Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 01, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » चैत्र » काव्यधारा » कविता » Archive through April 01, 2006 « Previous Next »

Lopamudraa
Thursday, March 30, 2006 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वार्‍यासोबत शिळ येते,
गातो पक्षी त्याचीच गाणी..
झुळझुळणारे पाणीसुध्दा बोलते त्याचीच वाणी!
वहाता वहाता ढगही दाखवुन जातो त्याचा चेहरा...
हसते फ़ुल खळी पाडुन... सांगते त्याचीच कहाणी,
माझ्या मनातले हसु ओठावर येते,
फ़ांदीवरची मैना मग धारेवर घेते..,
कधी येणार कधी येणार म्हणुन धिंगाणा घालते
हळुच स्पर्शतो तो घमघमाट मोहराचा,
कुणाचा राग कुणाचा लोभ..
सारे जीवनाचे भोग,
सोडुन द्या सारे
अरे...
वसंत आला रे....!!!

नविन वर्षाच्या शुभेच्छा!!!


Shyamli
Thursday, March 30, 2006 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है!
अगदी साजेशी आहे चैत्राच्या सुरवातिला......


Meenu
Thursday, March 30, 2006 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चैत्राची सुरुवात सुंदर लोपा...

Meenu
Thursday, March 30, 2006 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरोप

जाताना एकदाच तुझ्याकडे
डोळे भरून पाहु दे
हात तुझा थोडा वेळ
हाती माझ्या राहु दे
पुढच्या माझ्या प्रवासासाठी
तूला साठवून घेऊ दे
आणी हो,
शेवटचचं तू मला घे मिठीत
शेवटचं एकदा मला मिटून जाऊ दे
शेवटचचं एकदा मला मिटून जाऊ दे


Dha
Thursday, March 30, 2006 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु आणि लोपमुद्रा, वा क्या बात है! दोन्ही कवित छन आहेत.

Meenu
Thursday, March 30, 2006 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसा तु असतोसच माझ्यात नेहमी
पण आज तुझी आठवण येऊन गेली
कमरेभोवती तुझ्या हाताचा विळखा ठेऊन गेली
तसा तु असतोसच माझ्यात नेहमी
पण आज तुझी आठवण येऊन गेली
थरथरणार्‍या ओठांना सिगारेटची चव देऊन गेली
तसा तु असतोसच माझ्यात नेहमी
पण आज तुझी आठवण येऊन गेली
ओठांना माझ्या तुझ्या ओठांची ऊब ठेऊन गेली
तसा तु असतोसच माझ्यात नेहमी
पण आज तुझी आठवण येऊन गेली
तुझ्या नजरेत पुन्हा माझी नजर मिसळून गेली.....
तसा तु असतोसच माझ्यात नेहमी
पण....


Chaukatcha_raja
Thursday, March 30, 2006 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा ! क्या बात है !!

नवीन वर्षाची सुरुवात तर अतिशय बहारदार झाली आहे.
म्हणजेच येणारे पूर्ण वर्ष हे असेच अनेक उत्तमोत्तम काव्य-साहित्याने भरलेले-भारलेले असणार हे नक्की....


संपुर्ण मायबोली परिवाराला गुढिपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

चौकटचा राजा

Meenu
Friday, March 31, 2006 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डाव

आठवशील का तू कधी
पुन्हा या वेडीला
उद्या जेव्हा नसेन मी
ईथे तुझ्या जोडीला
स्मरशील का माझ्यातल्या
घासाच्या त्या गोडीला
आठवशील का कधी
होते आपले आंगण एक
आंगणामधल्या आपल्या त्या,
हास्याच्या लडीला
आठवशील का बसलो एकदा
लावुन मांडी मांडीला
आठवशील का मीच एक
होते तुझ्या तोडीला
जरी आपला डाव त्याने
मांडुन आज मोडीला


Meenu
Friday, March 31, 2006 - 1:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंत

मला माणुस मेल्याचा वास येतोय
माझ्यातलच कुणी गेल्याचा भास होतोय...
तशी माझ्यातली ती अल्लड, अवखळ, बडबडी पोर
नाहीशी झालीये खरी खूप दिवसांपासून
तीच ती जीला प्रेमाची तहान होती
गेली बिचारी भरल्या डोळयांनी
कोरड्या ओठांनी...
अरेरे!! फार फार वाईट झालं
अजुन काय म्हणणार?
मी आता फक्त पुढच्या तयारीला लागणार
तयारीला लागणार.


Kandapohe
Friday, March 31, 2006 - 3:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपमुद्रा, मीनू सहज सुंदर!! :-)

Lopamudraa
Friday, March 31, 2006 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोकळी

आताशा तु फ़िरकत नाहीस माझ्या घराकडे,
मनानेही अन तनानेही!

माझे मन मात्र तिथेच
अडकले आहे अजुन त्या डोळ्यात...!
कसे अडकले त्या जाळ्यात?
अन गुरफ़टत गेले, गुरफ़टत गेले..
नंतर लक्षात आले मी पुरती जाय्बंदी झालेय!
मग काय हलता येइना, चालता येइना..
जखडले अशी होते,
जगणे जागच्या जागी खिळले होते,

जीवाच्या आकांताने धडपड केली..
नि सगळे पाश तोडुन मोकळी झाले!!!


Niru_kul
Friday, March 31, 2006 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदाच येऊन भेट........

फुटलेल्या माझ्या काळजाचे, तुकडे येऊन समेट;
एकदाच फक्त तू, मला एकदाच येऊन भेट.

काळ सरला, ऋतु बदलले,
तरी मन तुझ्या आठवणींचा माग काही सोडत नाही;
वारे बदलले,दिशा संपल्या,
पण तुझ्याशिवाय या मनाचा, ठाव कुठंही जडत नाही.

निस्तेज ह्या ह्रदयाला,
तुझ्या आठवांचा सुर्य प्रकाश देतो;
निष्पर्ण ह्या जीवनाला,
तुझ्या येण्याच्या आशेने पालवी देतो.

तुला शपथ आहे माझ्या प्रत्येक श्वासाची;
घशात अडकलेल्या प्रत्येक घासाची;
वादळ हो, वारा हो, पाऊस बनून धाव;
एकदाच माझ्या ह्रदयावर घाल, मिलनाचा घाव;
आणि मग, फुटलेल्या माझ्या काळजाचे, तुकडे येऊन समेट;
एकदाच फक्त तू, मला एकदाच येऊन भेट.

पार्थसारथी........



Vaibhav_joshi
Friday, March 31, 2006 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जजमेंट ....

मला मान्य आहे ...
मान्यच आहे मी चुकलोय सखे
अन असं अचानक निघून जाऊन
तू दिलेली
शिक्षाही मान्य आहे ...
गुन्हेगाराला चॉईस असतो कुठे नाहीतरी ?
पण इतक भयानक कुठे होता गुन्हा ....
की फाशी आरोपीला ...
अन
जन्मठेप न्यायाधीशाला ?


Mmkarpe
Friday, March 31, 2006 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कविता...

हृदयातिल भावनांच्या
विशाल तरल सागरावरील
धुंद संवेदनांच्या
अगणित लाटांना
उतरवू पाहते कविता
कागदावर...

पण...!
कागदावर उतरण्याआधिच
किनारा गाठतात लाटा
अन
कागदावर उतरतो
त्या लाटांवरचा
उरलेला फेस फक्त...

....


Mmkarpe
Friday, March 31, 2006 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु, लोप्मुद्रा नविन वर्षाची मस्तच सुरुवात केलित.
वैभव! आम्ही काय जजमेन्ट करावं?
नेहमीप्रमानेच....


Ninavi
Friday, March 31, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! हे वर्षं मुक्तछंदाचं की काय?
Keep it up लोपा, मीनू.
वैभव, जजमेंट अप्रतीम.. नेहेमीप्रमाणेच!
कर्पे, सुंदर कल्पना आहे.

कोणीतरी काहीतरी आनंदी लिहा रे! असे उसासताय काय सगळे?


पार्थसारथी, तुम्ही प्रतिक्रिया हक्काने मागता, तश्या आवर्जून देत नाही वाटतं?



