Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 13, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » चैत्र » काव्यधारा » कविता » Archive through April 13, 2006 « Previous Next »

Vaibhav_joshi
Monday, April 10, 2006 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आण ....

माते जाणतो तुलाही
ऊन साहवत नाही
तुझी कोरड मलाही
आता पाहवत नाही

नद्या नाले विहीरींचे
पाणी वळवले त्यांनी
तुझ्या माझ्या तोंडचेही
पाणी पळवले त्यांनी

आला दुष्काळ नशीबी
जणू वैरी तुझा माझा
किती दिस झाले आई
घास घेउनिया ताजा

दुःख पाहणे तुझे हे
कसे शोभायचे मला
एक कर्तव्य करू दे
अता अखेरचे मला

दोन अश्रू प्राषुनिया
तुझी भागु दे तहान
मग निरोप मला दे
तुला लेकराची आण


Lopamudraa
Monday, April 10, 2006 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaibhav ..nehamipramanech.... .. .. ..

Ninavi
Monday, April 10, 2006 - 10:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! सुंदर आहेत कविता लोपा आणि वैभव.

Meenu
Monday, April 10, 2006 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, वैभव खूप सुंदर लिहिलय रे तुम्ही...

Shyamli
Monday, April 10, 2006 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>सूर्य उगवतो रोज, पण
दिवस उजाडत नाहीत....

neenaavi....goodone

Suyog
Monday, April 10, 2006 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव तुझ्या कविता सगळिकडे पसरत आहेत, तु तुझे copyright टाकुन jpg image format मधे कविता टाक.

Lopamudraa
Tuesday, April 11, 2006 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaibhav tu pustak kaa nahi kaadhat?.. .. .. ...... ..

Menikhil
Tuesday, April 11, 2006 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो वैभव....मलही अत्तापर्यन्त तुझ्या बर्‍याच कविता मेल मधे आल्या आहेत. प्लीज कॉपीराईट करून पोस्ट करत जा.

Menikhil
Tuesday, April 11, 2006 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी विचारा मला "मी जगतो कसा?"
मी म्हणेन पावातल्या वड्याजसा
स्वदिष्ट, रुचकर, खमन्ग असा
पोटभर खा वट्टेलतसा

जरी असेल मी पावात दाबलेल
चटणी, मिरचीनी तिखट केलेला
उकडुन, तळुन, शिजवुन काढलेल
तरीही चिन्चा आणी गुळात बुडलेला

मज विचारा मी इतका चवदार कसा?
मी म्हणेन त्यासाठी आधी कूकर मधे बसा
मग उकळत्या तेलात पोहुन घ्या जरासा
आणी पावच्या दढेत जाउन बसा

समजू नका मजवरी देव कोपला
बघा खजुरही वाळवन्टी जन्मला
जो कोणी आगीतुन नाही निघाला
कुन्दनाची सर कधी नाही येणार त्याला


Dr_ashutosh
Tuesday, April 11, 2006 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Just composed music for a education related documentary . Also wrote a title song for it which comprises jist of it . Recording done in last week . Imagine all kids singing this song and perhaps demanding their very need of freedom


शिकता शिकवता
वाढत जातो आपण देखिल
शिकता-शिकवता
गाणे मिळते अगदी आतिल

निळ्यासावळ्या आकाशाच्या
छताखालती आमची शाळा
झाडासन्गे खेळ खेळतो
लाल मातीचा लावूनी टिळा

वेष आमुचा चमचमणारा
रन्ग तयाचे इन्द्रधनूतिल
शिकता शिकवता
वाढत जातो आपण देखिल


सोनसावळ्या उन्हात न्हातो
मजेत गातो आम्ही सगळे
अशीच शाळा आम्हा आवडे
श्वास येथले किती कोवळे

ध्यास आमुचा पोलादाचा
वीण परन्तु सात सूरातिल
शिकता शिकवता
गाणे मिळते अगदी आतिल
शिकता शिकवता
वाढत जातो आपण देखिल


Dr. Ashutosh

Zaad
Wednesday, April 12, 2006 - 2:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashutosh, khoop chhan gana ahe he! manapasun awadala!!

Zaad
Wednesday, April 12, 2006 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सराईत

आता तर तू
इतका सराईत झाला आहेस,
वाक्याच्या सुरुवातीला सुरू केलेला विषय
वाक्याच्या शेवटी बदललेला असतो!
(तुला वाटत असेल मला कळणार नाही!!)
परंतु मी, हेही स्विकारलं...तुला कळू न देता,
सराईतपणे...


Lopamudraa
Wednesday, April 12, 2006 - 3:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डाॅ. अशुतोश.. छान आहे गाणं.. .. .. .. .. .. !!!

Champak
Wednesday, April 12, 2006 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशुतोष.. .. छान उपक्रम :-)

Kshipra
Wednesday, April 12, 2006 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ध्यास आमुचा पोलादाचा
वीण परंतु सात सुरातील हे विशेष आवडले


Mmkarpe
Wednesday, April 12, 2006 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या दिवशी जाताना
किती सहज म्हणालिस तू;
'मी विसरलेय तुला
आता तुही विसर मला'
पण... हे खरय का!
जगता येईल
त्याच सहजतेने
दोघांनाही
आत्म्यांशिवाय.


Mmkarpe
Wednesday, April 12, 2006 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो! हक्क आहे तुला
म्हणण्याचा बेइमान मला
साधे दोन अश्रूही
नाही देवु शकलो
भेट म्हणुन तुझ्या पाठवणीला.
पण खरं सांगू?
हे अश्रूच तर आहेत
माझा भविष्य निर्वाह निधी
म्हणुनच मग...
जपुन नकोत का वापरायला?


Dr_ashutosh
Wednesday, April 12, 2006 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

THX , Kshipra , champaka , lopamudra and zaad !

Kshipra , ur choice matches me : ) malahi lihilyalihilya tyach don oli avadalya .

BTW , Can we post audio track here ? If its so , I will try to post the song itself . Anyone for help ?

Chanakya
Thursday, April 13, 2006 - 12:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'मी'
जीवनाशी झुंजताना मानली ना हार आहे
घेतली नाही कधीही मी रणी माघार आहे

दुश्मनांचे घाव त्यांची, का करू वृथाच पर्वा
सोयर्‍यांचे रोज वर्मी, झेलतो मी वार आहे

सावलीने सोडली ही साथ ग्रीष्माच्या दुपारी
मीच माझा एकटा सूर्यापरी आधार आहे

चालतो मी चाल ऐसी, आज रस्त्याने गजाची
भुंकणारे श्वान त्यांचे, भुंकणे बेकार आहे

मी यशाचे पेलले हातांवरी आभाळ सारे
संकटांना तोंड देण्या, मी सदा झुंजार आहे


Moodi
Thursday, April 13, 2006 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाणक्य अतिशय सुरेख!! ..




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators