|
Jayavi
| |
| Monday, May 08, 2006 - 9:11 am: |
| 
|
प्रिन्सेस, अगदी अगदी पूजा,सुरेख !
|
Poojas घरटे छानच आहे. पण मला वाटून गेले की कित्येकदा उर्दु शायरीची इतकी दाट छाया पडते की नेहमीच्या वापरातले, सहज, सोपे, मराठी शब्द-प्रयोग सुचत नसावेत. 'सान्धण्याचा डावही फ़सवा निघाला'ही ओळ त्याचे एक उदाहरण.आपण मराठीत डाव ह्या शब्दला जराशा हीन, कुटील अशा अर्थाने पहातो. डाव फसणे याचा अर्थ कोणतेतरी कपट कारस्थान उधळले जाणे असाच सामान्यत्: घेतला जातो, तो या कवितेत नक्कीच अभिप्रेत नसावासे वाटले. बापू.
|
Shailendra, मममनाच्या शब्दझूल्यात\तुझे माप घ्यायचे ही प्रतिमा जरा स्पष्ट करता येइल का? बापू.
|
Meenu
| |
| Tuesday, May 09, 2006 - 12:24 am: |
| 
|
मित्र.. सर्वप्रथम मी तुझच तर चित्र काढायला शिकले, पाटिवरती.......... त्यानंतर अनंत वेळा मी तुझं चित्र रेखाटलय, रांगोळीनी, खडुनी... कंटाळवाण्या तासाला कागदाच्या कोपर्यावर... पण, आरशात बघुन लालभडक कुंकवानी भाळावर, जेव्हा जेव्हा तुझं चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा अग्नीच उमटला...फक्त... असं का रे मित्रा..?
|
Meenu
| |
| Tuesday, May 09, 2006 - 2:17 am: |
| 
|
Rutu, vaibhav, bapu, mast....
|
rutu chhaan kavita... bes...
|
पुस्तक .... मी जसा आलो तसा जाईनही शब्द काही फक्त मागे ठेवुनी कोण जाणे त्यातुनी भेटेनही जर कुणी काढेल मजला शोधुनी जाउ द्या मुख्पृष्ठ ! खोटा चेहरा वयपरत्वे जीर्ण आहे जाहला नाव ही ओळख नसे माझी खरी का कुणी त्याला म्हणावे आपला? आत यावे शोधण्याला कोण मी बाल्य ते वृद्धापकाळाच्या खुणा ह्या इथे मी जन्मलो कित्येकदा पण तरी अपुल्या घरी मी पाहुणा वाढलो शब्दांसवे , अर्थांसवे खेळलो मी अंगणी वृत्तांसवे रम्य काही आठवे ह्या अंगणी अन बरीचशी शिंपलेली आसवे जाणुनी घेता तुम्हां समजेलही एक वेड्याला जरासे जाणले राहिला येथेच तो जाऊनही शब्द त्याने प्राण होते मानले शेवटी दिसतील ती हस्ताक्षरे भरविले मलपृष्ठ थोडे अंततः ज्यामुळे राहीन मी तुमच्यामध्ये हीच ती असणार आहे एक कविता
|
वैभवा, "शब्द त्याने प्राण होते मानले" मस्तच!!
|
वैभव पहीली आवृत्ती संपून दुसरी आली देखील. 
|
विजयगाथा ऐक पडतो कानी टापांचा आवाज का नर्तन करते कूणी नर्तकी घरंदाज हा कल्लोळ कशाचा येतो आहे कानी काय जाहले मम पायथ्याच्या हो रानी हाय गनिमाने का रचला कुटील डाव मित्र म्हणवूनी का केला पाठीवरती घाव त्या ठावूक नाही ही शूर मराठी जात पाते लवताच हो करिल त्याचा नि:पात बघा ती उसळली समशेर स्वाभिमानी तो उघडा पडला गनिम हो सैतानि ते रक्त सांडूनी उजळला माझा माथा अजिंक्य गड रे सांगतो विजयाची गाथा
|
Poojas
| |
| Tuesday, May 09, 2006 - 6:13 am: |
| 
|
धन्यवाद तुम्हा सर्वान्च्या प्रतिक्रीया वाचून खूप छान वाटले. I M NOT MUCH AWARE ABOUT FONTS. SO LOTS OF MISTAKES R THERE. PLZ "CBDG".
