Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
विडंबन

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » विनोदी साहित्य » विडंबन « Previous Next »

Cool
Wednesday, June 07, 2006 - 2:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



कवितांच्या विभागात बापुंनी लिहिलेल्या
कदाचीत या कवितेवरुन प्रेरणा घेउन, हा एक छोटासा प्रयत्न

बापु दिवे घ्यालच...

सासर कडच्या मंडळींना वैतागलेल्या नवर्‍याचं मनोगत...

लक्षात नसेल राहीलं तुझ्या कदाचीत

तु पाळलेला ताईचा नवरा
घेउन आला होता, 'पहिल्या धारेची'
'लवंग'ही चघळले तरी मुखाला
'नवटाकेचा' गन्ध येत होता

लक्षात नसेल राहीलं तुझ्या कदाचीत

गल्लिबोळातुन पोरी सोरींमागे
शिट्ट्या फुंकीत तुझा भाउ भटकला
उचलला पोलिसांनी जेंव्हा
मामला मीच निस्तरला होता

लक्षात नसेल राहीलं तुझ्या कदाचीत

मला टाकुन, तरीही तु पळालीस
मी काय करील हे बघण्यासाठी वळालीस
'साली आधी घरवाली' चा अर्थ
तेंव्हाच मजला उमगला होता

कुल

(केवळ निरिक्षणातुनच )




Rupali_rahul
Wednesday, June 07, 2006 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच भारी आणि बारिक निरिक्षण कुल...

Indradhanushya
Wednesday, June 07, 2006 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदम कुल रे भो... तुझ्या निरिक्षणाची दाद दिली पाहिजे :-)

Chinnu
Wednesday, June 07, 2006 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय हो कुल? फ़क्त निरिक्षणातुनच इतके छान तर मग अजुन पुढे येणार ते काय? :-)
अजुन येवु द्या!


Limbutimbu
Friday, June 09, 2006 - 11:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगी ज्यास कोणी नाही
त्यास देव आहे च्या चालीवर....

हितगुजी ज्यांस कोणी नाही
त्यास ऍडमिन आहे
निराधार आयडिन्चा
तोच भार वाहे.. तोच भार वाहे!
DDD





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators