|
सोहळा ... जाईच्या देहावरती प्राजक्त बहरला होता ती खरी पालवी होती , तो ऋतू आपला होता मोहाची सलज्जतेशी रुजवात जाहली तेव्हा आकाशी चंद्र स्वतःचे अस्तित्व विसरला होता मौनाची दुलई घेऊन अंधाररात्र निजलेली कायांची सळसळ होती , कल्लोळ माजला होता ओठांच्या सभोवताली ओठांचे कुंपण होते होकार तरी गात्रांतुन बेफाम उधळला होता ग्रीष्माच्या तलखीवरती झरलेल्या श्रावणधारा प्रणयाचे चंदन लेऊन मृद्गंध पसरला होता रात्रीचा झळाळ पाहुन आरक्त जाहली प्राची अन देहमंडपी रक्तिम सोहळा रंगला होता
|
भई वाह!!! मस्त रे वैभव
|
Shriramb
| |
| Tuesday, April 04, 2006 - 3:41 am: |
| 
|
वाह! क्या बात है!
|
Giriraj
| |
| Tuesday, April 04, 2006 - 3:50 am: |
| 
|
वाह भाइ! वैभव! बापू,छान माहिती. Romanticism ला मराठीत योग्य शब्द नाही हे मात्र खरंअय! त्याला स्वप्नरंग्जनही म्हणू शकत नाही कारण त्यामागे निव्वळ आशावाद नसतो तर त्यामागे सकारात्मक विचार आणि कृति असते. तुमचे विचार अपेक्षित असतात आम्हाला प्रत्येक विषयांवर!
|
Shriramb
| |
| Tuesday, April 04, 2006 - 4:48 am: |
| 
|
(वैभव, क्षमस्व!) कावळा खाटीच्या पायांवरती धूडांचा भारच होता ती चाळ आपली होती, तो काळ आपला होता खिडकीच्या फुटक्या दारी, दिसणारा तुटका दिवटा लुकलुकून लुकड्या रात्री, तार्यांस लाजवित होता ढोलकेच बडवे जणु ती, मिणमिणती रात्र गोंगाटी, श्वानांच्या सुरसाथीला, डासांचा तंबोरा होता ग्रीष्माने घातले होते, आजही घर्मस्नान वीजेच्या खेळामध्ये, आजही खंड न होता शेजारी रण संचरते, घरात बंड्या येता तो रोजच्याच सवयीने, आजही पिउनी होता ओठांवर कोरड होती, गात्रांत नव्हते त्राण कासाविस ते प्राण, जाण्याचा संशय होता रात्रीच्या मरणानंतर, उगवली सकाळ जेव्हा रोजच्याच तारेवरती, कावीत कावळा होता
|
Jayavi
| |
| Tuesday, April 04, 2006 - 7:17 am: |
| 
|
वैभव, त्वाडा जवाब नही !
|
स्मरण जीवनातल्या ह्या वळणावर स्मरण मला का तुझेच व्हावे मनात हसु असतांनाही नयनी पाणी का तरारून जावे आहे सारे मनोहर तरी मनी हि का खंत असावी यशाच्या ह्या शिखरावर तू माझ्या का सांगाती नसावी सारे विश्वच माझ्या चरणी असावे पण माझ्या ह्या विश्वात तूच नसावे प्रियतमे मजवर तू इतुके का रुसावे माझ्या ह्या यशाकडे का एकदाही न पहावे जीवनातल्या ह्या वळणावर स्मरण मला का तुझेच व्हावे मनात हसु असतांनाही नयनी पाणी का तरारून जावे जगत्-नियंती नियती हि का एवढी क्रूर असावी तुझ्यावरच्या माझ्या प्रेमाची का तिला पारख नसावी तुझ्याविना मी का एकट्याने कुढत जगावे तुझ्या आठवणींनाच का जीवन समजावे तुला काळाने का इतके ऊंच न्यावे मला तुझे का दर्शनही दुर्लभ व्हावे जीवनातल्या ह्या वळणावर स्मरण मला का तुझेच व्हावे मनात हसु असतांनाही नयनी पाणी का तरारून जावे चौकटचा राजा
|
रस्ता कितिक आले, कितिक गेले तरी चालली रहदारी मालक इथला कुणीच नाही हा रस्ता ना सरकारी जो तो म्हणतो " रस्ता माझा !" परी न याला काही नाव एक दिशेने सर्व चालती सर्व शोधती अपुला गाव हातामध्ये हात गुंफुनी साथ चालतो एक सखा अन रस्ताही पांघरतो मग फुलाफुलांचा अंगरखा पाय घसरता पडतो आपण आणि उसळती हास्यझरे स्पर्शाच्या मलमाने केवळ कुणी सांधतो हृदयचरे कधी रस्त्याच्या कडेस दिसतो प्रसन्न हिरवा वृक्ष जुना कुणी खांद्यावर घेऊन फांदी पेरीत जातो हरितखुणा कुणी भेटते असे भेटते कुंकुमकोमल पायठसे कुणी हरवते असे हरवते संध्यासमयी रंग जसे ज्या रस्त्यावर चालत असतो त्या रस्त्याशी जुळते नाते आणि विसरलो आपण वेडे कुठे जायचे मनात होते... ~ प्रसाद
|
Ninavi
| |
| Tuesday, April 04, 2006 - 9:20 am: |
| 
|
वैभव, अरे काय चालवलंयस काय तू हे? रोज एकाहून एक सरस कविता वाचायला मिळतायत हल्ली तुझ्या. ( खातोस तरी काय हल्ली?) प्रसाद, खूप दिवसांनी? रस्ता छान आहे. बाकी रोमॅंटिसिझमला मराठीत शब्द नाही याची मजा वाटली. मराठी लोकांच्यात रोमॅंटिसिझम नाही की काय? किंवा असेल, पण त्यांना त्याबद्दल बोलण्यापेक्षा कृती जास्त महत्त्वाची वाटत असेल. 
|
वैभव, तश्याही तुझ्या कविता एखादा भाव दर्शवताना तो पूर्णपणे स्वत:मधे घेऊनच उतरतात आणि इथे तर ओसंडून वहातोय... कवितेतले शब्द तृप्त झाले असतील ह्या पंक्तीत बसल्यावर... प्रसाद मस्त जमलीये! त्यातल्या लयीवरून मला श्रावणमासी आठवली
|
Shriramb
| |
| Tuesday, April 04, 2006 - 10:51 am: |
| 
|
वा! प्रसाद, सुंदर!! ...
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 04, 2006 - 12:47 pm: |
| 
|
सगळ्या कविमित्रानो आणि मैत्रीणीनो, रोमॅंटिक चा मराठीत अर्थ नवनीत शब्दकोशाप्रमाणे अद्भुतरसानुसरण पद्धती आणि ऑक्स्फ़र्ड प्रमाणे प्रणय किंवा अद्भुतरम्यभाव, स्वच्छंदीपणा असे अधुन मधुन ईथे डोकावतो बरं का मी !!! घ्या, आता करा मराठीत रोमॅंटिक कविता.
|
Vaibhav वैभवाअ तुझा सोहळा अणि प्रसाद, तुझा रस्ता. दीर्घ काळ स्मरतील अशा कविता. गुलमोहराला चैत्र-पालवी फुटल्यासारखे वाटले. ह्या महीन्यात Moderatorभाऊन्ची चान्गलीच पन्चाईत होणार असा रन्ग दिसतोय. काय निवदणार आणि काय मागे ठेवणार? बापू करन्दिकर
|
Lampan
| |
| Wednesday, April 05, 2006 - 12:52 am: |
| 
|
प्रसाद .. मस्त आहे ' रस्ता ' अगदी गेय आहे
|
मनातल्या मनात.... मग त्या दिवशी पुन्हा मी... नव्याने डोळे उघडून बघितले तर; खूपच प्रसन्न सकाळ होती ती. अवतीभवती हिरवीकंच झाडं अन आकाशात चहूवार विखुरलेले ढगांचे निळे-पांढरे छोटे छोटे तुकडे. मंद मंद दरवळणारा वारा अन गगनातून क्षितिजाला टेकलेले इंद्रधनुष्याचे कडे. नुकत्याच बरसलेल्या सरीमुळे तरुणाईनं सजलेले प्रफुल्लित रस्ते वळणावळणावरून वळणारे गप्पिष्ट मुलांचे रंगबिरंगी बस्ते. रिमझिमणार्या पाऊसतुषारांना चिडवत अलगद डोकावणारे ऊन्हं-कवडसे आतूनच मोहरून येत तृणपात्यांनी जणू काही धरलेले कोवळे बारसे. मग त्या दिवशी पुन्हा मी... माझ्या आठवणींच्या दिवसांचं गाठोडं उघडून बघितलं तर... काय काय नाही मिळालं त्यात.. कधीतरी आवडीने घालायचे ते लाल-पिवळे, हिरवे-निळे बो.. खूप सारे सोनेरी वर्खाचे नाजूक दागिने अन किनकिनणार्या बांगड्यांचेही पेटारे. शंख-शिंपले जडलेले इवलाले जोडे माझं बालपण दिमाखात मिरवणारे आरसे लावलेले अन जरीकाम केलेले चंदेरी-सोनेरी शरारे... गरारे. कधीतरी डोळा चुकवून पळवलेला आई केसात खोवायची; तो घुंगरांचा आकडा छुमछुम वाजवत घरभर फिरायचे तो तोरड्यांचा सर; किल्ल्यांचा जुडगा. मग त्या दिवशी पुन्हा मी... नदीकिनारी फिरले... मनसोक्त हुंदडले केसातही माळला मोगर्याचा गजरा अन लहानपणी आवडायचं... ते ही खेळले आरश्यात डोकावण्याचा अन झटकन लपण्याचा खेळ न्यारा. रंगबिरंगी खडूंनी... चौकोनही आखले लगोरीही मांडली... टिक्करबिल्लाही खेळले 'एकही उत्तर देता आलं नाही' म्हणून 'बाई' होऊन छोट्या मिनूलाही रागावले. मग त्यादिवशी रात्री मी... बिछान्यावर पडल्या पडल्या स्वतःशीच... एकट्यानंच खुद्कन हसले कुणाला सांगितलं तर खरंही वाटणार नाही असं कसं माझं बालपण मी जगले.
|
Meenu
| |
| Wednesday, April 05, 2006 - 1:34 am: |
| 
|
प्रसाद, सुमति, वैभव सुंदर... रे... कुणी मला रुजवात या शब्दाचा अर्थ सांगेल.. काय?
|
वैभवा,सोहळा सुरेखच... प्रसाद,रस्ता मस्तच रे.. श्रीराम,विडंबन छानच रे. पण जागा चुकलास
|
Meenu
| |
| Wednesday, April 05, 2006 - 2:10 am: |
| 
|
दिधला मी देह | तुजला मानवा | तयाचे तू स्थान | जाण बापा | आत्म्याच्या हिर्याला | देह हे कोंदण | आत्मा हेची धन | जाण बापा | साधन समृद्ध | साधायासी साध्य | परि ना आराध्य | जाण बापा | विटाळला देह | क्रुर दानवांनी | तरी ती पवित्र | जाण बापा | घायाळ देहाला | करी उपचार | आत्म्यासी आधार | प्रेमळ आचार | सतीचे हे वाण | जाण बापा |
|
Sarang23
| |
| Wednesday, April 05, 2006 - 2:20 am: |
| 
|
प्रसाद क्या बात है!
|
निरोप .... दोस्ता तुला आठवतंय का ? आपलं ठरलं होतं ... मार्ग वेगळे व्हायची वेळ आलीच तर काहीही करून एकदा प्रत्यक्ष भेटायचं ... तरीही ... मी पाठमोरा असतानाच आलास तू ? इतकं लाजतात का वेड्या हातात सुरा असेल तर ? चल , निघतो मी आता ... !!!
|
Meenu
| |
| Wednesday, April 05, 2006 - 5:01 am: |
| 
|
वैभव अप्रतिम केवळ अप्रतिम.... कसं थोडक्यात मांडलस गड्या....
|
vaibhav....... .. .. nehamipramanechchaan 
|
Moodi
| |
| Wednesday, April 05, 2006 - 7:40 am: |
| 
|
इथे ही लिंक देत आहे, पाहिजे तर या वेबसाईटला भेट देऊन आपल्या कविता तिथे शक्य असेल तर पोस्ट करा. अर्थात, आधी या साईटचा अनुभव घ्या. छान वाटली अन कविता पण मस्त आहेत. इथल्या कवींचा निदान एक मोठा गृप पण तयार होईल. http://www.amhimarathi.com/kavita/k1.html .
|
Ninavi
| |
| Wednesday, April 05, 2006 - 9:51 am: |
| 
|
वैभव, निरोप सुंदर. मीनू, रुजवात म्हणजे माझ्या माहीतीप्रमाणे दिलजमाई ( विशेषतः भांडणानंतरची), किंवा राग शांत करणं अश्या अर्थी वापरतात. चुभूद्याघ्या.
|
Meenu, रुजुवात करणे हा शब्द-प्रयोग दोन परस्परविरोधी किम्वा भिन्न विधाने करणार्या व्यक्तींना समोरा-समोर आणून खरे-खोटे करणे किम्वा हिशेब जुळवणे, ह्या अर्थाने वापरतात. Vaibhav, मला दुसरीपेक्ष पहिलीच जस्त आवडली. बापू
|
|
|