Meenu
| |
| Wednesday, May 17, 2006 - 1:13 am: |
| 
|
(दिवे घ्या रे सगळ्यांनी..... काय लय बोलले आसन तर...) मायबोलिवरील आगामी कार्यक्रमांची रुपरेषा... सौ. मिनुताई राजेभोसले (प्रो. वेन्कटेश अमृततुल्य..) या पडद्यावर अवतरतात (अवतार वर्णन: हिरवीगार जरीकाठाची साडी, कपाळावर कुंकवाचा भला मोठा टिळा, हिरव्या बांगड्या, पोटाच्या आकारामुळे साडी जमिनीपासुन दोन इंच वर तरंगतेय...सुज्ञ गडावरील व कोथरुड बिब्यांच्या लोकांना ह्या वर्णनाचे प्रयोजन सांगणे न लगे... लिंबुभाऊ लगे रहो....) सौ. मिनुताई बोलायला सुरुवात करतात..... तर मंडळी आज आपल्यासमोर आम्ही (स्वत:साठी आ. ब.) सादर करीत आहोत.. मायबोलिवरील आगामी कार्यक्रमांची रुपरेषा (आवाज गोड हो लिंबुभाऊ...) आणी या कार्यक्रमांचे वैशिष्ठ्य म्हणजे यामधील मायबोलीवरील कलाकारांचा सहभाग... सकाळी...: संस्कार वर्ग: रंपावारी आज आपण ऐकु शकाल चहाख्यान प्रायोजक. सौ. मिनुताई राजेभोसले उर्फ मिनु (प्रो. वेन्कटेश अमृततुल्य..) प्र. वक्ते: नाना चहावाले.. खाद्योत्तेजक मंडळ आयोजित चहापान स्थळ: गड बीबी कलाकार: नेहमीचेच यशस्वी व दस्तुरखुद्द मिनुताई आरोग्य विषयक कार्यक्रम दिवे घेण्याचा हृदयावर होणारा अनुकुल परीणाम... दुपारी.....: मायबोलिवरील पुरुष सदस्यांच्या बायकांचे महिला मंडळ सादर करित आहे... कचर्यातुन कला.. मायबोलिवरुन पतिराजांनी वेळोवेळी गोळा करुन आणलेल्या दिव्यांचे वेगवेगळे शंभर उपयोग यात दाखवण्यात येतील.. प्रमुख आकर्षण प्रसिद्ध अभिनेत्री संध्यादेवी यांनी दिव्यांची उतरंड डोक्यावर रचुन केलेले दिप नृत्य... श्रेष्ठ विडंबनकार डॉक्टर देवदत्त कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांचे सुप्रसिद्ध विडंबन दिल्या घेतल्या दिव्यांची साभिनय सादर करतील मायबोलीवरील महिला मंडळाने आयोजित केलेला कार्यक्रम... लाजु मी कशी... हा हि दुपारच्या फावल्या वेळात आपण बघु शकाल... (या कार्यक्रमासठि लायक प्रशिक्षक मायबोलीवर न मिळाल्याने बाहेरुन मागवावे लागले आहेत) सौ. लाजरीबाई मायबोलीवरील महिलांना शिकवतील लाजण्याचे बहात्तर प्रकार (प्रात्यक्षिकासहित...) संध्याकाळी....: अयोग वधु वर सुचक मंडळ आयोजित न वरांचा मेळावा.. या कार्यक्रमांतर्गत पहा नवर्यांनी न्-वरांना केलेले मार्गदर्शन.. स्थळ्: कोथरुड बी बी कलाकार: ने. य. रंपा आणि त्याचा कोथरुड व गड बी बी वर होणारा परिणाम यावरील परिसंवादही तुम्हाला संध्याकाळच्या कार्यक्रमात ऐकायला मिळेल..वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर रंपाप्रेमी यात सहभागी होतील विशेष सहभाग कविराज वैभव, श्रेष्ठ विडंबनकार डॉक्टर देवदत्त, रंपा पंचायत कार्याध्यक्ष मयुर, प. पू. समर्थ श्री श्री रामभाऊ केल्याने रेखाटन हा कार्यक्रम सादर करतील लिंबुभाउ..यामध्ये प्रामुख्याने दोन विषय चर्चिले जातील १. रेखाटनाचा कार्यलयीन कामावर होणारा परिणाम २. रेखाटनाचा मायबोलीवरील अन्य सदस्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम (ता. क. कमकुवत हृदयाच्या मायबोलीकरांना हा कार्यक्रम पाहुन त्रास झाल्यास आयोजक जबाबदार नाहित. येणार्या श्रोत्यांनि खबरदारीचा उपाय म्हणुन आत्तापर्यंत जमा केलेले दिवे बरोबर घेऊन यावे.) रात्री...: रंपा पंचायत आयोजित रंपा पान स्थळ..: चंद्रनगरी कलाकार नेहमीचेच यशस्वी धार्मीक...: चिंता करीतो विश्वाची: वक्ते प. पू. समर्थ श्री श्री रामभाऊ या कार्यक्रमांतर्गत कोथरुड व गड बी बी वरील लोकांच्या वागण्याबद्दल चिंता व्यक्त करतील परी तु बी बी चुकलासी: वक्ते: लिंबुभाऊ (चुकीची पोस्टिंग चुकिच्या बी बी वर चुकिच्या वेळी टाकण्याच्या प्रात्यक्षिकासहित) तर मंडळी आपल्या आवडीच्या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी मिनुताईंशी तातडीने संपर्क साधा
|
मीनु ताई.. आपण एवढ्या जातिने लक्ष घालून जी कार्य्क्रमाची रुपरेषा ठरवली आहे त्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडे आहे.. आम्हास आपण एवढा मान दिलात याबद्दल आम्ही आपले शतश: ऋणी आहोत.
|
मीनू, तुला मी "सन्योजक" ही मानाची बिरुदावली प्रदान करू का? DDD
|
खाऽऽस मिनूच्या आग्रहास्तव हे चित्र! आता ह्या चित्रातली खरोखरच्या पैकी कुणाशी मिळती जुळती हे याचा शोध ज्याचा त्यान स्वतःच्या जबाबदारीवर घ्यावा!
|
Rmd
| |
| Wednesday, May 17, 2006 - 2:53 am: |
| 
|
Limbu: manala rao!! mast aahe chitra.
|
Meenu
| |
| Wednesday, May 17, 2006 - 3:09 am: |
| 
|
लिंबुभाऊ छान... संयोजक चालेल की
|
मीनु, कार्यक्रम मस्तच आहे. पण लिंबु तुझे चित्र तर एकदम झकास. अमोल
|
मीनु मस्त आहे .. शेवटपर्यंत कार्यक्रम नीट पार पडला म्हणजे मिळवलं
|
आरेमडी, मीनू, अमोल, तुम्हाला थॅन्क्यू! हे चित्र पण खरोखरच दहा मिन्टात काढले, काढताना तीन वेळेस बॉसने बोलावले... ("डिस्टर्बन्स ) आणि केवळ एकदा एक सेन्टीमीटर लाम्बीची रेषा पुसायला खोडरबराचा वापर केला! मीनू, असेच लिखाण करीत राहीलीस तर मला चित्रान्करता भरपुर विषय मिळतील! छान लिहिल हेस!
|
meenu gammat aahe h...kothrud bb var asate kaa he sagale??? 
|
Moodi
| |
| Wednesday, May 17, 2006 - 4:08 am: |
| 
|
लिंब्या चित्र खुपच सुरेख आलय रे. चुकल ग मीनु, सॉरी परत एकदा. तुला जबरदस्त ह्युमर सेन्स आहे मात्र. 
|
Smi_dod
| |
| Wednesday, May 17, 2006 - 4:12 am: |
| 
|
लिंबु चित्र खुपच सुंदर आले आहे. आणि परत १० मि. त आणि बॉस नावाच्या प्राण्याचा ईतका डिस्टर्बन्स असताना......
|
Meenu
| |
| Wednesday, May 17, 2006 - 4:31 am: |
| 
|
ओ लिंबुभाऊ हे काय बरुबर नाय हा माज्या लिखानाला कुनिच विचारना कि वो तुमच्या चित्राफुडं... ह्ये काय वो ये कानामागुन आलं नि....कायतरी जाला म्हणतात तसच कि वो..
|
अगो उगी उगी उगी मीनू अग समद्याना ठाव हे ना की ते चित्र तुह्या लिखाणावरुन काढल हे, तुझ लिखाण वाचल्याबिगर समजणार हे का चित्र कुणाला? अन लिखाण वाचुन चित्र समजुन घेतल्याबिगर कोण चित्राला चान्गल म्हणणार हे का? अर्थात, चित्राला चान्गल म्हणल म्हन्जेच चित्राच्या जोडीने लिखाणाला बी चान्गल म्हणताहेत लोक! 
|
Puru
| |
| Wednesday, May 17, 2006 - 5:30 am: |
| 
|
आता नक्की काय लिहावं (पक्षी, नक्की कोणाचं आणि किती कौतुक करावं?) हा यक्ष प्रश्न पडला आहे! (पक्षी, खडुस समिक्षकाच्या भुमिकेतुन लिहावं की आपलं पामर वाचकाच्या चष्म्यातुन )
|
Athak
| |
| Wednesday, May 17, 2006 - 5:43 am: |
| 
|
ह्या बहिणीला मायबोलीकरांचा सखोल अभ्यास फार कमी वेळात झाला भाषा पण भावासारखीच लिहीते
|
Krishnag
| |
| Wednesday, May 17, 2006 - 6:27 am: |
| 
|
अथक मिनु, लिम्बु झकास!!
|
>>>> पक्षी, नक्की कोणाचं >>>> पक्षी, खडुस समिक्षकाच्या एऽऽ पक्षा, तो "पक्षी" शब्द झक्कीबोवान्चा खास राखुन ठेवलेला हे!.....
|
मला तर कुठलाच पक्षी दिसत नाहीये ... हां एक बाई दिसतीय १० मिनिटात तयार झालेली .... पण हे असं चित्रातच घडू शकतं .. मस्त रे लिम्ब्या
|
मीनु छान लिहिले लिंबु ते पोटाचा घेर कमिच दिसतो आहे चित्रात मीनु लिहिले आहे ना साडी दोन्-तीन इंच वर तरंगते म्हणुन
|