ओलेत्या श्वासांमध्ये तू शब्दांस ओवले होते मग गाळल्या शब्दांमधले मज श्वास भावले होते
|
श्यामली, देवदत्त आणि वैभव, hats off !! केवळ अप्रतीम! श्यामली, तुझी लुडबुड (?) वाचायला आवडेल! थोडा धीर करून आणखी एक... बरसला घनराज जरीही शुश्क मनीचा घाव आहे डोळ्यातल्या प्रत्येक अश्रुवर आजही तुझंच नाव आहे
|
Shyamli
| |
| Tuesday, April 25, 2006 - 8:32 am: |
| 
|
मृण्मयी अश्रु पुस आणि आवर भावनांना काळच औषध असतो या घावांना!!! श्यामली!!!
|
श्यामली, सकाळी वाफ़ाळलेला आल्याचा चहा पिताना ४ ओळी जरा लवकर सुचतात तेव्हा 'काळाचीच' वाट बघत अश्रुंना थोपवून धरलं आहे एकदा मातीत विसावल्यावर बाकी काय उरलं आहे?
|
मातीत मिसळतांना सखये अश्रुनांहि गंध हवा कोमेजतांनाही फुला राणी बहरण्याचा छंद हवा
|
देवदत्त, लाजवाब!!!!!! बाकी काही शब्द सुचत नाही!
|
"शब्द सुचत नाही" म्हंटलं तरिही.... शब्दांची फुंकर घालून ह्रुदयाचा ठाव घेतोस कोमेजण्याचं कारण होऊन उमलण्याची आस देतोस
|
Ninavi
| |
| Tuesday, April 25, 2006 - 9:49 am: |
| 
|
अरे वा!! काय छान लिहीतायत सगळे. मृण्मयी ही तर झकासच आहे.
|
म्रुण्मयी, देवदत्ता... and श्यामली... फ़ारच छान!!!.. .. .. .. . ...
|
Mrinmayee
| |
| Tuesday, April 25, 2006 - 12:22 pm: |
| 
|
धन्यवाद निनावी, लोपमुद्रा! निनावी, तुम्ही स्वत: किती सुंदर लिहिता!
|
Ninavi
| |
| Tuesday, April 25, 2006 - 12:38 pm: |
| 
|
तुम्ही? मी एकटीच आहे गं हा आयडी वापरणारी. 
|
वा !!! देवा , श्यामली , मृण्मयी , खास ! मस्त चाललंय !!! क्षण भेटायचा प्रभू असा कसा लांबलेला? तुझ्या माझ्यामध्ये फक्त एक श्वास थांबलेला
|
ही प्रभू कोण रे ;) झोपायचं नाही का आज?
|
हाय अमेय ... नाही झोप येत नाहिये उजाडल्याविना माझी रात्र लुप्त होत गेली पाहिलेली स्वप्ने सारी रिक्त रिक्त होत गेली
|
आज माझिया लोचनी नीज घेइना विसावा जणू काळोख तेथला तिला साहला नसावा
|
असे कसे भवताली आज शांत शांत आहे ? श्वास रोखुनी थांबली जणू काळरात आहे
|
पुन्हा नव्याने मला तो चंद्र छळूनिया गेला आठवांत डोकावुनी स्वप्न जाळुनिया गेला
|
नको नकोसा काळोख..... किती अस्ताव्यस्त पसरलाय.. " पहाटेची " वाट पहात आता तर मी स्वप्नांचा पसाराही आवरलाय...
|
झोप येत नाही तेव्हा आम्ही डोळे मिटतो गप्प काहीस मात्र हे वैभव लाभे... करी जे ओव्या रचून थक्क!
|
डोळ्यात चांदण आणि तु समोर... माझे डोळे बोलु लागले माझ्याअगोदर....!!!
|