बापु, जयावी... आवडल्या कविता... !!!! नविन मुलांनो देवनागरीच्या खिडकिवर टिचकी मारा. आणि लिहायला लागा.
|
शैलेन्द्र, जयावि कविता मस्त आहेत.. वैभव कविता पोस्ट करतोयस ना झुळुक वरची इथे..
|
अरे टाकेन देवा नंतर ... मला गिरयाने आठवड्याला एक पोस्ट करायची असा दम भरलाय
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 18, 2006 - 10:39 am: |
| 
|
वैभव, असं गिर्याला घाबरुन कसं चाले ? त्याला मी बघुन घेईन. तुला हव्या तितक्या कविता लिहि, सुचत असतील, तर थांबायचे का ?
|
सारंग कुठे गेला रे???
|
तथास्तु .... हात जोदुनी सद्भावे मग बोलतो ईश्वरा चित्त नसे थारयावर घ्यावे पोटाशी लेकरा परी जाणतोस तू ही असे प्रामाणिक सेवा मनोभावे दास तुला रोज आळवितो देवा मंत्र उच्चाराया जातो शब्द वेगळे स्फुरती सुचे नवे नवे काही म्हणू पाहता आरती मंद हासुनी तथास्तु बोले कर्ताकरविता आणि प्रसाद म्हणूनी मिळे नवीन कविता
|
वैभव अरे ह्याला मस्त चाल लावली तर आरतीच म्हणायची की रे!!! परत नेहमीसारखीच अप्रतीम अशक्य आहेस तू नैवेद्य कशाचा दाखवतोस तू सांग बघू जरा?
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 18, 2006 - 9:34 pm: |
| 
|
वैभव, छान आहे. मला नेहमी वाटत आलेय कि कविता आणि गाण्यांच्या चाली, या कुठल्यातरी अलौकिक शक्तिमुळेच स्फुरत असाव्यात.
|
' जगी ज्यास कोणी नाही ' ह्या जुन्या भावगीताचे विडंबन जया अंगी गुण नाही त्यास वशिला आहे जगी सर्व नालायकीचा, तोच भार साहे शाळा सोडुनि ती दिधली कुणी प्रायमरीत तरी राजकारणी तो वाढला जोमात शिक्षणमंत्री म्हणूनी त्याची कोनशिला आहे जया अंगी गुण नाही, त्यास वशिला आहे. प्रा. सुरेश ख़ेडकर, नागपूर
|
Ruchita
| |
| Thursday, April 20, 2006 - 2:09 am: |
| 
|
वैभव,दिनेश, जया,गिरया, लोपा, मिनु..... ए मला पन तुमच्य ग्रुप मध्ये यायचे आहे, मायबोलि वरच्या तुमच्या सगल्या पोस्तिन्ग्स मी वाचल्या आहेत, अगदि कथान पासुन कवितान पर्यन्त. खुप खुप आवदल्य आनि आवदत आहेत. म्हनुनच येथे तुमच्या साथी माज़्या दोन ओली... ... मैत्रि म्हनजे दोन मने जोदनरा सेतु... मैत्रिचा दुसरा अर्थ मी आनि फक्त तु
|
Giriraj
| |
| Thursday, April 20, 2006 - 3:20 am: |
| 
|
रुचिता,आमचा वेगळा असा ग्रुप नाहीय काही.तू इथे नियमित येत रहीलीस की आपोआपच ओळखी वाढतील. ड असा लिही Da ण Na अनुस्वार असा दे.. आंबा= aaMbaa
|
रुचिता... " जो भी मीला प्यारसे हम उसिके हो लीये.. " group वैगैरे कहि नहि ग.!!! 
|
Ruchita
| |
| Thursday, April 20, 2006 - 4:33 am: |
| 
|
तु दिलेल्या माहितीबद्दल मनापासुन आभार गिरया. मला खरच लिहिताना तो प्रोब्लेम येत होत. पण आता मी तसेच करेन. तु दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोपा
|
SEE YOU .... कारण काहीही असो ... पण निरोप घेताना तट तट तुटतंच की काळजात . पाय निघण्याआधीच डोळ्यांत साठू लागलेल्या असतात उद्यापासून त्रास देणार्या, तरीही जपाव्याश्या वाटणार्या कालच्या आठवणी .... मग अनिवार्य होउन बसतं त्यांना वाहू न देता सांभाळून ठेवणं ... हो ! उद्या कुणी विचारलंच " काय मिळवलंस ? " तर बघता तरी येतं नजर उचलून ....
|
Himscool
| |
| Thursday, April 20, 2006 - 5:16 am: |
| 
|
अहो जोशी, तुम्हाला मॉडरेटनी दिलेली सूचना अमलात आणायचा विचार करत आहात काय? एकदम 'सी यू' च्या गोष्टी करायला लागलात!
|
निरोपाचा क्षण डोळ्यांच्या ओलसर कडा.. लपवता लपवता वेळ येते.. नजरेची भाषा अबोध होउन जाते, आणि हलणारा हात दिसेनासा होण्याआधी पाठ वळते.. हळवा श्वास उष्ण झरा बनुन सगळ्या अडथळ्यांना वळसा.. घालुन वहात राहतो.. थरथरते ओठ खारट होतात.. चिवचिवते मनपाखरु... पंख मिटुन निश्चल पडते.. काल आणि उद्याही आठवत नाही फ़क्त मिटुन घ्यावा हा क्षण नकोसा झालेला.. तरी का दाटुन राहावा हा क्षण नकोसा.. झालेला!!!
|
क्षण एकान्तातले ...... मनाला घट्ट रुतवणारे, मनाची कवाडे उघड्णारे, मनाला दिलासा देणारे क्षण एकान्तातले ...... मनाला साथ देणारे, मनातील भाषा डोळ्यातुन दर्शवणारे क्षण एकान्तातले ...... मनातील प्रेमाला जागृत करणारे, मनातील बॊल ऒठावर आणणारे क्षण एकान्तातले ...... प्रत्येक क्षणाला जतन करणारे आणी एकटा पड्ल्यावर, मनालाच सावरणारे शैलेंद्र कुलकर्णी
|
Ninavi
| |
| Thursday, April 20, 2006 - 9:34 am: |
| 
|
अरे वा. छान लिहीतायत सगळेच! 
|
Ninavi
| |
| Thursday, April 20, 2006 - 9:36 am: |
| 
|
कविता.. मला जरा सावरू तर दे.. मग लिहीन की कविता.. अजून कुठे रात्र पुरती हरल्ये अजून कुठे तहान पुरती सरल्ये अजून एकदा तुला डोळ्यांनी पिऊन घेऊ दे.. मग लिहीन की कविता.. अजून उजाडलेला नाही उद्याचा दिवस अजून पुरता फिटायचाय बोललेला नवस अजून एकदा जीव ओवाळून टाकू दे.. मग लिहीन की कविता.. अजून श्वासांत माझ्या तुझे श्वास दरवळतायत अजून स्पर्शात तुझ्या कोवळी फुलं चुरगळतायत उद्या श्वासांचे ध्यास उरतील.. स्पर्शांचे नुसतेच भास उरतील.. अजून काही क्षण जगून घेऊ दे.. मग... लिहीन की कविता.... - निनावी.
|
Jaaaswand
| |
| Thursday, April 20, 2006 - 10:10 am: |
| 
|
व्वा मित्रांनो दिलखुष हो गया
|