Abhi_
| |
| Friday, May 19, 2006 - 6:15 am: |
| 
|
" इज इट अभि? " " येस. स्पिकिंग. " " अभि कॉल फॉर यू " " प्लीज ट्रान्स्फर इट. थॅंक्यू. " ...... " हॅलो, अरे रुपाली बोलतीय. " " हॉस्पिटलमध्ये निघालायत का? " " अरे! अभिनंदन!! आपण दोघे आई - बाबा झालो. तुझाच अंदाज बरोबर ठरला. मुलगी झाली. पंधरा मिनिटे झाली. नॉर्मल झाले. सात पौंड आहे वजन. गोड आहे रे एकदम!! तू कधी निघतोयस? " " कधी काय लगेच निघतोय!! " ...... आज या रोमांचकारी क्षणाला एक वर्ष पूर्ण झालं. मला उगाच टेन्शन नको म्हणून सौभाग्यवतींनी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायच्या आधी मला कळवलेच नव्हते. त्यामुळे त्या अद्भुत अनुभवाला मी मुकलो. अर्थात आम्ही आई बाबा होणार हे समजल्यापासून ते आजतागायत अनेक रोमांचकारी आणि सुखद अनुभव आम्ही जगलोय. प्रत्येक " पहिल्या " गोष्टीची मजाच निराळी असते. त्या चिमुकल्या जीवाचं पहिलं " दर्शन " आम्हाला पहिल्या सोनोग्राफीच्यावेळी झाले. वीत-दीड वीतीचा तो जीव हालचाल करताना बघून काय वाटलं ते खरंच शब्दात मांडणे अवघड आहे. आम्ही दोघे तो जीव पोटात असल्यापासूनच त्याच्याशी खूप गप्पा मारायचो. आणि तो जीवही त्याच्या पद्धतीने त्याला प्रतिसाद द्यायचा. त्याची ती होणारी हालचाल, आतून मारलेल्या ढुश्या म्हटलं तर थोडसं त्रासदायक वाटणारा पण तरीही हवा हवासा वाटणारा तो अनुभव ही प्रत्येक माताच जाणे. ते सुख पुरुषाच्या नशिबी नाहीच. तर दिसामाजी योग्य ती प्रगती करत तो जीव रुढार्थाने या जगात प्रवेश करण्याइतपत पक्व झाला. इथेच त्या जीवाने खट्याळपणाची पहिली चूणूक दाखवली. डॉक्टरीण बाईंनी अंदाज वर्तवला की साधारणतः अपेक्षीत दिवसाच्या अंदाजे पंधरा दिवस आधीच आमचं बाळ या जगात प्रवेश करेल. आम्ही सर्वजण त्या नव्या जीवाच्या, आमच्या बाळाच्या स्वागताला तयारीत होतो. पण अखेर " ती " मात्र अगदी ठरल्या दिवशीच या जगात प्रवेशती झाली. " आतुरता " या शब्दाचा पुरेपूर अर्थ आम्हाला त्या दिवसांत समजला. गेले वर्षभर सईच्या बाललीला आम्ही दोघे समाधानाने अनुभवतोय. खरंच प्रत्येक मूल हे स्वतःच्या आई-बापाला त्यांचं सरलेलं बालपण जगायची पुन्हा एक संधी देत असतं फक्त पालकांचा दृष्टिकोन तसा असायला हवा. तिच्या हुंकार देण्यापासून ते आताच्या खास तिच्या भाषेतल्या बडबडीपर्यंत, तिच्या कुशीवर वळण्यापासून ते आताच्या दुडुदुडू चालण्यापर्यंत सर्व क्षण मी पुन्हा एकदा जगलो. आता हे सर्व क्षण कॅमेरात चित्रबद्ध आहेतच पण तरी ते अक्षरशः पुन्हा जगण्याचा जो अनुभव आहे तो निराळाच. अर्थात त्याचबरोबर आपण " बाप " झालो आहोत याचंही भान ठेवावं लागतं. गेले वर्षभर " पालक " म्हणून बर्याच गोष्टी आम्ही शिकल्या, अनुभवल्या अन पुढेही शिकत राहूच. आज सई वर्षाची झाली हे खरंच वाटत नाहिये. खूप लवकर काळ सरकल्याचा भास होतो आहे. अर्थात सर्वच चांगल्या गोष्टी घडताना असंच वाटत राहतं. आज तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा, आशिर्वाद यांनी ती उत्तरोत्तर मोठी होत जाईल. पण आज तिचा " बाबा " म्हणून तिला आशिर्वाद देताना देवाजवळ एवढीच प्रार्थना करतो की तिला चांगलं माणूस म्हणून घडवण्याचे बळ माझ्या पंखात सदा राहो...
|
अभि, सईच्या पहिल्या वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा. नक्कीच तुम्ही तिच्यात एक चांगला माणुस घडवाल यात शंकाच नाही. आम्हाला छकुलीचा फोटो पहायला नक्की आवडेल. अमोल
|
खुपच सुंदर तुझ्या सई ला वाढदिवसाचया खुप खुप शुभेछ्या जणु काय आमच्या च भावना तु मांडल्यास असे च वाटले क्षणभर …कारण आमची पण छकुली पुढच्या महीन्यात एका वर्षाची होत आहे
|
Giriraj
| |
| Friday, May 19, 2006 - 6:43 am: |
| 
|
सुंऽऽऽऽदर!!!!!!!!!! सईला माझ्या शुभेच्छा! आणि माझ्याकडून तुझे पंख घेऊन जा आधी.. तो देव मला विचारत होता याचे पंख कुठाय म्हणून!
|
Maudee
| |
| Friday, May 19, 2006 - 6:46 am: |
| 
|
अभिनंदन अभि. तुमची सई नक्कीच चांगली मनुष्य घडेल

|
Meenu
| |
| Friday, May 19, 2006 - 6:56 am: |
| 
|
आणि माझ्याकडून तुझे पंख घेऊन जा आधी.. तो देव मला विचारत होता याचे पंख कुठाय म्हणून! :-) अभि तु लिहिलेलं वाचुन मला वाटलं कि सई किती भाग्यवान आहे तीला तुझ्यासारखा बाबा मिळाला... तुझी खुप कष्ट करायची तयारी असेल तर नक्किच तु तीला छान माणुस घडवशील दृष्ट काढ रे पोरीची तुझ्या....
|
अभी, छान लिहिलय! तर आता "चिन्गी वर्षाची झाली नाही तोच" या चालीवर पुढची तयारी करीत रहा हे सान्गणे न लगे! सईला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा अन आशिर्वाद! (तेवढी दाराला काढता घालता येणारी अडसराची फळी करुन घे)
|
Ruma
| |
| Friday, May 19, 2006 - 7:01 am: |
| 
|
खूप छान.. सईला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. तुम्ही पण आई बाबा म्हणून आज एक वर्षाचे नाही का झालात मग तुमचेही हार्दिक अभिनंदन
|
>>>>> तुम्ही पण आई बाबा म्हणून आज एक वर्षाचे नाही का झालात मग तुमचेही हार्दिक अभिनंदन हो ग रुमा, ते ही महत्वाच हे! काय हे ना की एकवेळ बाप बनण सोप्प असत, बापपण निभावण अवघड असत! (धीरगम्भिर विचारी चेहरा)
|
Sushya
| |
| Friday, May 19, 2006 - 7:48 am: |
| 
|
अभी, खुपच छान रे... अप्रतिम लिहिले आहेस... अगदी मनापासून...
|
Krishnag
| |
| Friday, May 19, 2006 - 7:52 am: |
| 
|
अभि छानच!! सई आणि तुम्हा उभयता मनःपुर्वक शुभेच्छा!! 
|
Moodi
| |
| Friday, May 19, 2006 - 7:58 am: |
| 
|
अभी सुरेख!! सईला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा अन अनेक आशीर्वाद. अन तुमचे दोघांचे पण अभिनंदन. अन पुढील यशस्वी वाटचालीकरता तुम्हा तिघांना शुभेच्छा. 
|
Champak
| |
| Friday, May 19, 2006 - 10:25 am: |
| 
|
सई ला happy Birth day चा एक गोड गोड पापा दे रे भो!
|
सहीच अभी अभिनंदन आणि सई ला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
|
अभि,छोटच पण एकदम मस्तच लिहिलयस रे.. सईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि गोड पापा
|
अभि, फ़ार छान लिहिलय! तुझ्या पिटुकलीला वाढदिवसाच्या खूप शुभेछा!! Happy 1st Birthday Sai ! 
|
Smi_dod
| |
| Saturday, May 20, 2006 - 12:42 am: |
| 
|
अभि मी आज वाचले.. सुंदर लिहिलेस.. अगदी सगळ्या आई बाबांच्या मनातले.. माझ्याडोळ्यासमोर माझ्या केतकीचा आणि अनिरुध्द चा जन्मदिवस उभा केलास.. उशीर झाला पण तुझ्या सईला अनेक उत्तमोत्तम आशिर्वाद..आणि तुम्हा दोघांचे पण अभिनंदन
|
Jayavi
| |
| Saturday, May 20, 2006 - 2:44 am: |
| 
|
अभि, किती सुरेख उतरवल्या आहेस मनातल्या गोड भावना! खरंच तुझी सई खूप भाग्यवान आहे. तुझ्या छकुलीला खूप खूप शुभेच्छा.... आमच्यातर्फ़े तिचा खूप लोभ कर तुला अणि तुझ्या अर्धांगिनीला सुद्धा शुभेच्छा !
|
Abhi_
| |
| Saturday, May 20, 2006 - 6:59 am: |
| 
|
प्रतिक्रिया, शुभेच्छा आणि आशिर्वादांबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!!!
|
अभी खरच खुपच छान आणि हळव लिहिल आहेस. तिला वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा!!! नक्किच ती पुढे जाउन तुझे नाव उज्ज्वल करेल..
|