|
Jo_s
| |
| Tuesday, May 09, 2006 - 6:24 am: |
| 
|
पुजा, वैभव, देवदत्त छान चाललय, सुंदरच. पुढच येउदे.
|
Poojas
| |
| Tuesday, May 09, 2006 - 6:55 am: |
| 
|
"वळण...." तो मला भेटला त्या वळणावर जिथे मला मी सावरताना.. केले त्याने मजला त्याचे ओढ मनाची आवरताना.. तेच वळण तो रस्ता जेथे धरती आकाशाला भेटे.. इन्द्रधनूवर स्वार होऊनी वर्षाराणी गर्जत येते.. त्या वळणावर त्याचा-माझा अबोल अवचित परिचय झाला.. ओळख नव्हती तरीही त्याचा स्वर माझ्या ह्रदयाला भिडला.. स्वरात त्याच्या गुन्तवूनी मज क्शणात मग तो मागे वळला.. ओढ लावूनी अन्तरीची मज माझ्या अश्रुतून ओघळला.. त्या सरलेल्या क्शणाबरोबर अश्रुसुद्धा निसटून गेले.. दूर त्याच त्या वळणावरुनी आठव होऊन परतून आले.. होऊन वारा पुन्हा पुन्हा तो असाच मजला स्पर्शून जातो.. त्या वळणावर अस्तित्वाचा थेम्ब होऊनी बरसत येतो..!!!!!!
|
एक दिवस तरी... एक दिवस तरी मला पाऊस होऊन भिजायचे आहे.. ओल्याचिम्ब मोत्यानी मग पानाफ़ुलातून सजायचे आहे.. एक दिवस तरी मला फ़ुल होऊन फ़ुलायचे आहे.. दरवळत्या अस्तित्वाने वाय्रासोबत झुलायचे आहे.. एक दिवस तरी मला वारा होउन वाहायचे आहे.. उन्च उन्च जाऊन मग चान्दण्याना पाहायचे आहे.. एक दिवस स्वतहसाठी चान्द्ण्याना खाली बोलवयचे आहे.. तूही भान विसरशील पाहून ईतक स्वतहाला खुलवायचे आहे.. एकच दिवस नन्तर मग तुझी होऊन बघायचे आहे.. होकार दिलास तर सार आयुष्य तुझ्याच नावाने जगायचे आहे........!
|
सुन्दर स्वप्नगन्धा आणि पुजा सुरेख कविता आहेत
|
Poojas
| |
| Tuesday, May 09, 2006 - 7:41 am: |
| 
|
"अस्तित्वाचा लढा..." झिजले होते, झिजते आहे.. कोरड्या मायेत रुजते आहे, झिजून सरल्या आयुष्याचे.. उरले क्षण मोजते आहे..!! सोसत होते, सोसते आहे.. लाचार नशीब पोसते आहे, सोसून भरल्या डोळ्यान्मधले.. दुबळे अश्रू पुसते आहे..!! लढले होते,लढते आहे.. अस्तित्वाशी भान्डते आहे, लढून पुन्हा जिन्कण्यासाठी.. नवा डाव मान्डते आहे..!!
|
Shyamli
| |
| Tuesday, May 09, 2006 - 12:20 pm: |
| 
|
वा स्वप्नगंधा,... पुजा छान.. ..
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 09, 2006 - 1:26 pm: |
| 
|
पुजा, लढुन पुन्हा जिंकण्यासाठी. मला खुपच आवडली हि ओळ
|
Vaibhav, Simply superb. ह्या इथे मी जन्मलो कित्येकदा\पण तरी आपुल्या घरी मी पाहुणा. व! लाजावब!! बापू.
|
Minoo, Swapnagandha,Poojas, तुम्ही इतक्या छान-छान कविता पोस्ट करायला लागलात तर महिला आरक्षण रद्द करून पुरुषांसाठी आरक्षणाची मागणी करावी लागेल! बापू
|
|
|