|
Aj_onnet
| |
| Tuesday, May 02, 2006 - 7:06 am: |
| 
|
विशेष. विनंती. :- मागच्या आठवड्यात काही bug मुळे झालेल्या, पोस्ट गायब होण्याच्या प्रकाराचा आधार घेवून, लाकूडतोड्याची 'ती' गोष्ट पुन्हा लिहावी असे वाटले म्हणुन मी थोडक्यात ती शब्दबद्ध केली आहे. ह्यात चुकुनही कोणी दुखावले जात असेल तर मी अगोदरच माफी मागतो. माझा तसा कोणताही हेतू नाहीये. ही duplicate ID विरुद्धची मोहीम नाहीये अन तसल्या कोणत्याही मोहीमेशी माझा कसलाही संबंध नाहीये!. ती एक संगणक कामगार होती. दररोज office ला जावे. मायबोली उघडावे. एखाद्या वाहत्या bb च्या तिरी बसून पोस्ट टाकाव्यात. फावल्या वेळात इतर बिबी वर ही भटकून यावे. यातूनही वेळ उरलाच तर office चे काम पण करावे. असे तिचे 'पोस्टून वाचून' मस्त (सामान्य लोक यालाच खावून पिवून मस्त) आयुष्य चालले होते. त्यादिवशीही ती अश्याच एका वाहत्या बिबी च्या तिरी बसून अधूनमधून पोस्ट टाकत होती. त्यावरचा इतरांच्या प्रतिक्रिया वाचून परत काही उत्तरत होती. एकूनच सर्व सुरळीत चालले होते. ती पोस्ट टाकत होती. इतरांच्या पोस्ट वाचत होती. पण एकदम ह्या चक्रात खंड पडला. अचानक तिने टाकलेली एक पोस्ट एका बिबीवरून गायब झालेली तिला दिसली. गायब म्हणजे एकदम गायब! ती एकदम घाबरलीच. इतर काही बिबीवरील भुताटकी इथेही आली की काय असे तिला क्षणभर वाटुन गेले. पोस्ट वाहून जाणे हे तिला सवयीचे होते. पण असे बुडणे एकदम अकाल्पित होते. तिला एकदम आपली पोस्ट फारच वैचारीक वगैरे झाल्याने जड होवून बुडाली की काय असा प्रश्न पडला. आपल्या पोस्ट ह्या पुर्वी सारख्या गमतीदार न राहिल्याने त्या बुडल्या की काय ह्या शंकेने तिचे काळीज थरथरले. एव्हढेच काय, तर ती पोस्ट आक्षेपार्ह वाटल्याने mods ने उडवली की काय ह्या भितीने तिला क्षणभर सुचेनासे झाले. आपल्या पोस्ट प्रवाहात, अश्या बुडायला लागल्या तर आपले कसे होणार, आपल्या पोस्ट वर कोण प्रतिक्रिया कश्या देणार अन मग आपल्या संपूर्ण दिवसाचे खोबरे होणार अश्या भल्या बुर्या शंकांनी तिचे मन दाटून आले. कदाचित त्या बिबीचे software च आपल्याला अन्नुलेखाने मारते आहे की काय अशी शंका ही तिच्या मनाला थरकावून गेली. अन मग तिचा शोक अनावर झाला. ती परिस्थितीला अन स्वतःला दोष देत अश्रु ढाळु लागली. सर्वशक्तीमान नियंत्याकडे दाद मागु लागली. त्या महाजालाचा अन पर्यायाने त्या प्रवाहाचा नियंता, admin हे सर्व पाहत होता. त्याचे तो शोक पाहून मन द्रवले. तो क्षणार्धात तिथे प्रकट झाला. अकस्मात(अन एव्हढ्या लवकर!) प्रकट झालेल्या admin ला पाहून ती विस्मयचकीत झाली. आपल्या सर्व समस्यांचा उपाय साक्षात समोर उभा ठाकलेला पाहून तिला एकदम हायसे वाट्ले. तिने झाला प्रकार कथन केला अन आपली फिर्याद मांडली, 'असेच जर होत राहिले तर मी माझी प्रतिभा कुठे प्रकट करू?, माझ्या कल्पना माझे विचार, माझे comment , ह्यांना मुर्त रूप न मिळाल्याने त्या तश्याच काळाच्या पडद्याआड राहतील. माझी बौद्धीक अन वैचारिक उपासमारी होईल. मी ह्या महाजालात असून नसल्यासारखी होईन. तुम्ही कृपया काहीतरी करा ' परमदयाळु admin चे मन तिचा हा आक्रोश पाहून द्रवले. ते म्हणाले थांब मी तुझी पोस्ट शोधून परत प्रस्थापित करतो. असे म्हणुन त्यानी त्या पोस्ट च्या प्रवाहात बुडी घेतली. काही क्षणातच ते एक पोस्ट घेवून बाहेर आले. अन मंद स्मित करत उच्चारले,'वत्सा, हिच का तुझी पोस्ट?' क्षणभर ती चमकली. खरे बोलावे का खोटे हे तिला कळेना. ती पोस्ट 'ती' नव्हती. पण ती पोस्ट तिचीच होति. पण तिने ती पोस्ट दुसर्या ID ने अंताक्षरीच्या बिबीवर टाकली होती. पोस्ट तिची होती पण अन नव्हती पण. तिने घाबरतच admin कडे पाहीले. त्यांच्या चेहर्यावर अजूनही अरूण गोविल च्या रामाच्या चेहर्यावर जसे कायम मंदस्मित असायचे तसेच स्मित कायम होते. docter, वकिल अन admin ह्यांच्या पासून काही लपवून उपयोग नाही असा विचार करून तिने सत्य कथन केले, 'ही पोस्ट माझीच आहे. पण मी ती माझ्या अंताक्षरीच्या खास ID ने केली होती. ही ती पोस्ट नव्हेच' 'चला, एक अजून duplicate ID मिळाला' हे पाहून admin ला झालेला आनंद त्यांनी बर्याच संयमाने आपल्या मंद स्मितामध्ये दडवला अन परत त्या प्रवाहात बुडी मारली. काही क्षणात ते पुन्हा एक पोस्ट घेवून बाहेर आले. ही पोस्ट भली मोठी दिसत होती. पोस्टचा आकार पाहून ती एकदम चक्रावली. admin आपल्याशी काही खेळ तर करत नाहीत ना असे तिला एकदम वाटून गेले. तिने ती पोस्ट नीट पाहिली अन ती एकदम उडालीच कारण ती पोस्ट, तिच्या खास 'वादविवादासाठी' राखून असलेल्या ID ची आहे हे तिने जाणले. ती थोडी घाबरली. admin ला, ही पण माझ्या duplicate ID ची पोस्ट आहे हे कसे सांगायचे ह्या धास्तीने ती एकदम शांत झाली. कुठून ह्या फंदात पडले. एखादी पोस्ट बुडून गेली असती तरी चालले असते. पण सर्वशक्तीमान admin समोर आपल्या duplicate IDs चा बोभाटा नको असे तिला वाटून गेले. पण आता खरे बोलल्याशिवाय पर्याय नाही हे जाणुन ती उत्तरली, 'हे क्षमाशील अश्या, admin , मला सांगताना दुःख होतय, पण ही पण ती पोस्ट नाही. ही माझीच पोस्ट आहे. पण त्या ID ने केलेली अन ती पोस्ट, ही नव्हे' आता अजुन एक duplicate id सापडल्याच्या आनंदापेक्षा हिचे असे अजून किती duplicate IDs आहेत ह्या शंकेने admin ला ग्रासले. आता परत एकदा ह्या असंख्य पोस्ट च्या प्रवाहात प्रवेश करून ती पोस्ट शोधावी लागणार ह्या विचाराने निर्माण झालेली चिडचिड त्या शाश्वत स्मितहास्याखाली लपवून त्यांनी परत एकदा त्या प्रवाहात बुडी मारली. काही क्षणातच admin अजून एक पोस्ट घेवून बाहेर आले. ती पोस्ट पाहुन तिला आंनदाचे भरते आले. अन एकदम हायसेही वाटले. (अश्याच भावना बहुधा admin च्याही होत्या!) 'होय, हीच ती पोस्ट. धन्यवाद' admin तिचा हा प्रामाणिकपणा पाहून संतोष पावले. शिवाय आपल्या प्रत्येक ID शी तिचा, अन त्या ID चा त्या संबधीत bibI च्या विचारांशी असलेला ठामपणा पाहून त्यांना धन्य धन्य वाटुन गेले. प्रत्येक प्रकारासाठी वेगळा ID अन त्या ID शी संबधीत जोपासलेले वेगळे व्यक्तिमत्व पाहून ते गहिवरले. तिला, 'तुम्हाला कसे काय जमते हो हे सगळे?' असा प्रश्नही त्यांना विचारावासा वाटु लागला. एकूनच हा प्रामाणिकपणा पाहून त्यांचे मन हेलावले. अन ते उत्तरले, 'वत्सा, मी तुझ्यावर खूश आहे. तुझा प्रामाणिकपणा मला खूप भावला. तुझे हे तीनही ID वापरायची परवानगी तर मी तुला देत आहेच पण जर तुझा 'गुलमोहर' साठी एखादा खास ID नसला तर तुला तोही काढायची परवानगी मी देत आहे. अशीच प्रत्येक ID शी प्रामाणिक रहा' एव्हढे बोलुन ते अंतर्धान पावले. तात्पर्य : काय लिहू?
|
खी खी खी खी खी
    अजय, क्या बात है!
|
Divya
| |
| Tuesday, May 02, 2006 - 10:38 am: |
| 
|
वाह अजय सहीच लिहीलेत, सुचल तरी कस?? 
|
Asami
| |
| Tuesday, May 02, 2006 - 10:41 am: |
| 
|
खल्लास रे भन्नट लिहिलेयस
|
Ninavi
| |
| Tuesday, May 02, 2006 - 10:41 am: |
| 
|
>>>> अशीच प्रत्येक ID शी प्रामाणिक रहा

|
Milya
| |
| Tuesday, May 02, 2006 - 11:04 am: |
| 
|
अजय : खी खी खी.... अरे पण ही 'ती' कोण? 
|
Moodi
| |
| Tuesday, May 02, 2006 - 11:15 am: |
| 
|
अजय एकदम मस्त रे!! 
|
सही! कल्पना महान आहे 
|
सहीच अजय... मस्त लिहिलय
|
Hems
| |
| Tuesday, May 02, 2006 - 12:42 pm: |
| 
|
केवळ जबरी! कल्पनेची आयडिया एकदम मस्त!!
|
Avdhut
| |
| Tuesday, May 02, 2006 - 12:44 pm: |
| 
|
मजा आ गया. वादविवादा साठी खास ID हि चांगली कल्पना आहे. वादात लोक दोन ID घेवुन दोन्ही बाजुने भांडतात असेही मी वाचले आहे. नंतर तीसरा ID वापरुन त्या दोघांना शांत करतात.
|
Pendhya
| |
| Tuesday, May 02, 2006 - 1:04 pm: |
| 
|
आपल्या पोस्ट ह्या पुर्वी सारख्या गमतीदार न राहिल्याने त्या बुडल्या की काय ह्या शंकेने तिचे काळीज थरथरले. >>> माझी बौद्धीक अन वैचारिक उपासमारी होईल. >>> अजय, मस्त रे! मजा आली.
|
अजय... मला तर शंका आहे... वरच्या प्रतिक्रियांचे ID सगळे तुझेच आहेत...
|
अजय एकदम सही...!!! 
|
he ethe vidamban bb var "my experience"?? just kididng.. it was too funny Ajay!!
|
Mbhure
| |
| Tuesday, May 02, 2006 - 5:53 pm: |
| 
|
सही... मजा आली वाचताना
|
Krishnag
| |
| Tuesday, May 02, 2006 - 11:44 pm: |
| 
|
अजय, भन्नाट कल्पना!!! फारच खास!! 
|
Rajkumar
| |
| Wednesday, May 03, 2006 - 12:21 am: |
| 
|
मस्तच लिहीलयस रे अजय..
|
Charu_ag
| |
| Wednesday, May 03, 2006 - 1:33 am: |
| 
|
सही लिहीलयसं अजय. HHPV
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 03, 2006 - 1:46 am: |
| 
|
अजय, छानच लिहिले आहेस. हि अशी सगळी वादळे, मी ईथे नसतानाच का होतात रे ?
|
|
|