Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
चित्रकविता

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » काव्यधारा » चित्रकविता « Previous Next »

Menikhil
Saturday, May 06, 2006 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Jo_s
Saturday, May 06, 2006 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा बघितलं जाता जाता
सावळा गोंधळ चालू होता
शब्द सारे आम्ही आपण
पळवून लावले मारुन गोफ्ण

मी माझा मी माझी
म्हणणारे शहाणे सारे होते
भक्त सारे अद्वैताचे
काहो ते वेडे होते?

कळत का नाही या सार्‍याना
शेवटी सारेच होतात वजा
रहात नाहीत म्हणायलाही
मी माझा मी माझा

सुधीर


Moodi
Saturday, May 06, 2006 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जो एस खुपच छान कविता केलीत हो. मी पणाच तर विसरता येत नाही माणसांना.

Lopamudraa
Saturday, May 06, 2006 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माणुस....

फ़िरला माझा अश्व
घेउन पांढरे निशाण
उगवत्या नारायणापुढे..
रणांगणावर...........

माझी मलाच लाज वाटली
त्या पायाखालच्या लाल रंगाची,
शोधुन पाहिले सगळीकडे..
मी मला...

स्वतापासुन पळतांना..
किती धाप लागली...
या जीवाला.....
आक्रंदन ऐकले नाही
मीच माझे...
शेवटी पराभव पत्करण्याशिवाय...
गत्यंतरच उरले नाही...
दगडाच्या मुर्तीतुन..
देव कधी साकारला नाही...
देव कधी आकारला नाही......


Dineshvs
Saturday, May 06, 2006 - 10:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, विषय छान, पण शेवटच्या तीन ओळींचा सांधा जुळला नाही.

Jayavi
Sunday, May 07, 2006 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर,सुरेख !!
लोपा.... मला पण शेवट नाही कळला.


Lopamudraa
Sunday, May 07, 2006 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, जयावि...
माणसाची दोन मने... एक त्याला जीवनाची लढाइ जिंकायला उद्युक्त करते.. दुसरे जीवानात येनार्‍या संकटांनी हार मानुन पराभव पत्करते... हताश होते... आणि मग त्याची त्यालाच लाज वाटते... या पराभवाची पळपुटेपणाची.... ते मान अपमानाला.. कलांकाला घाबरते ते कबुल करते कि त्याच्यात इतकी सहन शक्ति नाही आणि त्यामुळे टाकिचे घाव सोसुन जे दगडाला देवपण येते... ते माणसाला मिळत नाही...


Dineshvs
Sunday, May 07, 2006 - 10:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह, असे आहे का ? पण मधे आणखी एखादी ओळ हवी होती.

Ganesh_kulkarni
Monday, May 08, 2006 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I need some help for How to use MyBoli.com
i want to post my poems.
so please help me.
Maza Email Id
Kulkarni2005_ganesh@rediffmail.com

Jo_s
Tuesday, May 09, 2006 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

moodi, jayavi thanks
Sudhir

Kandapohe
Wednesday, May 10, 2006 - 10:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हात तुझा हातात, धुंद ही हवा! :-)
hat

Gharuanna
Thursday, May 18, 2006 - 8:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिमिटेड स्वातन्त्र्यातही एक वेगळ सूख आहे
हात तुझा हाती असता
पारतन्त्र्यही झूट आहे.
दूर चालू मार्गवरती असेल जर तुझी साथ
मग नही पर्वा जरी
सगे-सोयरे साथी सोडुन जाती साथ



Maudee
Friday, May 19, 2006 - 2:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरूअण्णा छनच.......
"लिमिटेद स्वातन्त्र्य":-)


Vaibhavingavale
Friday, May 19, 2006 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोबत घेउन सोबतीची
तुम्ही सोबत्-सोबतच रहा
सोबत सोडुन नका कधि सोबतीची
सावलीतही स्वतःच्या तुम्ही
सोबतीलाच पहा.
नसेल कोनी सोबतीला
तर आपले मनच आहे सोबती
हात देउन सोबतीचा
अवघ्या जगाचे व्हा सोबती.


Kmayuresh2002
Friday, May 19, 2006 - 10:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संगीत तुझिया मनीचे
गीत माझिया ओठी
सप्तसूरांनी चिंब नाहली
अशी आपुली प्रिती

सोबत सोनपावलांची
घेऊनी हाती असा हा हात
शब्दांपलीकडले नाते अपुले
रंगली रंगात आपुली साथ

येतील वळणे जिवनी या
करू पाहतील वाताहात
सुटु नये गाठ जन्मांतरीची
जरी होई वज्रापात

सावल्याही आता अपुल्या
करीती एकमेका साथ
सोबत घेऊनी तयांना
चालु प्रेमाची वहिवाट



Pkarandikar50
Saturday, May 20, 2006 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोबत

सखे तुझ्यासन्गे तुडवली किती वाट
वाटले, वाट नव्हे ही, हा तर ताटवा
थोडे रेंगाळले जरी पाय, नव्हे हा थकवा
घेऊ या का क्षणभराचा एक विसावा?
असाच हात आश्वस्त हातात बंदिस्त रहावा
सोबतीच्या उबेंत शिरावा सावलीचा गारवा.

मिट्ट चादरीत लपेटून खुशाल
भागलेल्या जनांनी निवांत व्हावे
पिठूर लोण्याचा करत शिडकावा
त्याने मात्र पहारा चोख द्यावा.

तुज्या अर्ध्या डोळ्यात धिटाइने डोकवावे
माझे प्रतिबिंब न्याहाळत सावकाशीने मावळावे
किंचित विलग अधर, अधीर अबोल व्हावे
नि:स्तब्ध हुंकार तृप्त पापण्यांवर घुमावे

आणखी थोडी नागमोडी वळणे, आड बाकी
कोवळ्या उन्हांनी अशीच अलगद उलगडावी
असले काटे-कुटे अथवा निर्लज्ज खळगे
पायताणावरचे प्रेमळ पान्ढूर असेच उजळावे.

बापू









Moodi
Sunday, May 21, 2006 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा बापू ये हुई ना बात. सुरेख हो.

Pkarandikar50
Sunday, May 21, 2006 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moodi,
कवितेला खुली दाद मिळाली, धन्यवाद.
बापू.


Kandapohe
Sunday, May 21, 2006 - 10:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घारू, वैभवी, मयूर, बापू सुरेख!

हे चित्र एका झू मधले आहे. त्या अनुशंगाने काही लिहीता आले तर मस्त वाटेल. सायबेरीया मधे नैसर्गीक वातावरणात न राहता इथे झू मधे असूनही संगत कायम आहे.
:-)

Pkarandikar50
Monday, May 22, 2006 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कान्दापोहे, मनापासून धन्यवाद.
बापू.


Mrinmayee
Monday, May 22, 2006 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास जमल्यात सगळ्यांच्या कविता!
चार ओळी माझ्याही......
"दूर सख्या घरदार आपुले
तुडवीत आलो हिमभरली वाट.."
"साथीला तु सखये असता
मांडु नव्याने सारीपाट"


Lopamudraa
Monday, May 22, 2006 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaibhav2, mayuresh chaan aahe, mrinmayii tujhii charoli sudhdaa...!!!
baapu tar prashnach naahi.mastach..... baryaach divasaani...aalaat..!!!

Vaibhav_joshi
Tuesday, May 23, 2006 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा ... इथेही सुंदर संमेलन भरलंय की ... वा !!!

नमस्कार बापू ... इकडे कधी आलात ? मी तुम्हाला शोधत फिरतोय सगळीकडे ...

वैभव ... मेल ला उत्तर द्यायचं राहिलंय रे ... पण देइन नक्की ....


Vaibhavingavale
Tuesday, May 23, 2006 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही हरकत नाही रे वैभवा पन जरुर मेल कर




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators