मूळ गाणे :- लाSSजून हासणे अन हासून ते पहाणे विडंबन :- बुधवारचे बहाणे हे काम आहे सांगुन रात्री निघून जाणे ती ओळखून आहे माझे पुरे बहाणे बुधवारच्या सकाळी मी लागतो तरंगु खोळंबले असावे बीबीवरील बंधू ते पेज सारखे मी रिफ्रेशुनी पहाणे ती ओळखून आहे माझे पुरे बहाणे ऒफिसमधून येता चाले तिचा ठणाणा का आज फक्त वाजे हा फोन हो खणाणा? ही साद जिवलगांची , ती ही अखेर जाणे ती ओळखून आहे माझे पुरे बहाणे मग बोलते हसूनी जा थांबलेत सारे सांभाळुनी असावे , तोडू नयेत तारे बरे गावले म्हणूनी कविता न ऐकविणे ती ओळखून आहे माझे पुरे बहाणे
|
Deemdu
| |
| Friday, May 05, 2006 - 1:40 am: |
| 
|
.. .. .. ..
|
Shyamli
| |
| Friday, May 05, 2006 - 1:48 am: |
| 
|
सांभाळुनी असावे , तोडू नयेत तारे बरे गावले म्हणूनी कविता न ऐकविणे>>>
क्या बात है लांब आहे पण बुधवार अजुन
|
Psg
| |
| Friday, May 05, 2006 - 1:53 am: |
| 
|
छान झालय. हे on behalf of mayuresh आहे का? मयुर, ~D
|
वैभव.. फारच टचिंग आहे रे.. मनाला भिडलं बघ..
|
वैभव, फोन हो ठणाणा ऐवजी फोन हो खणाणा चालेल का? झाकास जमलय! 
|
Pha
| |
| Friday, May 05, 2006 - 4:08 am: |
| 
|
जबरी रे!
|
वैभवा,खी खी खी... सही जमलय psg
|
धन्यवाद मित्रांनो .. एका जाणकार व्यक्तीने आव्हान दिलं होतं की आता हेच पूर्णपणे diverse emotions वर लिहून दाखव. नेहेमीप्रमाणेच हाही प्रयत्न आपल्यासमोर मांडतो आहे. (लिंब्या लिहीताना खणाणाच होतं रे , पोस्टताना गल्लत झाली . धन्यवाद ) मूळ गाणे :- तेच. का तर्क मांडता तो येथे कुठे नसावा हा आसमंत सारा त्याचा असे पुरावा ज्याच्या कृपे निरंतर आयुष्य श्वास घेई जो वावरे असा की हृदयात भास होई का हट्ट चालला तो प्रत्यक्षही दिसावा हा आसमंत सारा त्याचा असे पुरावा शिवशक्तिरूप आहे , ब्रम्ह्स्वरूप आहे करुणाकराय जे जे त्याचेच रूप आहे तो मानवीरुपे ही अपुल्यामध्ये असावा हा आसमंत सारा त्याचा असे पुरावा
|
Psg
| |
| Friday, May 05, 2006 - 4:34 am: |
| 
|
मयूर, प्लीज रागावू नकोस रे! भारनियमन वाढलय का तुमच्याकडे? मग दिवा नाही तर पणती घे!
वैभव, जियो! हे जास्त आवडलं
|
वैभव बेस्टच रे.. कविराज पदास रे तु योग्य ठरावा दादही तुज द्याया का शब्दही उरावा
|
वैभव, हे पण झकास रे! एकदम विरुद्धार्थी... "देव आहे का" बीबी वर टाक! यन्दा गणेशोत्सवात वेगवेगळ्या विषयात "हितगुज आयडॉल्स" च्या स्पर्धा / व्होटिन्ग घ्यायला हरकत नसावी! 
|
Puru
| |
| Friday, May 05, 2006 - 5:05 am: |
| 
|
वैभव, केवळ सुंदर रे! (आम्ही जुन्या काळात 'उच्च' म्हणायचो
|
मित्रांनो कुणीतरी तुमच्या मित्राला खुन्नस देतंय . म्हणे विनोदी झालं , भक्ती झाली... पण हे सगळे पुरुषी ऎंगलने लिहीलेले झाले. आता टाईम लिमिट देऊन स्त्रीचा दृष्टिकोण आणि तो ही परत एकदा diverse लिहायचं आव्हान दिलंय आणि हे पेललं तर जिंकलो असं म्हणे. सो धिस इज माय लास्ट अटेम्प्ट ह्या वादळात आहे थैमान आठवांचे मी सोसते तडाखे अद्याप त्या क्षणांचे एका क्षणांत झाले सर्वस्व ध्वस्त माझे जेव्हा तुझ्यासवे तू नेलेस विश्व माझे का ठेवलेस मागे आकाश वेदनांचे मी सोसते तडाखे अद्याप त्या क्षणांचे आता निरभ्र येथे होणार ना कधीही पाऊस आसवांचा सरणार ना कधीही बघ चालले झरूनी ते गीत चांदण्यांचे मी सोसते तडाखे अद्याप त्या क्षणांचे
|
जियोऽऽऽ मेरे लाऽऽऽल! वैभव, मस्तच रे! कोण हे रे तो खुन्नस वाला? नाव तर कळुदेत? गिर्या तर नाही? पण तो नसावा! 
|
जियो वैभव... ती जी कोण व्यक्ती आहे तिचे आभार.. तिच्या कृपेनेच एवढे उच्च वाचायला मिळते आहे
|
वैभव.. सहिच आहे.. पण ह्या दोन्ही कविता किंवा गीत म्हणून जास्त योग्य आहेत असं नाहि वाटत?.. कारण तू त्या गाण्याचे मीटर चेंज न करता त्यातच आपले शब्द ओवले आहेस.. पण तू जर ह्याला फक्त विडंबन म्हणत असशील तर ते चुकिचं ठरेल असं मला वाटतं कारण विडंबनापेक्षा फार जास्त आहे हे.
|
अगदी अगदी रे देवा. विडंबनापेक्षा जास्त वा कमी कल्पना नाही पण कुठल्या तरी आधीच आलेल्या गाण्याच्या मीटर वर लिहायचं होतं. थोडंस थ्रिल ह्या पलिकडे काही नाही. १. पहिल्या विडंबनासाठी जे गाणं निवडलं त्याच्याच मीटर वरून खुन्नस होती म्हणून इथे आणि २. मी ह्याला स्वतःची original कलाकृती मानत नाही म्हणून कविता बीबी टाळला
|
Himscool
| |
| Friday, May 05, 2006 - 8:38 am: |
| 
|
एकाच गाण्याची तीन वेगळ्या दृष्टीकोनातून विडम्बने...खरच उच्च...
|
Shyamli
| |
| Friday, May 05, 2006 - 8:44 am: |
| 
|
>>विडंबनापेक्षा फार जास्त आहे हे.>>> खरच जास्त आहे हे...तरिपण वैभव तु म्हणतोस तेही बरोबर वाटतय... ऊच्च!!!
|