाला :-)
सुमती, अगदी खरंय. पैसा फ़क्त पैसाच असतो. खूप छान आहे कविता........ अगदी वास्तववादी.
नादमय,मस्त!
माधुरी, क्या बात है.......आखीर तुम भी शुरु हो ही गयी ना.....मबरूक :-)




Rmd
Wednesday, May 24, 2006 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस्तित्वाच्या शेवटच्या कणापर्यंत
स्वतशीच झगडत रहाणं
कणाकणाने स्वतलाच असं संपताना पहाणं
जगण्याची उत्तरं मिळवत जाताना
उत्तरांमधे प्रश्न शोधत जाणं
क्षणांच्या सांदीकपारींमधून
आयुष्याचं असं ठिबकत ज़ाणं...

जगणं खरंच याला म्हणतात?



Moodi
Wednesday, May 24, 2006 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमती तुझी प्रत्येक कविता अंतरात एक नवी संवेदना देऊन जाते, एक कळ उमटते ती मात्र शब्दात अजीबात व्यक्त करता येत नाही, फक्त तुझी जी भावना आहे तीच आमच्या मनात असते. अन तशी भावना रुजवण्यात तू कायम यशस्वी होतेस हेच महत्वाचे आहे.

Poojas
Wednesday, May 24, 2006 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी..एकदम बरोबर. मी तुझ्याशी सहमत आहे.
रुपा.. अप्रतिम... !!!
निनावी... आता खरच शब्द नाहियेत गं कौतुक करायला !
नादमय.. simply superb..
last but not the least .. .. ..माधुरी.. exactly तेच म्हणायचय मला..
बघ गं कुठे एखादी अशी dictionary मिळते का..
ज्यात कौतुकाच्या शब्दांची भरघोस लिस्ट मिळेल.. plz


Vaibhav_joshi
Wednesday, May 24, 2006 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी नावं घेत नाही कारण कुणाचं तरी राहून जायचं ... पण इतक्या सुंदर कविता एकावेळी मी तरी पहिल्यांदाच पाहतोय ... खूपच मस्त वाटलं ... ही तीन चार अर्काईव्ह्ज मी सेव्ह करून ठेवतोय ....
आणि एक कॉन्ट्रिब्युशन ... गंभीर मूड बदलण्यासाठी
:-)


Vaibhav_joshi
Wednesday, May 24, 2006 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लघू अन दीर्घ शब्द आळीपाळीने आले की वाचायला फार मजा येते ... आणि त्यातच जर शब्द रिपीट होत असतील तर खुमारी आणखीनच वाढते . असाच एक प्रयत्न .

अजू SS न ......

निरोप देऊ कसा तुला मी कुठे पुरेशी सुखावले रे
अजून डोळ्यांत चंद्र माझ्या अजून नाही उजाडले रे

असाच वेड्या जरा असू दे तुझा हात तो उशास माझ्या
अता अताशा तुझ्या मिठीला, मिठीत घेउन विसावले रे

पहा पुन्हा ते तुझे ओठही हळूच काही म्हणू पहाती
म्हणून ऐकावयास माझे पुन्हा ओठ हे खुळावले रे

झुळूक होवून स्पर्श सारे जरी मला चुंबिण्यास आले
कसे कळेना क्षणांत त्यांचे उरात वादळ भणाणले रे

नकोच आता बघावयाला नभातला शुक्र जागलेला
तुलाच मी पांघरुन घेउन जगास सार्‍या झुगारले रे

अबोल रात्रीसही कळाल्या कळू नये त्या हजार गोष्टी
कुणी कुणाला कसे कसे अन किती कितीदा पुकारले रे

VJ


Mukman2004
Wednesday, May 24, 2006 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया, पुजा thanks ग :-)

पण खरच खुप सुंदर लिहिताय तुम्ही २६ २६ २६
जया मै तो शुरु हो गयी रे. लेकिन तुम क्यों रुकी हो २६..वाट पहात आहे तुझ्या कवितांची
का आजुन ती " १८वेळ १९ " आली नाहिये :-)

वैभव, मार डाल रे मार डाला खलास एकदम :-)


Shyamli
Wednesday, May 24, 2006 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव वाह वा
क्या बात है भई

माधुरी और थोडा बरसो


Rmd
Wednesday, May 24, 2006 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव्: अगदी केवळ!!
तुलाच मी पांघरुन घेउन जगास सार्‍या झुगारले रे
>>>>> एकदम मस्त!!

Poojas
Wednesday, May 24, 2006 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव.. .. .. .. झक्कास रे भौ

माधुरी.. हे आकडे नक्की काय सांगतात.. ??





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators