|
Dhruv1
| |
| Tuesday, May 02, 2006 - 5:29 am: |
| 
|
रात्रीच्या गडद अंधारातलं जागतंपण. चांदण्यांच्या संथ गतीचे लयदार श्वास. पृथ्वी फ़िरतेय, स्वतभोवती गिरकी घेतेय व समोरचा फ़िरता रंगमंच हळुहळु बदलतोय. काळ सरकतोय का पुढे? एक चक्र संपुन पुन्हा दुसर्या चक्राची सुरुवात. मी कुठंय? कोण आहे? का आहे मी इथं? कोणाचा कोण? काय उद्देश माझ्या असण्याच्या अन मी नसण्याने काही फ़रक का पडणार आहे कोणाला? अशा एक ना दोन अनेक प्रश्नांचे भिरभिरते तिक्ष्ण टोकाचे गरगरते भोवरे उरात खुपसुन चांदण्यांची ऊधळण करणारं हे आभाळ माझ्या सकट अनेक जणांच्या ऊरावर असेल. मग त्या अनेकांतलाच मी एक क्षुद्र प्राणीच का? की खरच मी काही वेगळ करायला अलोय इथं? काही विशेष? की फ़क्त ऋतुचक्राचा एक छोटासा हिस्सा? एका प्रचंड system चा छोटासा part ? आपलं काम निमुटपणे करणारा व प्राक्तनातले भोग संपले की निमुट आत्मसमर्पण करणारा? याला आत्मशोध म्हणु? की काय म्हणु? माझ्या सारख्याच मळलेल्या वाटांवर माझ्यापुढे चार दहा पावलं गेलेल्या सर्वांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत चालु? खरच का कोणी असतं कोणासाठी पथदर्शक? आत्मोन्नतीच्या वाटा अशा असतात का मळलेल्या? ज्या आकाशाचा माग घ्यायचा ज्या स्वतत्वात डोकावुन स्वतःला खोल खोल झोकुन द्यायचंय? तिथे कसा पोहोचत असेल कोणा दुसर्याचा प्रकाश? मी असा कुठे चाललोय? भवतो न भवंतु? कुठलं आहे सत्य अन कुठल आहे असत्य? कोणाचे अनुभव मानु प्रमाण म्हणुन अन कसे आखु त्यावरुन माझ्या कर्यप्रणालीचे आलेख? कोठले नकाशे ठेऊ समोर पथदर्शक म्हणुन? ह्या सर्वाच्या पलीकडे ही आहे का काही अदीम? अनादी? अनंत? की सर्वच फ़क्त अनाकलणीय आहे? माझ्या बौधीक कक्षेच्या विस्ताराच्या पलीकडचं? हे सर्व माझ्यातलच अन तरीही माझ्याशी संदर्भहीन. जागेपणातल्या माझ्याच एका स्वप्नासारखं. आत्मशोधाची दिक्षा कसं कोण देत? कोण माझ्या आतुन मला खुणावतं? माझ्या फ़ुलपाखरी दिवसांचे कवडसे हातात धरु पाहुन प्रखर तेजाची वलय माझ्या कायेवरती सांडतं? हे माझ्या आतलंच एक जागतंपण रात्री बेरात्री असे चांदण्याचे आवाज ऐकण्याच्या अट्टाहासाचं. कोणा अनोळखी प्रदेशांची सफ़र घडवणारं? मला माहीती आहे, हा मार्ग वेगळा आहे, ठाव नसलेला शेवट नसलेला आहे. पण आणखी कोणाला नाहीच का खुणावत ह्या वाटा? हे प्रदेश? हे आवाज? हे जग नसतच कधी जागं झालेलं त्यांच्यातही? जगण्याची सारी जिगीषा एकवटणारे हे पडसाद त्यांच्या आयुष्यावर नाहीच का पडत कधी? ही जिवघेणी सल नाहीच का ओढुन धरत त्यांना आतुन आतुन कधी? सर्वांचीच जगण्याची मुळ अशी खोलवर रुतलेली असतात का? की न विचार करताच जगता येतं? खरच का आखता येतं एक सरळसोट आयुष्य? हे माझं असं एकट्याचंच वेगळेपण आहे की सर्वच ह्याच प्रवासातुन आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यातुन जात असतात?
|
Shyamli
| |
| Tuesday, May 02, 2006 - 5:41 am: |
| 
|
ध्रुव.. .. .. .. अगदी अगदी रे बाबा.... सगळ्यांचच होत असतं असे... पण असं मांडता येत नाही शब्दात
|
हो.. सगळ्यांचीच.. मुळे अशी खोल रुतलेली असतात... जगण्यात.. कुठेतरी... गुंतलेली... ती तशीच.. ठेवुन आकाशाला भिडायचे.. आणि मग चांदण्यांना ऐकायचे... अजुन जमत नाहीये... खुप कठिण प्रवास आहे हा....
|
लई खास रे धृव! पर ह्यो V&C चा टॉपिक हिकड कुठ लिवला रे? 
|
Moodi
| |
| Tuesday, May 02, 2006 - 11:18 am: |
| 
|
लिंब्या काहीही बोलतोस का रे, दुपारी मला जेवतांना एकदम ठसकाच लागला हे वाचत असताना. ध्रुव खरच फार सुरेख लिहीलस. दररोजच्या त्याच त्या आयुष्यातुन अगदी हेच वाटत रहाते. 
|
Pendhya
| |
| Tuesday, May 02, 2006 - 11:26 pm: |
| 
|
ध्रुव, मनाला भिडणारा लेख. फ़ार छान. तेव्हढीच, सुंदर शब्द रचना.
|
Abcd
| |
| Thursday, May 04, 2006 - 3:43 pm: |
| 
|
{khupach Chaan !!!}सगळेच अड्कले आहेत या चक्रात
|
Shriramb
| |
| Thursday, May 04, 2006 - 11:19 pm: |
| 
|
धृव, सुंदर शब्दांत मांडलं आहेस! वाजपेयींची कविता आठवते, 'सत्य क्या है? होने का होना सत्य है? या न होने का होना सत्य है? मेरे खयाल से होना और न होना एकही पहलू के दो आयाम है बाकी सब विचार के खेल और बुद्धी के व्यायाम है'
|
धृव, सुरेख मांडली आहेस रे संकल्पना . हा शोध कधीच न संपणारा आहे पण तरी तो आपण शेवटपर्यंत चालु ठेवलाच पहिजे.
|
|
|