Santu
| |
| Sunday, April 23, 2006 - 3:18 am: |
| 
|
करपे वाह रे दोस्ता अगदी काळजाला भिडलि गड्या कविता तुझी गाव आहे आपले इवलेसे अंगणात आहेत आपलेपणाच्या गायी निवांत तुळशी जवळ थरथरत्या मायेचा दिवा तेवतो शांत
|
Kashi
| |
| Sunday, April 23, 2006 - 9:45 am: |
| 
|
saglancha kavita farach chan aahet vachayla avdtat..
|
Zoom
| |
| Sunday, April 23, 2006 - 12:00 pm: |
| 
|
करपे, फारच छान! मनाला भावली तुझी कविता.
|
Smi_dod
| |
| Monday, April 24, 2006 - 12:14 am: |
| 
|
आठवणीचे पक्षी पिंगा घालतात रात्रंदिवस काहुर उठवतात. कशी करु स्वत्:ची सुटका त्यांच्यापासुन पक्ष्याना घालवणे माझ्या हातात नाही त्यांच्या संगतीने जगणे मला शक्य नाही. शक्य अशक्यतेच्या कसोटीत तावुनसुलाखुन तरी किती वेळा निघायचे. सीतेने एकदा दिलेली अग्निपरिक्षा मी वारंवार का द्यायची असा कुठला गुन्हा,कुठले नशिब माझ्या वाट्याला आले? दरवेळेस सजा मी च का भोगायची? समज गैरसमजाच्या गर्तेत मीच का सापडायचे
|
Shyamli
| |
| Monday, April 24, 2006 - 12:21 am: |
| 
|
जया... मन आतुर आतुर....सहिच वैभव.....सी.यु. खरचच सुन्दर वैशाली निरोपाचा क्षण नकोसा असणारा......
|
Ruchita
| |
| Monday, April 24, 2006 - 1:55 am: |
| 
|
व्वा....एऐन ग्रीश्मात मायबोली वर कवितान्चा बहर आलाय..वाचुन मनाला अगदी थन्ड थन्ड वाटतेय...Cचालु द्या..
|
Vasant_a
| |
| Monday, April 24, 2006 - 2:01 am: |
| 
|
आठवणीच्या प्रत्येक पानावर तुझ नाव लिहीलय, आठवणीच्या प्रत्येक पानात, तुझच फुल ठेवलय! पुसट झालीत अक्षर, तरीही मी ती वाचतोय, अन कोमजून गेलीत फ़ुल, तरी तुझ्याच सुगन्धात नहातोय
|
एक पहाट....... एक पहाट........ धुक्यात गुरफटलेली. एक पहाट......... दंवानं थबथबलेली. एक पहाट........... रजनीच्या मिठीनं धुंद होऊन उगवलेली. ती पहाट............. ताजीतवानी... प्रसन्न... जणू कान्ह्याच्या पाव्यामुळे राधेच्या मनात फुललेलं स्वप्न.
|
Smi_dod
| |
| Monday, April 24, 2006 - 3:10 am: |
| 
|
अश्वत्थाम्याचे दु:ख, भळभळणारी जखम मला मिळाली मी बाळगते ते भळभळते दु:ख कोणी त्याला तेल लावेल या अपेक्षेत नाही.... कारण ज्या ज्या वेळेस तेलाची अपेक्षा केली जखमे वर मीठ मिळाले आता मात्र गात्रे थकली,मन थकले जखम मिरवायची,तिची तिव्रता,तिचे दु:ख जोपासायची पण शक्ती संपली
|
Mmkarpe
| |
| Monday, April 24, 2006 - 12:07 pm: |
| 
|
सन्तु...,झूम... धन्यवाद... छान आहेत सार्यांच्याच कविता आणखी येऊद्यात
|
Ninavi
| |
| Monday, April 24, 2006 - 10:00 pm: |
| 
|
क्षितीज.. तशीच ओली पहाट होती दंवात झाडे नहात होती तशीच माझी कुवार स्वप्ने तुलाच स्वप्नी पहात होती तसाच श्वासांत ध्यास होता, तुझा छंद स्पंदनांस होता तशीच ती ओढ जीवघेणी नसांत माझ्या वहात होती तश्याच हाका नभात होत्या तुझ्या परांना खुणावणार्या तशीच माझी मुकी आर्जवे मनात माझ्या रहात होती निराश मी होऊनी अखेरी जरी दार लावले घराचे चुकार खिडकी जरा कलूनी तुझ्याच वाटा पहात होती तुझे गीत आळवीत माझी जिथे चिता पोरकी जळाली क्षितीजरेखा तिथून सारी दूर फक्त दोन हात होती.. - निनावी.
|
Dineshvs
| |
| Monday, April 24, 2006 - 10:40 pm: |
| 
|
निनावि, नेहमीपेक्षा थोडी कमी छान, मला काहितरी गडबड वाटतेय. नीट नाही सांगता येणार.
|
निराश मी होऊनी अखेरी जरी दार लावले घराचे चुकार खिडकी जरा कलूनी तुझ्याच वाटा पहात होती वाह !!! सुंदर सुमतिताई ... एक पहाट मधला शेवटचा पंच जीवघेणा आहे
|
Ruchita
| |
| Tuesday, April 25, 2006 - 5:13 am: |
| 
|
तु सतत जवळ राहावे हा मनाचा हट्ट होता मिठीत तुझ्या मी अन हातात हात घट्ट होता अचानक वारयाची झुळुक आली.. बाहुतील मिठी सैल झाली जणु... तुझ्यापासुन मी दूर व्हावे ह इश्वरि सन्केत होता.
|
Ninavi
| |
| Tuesday, April 25, 2006 - 10:57 am: |
| 
|
धन्यवाद, वैभव. दिनेशदा, काय चुकलं ते ऐकायला आवडेल खरंच. संतूराव, छान लिहीता तुम्ही. मायबोलीवर स्वागत. रुचिता, अगं इतक्यात कुठला ग्रीष्म? 
|
Giriraj
| |
| Tuesday, April 25, 2006 - 11:51 am: |
| 
|
मी येऊ का? मी लिहू का? स्वप्न साहतो रंगपटावर फ़िरत राहतो भोवतालि मम काचा रंगित. माखून घ्यावे रंग तयांचे कोण कोण मज असते सांगित. लिंपून घेऊन रंग मीही मग अंतर्यामि वाट पाहतो. घेऊन माझे रुप अंतरी; भेट दर्पणा,स्वप्न साहतो! गिरीराज
|
Shyamli
| |
| Tuesday, April 25, 2006 - 1:53 pm: |
| 
|
सुमती राधेच्या मनात फुललेल स्वप्न...वाSS निनावी मलापण चुकार खिडकीच जास्त आवडली...सहीSS गिरी... >>>>मी येऊ का? मी लिहू का? मला हिच सुरवात वाटलि कि... छाने
|
Chinnu
| |
| Tuesday, April 25, 2006 - 2:29 pm: |
| 
|
गिरी, शिर्षक लयी साहसी आहे! निनावी मलाही चुकार खिडकी आवडली. शेवटली ओळीत 'सारी दूर' खटकले मला. माझ चुकले तर सांग मोठा दिवा घेवुन टाकते!
|
खुप छान आहेत सगळ्यानच्याच कविता.... सुमती तुमच्या कविता तर नेहेमीच अप्रतीम असतात... पण येथे काही कविता वाचता येत नाही आहेत..कोणी सान्गेल का प्लीज...
|
स्वप्नगंधा कुठल्या कविता वाचता येत नाहियेत? नावं सांग जरा.
|