तुझ्या नुसत्या आठ्वनीनेही आभाळ वेड भरुन येत डोळ्याचे पाखरु मग श्रावन सरींना धरुन जात
|
अचानक ह्या उदास अंगणी कश्या फुलल्या जाईजुईच्या वेली ? नक्कीच आज पुन्हा ती माझ्या अपरोक्ष येऊन गेली
|
आज पुन्हा नव्याने ती लटकेच भांडली होती त्या गालांवरति गुलाबाने आपलि प्रभा सांडलि होती
|
कोवळ्या उन्हात मला तुझ्या श्वासाचा भास झाला... आणि अवेळीच वारा.. नखशिखांत शिरशिरी उठवुन गेला.....
|
तसा अजूनही येतोच की पाऊस नित्यनेमाने पण बरसत नाही तुझ्यासारखा अविरत ... प्रेमाने
|
एकदा हळुच प्राजक्त व्हायचय.. नजाकतीने चालणार्या पाया खाली, झोकुन द्यायचय.. धुन्द त्या डोळ्यात पहाण्यास मोगर्याचा गंध होउन भिरभिरायचय.... त्या गालावर गुलाब उमलन्यास.. गुलाबी... गुलाबी पहाट होउन.. दवात बुडुन जायचय...
|
घर वाहून गेल्यावर कळलं पाऊस क्षितिजभर दूर होता ज्याने उध्वस्त केले होते मला माझ्याच आसवांचा पूर होता
|
तु कितिही लपली तरी अबोली सुध्दा फ़ितुर होते.. माझ्या आतुर नजरेला.. तुझे अस्तीत्व जाणवुन देते...!!!
|
ही अशी निरव रात्र येताच शब्द बोलायला लागतात मनमोकळं मग किती सहज होत जातं जगापासून माझं जग वेगळं
|
वैभव, देवदत्त, निलायम... सुंदर..... . . . . . . .
|
वैभव तोच भाव वेगळ्या शब्दात मी रोज ठरवतो नभाला त्या भेटून यावं त्यालाही सांगावं तुझ्यासारखं अंतर्बाह्य भिजवून जावं
|
गर्दीशी बोलायला जावं तर भोवती गजबजाट असतो स्वतःशी बोलायला जावं तर मनात शुकशुकाट असतो
|
देवा , लोपा , मस्त .... ह्यावेळी येशील तेव्हा जाण्यासाठी येऊ नकोस आणि जाणारच असशील तर निदान मागे वळून पाहू नकोस
|
तु माझ्या आयुष्यात आलास आणि सारं जग माझ्या ठायी ठिपका होउन गेलं आणि तु परत गेलास सार जग पुन्हा एक ठिपका होउन गेलं..
|
जगायाला वाव नाही माणसांचे गाव नाही चेहेरयांची जत्रा फक्त ओळखीचा भाव नाही
|
चेहर्यांच्या जत्रेत इथे प्रत्येकाचा भाव आहे खरेदिला कोणी नाही पण विक्रीचा वाव आहे
|
गर्दीत मिसळण्यासाठी.. रोज मी मुखवटा लावी.. मुखवट्याआडचा चेहरा आता माझा मलाच ठाउक नाही..
|
व्वा वा वैभव देवा मस्त जमलीय कवीता शिफ़्टा आता.. वचु द्या सगळ्याना...!!!!
|
वैभव बढिया हैं.. वैशाली मस्तच
|
निळ्या निशेत बुडुन अंधार होउन जावे.. उदास मनाला या कसे समजावे हट्ट धरलाय त्याने प्रेमाच्याच गावी न्यावे...!!!
|