Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 04, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » चैत्र » काव्यधारा » कविता » Archive through April 04, 2006 « Previous Next »

Niru_kul
Sunday, April 02, 2006 - 1:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, प्रतिक्रिया देण्याइतका मी काही थोर नाही.

मी तर आहे एक वेडा कवी,
शब्दांचे बाण सोडणारा;
नव्या रितींचा उद्धार करताना,
जुन्या कल्पना मोडणारा.

पार्थसारथी........


Jo_s
Sunday, April 02, 2006 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कवि कसा
पारखी हावा
जुनं म्हणजे, बुरसटचं
नवं म्हणजे, वाईटचं
असं काहिही न मानता
उघड्या डोळ्यांनी
मोकळ्या मनानी
चांगलं ते
टिपून घेणारा,
आणि सद्सद्-विवेकानी
विचार करणारा
पारखी. . . . . .

सुधीर


Rashmirathi
Sunday, April 02, 2006 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा एकदा, फक्त माझ्यासाठी........

तू मोहक हसतोस, तेव्हा मी हरखुन जाते;
भोवतालचे जग, अगदी विसरुन जाते;
तुझ्या हास्यासारखेच निर्भेळ प्रेम मला देशील का?
पुन्हा एकदा, फक्त माझ्यासाठी, पुन्हा एकदा हसशील का?

तुझ्या श्वासाचा गंध, मला मुग्ध करतो;
तुझ्या नजरेतला अवखळ भाव, मला निःशब्द करतो;
तुझ्या या स्वप्नील डोळ्यात, तू मला बद्ध करशील का?
पुन्हा एकदा, फक्त माझ्यासाठी, पुन्हा एकदा हसशील का?

तुझी निरागसता, माझ्या मनाला भावते;
तुझी रसिकता, माझ्या ह्रदयाला भुलावते;
तुझ्या स्वभावासारखेच निर्मळ, आयुष्य माझे करशील का?
पुन्हा एकदा, फक्त माझ्यासाठी, पुन्हा एकदा हसशील का?

तुझ्या मिठीत मला, स्वर्ग सापडतो;
तुझ्या सहवासात, भावनांचा आविष्कार घडतो;
तुझ्या या निर्मय जीवनाची, अर्धांगी मला करशील का?
पुन्हा एकदा, फक्त माझ्यासाठी, पुन्हा एकदा हसशील का?

रश्मिरथी..........


Rashmirathi
Sunday, April 02, 2006 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उसळणार्‍या समुद्राला, चंद्र बनून कवटाळणार आहे,
पिसाळलेला वारा, पदराशी बांधणार आहे;
अंधारात वावरणार्‍या, दिशाहीन जीवांना,
मी रश्मिरथी बनून उजळणार आहे.

रश्मिरथी...........

सर्व कवींना आणि कवयित्रींना रश्मिरथीचा प्रणाम....

वैभव, लोपामुद्रा, मीनू, पार्थसारथी,वसुधा,सुनिता,अनिरुद्ध,श्यामली सर्वांच्याच कविता सुंदर. माझ्यासारख्या नवकवयित्रीला तुमच्या सारख्या दिग्गजांसोबत काम करायला मिळतय हे माझं भाग्यच आहे. सर्वांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा. नविन वर्ष सर्वांना सुखाचे, सम्रुद्धीचे, ऐश्वर्याचे, करीनाचे, मल्लिकाचे व बिपाशाचे जावो अशीच मनोकामना.

रश्मिरथी...........


Dha
Sunday, April 02, 2006 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रश्मिरथी,
कविता खुप सुन्दर आहे. नवकवियत्री वाटत नाहिस. आणि आम्ही कसले दिग्गज? निदान मी तरी नाही.
नविन वर्षाच्या शुभेच्छा मात्र :-)

तुलाहि हे वर्ष ज़ोन, सलमान, ह्रितिक चे जाओ, ही ईश्वरचरणी प्रार्थना!:-)


वसुधा


Rashmirathi
Sunday, April 02, 2006 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाखंरु......