Dha
Friday, March 31, 2006 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी कालचीच गोष्ट्-
अश्रू दाटुन आले डोळ्यात,वाटलं मी एकटीच आहे आता,
पण,तितक्यात कुठुनसा तुझा आवाज आला,
"एकटी कुठंयस,मी आहे ना!" असं म्हणालास.
आणि मग माझ्याच मनात उभा राहिलास
माझं बळ बनून...
मग वाटलं मी एकटी कुठंय, तू आहेस ना!
कधी जलधार होऊन,चिंब भिजवतोस,
तर कधी, सोनेरी किरणांनी मला मोहवतोस,
मी एकटी कुठंय तू आहेस ना!
माझ्या प्रत्येक श्वासात,
हृदयाच्या कणांकणांत सामावलेला.
जळी-स्थळी,काष्ठी-पाषाणी सगळीकडेच तू आहेस,
मग मी एकटी कुठंय?


Sunita_zade
Saturday, April 01, 2006 - 12:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,
छान आहे कविता...


Sunita_zade
Saturday, April 01, 2006 - 1:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाई आहे म्हणून...

आम्हा भावंडांच्या भांडणाचा समारोप
नेहमी आईच्या या वाक्याने व्हायचा
'बाई आपण थोडं नमत घ्यावं'
का? तर उत्तरही ठरलेलं.
'बाई आहेस म्हणून...'
कुठलीही सुनावणी न होता
असे अनेक विषय
अशाप्रकारे संपवले जायचे

अशी स्वतःला बेदखल करण्याची सवय लावून
तिने तिच्या आणि माझ्याही पदरात
काय पाडून घेतलं..
फक्त बेमानी

अगदी बुडापासून...
शेंड्यापर्यन्त करूनही
स्वतःसाठी काय
तर काहीच नसल्याचं समाधान

हे मानण्याइतकं मोठेपणही
अंगी बाणवायला हवं होतं
म्हणजे असं सतत बेदखल होण्याचं
दुःख जाणवलं नसतं

आज इतक्या वर्षांच्या अनुभवांवरून
एक लक्षात येतं
जर स्वतःशी निखळ इमानदारी
करायची तर...

कधीतरी दुसर्‍याशी
बेमानी
करावीच लागते
पटते का पहा बाई.


Heartwork
Saturday, April 01, 2006 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व मायबोलिकरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
लोपा, मिनु, वैभव, निरज, वसुधा, सुनिता सर्वच कविता अतिशय सुन्दर


Heartwork
Saturday, April 01, 2006 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहमिचंच....

मी गेल्यावर तुझं येणं
नेहमिचंच झालंय
तुझी चाहुल मी घेणं
नेहमिचंच झालय

देणार काय गं
वादळाला तु आता
तरी माझं मागणं
नेहमिचंच झालंय

देणार नाहि फुले मि
तुला माहित झालय ना?
तरी तुझं कळ्या आणणं
नेहमिचच झालय

हात तुझा हातात
श्वास तुझा श्वासात..
खोटी स्वप्नं पहाणं
नेहमिचंच झालय

नसलेल्या जखमांचे
घाव कसे दाखवु
तुझं चंदन आणणं
नेहमिचच झालय

चुकले बघ आज
शब्दही जरासे
माझं चुकणं तर
नेहमिचंच झालय


Shyamli
Saturday, April 01, 2006 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी नसतानाच तुझ येण
मुद्दामच असत
उगाच मला शोधण
नेहमिचच झालय

वादळ होउन तरी
सावर म्हणतिये पण
तुझ झुळुक होउनच राहणं
नेहमिचच झालय

कधितरी फुलतिल म्हणुन
कळ्या आणण.......
आणि तश्याच परत नेण
नेहमिचच झालय

अरे स्वप्न बघणच की
माझ्या हातात फक्त
ते सुधा नको म्हणतोस
नेहमिचच झालय

चुकलास बघ परत
शब्दही चुकलेत जरा
चुकण तुझ आणि
माझ समजुन घेण
नेहमिचच झालय

अनिरुध्द तुमच्या कवितेला पुढच्या ओळि सुचल्यात....
प्रयत्न करतिये
CBDG =चु.भु.द्या.घ्या



Heartwork
Saturday, April 01, 2006 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामलि चांगला सफ़ल प्रयत्न्न!!

Athak
Saturday, April 01, 2006 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

CBDG म्हणजे C चुकल B बिकल तर D दिवे G घेईल :-)
कविता मात्र झ्याक बर का


Ninavi
Saturday, April 01, 2006 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिरुद्ध, छान आहे कविता.
अथक





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators