|
Sushya
| |
| Friday, May 12, 2006 - 12:46 am: |
| 
|
सुप्रभात लोक्स आज कधी नव्हे तो जरा लवकर उठलो, एक सुरम्य सकाळ पाहिली सकाळी सकाळी वाफाळता चहा आणि सोबतीला सूर्योदय पर्वतीच्या बाजुने वर येणारा, इमारतींच्या जंगलातून हळूहळू दिसू लागलेला तो सूर्य. ते तांबुस आभाळ, ती आल्हाददायक किरणे, स्वच्छ सुर्यप्रकाशात न्हाऊन निघालेली पुण्यनगरी, बर्याच दिवसांनी मन प्रसन्न झाले. त्या उगवणार्या सूर्याकडे पहाताना मनात एक विचार डोकावुन गेला आणि मन खिन्न झाले. थोड्याच वेळात ह्याच सूर्याचा डोळ्यांना त्रास होईल, अंगाची लाही लाही होईल आणि मग हाच सूर्य नकोनकोसा वाटेल. आयुष्यात कुठलीच गोष्ट स्थायी नाही, माणसे बदलतात, परिस्थिती बदलते, माणसामाणसांमधील नाती बदलतात. प्रसंगानुरुप माणसेही सरड्याप्रमाणे आपले रंग बदलायला कमी करत नाहीत म्हणून आपण त्रागा करतो, इतरांना बोल लावतो, पण जिथे सर्वांना प्रकाश देणारा, आपल्याला जीवन देणारा सूर्य सुद्धा १० मिनिटात आपले रंग बदलतो तिथे माणसांची काय कथा!! आज जे इतरांनी केले म्हणून आपल्याला त्रास होतो तेच उद्या प्रसंग आला तर आपणही करू हे मात्र आपण सोयिस्कररित्या विसरुन जातो. पण शेवटी प्रत्येक जण स्वत:साठी जगत असतो, मग इतरांना दोष देण्यात काही अर्थ आहे का? माणसे आपला स्वार्थ न बघता इतरांचा विचार करत नाहीत का? का ती आपला विचार करत नाहीत हे म्हणताना आपणच स्वार्थी होऊन विचार करत असतो? ह्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे नाही, तुमच्याकडे आहे?
|
Shyamli
| |
| Friday, May 12, 2006 - 12:58 am: |
| 
|
पण शेवटी प्रत्येक जण स्वत:साठी जगत असतो, मग इतरांना दोष देण्यात काही अर्थ आहे का? माणसे आपला स्वार्थ न बघता इतरांचा विचार करत नाहीत का? का ती आपला विचार करत नाहीत हे म्हणताना आपणच स्वार्थी होऊन विचार करत असतो?>>> खरय सुश्या..... छान मांडलयस..... चांगल लिहितोस रे लिहित रहा
|
सुश्या,चांगलं लिहिलयस रे.. पण थोडक्यात संपवलस.
|
सुश्या.. छान लिहिलं आहेस.. लिहित जा रे
|
हो,.. .. .. जगावर त्रागा करुन काय उपयोग.... माणस खरच सरड्यासारखी रंग बदलतात.. .. .. हाक मारीत जा काम करीत जा... मदत तय्यर आहे... तस प्रश्न विचारत जगत जायचे.. उत्तरे ही कधीना कधी मिळतील ही आशा.. धरावी... पण माझ्याच वाट्याला हे का.. अशा काही प्रश्नांना उत्तरे नसतात बहुदा... दुसरा भाग पण लिहिरे... !!!
|
Arun
| |
| Monday, May 15, 2006 - 4:40 am: |
| 
|
छान लिहिलं आहेस रे ........
|
Pendhya
| |
| Tuesday, May 16, 2006 - 12:46 am: |
| 
|
पर्वतीच्या बाजुने वर येणारा, इमारतींच्या जंगलातून हळूहळू दिसू लागलेला तो सूर्य.>>>>>>>> सुश्या, मला वाटतं, तू, शेवटी विचारलेल्या प्रश्णाचं ऊत्तर, तुझ्या वरच्या ह्या वाक्यातच आहे. आज, सुर्याला देखिल, त्या ईतिहास कालीन आणी ईतिहास साक्षी, पर्वती च्या बाजुने वर येतांना, एकेकाळच्या घनदाट वनश्री असलेल्या सभोवतालच्या ऐवजी, माणसाने, स्वतःच्या स्वार्था पोटी त्यांचा नाश करुन ऊभारलेल्या ईमारतींच्या जंगलातून वर याव लागतय. ....... BTW ही वाक्य रचना आवडली.
|
|
|