Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 16, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » विनोदी साहित्य » विडंबन » Archive through May 16, 2006 « Previous Next »

Ninavi
Friday, May 05, 2006 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा. सुंदर रे वैभव.

Ramachandrac
Saturday, May 06, 2006 - 12:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असा मोहरा झाला नाही पुढे न होणार
कविराज वैभव हे नाव जगती गर्जत रहाणार....
वैभवा तुझ्या कविता जितक्या मनाला भावतात तितकाच तुझा प्रामाणीकपणाही भावला...


Milya
Saturday, May 06, 2006 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव : too good रे
पहिल्या गाण्याला


आणि देवा म्हणतो ते मलाही पटले दुसरी दोन आहेत ती विडंबनापेक्षाही खुप काही आहेत... वा!!! वा!!!! काय प्रतिभा आहे...

Manali_frd
Saturday, May 06, 2006 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव एका पेक्षा एक सरस होत गेलेल्या कविता. :-) खुप आवडलं हे विडम्बन (??) :-)

Giriraj
Saturday, May 06, 2006 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्ब्या,मी त्याला बाय दिलाय!
माझा अभिप्राय गृहित धरतो तो आता!
प्रत्येक वेळी काय कौतुक करत बसणार आपण त्याचं!आता काय लहान बाळ नाही राहिला वैभव आपला!

वैभव,आता कामाला लाग आणि संग्रहाचं बघ!:-)... :-)


Milya
Saturday, May 06, 2006 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिर्‍या तुला अनुमोदक रे. आता आपण वैभवची कविता आवडली नाहि की फ़क्त लिहीत जाउ.. की वैभवा तुझ्या लौकिकाला साजेशी नाहि रे.. अशी वेळच कधी यायचि नाही पण


Dineshvs
Saturday, May 06, 2006 - 10:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव तिन्ही सुंदर आहे. प्रामाणिकपणाहि आवडला पण त्याची गरज नव्हती. मीटर सोडले तर मुळ गाण्यातले काहिच ऊचललेले नाही, त्यामुळे स्वतंत्र निर्मिती ईतकेच याचे श्रेयस आहे.

Lopamudraa
Sunday, May 07, 2006 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaibhav.. .. .. .. .. .. .. ..

Devdattag
Friday, May 12, 2006 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळ गाणे
दिल्या घेतल्या वचनांची

दिल्या घेतल्या दिपकांची शपथ तुला आहे
गडातल्या खोडकरांची शपथ तुला आहे

पार्ल्याच्या बीबीखाली ठाण्याच्या तळ्यात
टवाळ टाळकी जमति पुणेरी पुण्यात
त्या सगळ्या अजबगावांची
त्या सगळ्या अजबगावांची शपथ तुला आहे

शब्द फुले वेचित रचला ताज तु लयीचा
म्हाणालीस शब्दोत्सव गंध त्या जुईचा
गुलमोहराच्या कवितेची
गुलमोहराच्या कवितेची शपथ तुला आहे

रंगत तो वादही होता अनेक पानात
अनुभव मी वाटत होतो आपल्या जनात
भरलेल्या त्या घटाची
भरलेल्या त्या घटाची शपथ तुला आहे

फाडफाड बडबडतांना भाषा ही फिरंगी
उदास भाव दाटून येई सदा अंतरंगी
रांगड्या मायमराठीची
रांगड्या मायमराठीची शपथ तुला आहे

Moodi
Friday, May 12, 2006 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्ता ग्रेट!! सुबक सुरेख वर्णन. अचुक पकडतोस रे सगळे.

Limbutimbu
Friday, May 12, 2006 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा रे वा देवा! झक्कास रे भो! :-)

Chinnu
Friday, May 12, 2006 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा अफलातुन आहे कल्पना! झक्कास जमलय सारं. शेवट आवडला बरं का!

Dineshvs
Friday, May 12, 2006 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त, झक्क जमलय हे.

Mrinmayee
Friday, May 12, 2006 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्ता, कसं सुचतं रे बाबा तुला इतकं बढिया:-) फारच मस्त!!!!

Devdattag
Monday, May 15, 2006 - 12:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्रहो..
>>कसं सुचतं रे बाबा
मृण्मयी, या प्रश्नाला उत्तर कसं द्यावं सुचत नाहिये..:-)

Vaibhav_joshi
Monday, May 15, 2006 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा .... मस्त रे ... उत्तर सुचलं नाही तरी चालेल पुढचं विडंबन लवकर सुचू दे तुला

Devdattag
Tuesday, May 16, 2006 - 1:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संदिप खरेंची माफी मागुन.
मुळ कविता:
म्हणालो नाही

तु आलिस तेंव्हा थांब म्हणालो नाही
का येशी ते ही सांग म्हणालो नाही
होतीस जेंव्हा माझ्या समोरी उभी तु
तुला घराचा खांब म्हणालो नाही

मज स्मरते ना ती वेळ कोणती होती
मन अंध की नजर आंधळी होती
धोपटून काढता कपड्यामधले पाणी
का भाळी माझ्या 'झाग' म्हणालो नाही

वाटते मज तेंव्हाच नाचे अन गावे
माहेरी जातांना तू बॅगेस उचलावे
पण हाय येतो तेंव्हाच माझा साला
साल्यासही कधी 'जा भाग' म्हणालो नाही

जरी आलीस घेउन तू माहेरचा माळी
झाडांना पाणी घालणे रोज माझ्याच भाळी
मज अन्य नको काही तर सोबत म्हणूनी
जरा रे कामासही लाग म्हणालो नाही

हे श्रेय न माझे तुझेच देणे आहे
तन माझे अजुनी जरा शाबुतसे आहे
जो एकच दिसतो ठसा तुझया हाताच
तो नशिबावरचा डाग म्हणालो नाही




Smi_dod
Tuesday, May 16, 2006 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, बढिया देव.. खि खि .

Kandapohe
Tuesday, May 16, 2006 - 1:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा, हे फक्कड जमले आहे. मजा आला. झाग, जा भाग.

Meenu
Tuesday, May 16, 2006 - 2:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा विडंबनात specialisation होणार रे आता तुझं का direct Ph. D चा विचार आहे..

बाकि अनुभव नसताना इतकं खरं खरं लिहायला कसं रे जमतं तुला... (दिवे नको ना रे द्यायला या post ला)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators