|
MOD साहेंबाच्या विनंतिस मान देउन !!!! आपल्याकडे जसा गुढिपाडवा मार्च महिन्या अखेरिस (चैत्र महिन्याच्या पहिल्यादिवशी) नविन वर्ष म्हनून साजरे करतात तसेच,इराण मधे नौरोज़ किंवा नौरूज़ म्हनजेच नविन वर्षाच्या आगमनाप्रिथ्यर्थ ९ दिवस फ़ारसि लोक एक उत्सव म्हनून साजरा करतात. हे ९ दिवस म्हनजे ह्या लोकांसाठि उत्साह आणि आनंदाचि एक पर्वनीच असतात. साधारणत्: मार्च महिन्याच्या अखेरिस सुरु होणारा हा सोहळा एप्रिल महिन्याच्या सुरुवातिपर्यंत चालतो.प्रत्येक घरात एक विशिष्ट प्रकारचि सजावट करण्यात येते."स" या अक्शराने सुरु होणारया सात वस्तु मुख्यत्: लाकडी टेबलावर सजवन्यात येतात.त्या वस्तु फक्त निसर्गाकडुन प्राप्त झालेल्या हव्यात... वस्तु पुढिल प्रमाणे.. १. सब्ज. (Green Plant) २.सोमक (Powder of Cherry) ३. सेरके (Vinegar) ४.सीर. (Garlic) ५. सीब. (Apple) ६.सेंन्जेद (Red Berrys) ७.समान्यु (Wheat Flour) ह्या वस्तु व्यतिरिक्त अंडे,नाणी आणी इतर वस्तुहि सजावटि करता ठेवतात. pls see attached picture at the end for this arrangement हि सजावट पाहन्याजोगि असते. ह्या ९ दिवासात सगळि मंडळी आपापल्या नातेवाइकांना जाउन भेट्तात, gifts चि देवाण घेवाण होते. ह्या ९ दिवसात सातवा दिवस खुप महत्वाचा असतो. घरचि सर्व मंडळी त्या त्या घरातिल व्रुद्ध व्यक्तिंना Presents देतात,त्याना घराबाहेर फिरायला नेतात आणी जर का व्रुद्ध मंड्ळी परगावि राहत असतिल तर त्याना सातव्या दिवशि भेट देतात. ह्या ९ दिवसात लहान मुलांचि चंगळ असते.फटाके, Dryfruits आणी Sweets ह्याचि अगदि लयलुट असते. ९ व्या आणी शेवटच्या दिवशि घरातिल लहान मोठि मंडळि ही बागेत किंवा शहराबाहेर छोटाशि PICNIC करतात. आपल्याकडे असणारया दिवाळि,गुढिपाडवा अश्या उत्सवांचि आठवण करुन देनार हासोहळा फ़ारशि लोकांचे निसर्गाबद्द्ल असलेले आकर्षण,प्रेम आणि व्रुद्ध लोकांबद्दल असलेला आदर दाखवुन जातो.... क्रमश्: 
|
MOD साहेब pls ते HEADING मराठित कसे करायचे सांगाल का !!!
|
छानच लिहिलय! कधी ऐकले नव्हते याबद्दल. अंकुश, आणखी तिथले अनुभव लिहा जरूर.
|
Moodi
| |
| Sunday, March 26, 2006 - 11:02 am: |
| 
|
अंकुश छान ओळख करुन दिलीस इराणी संस्कृतीशी. फोटो तर अतिशय सुरेख आहे. आता उत्तरार्ध लिही बघु. अन वृद्ध असे लिही vRuddha . 
|
Dineshvs
| |
| Sunday, March 26, 2006 - 8:31 pm: |
| 
|
या पर्शियन भागातुन आलेले पारसी पण नवरोज, साजरा करतात, पण बाकि डिटेल्स माहित नव्हते. तसा ईराण निसर्गरम्य भाग आहे. फळफळावळ भरपुर आहे.
|
धन्यवाद मैत्रेयी,मुडी तुझ्या सुचनांसाठि Thanks ,दिनेशजी आपण बरोबर ऐकलयत,मुडी उत्तरार्ध इतक्यात नाही.बहुतेक अजुन ३एक पोस्ट करीन म्हणतोय.(वृद्ध-ज़मल्- thanks ). दिनेशजी फळफळावळ बद्द्लचि माहिती लिहिन नक्कि.
|
Dineshvs
| |
| Monday, March 27, 2006 - 10:33 am: |
| 
|
ईरानचा एक भाग किश आयलंड आहे. दुबईहुन तिथे २० मिनिटात जाता येते. दुबईहुन एक्झिट हवे असेल तर तिथे जाऊन येता येते. ईरानमधे किवि फ़ळे पण होतात. सुका मेवा तर असतोच. मस्कतमधील एका मराठी माणसाने ईरानी बायको केली होती, ती अगदी साडी वैगरे नेसुन आमच्या कार्यक्रमाना यायची. अंकुश आता तिथले वर्णन तुझ्याकडुन वाचायची ईच्छा आहे.
|
Ninavi
| |
| Monday, March 27, 2006 - 11:06 am: |
| 
|
अंकुश, छान माहिती मिळाली. धन्यवाद. निसर्गाशी जवळीक सगळ्याच प्राचीन संस्कुतींमधल्या पारंपारिक सणवारांत दिसून येते. आपल्याकडे नाही का केळीचे खांब, पानं, आंब्याचा टहाळा, धान्यांच्या लोंब्या, झेंडूचं तोरण, आपट्याची पानं, विड्याची पानं, सोळा प्रकारची पत्री, नारळ आणि इतरही फळं फुलं आपल्या सगळ्याच सणवारांचा किती अविभाज्य भाग आहेत?
|
Abolik
| |
| Monday, March 27, 2006 - 11:07 am: |
| 
|
अरे वा अंकुश, इराणविषै फ़ार माहिति नव्हति कधि. except बुश आणि इराण न्युक्लियर matters आता तुज़्याकडुन होउंदेत इराणची ओळख! छान लिहिलयस. पुढचे येउदे लौकर....
|
इराणी मुली खुप सुंदर असतात माझी एक मैत्रिण आहे ना ही वरिल संस्कृती आपाल्या नवरात्री Style वाटली जवळपास प्रत्येक धर्मात साध्र्म्य असतेच असे वाटते.
|
Mahaguru
| |
| Monday, March 27, 2006 - 3:43 pm: |
| 
|
अंकुश, सुंदर माहीती सांगितलीत. माझ्या बरोबर काम करणारा पण इराणीयन आहे. त्यानेही मला ही सगळी माहीती दिली होति. त्याच्या घरातला ७-S चा फोटो

|
अंकुश, पण हे 'स' चे काय महत्व आहे काही माहिती आहे का?
|
|
|