|
प्रिय.. नेहमीप्रमाणे मन अस्वस्थ झालं की येते तुझ्याकडे. मनात पहुडलेले प्रश्णं उभारी घेतात आणि तुझ्याकडे यायला प्रव्रुत्त करतात. मी ही शोधतेय, कसली अस्वस्थता आहे ही? की जीवनाच्या एका सत्याच्या मी अगदी समीप आलेय म्हणून ही सैरभैरता? पण सत्य हे एवढच? एवढं व्यवहारीक? मनाचा पुर्ण गोंधळ उडण्याआधी एक एक धागा पकडते. हिंदीत एक खूप सुंदर शब्द आहे 'गुंजल'. वींड चाईमचे एकमेकांत अडकलेले नायलॉनचे धागे सोडवताना अजुन अजुन उलझत जाते ती गुंजल. याक्षणी माझी तीच अवस्था आहे. भावना, जीवत्व, बुद्धी यांच्या आधारवर तरंगणार्या, आंदोलीत होणार्या, एकमेकांवर धडकुन नाड निर्माण करणार्या इच्छा, आसक्ती यांची माझ्या शरीराच्या वींड चाईम मधील गुंजल. खरं तर ही गुंजल सोडवणं हा एक वेडेपणाच. पण हट्टी मन पुन्हा इरेला पेटलय. मैत्रा स्त्री म्हणुन मला बहाल झालेलं नी आकळलेलं (कन्सीव झालेलं) माणुसपण आणि पुरुष म्हणुन तुला बहाल झालेलं आणि आकळलेलं माणुअसपण वेगळं असतं का रे? मला सतत का वाटत रहातं, 'हो! वेगळेपण असतं'. आणि ते वेगळेपण समजुन घेण्यासाठी मी जेव्हा तुझ्या अगदी जवळ यायचा प्रय्त्न करते, तेव्हा का त्या वेगळेपणाला तु दिलेल्या अभेद्य कोषाला धडकुन मी पुनः शुन्य स्तरावर येते? कधी भिरकावलीही जाते? कधी घायाळही होते? कधी घाबरतेही ताकिद दिल्यासारखी. मुळात चिवट, लोचट, दुर्द्म्य असणार्या माझ्या इच्छाश्क्तील, जगण्याच्या इच्छेला ही धडक, हे ठोकरलं जाणं तात्पुरतं रक्ताळत असलं तरी, आपला हट्ट सोडायला लावू शकत नाही. या कोषात असलेल्या तुला मी पुन्हा हाक देते. का मला वाटतं काही प्रश्णं तुला नकोच असतात? का काही प्रष्णांना तु उडवाउडवीची उत्तरं देतोस? का आतलं रेषीम तुला माझ्यापासुन लपवुन ठेवायचं असतं? का लपवतोस ते ही सांगत नाहीस. मग कधी कधी भिती वाटते, आत रेषीम नसेल तर? या तर्कहीन भितीला झटकुन मी पुन्हा तुझ्या जवळ येते. तुला सुचीत करत रहाते की हे प्रिया मला रेषमाची ओढ नाहिये ना मी त्याच्या शोधात आहे. मला हवेय फक्त हवीये आरपार जाण्यासाठी, जाणण्यासाठी अनुमती. मला हवीयेत उघडणारी दारं. नी मला हवय माझ्यातल्या स्त्रीची आठवण करुन न देणारां तुझ्यातला माणुस. खरं तर आजचं व्यथीत होऊन तुझ्याकडे येणं याच कारणासठी. सख्या तुझ्या वेगवेगळ्या रुपांद्वारे तुझ्यापर्यंत, तुझ्यातल्या आतल्या तुझ्यापर्यंत पोहचण्याचा माझा शोधप्रवास चालूच राहील. या शोधाची साधना करताना होणारी खरचट, लागणारे चटके, त्या कोषाल आदळून होणारी माझी विछिन्नता झेलायची आणि सहायची शक्ती माझ्याकडे आहे. तुझ्या घट्ट कोषासारखी तीही माझ्याभोवती कवचकुंडलांसारखी ताकडीने साथ देतेय. तरीही, या प्रवासात तुझी रुपं जेव्हा, फक्त माझयातल्या स्त्रीपणाची मला जाणीव करुन देतात, मला फक्त ते स्त्रीपण जगायला खुणावतात, मी व्यथीत होते. शिखरावरच्या तुला भेटायला येते, साद घालते. मन ओतून निचरा करू पहाते. तुझ्यावरचं माझं प्रेम अभेद्य रहाणर असतं. तुझ्या रुपांना मी जशी भुलत नाही तशीच त्यांनी हिरमुसतही नाही. माझ्या देहातल्या अंतिम चेतनेपर्यंत तुझ्या कोषातल्या आतल्या तुला एकदा मी कवेत घेईनच हा मला द्रुढ विश्वास आहे. यासाठी तुझ्यावरचं माझं प्रेम हे माझं आत्मबल आणि माझातलं माणुसपण हा माझा आत्मविश्वास माझया सोबत आहेतच. चल येतेच लवकरच भेटू. तुझं माणुस. मेघधारा
|
Dhruv1
| |
| Tuesday, May 23, 2006 - 7:42 am: |
| 
|
मेघा खुप आतलं व सच्च लिहिलयस आपण आपल्या आतच हरवलेलो असतो कि कोणात गुंतत जातो? काय असतात सर्व व्यवधानं त्यांचा हिशोब सर्वच अगम्य असो मनापासुन आवडलं..... हे खरं....!
|
Jayavi
| |
| Tuesday, May 23, 2006 - 10:22 am: |
| 
|
मेघा, उच्च! खरंच मनाला पडलेले हे प्रश्न..... कधी कधी त्याची उत्तरं शोधावीशी वाटत असूनही ती अनुत्तरीतच रहाविशी वाटतात. explore करण्यातली मजा काही वेगळीच असते ना खूप दिवसांनी आलीस गं!
|
Shreeya
| |
| Tuesday, May 23, 2006 - 3:22 pm: |
| 
|
मेघा, खूप सुन्दर आणि विचार करायला लावणार लिहिले आहेस. वाचल्यावर अंतर्मुख व्हायला होतं हेच तुझे यश आहे.
|
Smi_dod
| |
| Wednesday, May 24, 2006 - 12:51 am: |
| 
|
वा..वा मेघधारा, सुंदर... अगदी अंर्तबाह्य हलवलस... छान
|
chaan lihiley... mast...!!!.. .. .. .. .... .
|
मेघधारा मस्तच लिहीलयंस. अवघड विषय असून सहज भाषेत छान उतरवलाय.
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 24, 2006 - 9:26 pm: |
| 
|
छान आहे मेघधारा. असा विषय असला कि असे ओघवते लिहिता येत नाही अनेकजणाना. ईथे मात्र गाळलेल्या जागा नाहीत.
|
नमस्कार मंडळी, मला तुमच्या आत पोचु दिल्याबद्दल धन्यवाद! या पत्राचं संवादात रुपांतर व्हावं ही सदिच्छा. मेघा
|
Shyamli
| |
| Thursday, May 25, 2006 - 10:15 am: |
| 
|
अरेच्चा ईकडे बघितलच नाही की.... वा अगदि नेहमीची तगमग... अन कातरता.... सुरेख मांडले आहेस...
|
|
|