|
झोपेची गाडी......... स्वप्नांवर होती अडली आहे म्हटल वेळ तर कविता करु.... घडली तर घडली........ नाहीतर बिघडली... तितक्यात फ़ोनची ring वाजली, " बोलतय कोण? " पलिकडुन इग्लिश मधले हिंदी ऐकु आले... कानात, असं तर फ़क्त सोनिया बोलते म्हटल... ......मनात, म्हणाली " अग, कुठे झाली बेपत्ता केव्हापासुन शोधतेय आत्ता सापडला मायबोलिवर तुझा पत्ता... " आवाज ऐकुन तीचा घाबरा घुबरा... डोकं लागलं गरगरायला. सगळ्यांना बिथरवणारी बाई.. काय झालं आज चिंता करायला... " काहि नाही ग!... प्रचारात फ़िरत होते... लागली एक उणिव जाणवायला, वाटले एक सुन पाहिजेच सगळ्यांच्या खुर्च्या सांभाळायला, किती वाढलाय फ़ाफ़ट्पसारा... घ्यावा म्हटला पर्देशस्थ भारतीयांचा सहारा... तु आहेस तोवर जाउन येउ... म्हटलं ....टोनीच्या राज्यात एक मुलगी बघायला, दमलाय तो सेवा करुन बुशची... संधी नको कुणाला बोलायला फ़ुकटची... म्हणुन तुझ्याकडे राहिन कांदापोहे खाउन मग ईटलीकडे जाईन माहितीये तुला माझी किर्ती... आणि नसते माझी कधी उगाच फ़िरती!!! यु... देउन टाकते मी सगळी पदे... समता,ममता,जयललीता... नाही कोणि अधेमधे, डावे उजवे सारे प्यादे.. झालेत आता शांत... तरीही चिंता आहेच करेल कोणी आकांत!! सगळ्यांना सांभाळतांना माझी किती धांदल होते... एक सुनबाई आत्ता शोधुनच आणते.. आणि परंपरा चालवते... सासुबाईंचे होते kitchen cabinet , बनवते तशी प्रतीक्रूती थेट... आधी गाठली होती अमेरीकेत मुलगी... पण काय सांगु तुला... मेला बुश मध्ये आला जुलमी, म्हणाला " मला अंधारात ठेवला आणि कांद्यापोह्याला नाही बोलावला " लागला सारखा अटी घालायला... मुलगी आली पाहिजे आठवड्याला माहेराला... नेसणार नाही ती साडीबीडी, आणि रोज पाहील remix ची V CD " आवडत नाही मला अटी कुठल्याच मी आपली राजीनामा मंत्र जपते, आणि राजकारण करते...! ठणकाउन सांगितले जोर्जला... अगदी सही सही म्हणलं " यंदा कर्त्यव्य न्हाई!!! " एकदा वाटले करावि पोरगी शेजार्याची.. दुश्मनि मिटेल आयुश्याची... पटवुन देईल यातच सार्यांचे हित होते... तिथे जाउन पाहिले तर.... भारताने बोम्बस्फ़ोट केला असे खोटेच बातम्यांना सांगत होते, मुलगी म्हणाली, " येतील माझी भा.वंड भेतायला दिवसाला... गृहखाते माझे आणि संरक्षण खाते मेरे भैय्याला!!! " असं म्हणुन तीने मारली पिचकारी... रंगवुन काढली भिंत सारी... तेवढ्यात आले मुशरफ़ जनरल.... " अलिकडे अमेरीका पलीकडे अमेरिका.. तिच्या जोरावर आम्ही माजु... घेतली नाही आमची बाजु तर बोम्बस्फ़ोट कारायला आम्हि का लाजु? " एवढं बोलुन त्यांनी मारला डोळा... खिशातुन काढला imported बोम्बगोळा...!!! एकदा गेले चायनात मुलगी पहायला... तर माझी झाली अशी गोची... डोळे होते तीचे गिचिमिची, म्हणाली " हिमालयाचे आंगण, पाकिस्तानने दिले आम्हा आंदण... देउन टाका आता ईशान्या भारत मग मिटवुन टाकु भांडण!!! " तिकडु आली दुसरी.. म्हणायला लागली मीच खरी लग्नाची मुलगी.... पाहुन चिनचा duplicate बाजार माझा बळावला आजार... दुसरी म्हणालि.... " जगात सार्या आमचेच पाॅवर....... बुशच्या बाथरुमला चाइनिज शाॅवर रोज खाइन प्राणि पाच... वरुन सोयासाॅस घेइन त्यावर, पटल तर बघ नाय तर बाडबिस्तारा आवर...!!! " पाहुन चिनि तोरा म्हटलं आपला टोनीच बरा..... अमेरिकेची चाकरी आणि राणिची नोकरी... आणि english छोकरी... " फ़ोन ठेवते आता भेटल्यावर बोलु, बाहेर चाललेला दिसतोय समर्थकांचा गोंधळ थोडा... आता देउन येते त्यांना त्यागाचा धडा...!! माझ्या मनात पाहुणचाराचा विचार झाला चालु... पिझ्झा करु की पास्ता च बरा म्हणुन मेनुवर विसावली. आणि मोबाइलवर रामायणाची धुन वाजली... मी हॅलो म्हणते तर आवाजही नसतो, फ़क्त धिरगंभिर कंपनांनि फ़ोन हलतो, तेवढ्यात कोण बोलले.. " वाजपेयी तुम्ही थांबा, आधी मी बोलतो... सजवलेल्या रथाला दोन चाके... यात्रेने भरतो आम्हि पोट गरीबाचे..., " अरे, वा... कोण..कोण आहे रथावर... आवाज येतो.. अजुन कोणी नाहि... सारे म्हणाले बसु तर खुर्चीवर....!!! कांद्यापोह्याचा कार्यक्रम आहे उद्यावर, तयार ठेव हार तुरे हिथ्रोवर...... अजुन काही ऐकायच्या आत..... आलि मला चक्कर कानावर आला पोरांचा गलका....... अरेच्चा कविता करता करता लागला होता मला डुलका!!!!!!!!!!!!!!!!!!!!
|
Moodi
| |
| Thursday, April 27, 2006 - 12:27 pm: |
| 
|
लोपा भन्नाट सोडलीस बघ तुझी युरोस्टार.... लै ब्येस. 
|
Ldhule
| |
| Thursday, April 27, 2006 - 1:02 pm: |
| 
|
लोपा, एकदम फक्कड लिहिलयस.... 
|
Chinnu
| |
| Thursday, April 27, 2006 - 1:18 pm: |
| 
|
too good लोपा मुद्रा!
|
Mrinmayee
| |
| Thursday, April 27, 2006 - 1:28 pm: |
| 
|
जगात सार्या आमचेच पाॅवर....... बुशच्या बाथरुमला चाइनिज शाॅवर काय पण बढिया लिहलय!
|
Suniti_in
| |
| Thursday, April 27, 2006 - 5:15 pm: |
| 
|
अरे मस्तच लिहिली आहे कविता. बाकी shower मात्र नक्कीच चायनीज असेल हो. 
|
Dineshvs
| |
| Thursday, April 27, 2006 - 9:23 pm: |
| 
|
छान लोपा. पोरीने तो रॉबर्ट केला, आता सगळ्या अपेक्षा मुलावर ना ? तिथे नाही जमलं तर, लंकेत पण बघा कि. तो सेतु अजुन आहे म्हणतात. म्हणजे ह्यांच्या खुनाचा बदला, सुनबाईला छळुन घेता येईल.
|
Jayavi
| |
| Thursday, April 27, 2006 - 10:49 pm: |
| 
|
लोपा एकदम भन्नाट गं........
|
दिनेश... ... मी फ़क्त गमतीने लिहिलेय, बाकि काहि माझ्या डोक्यात नव्हते..., i respect Soniyaajiii,personally she is my favourt.!! बदला वैगैरे असे काहि कधी ऐकले नाहि.. हो..., सुन एक ईतर देशांचे भारताबद्दलचे धोरण या द्रुष्टीकोनातुन घेतलिये... बाकि काही नाही...!!!
|
Gandhar
| |
| Thursday, April 27, 2006 - 11:57 pm: |
| 
|
लोपा मस्त जमलीय गं कविता..
|
Kashi
| |
| Friday, April 28, 2006 - 1:50 am: |
| 
|
its tooooo good lopa,eakdam sundar..
|
Cool
| |
| Friday, April 28, 2006 - 2:12 am: |
| 
|
वा वा छान लिहिलय..
|
हा हा हा जमलंय अगदी!
|
Shyamli
| |
| Friday, April 28, 2006 - 4:35 am: |
| 
|
भन्नाट ग १दम.....सही जमलाय .. .. ..
|
Psg
| |
| Friday, April 28, 2006 - 7:37 am: |
| 
|
लोपा, सही लिहिल आहेस.
|
धन्यावाद मंडळी....!!!!.. .. .. .. .. ..
|
Charu_ag
| |
| Friday, April 28, 2006 - 8:34 am: |
| 
|
लोपा, छान लिहीलं आहेस.
|
|
|