Ninavi
| |
| Wednesday, May 03, 2006 - 1:23 pm: |
| 
|
ही लावणी लालूच्या सांगण्यावरून इथे टाकत्ये. विसरा लाडू विसरा पेढे मीच लाडकी सगळ्यांची गं बाई मी पुरणपोळी चितळ्यांची इतर : गं बाई चितळ्यांची.. गं बाई चितळ्यांची.. कोल्हापुरास्न आणला गूळ पिवळा सोन्यावाणी अन डाळ निवडाया बशिवल्या चार जणी पुरण शिजता दरवळ सुटता गर्दी दारी कावळ्यांची गं बाई मी पुरणपोळी चितळ्यांची भरडली वेलची नीट काढुनी साले अन पाट्यावरती पुरण बाई वाटले नकोच तोरा, नको हुशारी फुडप्रोसेसरवाल्यांची गं बाई मी पुरणपोळी चितळ्यांची मुखडा माझा गोल चांदवा भासे अन गालावरती लालसर डाग जरासे धार तुपाची वरी सोडता फे फे भल्याभल्यांची गं बाई मी पुरणपोळी चितळ्यांची
|
Arch
| |
| Wednesday, May 03, 2006 - 1:48 pm: |
| 
|
निनावी, एकदम फ़क्कड जमली आहे लावणी. आता तुझ्या लाडवाचा जवाब येऊ दे.
|
Junnu
| |
| Wednesday, May 03, 2006 - 1:55 pm: |
| 
|
फारच सही जमलीये लावणी...मी इकडे हसतेय तर माझी अम्रु मैत्रिण मला विचारतेय काय झाल म्हणुन. तिला आता काय सांगु लावणी वगरे काय असत. अमेय च्या एका वाक्यावरुन (ओळीवरुन खरतर) प्रेरणा मिळाली. 
|
लावणी झकासच आहे निनावी आणि उत्स्फ़ुर्त आहे एकदम, खरच चितळेंच्या पुपोंच्या पाकिटावर टाकावी अशी आहे >>>अमेय च्या एका वाक्यावरुन (ओळीवरुन खरतर) प्रेरणा मिळाली ही प्रेरणा कोण बरं
|
Chinnu
| |
| Wednesday, May 03, 2006 - 2:37 pm: |
| 
|
अहाहा, जियो निनावी.. क्या बात है!
|
Milya
| |
| Wednesday, May 03, 2006 - 2:50 pm: |
| 
|
निनावी झकासचं गं लावणी आता तुझ्या लाडवाचा जवाब येऊ दे >>> हा घे जवाब अरे पुरणपोळी काय घेउन बसलात् लाडु चाखुन 'सहा' जरा... हो... हो... हो... अन् निनावीच्या लाडवाचे हे गुपित सांगतो ऐका जरा जी जी रं जी जी एडिसन वाल्या गुज्जु कडुनी आणले बेसन फ़क्कड अन् परसिद्ध लाडु खायला झाले गोळा सारे नुक्कड बेसन भाजायला ठेवताच त्याचा वास घमघमे घरा घरा अन् निनावीच्या लाडवाचे हे गुपित सांगतो ऐका जरा || बेसन भाजता भाजता तिने पाक बनवला एकतारी अन अवचित दारामध्ये उगवली नवरोजींची की स्वारी जंगी बेत 'हा' बघुनी त्यांनी बेसमेंट गाठले त्वरा त्वरा अन् निनावीच्या लाडवाचे हे गुपित सांगतो ऐका जरा || पातेल्यापुढे बसले खाशे एकदम मांडा ठोकुन छिन्नी, हातोडा वापरुन लाडु काढती उकरुन उकरुन लेकही आला औषध घेउन इनो आणिक पुदिनहारा || अन् निनावीच्या लाडवाचे हे गुपित सांगतो ऐका जरा जी जी रं जी जी रं जी जी निनावे लाडु दिवे घे गं  
|
Moodi
| |
| Wednesday, May 03, 2006 - 2:55 pm: |
| 
|
निनावी अन मिल्या तुम्ही दोघेही महान आहात. 
|
Ninavi
| |
| Wednesday, May 03, 2006 - 3:00 pm: |
| 
|
मिल्या, मान गये उस्ताद! धन्यवाद, दोस्त्स. हे पार्ल्यातल्या GTP चं फळ आहे. लालूच्या आशीर्वादाने झालेलं. 
|
निनावी , मिल्या , सॉलिड रे दोघेही , मज़ा आला
|
निनावीची लावणी ऐकून हसून जीव झाला वेडा.... अन जणूकाही हे कमी पडलं म्हणून मिल्यानं गायला पोवाडा धन्य आहात
|
Polis
| |
| Wednesday, May 03, 2006 - 3:18 pm: |
| 
|
आता हित असल्या काही लाडू, लालू अन लावन्या असतील ये काय वाचल्या बिगर स्वप्नात पाहील होत काय...? वाटल काहीतरी असेल बरं पन कस्ल काय!
|
Lalu
| |
| Wednesday, May 03, 2006 - 4:03 pm: |
| 
|
>>काहीतरी असेल बरं 'बरं'? इथे 'काहीच्या काही' असतं हे बीबीच्या नावावरुन कळत नाही काय?!! वाटलं, तेवढं तरी कळत असेल, पन कस्लं काय! इनो आणिक पुदिनहरा मिल्या, मस्त रे!
|
Krishnag
| |
| Wednesday, May 03, 2006 - 11:37 pm: |
| 
|
निनावी धमाल!! मिल्या.. .. माज्या राजा तू रं माज्या सोन्या तू रं..
|
निनावी एक्दम खास गं लावणी मिल्या,सही जवाब रे मित्रा
|
Psg
| |
| Thursday, May 04, 2006 - 1:29 am: |
| 
|
निनावी, पॉश लावणी!! मिल्या
|
निनावी सहीच गं. मिल्या इनो आणिक पुदिनहरा. अशक्य आहेस बाबा तू. पद्य रेसिपीज ची प्रथा पडणार दिसतंय आता.
|
Milindaa
| |
| Thursday, May 04, 2006 - 7:26 am: |
| 
|
सही निनावी मिल्या, झकास
|
Chinnu
| |
| Thursday, May 04, 2006 - 9:16 am: |
| 
|
.... .... .... मिल्या!!
|
Shyamli
| |
| Thursday, May 04, 2006 - 10:43 am: |
| 
|
निनावी हि हि हि मिल्या धमाल आलि रे वाचायला 
|
Giriraj
| |
| Thursday, May 04, 2006 - 10:58 am: |
| 
|
मिल्या,भले बहाद्दर! आता या GTG ला गाऊन दाखवायचा हा पोवाडा तूच!लागेल तर मी साथ करीन तुला.. निनावि,नाव काढलेस पोरी!
|