|
Pooja, Wonderful ! A tue emotion, composed into a beautifully paced format. Great!! Baapoo
|
Anilbhai
| |
| Thursday, May 18, 2006 - 10:26 am: |
| 
|
जितेन तुझे पोष्ट खलिल ठिकाणी हलवले आहे /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=93330&post=799439#POST799439
|
hello, will you allow me to enter your circle?
|
Dineshvs
| |
| Thursday, May 18, 2006 - 1:33 pm: |
| 
|
मला नेहमी असे दिसते, कि ही जी लहान मुले भीक मागतात ना ती कधीच एकट्याने खात नाहीत. आपल्या लहान भावाला बहिणीला ते आधी खाऊ घालतात. थोडी मोठी झाली कि जगाची रित शिकतात, सगळ्याना लुटुन आपलेच पोट भरायची. पण तुम्ही सगळ्यानी त्यांचीहि बाजु मांडली हे चांगले झाले.
|
Dineshvs
| |
| Thursday, May 18, 2006 - 1:36 pm: |
| 
|
Renukaa urf netraa, maraaTheet lihiNe tase avaghaD naahee. ase \dev2 lihun tyaapuDhe {} ka.nsaat lihaayache. kavitevar jaaNakaar manDaLee lihiteelach.
|
Meenu
| |
| Friday, May 19, 2006 - 12:23 am: |
| 
|
अंत.. दिवेलागणीची वेळ झालिये आता ईथे उजाडेल शृंगाराच्या भगभगाटात हा आसमंत बुडेल आता येतील दैन्य, दारिद्र्य, दु:ख, वासना माझ्या दारी बुडतील शृंगाराच्या भगभगाटात सारी तु मात्र बाळ आता शाळेला पळ मीही सोशीन थोडीशी कळ येईपर्यंत तुझ्या इवल्या पंखात बळ जे गेलं त्याची आता कशाला करु खंत... तुझ्या रुपात पाहतेय मी या दु:खाचा अंत..
|
Meenu
| |
| Friday, May 19, 2006 - 12:53 am: |
| 
|
सोबत.. ते कुत्र्याचं पिल्लु शेवटचे श्वास मोजतयं बसु का जाऊन त्याच्या जवळ फिरवु का पाठी हात निर्मळ विचाराच्या नादात गाडी पुढे आलीये मी आता सरळ घरीच चाललीये मनात मात्र एकच खंत का नाही केली मी क्षणभर सोबत..
|
Meenu
| |
| Friday, May 19, 2006 - 1:03 am: |
| 
|
जगणं निरर्थकच जगणं रात्रंदिन धावणं वस्तुंची आरास संम्पन्नतेचा भास खिन्न पोकळी जीवना झाकोळी प्रियाचा बोल सावरे तोल मित्राची हाळी मोगर्याची कळी उतरे पुन्हा जिवनेच्छा गळी
|
Meenu
| |
| Friday, May 19, 2006 - 1:08 am: |
| 
|
उदघाटन या रस्त्यानी जाऊ नका अहो, त्याचं अजुन उदघाटन व्हायचयं कधी होणार उदघाटन...? अहो, मंत्री आल्यावर.. कधी येणार मंत्री...? अहो, सवड झाल्यावर... कधी होणार सवड...? अहो, घडा भरल्यावर... कधी भरणार घडा.... ? अहो, तुम्ही उघडे झाल्यावर.....
|
Aparnas
| |
| Friday, May 19, 2006 - 1:57 am: |
| 
|
मीनू, सगळ्याच कविता मस्त आहेत. अंत तर फारच सुंदर......
|
Maudee
| |
| Friday, May 19, 2006 - 2:23 am: |
| 
|
मीनू, छान कविता आहेत.... "का नाही केली मी क्षणभर सोबत?" ख़रच प्रत्येकाबरोबर अस कधी न कधी घडत ना?
|
Poojas
| |
| Friday, May 19, 2006 - 2:26 am: |
| 
|
Minu.. .. ..Very nice !! esp. "SOBAT & ANT" ...Very touching ! Baapoo..Thanks !
|
Ruchita
| |
| Friday, May 19, 2006 - 3:36 am: |
| 
|
मीनु..सोबत आणि अन्त खुपच भावस्पर्शी..
|
मीनु... अह हा हा.. जगणं आणि अंत best सगळ्याच छान... !!!
|
मीनु, जगणं आणि उद घाटन दोन्ही सुन्दर! छान फॉर्म ( आकृती-बन्ध ह्य अर्थाने) गवसलाय तुला. बापू.
|
Moodi
| |
| Friday, May 19, 2006 - 9:49 am: |
| 
|
मीनू आमच्या भावना अतिशय अचुक शब्दात पकडतेस बघ. फार प्रभावी देणगी मिळालीय तुला.
|
मीनु, अन्त कवितेत भगभगाटाची द्विऋक्ती टाळता नाही क येणार? किंवा, त्याहून छान, भगभगटालाच दैन्याचं, यतनांचं रूपक आणि प्रतीक म्हणून वापरायचं.कशी वाटते कल्पना? बापू.
|
मीनू, मस्त! "अंत" सुरेखच!
|
Poojas
| |
| Friday, May 19, 2006 - 11:27 am: |
| 
|
"बालपण...." अजून वाटते कधीकधी की.. पुन्हा एकदा लहान व्हावे.. खोड्या काढून.. खाऊन रट्टा हळूच आईच्या कुशीत शिरावे.. बरसत येता टपटप पाऊस होड्या सोडत चिंब भिजावे.. पुन्हा नव्याने गोष्टी ऐकत आजीच्या पदरात निजावे.. पाहून दप्तर मित्राचे मी बाबांजवळी हट्ट करावा.. रुसून कोपर्यामध्ये बसूनी अबोल अट्टाहास धरावा.. भातुकलीच्या खेळामध्ये करुन जेवण व्हावे आई.. कधी तपासून जुन्या वह्यांना घेत हजेरी व्हावे बाई.. भावविश्व नाजूक निरागस दु:खाचा लवलेश नसावा.. गप्पा गोष्टी गाण्यांमधूनी स्वप्नांचा उन्मेष हसावा.. क्षण सारे ते निसटून गेले.. उरली केवळ एक आठवण, तरीही उरतो प्रश्न अनामिक सरले कैसे माझे बालपण.. सवयीने मी आई आणिक बाबांना हा प्रश्न करावा.. पुन्हा लावूनी हात कपाळी त्यांनी माझा कान धरावा.. "यक्षप्रश्न हा अनुत्तरित जो उत्तर नाही कुणास अवगत.. जीवन अपुले ऋतूचक्रासम चालत राहते अखंड अविरत.. आयुष्यातील वसंत सरला.. बालपणातच.. समजून घ्यावे.. संस्कारांचा मोहोर जपण्या पुन्हा एकदा लहान व्हावे.. पुन्हा एकदा लहान व्हावे..!!!"
|
पूजा "बालपण" मस्तच आहेत... अगदीच नेमके शब्द पण हवं ते सगळं घेऊन उतरलेत... लोपा, निनावी, वैभव, बापू आणि सगळ्याच सिनीअर मंडळींनो, इकडे तर उच्च प्रतिभावंतांची रांगच लागली आहे अलिकडे गुलमोहोराचा नवा बहर हा की नवप्रतिभेचे सुंदर पैलू शब्दामृत जणू घेऊनी येती पूजा, रुचीता आणिक मीनू नावं फ़क्त चारोळीत बसतील एवढीच घालता आली पण अजूनही बरीच मंडळी आहेत ह्यात खरंतर... चु. भु. द्या. घ्या.
|
|
|