हळू हळू रातराणी आता गंधाळत आहे कवितांच्या वहीमध्ये शब्द दरवळत आहे
|
ameydeshpande आणि वैभव... काव्य वाचनास तय्यार आमची मध्यरात्र अजुन व्हायचिये...!!!
|
कितीतरी दिवसांनी कुणी उदास दिसला मग ओळख पटून माझा आरसा हासला
|
Chinnu
| |
| Tuesday, April 25, 2006 - 4:17 pm: |
| 
|
फ़ार सुंदर झुळुक वैभव.. मला मृण्मयीच्याही आवडल्या. लोपा आणि निनावी नेहेमीच छान लिहीतात!
|
रेषा काळोखाच्या... देउन जातात जेव्हा सप्तरंगी स्वप्न... हवेहवेसे क्षण अंधारात या स्पर्शुन जातात...
|
जीवघेणी ओढ आहे कशी शब्दाची शब्दाला भेटतात लपूनिया कवितेच्या आडोश्याला
|
मृत्यो अद्याप पुरेशी वेळ जाहलेली नाही एक हवीशी कविता मज सुचलेली नाही
|
अश्याने तू स्वत: ओढवी प्रभू चा रोष मनी ठेव चैतन्य आरश्यास का रे दोष
|
सूक्ष्म होवुनिया देवा कसा लेखणीत येशी? भव्य रूप शब्दांमध्ये कसा ठेवुनिया जाशी?
|
कुणा वाटेल शब्दांची फक्त कसरत आहे इथे शाईतून माझे रक्त झिरपत आहे
|
कशा कशालाच जणू राहिलेला अर्थ नाही एक दिलासा इतुका शब्द झाला व्यर्थ नाही
|
जसा चंद्र गेला तसा लुप्त झालं चांदणंही माझ्यासंगे जागताहे फक्त कवितांची वही
|
मोक्ष नाहि माया नाही मला फ़क्त हवी या अविट शब्दांची माया... सारे उसासे.. सारे उमाळे.. सोशिती हे शब्दच माझे लेकुरवाळे...!!!
|
झुळुकीवर येती जेव्हा वैभवाचे सडे ऑफ़िसात बसून आमचे लक्ष मात्र मायबोलीकडे
|
तुझ्या स्पर्शांचे दागिने काया मिरवित होती आज डोळ्यांत उरले दोन आसवांचे मोती
|
चंद्रही रुसला... चांदण्याही भागल्या.. आमावस्येच्या राती... सार्या माझ्या कवितेतेच्या कोंदणातुन..लकाकल्या..!!!
|
अमेय .. लोपा ... मस्त चिन्नु ... धन्यवाद
येतो रे दोस्तांनो ...
|
रात्र सरत आली साखरझोपाही मंदल्या पणती घेऊनी उभी क्षितिजी पहाटकन्या
|
एक टक तुझे बघणे.. आणि निराधार माझी नजर.. निवळु तर दे... आधी.. मिलनाच्या.. सोहळ्याचा असर..!!!
|
ऑफ़िसात बसून संध्ये तुझी किती वाट पहावी ५ वाजले चला आता घरची वाट धरावी
|