भर मध्यान्ही आकाशात, एक पाखंरु उडत होतं;
आपल्या एकाकीपणावर, मनातल्या मनात कुढत होतं;
भर मध्यान्ही आकाशात, एक पाखंरु उडत होतं.

एकटं होतं ते बिचारं, कोणाचीच साथ नव्हती;
डोळ्यात मात्र त्याच्या, एक वेगळीच आस होती;
खडतर परिस्थीतीशी, ते प्राणपणानं लढत होतं,
भर मध्यान्ही आकाशात, एक पाखंरु उडत होतं.

इतर पक्षी त्याला, तुच्छ लेखायचे;
पाखंरु जवळ येऊ लागताच, त्याला दूर रेटायचे;
त्यांच्या अशा वागण्यानं, ते स्वभावानं बुजरं घडत होतं;
भर मध्यान्ही आकाशात, एक पाखंरु उडत होतं.

एके दिवशी त्याच्या आयुष्यात, ती अवतीर्ण झाली,
त्याची निःशब्दता, अचानक दूर झाली;
तिच्याशिवाय त्याचं मन, इतर कुठंही जडत नव्हतं,
भर मध्यान्ही आकाशात, एक पाखंरु उडत होतं.

त्यांच्या दोघांचं आता, छान मेतकुट जमलं होतं,
आपलं घरटं त्यांनी, पळसाच्या झाडावर बांधलं होतं;
वसंतच्या आगमनाबरोबरच, त्यांचं आयुष्यही फुलत होतं,
भर मध्यान्ही आकाशात, एक पाखंरु उडत होतं.

पण दैवाने पुन्हा एकदा, त्याचा घात केला,
पारध्याच्या रुपाने आलेल्या यमाने, त्याच्या पक्षिणीचा पात केला;
त्याच्या डोळ्यादेखत तिचं कलेवर, झाडावरुन पडत होतं,
भर मध्यान्ही आकाशात, एक पाखंरु उडत होतं,
आपल्या एकाकीपणावर, मनातल्या मनात कुढत होतं;
भर मध्यान्ही आकाशात, एक पाखंरु उडत होतं.......


रश्मिरथी......





Kandapohe
Sunday, April 02, 2006 - 11:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहमिचंच>>

शामली, हार्टवर्क रेशमी गाण्यांचे छान संकलन वाटले तुमच्या कविता म्हणजे. :-)

Meenu
Monday, April 03, 2006 - 1:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dha , कांदापोहे.., निनावी, कर्पे, चौकटचा राजा, heartwork सर्वांना धन्यवाद..



Heartwork
Monday, April 03, 2006 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनायक, निनावि, धन्यवाद.
रश्मि, सुन्दर कविता....


Rashmirathi
Monday, April 03, 2006 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक कळी मात्र, उमलायचीच राहून गेली.......

वसंतात आज या, सारी बाग न्हाऊन गेली;
एक कळी मात्र, उमलायचीच राहून गेली.

झंकारली भग्न तार, ह्रदयाची माझ्या;
वेदना त्या जुन्या, पुन्हा सुलगावूनी गेली.

उजळले दीप, सर्वांच्या दारी;
रांगोळी माझ्या घरी, का अशी पुसटून गेली?

पुरविली वस्त्रे द्रौपदीस, लज्जारक्षणार्थ अच्युताने;
चंद्रमौळी नशिबात माझ्या, लक्तरे का राहून गेली?

जाहली त्रुप्त धरती, अळवाच्या बरसातीने;
झोपडी माझीच फक्त, त्या पुरात वाहुन गेली.

एक कळी मात्र, उमलायचीच राहून गेली.......

रश्मिरथी.....


Lopamudraa
Monday, April 03, 2006 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rashmi chaan aahee!!!.. .. .. .. .. ..

Vaibhav_joshi
Monday, April 03, 2006 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मौन वादळे ...

अबोल ही निशा ! अधीर स्पर्शचांदणे
लबाड ओठ व्यस्त अन मूक बोलणे

हळूच घे लपेटूनी मिठीमध्ये मला
हळूच हाती येऊ दे ... हात लाजरा
श्श्श .... हळूच !!
हळूच ! बोलतील ना सलज्ज कंकणे

किती किती निमंत्रणे .. किती पुकारणे
किती किती दुरावणे .. फिरून भेटणे
स्स .... किती ... किती ...
किती दुखावणे तरी किती सुखावणे ...

पुन्हा कधी अशी निशा .. ही नशा अशी
पुन्हा कधी अधीर मौन वादळे अशी
हाय .. पुन्हा कधी !!
पुन्हा कधी हे बोलल्याविनाच बोलणे


Lopamudraa
Monday, April 03, 2006 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sparshchandane........ vaibhav.nehamipramanech.... .. .. .. .. !!!

Ameyadeshpande
Monday, April 03, 2006 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहाहा! वैभव!!! .. ..

Shyamli
Monday, April 03, 2006 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे काय रे वैभवा......
एखादे सुन्दर गीत होईल याचे

सुरेSSSSSSSSख


Ninavi
Monday, April 03, 2006 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव!!!! अरे काय!!! सुंदर!!!

Rashmirathi
Monday, April 03, 2006 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बलात्कार........

फाटकी ही लक्तरे घेऊन, आता मी कुठं जाऊ?
कोणाच्या झोळीत जाऊन, आपलं तोंड लपवू?

अच्युता, केशवा, मिलींदा असा पांचाली सारखा हंबरडा फोडू काय?
पण त्याचा काही उपयोग होणार नाही,
कारण हे काही द्वापारयुग नाही.
एका स्त्री ची विटंबना रोधण्यासाठी देव काही जमिनीवर उतरुन येणार नाही,
उलट वर बसून तोही आपल्या असहाय्यतेवर अश्रु ढाळत असेल......

माझ्यावर धडधडीत अन्याय होत असल्याचे पाहुनही,
एकही 'पुरुष' मदतीला पुढे आला नाही;
तशी अपेक्षा करणेही चुकीचेच होते.
अबलांवर अत्याचारास सिद्धहोण्याखेरीज आजच्या या जगात कोणता पुरुषार्थ तरी उरला आहे काय?
बाकी सारे तर नुसते षंढांसारखे होणारी घटना निमुटपणे पहात होते,
नुसते पहात होते की तेही याचा आस्वाद घेत होते?......

नकोय मला कोणाची सहानूभूती!
मी ठरवलंय, मी जगेन ती स्वतःच्या बळावरच;
होणारी निंदा-नालस्ती मी दुर्लक्षिन अन परिस्थितीवर मात करीन,
जरी नियतीने माझ्या पदरात निखारे बांधले असले तरीही.......

फक्त मला सवय करावी लागेल, खोटी सहानूभूती दाखवणार्‍यांची आणि.....
आणि......... वासनेने खदखदलेल्या नजरांची........


रश्मिरथी.......


Jayavi
Monday, April 03, 2006 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव just too good ! खूप रोमॅंटिक !

Pkarandikar50
Monday, April 03, 2006 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vaibhav,
मस्त मूड पकडलास. एक शन्का, ह्या कवितेचे रोमॅन्टिक हे वर्णन तुला पटते का?
बापू.


Pkarandikar50
Monday, April 03, 2006 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोमॅन्टिसिझम ह्या विषयावरती खूपच लिहीले गेले आहे. एक त्रोटक उतारा देतो आहे.
The last quarter of the 18th century was a time of social and political turbulence, with revolutions in the United States, France, Ireland and elsewhere. In Great Britain, movement for social change and a more inclusive sharing of power was also growing. This was the backdrop against which the Romantic movement in English poetry emerged.

The main poets of this movement were William Blake, William Wordsworth, Samuel Taylor Coleridge, Percy Bysshe Shelley, Lord Byron, and John Keats. The birth of English Romanticism is often dated to the publication in 1798 of Wordsworth and Coleridge's Lyrical Ballads. However, Blake had been publishing since the early 1780s.

In poetry, the Romantic movement emphasised the creative expression of the individual and the need to find and formulate new forms of expression. The Romantics, with the partial exception of Byron, rejected the poetic ideals of the eighteenth century, and each of them returned to Milton for inspiration, though each drew something different from Milton. They also put a good deal of stress on their own originality. However, as has already been noted, many of their themes and attitudes had already begun to appear earlier in the century.



Pkarandikar50
Monday, April 03, 2006 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक चान्गला वेचा
Romanticism:
A movement in art and literature in the eighteenth and nineteenth centuries in revolt against the Neoclassicism of the previous centuries...The German poet Friedrich Schlegel, who is given credit for first using the term romantic to describe literature, defined it as "literature depicting emotional matter in an imaginative form." This is as accurate a general definition as can be accomplished, although Victor Hugo's phrase "liberalism in literature" is also apt. Imagination, emotion, and freedom are certainly the focal points of romanticism. Any list of particular characteristics of the literature of romanticism includes subjectivity and an emphasis on individualism; spontaneity; freedom from rules; solitary life rather than life in society; the beliefs that imagination is superior to reason and devotion to beauty; love of and worship of nature; and fascination with the past, especially the myths and mysticism of the middle ages.
English poets: William Wordsworth, Samuel Taylor Coleridge, Lord Byron, Percy Bysshe Shelley, and John Keats
American poets: Ralph Waldo Emerson, Nathaniel Hawthorne, Edgar Allen Poe, Henry David Thoreau, Herman Melville, Walt Whitman
बापू

Pkarandikar50
Monday, April 03, 2006 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण रोजच्या व्यवहारात रोमान्स हा शब्द प्रणय ह्या अर्थाने वापरतो. हे म्हणजे झाडाला किम्वा डोन्गराला निसर्ग म्हणण्यासारखे झाले. निसर्ग ह्या शब्दाची व्याप्ति केवढीतरी मोठी आहे. त्यात झाड येते, हे खरे पण म्हणून झाड म्हणजे निसर्ग होत नाही, असे मला वाटते. नव-राष्ट्र, नव-समाज घडवण्याच्या, आत्यन्तिक आणि उत्कट ध्येय-भवनेने वेडे होऊन बलिदानास सिद्ध झालेले नव्या मनूचे शिपाई किम्वा क्रान्तिकारक हे सुद्धा रोमॅन्टिक होते. मुझसे मेरे मेहबूब मेरी पहेलीसी मुहब्बत ना मान्ग म्हणणारा शायर फ़ैज़्- हाहि रोमॅन्टिकच म्हणायला हवा नाही का?
बापू करन्दिकर.


Ameyadeshpande
Monday, April 03, 2006 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

romantic पेक्षाही जास्त " मादक " आहे :-) आणि नावातले शब्दही एकदम विरोधाभास असणार्‍या अर्थाचे तरीपण एकदम फ़िट्ट बसणारे आहेत! amazing !!!

Nirav
Tuesday, April 04, 2006 - 2:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव खूप छान...... Please write frequently

Vaibhav_joshi
Tuesday, April 04, 2006 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, अमेय,निनावि,जयावि,बापू निरव .... मनःपूर्वक आभार ...
बापू ... हे रोमान्सपेक्षा passion ह्या थीम वर based होतं ... तुमची माहिती सुंदरच आहे ...

आणि मूड पकडलाय म्हणता आहात तर ही आणखी एक ... त्याच मूड मधली ...





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators