Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 24, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » काव्यधारा » काहीच्या काही कविता » Archive through March 24, 2006 « Previous Next »

Mavla
Saturday, March 04, 2006 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



शापित मी शापित

सुख किती दुख: किती
ती माझिच सावली होती
शोधली जिला कणाकणात
ती माझ्या काळजाच्याच कुपित...
शापित मी शापित

वेडावलो किती वहावलो किती
आजन्म पळालो रिकाम्याच हाती
शोधन्यास जिला वेचला जन्म
ती कस्तुरि माझ्याच बेंबीत...
शापित मी शापित
शापित मी शापित

मावळा


Vaishali_hinge
Tuesday, March 07, 2006 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी खेड्यात काही स्रीया बघितल्या, स्वाभिमानाने निडरपणे जगणार्‍या, त्यांच्यासाठी
त्यांच्यावर.................

जाता जाता

तु कसा, तु कसा
कायम कोपर्‍यात फ़ुगलेला जसा,
तुला सरळ करीन अशी देतोस धमकी,
पण वाकड्यात शिरायची सवय तर तुझी!!

मी सरळच होती,
सरळच आहे,सरळच राहीन,
माझी उगवलेली कुस नी
मी कस जगायच ते पाहीन!!

कोरड्या भाकरीला पाणी लावुन खाइन,
पण तुझ्या नरकातुन दुर जाइन!!

तु म्हणतोस जाउन जाउन कुठे जाशील?
शेवटी पाय माझ्या संसाराच्या खोड्यात
अन तुझी जागा माझ्या जोड्यात!

अरे वेड्या स्री ही क्षणाची पत्नी
अनंतकाळची असते माता,
संसाराच्या खोड्यातुन
मी मोकळी मोकळी आता!

तुला घालीन लाथा,
जर जास्त केल्यास बाता........जाता जाता....!!!


Chinnu
Tuesday, March 07, 2006 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nice one vaishali.. मी कात टाकलीची आठवण झाली..

Dhondopant
Wednesday, March 08, 2006 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतुल...
तु कुट आहेस?
तुला कवाचा शोधतोय गड्या...
तु कुटच दीसत नाहीस
तु कुट आहेस आतुल तु कुट आहेस?

तुला येष्टी ठ्यांडवर हुडकल..
ठेसनात हुडकल...
थेटरात हुडकल...
तु गावत न्हाईस आतुल
अतुल.......
तु कुट हायेस?

तु का रागावलास आतुल?
का रागावलास?
तु घरी परत ये आतुल sss ...
तुला कुनि रागायच न्हाई...
तुला कुनि गागायच न्हाई...
तु परत ये आतुल माज्या आतल्या
तु परत ये!!

तु गेलास जीव लागना
थहान लागना s अन भुक लागना...
आतल्या ss जीव लागना...
तुला बिड्या ओढायची सवय..!
मी न्हाई रागावणार..
घे या बिड्या... ओढ..!!
आतुल... तु कुट हायेस आतुल?

तुला कधीमधी लागते रात्री
मी न्हाई रागावणार..!
तु पिवुन पड गटारीत
त्या घरासमोरच्या गटारीत पड..
गावातल्या पड..
घे ही बाटली.. पी!!
पण आतल्या परत ये

आतल्या.. तुला आजुनबी काई सवयी...
आसतील..!! न्हाई म्हनत न्हाई मी..
तु जा तमाशाला
हे घे तिकीट.. आतल्या
पन म्हनुन का यवड लांब जायाच?
आतल्या... तु कुट ग्येलास?
आतल्या..!!

आतल्या तुज्यासाठी कीती जायराती दील्या..
उर्दुत दील्या..
हींदीत दील्या
म्हराटीत बी दील्या..
पर आतल्या काई उपेग न्हाई झाला
आतल्या... आतुल

टे.व्ही वर तुज चित्तर दाकीवल
म्हनल.. " आपन याना पायलत का "
पर काई प्रीतीसाद... न्हाई आला
तु ओ म्हन आतल्या...
एक पेटी तयार ठेवतो... ऐश कर
पन परत ये आतल्या.. परत ये!!

आतल्या आता मी ठरवलय
कांपुटरवर तुला हुडकायच
हुडकुनच काडायच...
म्हनुन मी एक बीबी उगाडलाय
त्या मायबोलीवर.. तुज्याच नावाचा
looking for मदी

तु बी लई नाठाळ हायेस
थित बी बगितल
तुज्यासारकीच येत्यात
काय बी लिवत्यात... भांडत्यात
म्हनल.. हीत नक्की भ्येटनार
आतल्या..

म्या कदी चुकत न्हाई आतल्या
म्या कदी चुकत न्हाई
आमीबी ह्येच केलय आतल्या
लई काय काय वाचलय

आतल्या.. ती मायबोलीची साईट उगाडली म्या
की काय दाकवतय ठाव हाय?
दाकवतय " आतल्यासहीत मानुस "

ह्यो मानुस कोन हाय आतल्या? त्यो कोन हाय?
मायबोलीवर त्यो धुडगुस घालतोय आतल्या
त्या माणसान तुला नादावलय आतल्या
त्यो माणुस बरुबर न्हाई आतल्या
त्यो येंधळा हाये.. बरुबर न्हाई त्यो...

त्यो तुला गुतवल... गुतु नको
त्यो तुला फीतवल... फीतु नको
तु आतल्या परत ये...परत ये
वाटल त माणसाला बी घिवुन ये...

मग आपन कारेक्रम करु
" माणसासहीत आतल्या "
पन आतुल तु परत ये...
तुला हे शो. ना. हो.

शी यु सुन
लगिन करुन घेतल आसल तर...
शी यु सुनबरोबर.

तुजा बा.

ता. क. : आल्यावर तुला कुनि बी काई बी म्हन्नार न्हाई. तुला एक कांपुटर घिवुन देतो. पी तुला काय आवडल त्ये आनि मायबोलीवर जावुन तु काईबी लिवत बस मग. पन परत ये.



Moderator_2
Wednesday, March 15, 2006 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे स्वता: केलेल्या मराठी कविता अपेक्षीत आहेत. बाकीच्या कविता काढुन टाकल्या जातिल. लवविन तुझी हिंदी कविता काढुन टाकली आहे.

Devdattag
Thursday, March 16, 2006 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता पानगळ सुरू झालिये
गेला वर्षा गेला वसंत
गेलेते बहराचे दिवस
आता पानगळ सुरू झालिये

तो फुलोरा तो मोहोर
ती हिरवीगर्द झाडी
गेले ते मोहक रूप
आता पानगळ सुरू झालिये

तो श्रांत वाटसरू
तो तृप्त भिक्षुक
गेले ते सगळे लाभार्थी
आता पानगळ सुरू झालिये

गेल्या त्या चिमुकल्या खारी
गेली उडून ती पाखरे
आता उरली रिक्त घरटि
आता पानगळ सुरू झालिये


Indradhanushya
Thursday, March 16, 2006 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कविताच ती...
वळणा वळणावर वाट पाहणारी
गर्द झाडीत वाट हरवणारी

कविताच ना ती...
आरसपाण्यात स्वतःला न्ह्याहाळणारी
कविच्या मनातून डोकावणारी

अरे हो.. कविताच ती
ग्रिष्मात वसंत खुलवणारी
चिखलातल्या कमळात फ़ुलणारी

पण ही कविता कोण...
मलाच माझ्यापासून दूर न्हेणारी
उध्वस्त डोळ्यातून पाघळणारी

ती प्रिय कविता...
गुलाबी गालात हसणारी
हसता हसता रडवणारी

Draj


Mmkarpe
Sunday, March 19, 2006 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सदुपयोग.....

मित्राने रिकमेंड केला हा पेपर फार चांगला
खिशाचा विचार न करता मीही विकत घेतला.
दुर्मुखलेल्या पोलिसांनी पकडलेला हसरा'डॉन'
दिमाखात सजवित होता पहिले पान.
पक्षांतर, घोटाळे, गुन्हेगारांशी नातीगोती
लक्षवेधक होत्या नेतेमंडळीच्या उचापती
बलात्कारचा दोषी बडा उद्योगपती
पानपानभर त्याच्या वकिलांच्या मुलाखती
पेज ३ वर होती रंगीबेरंगी दाटी
पोजमध्ये उभे होते'सो कॉल्ड सेलिब्रिटी'
न राहुन मग उलगडले संपादकीय पान
लागे बांधे असनारांचे केले होते गुनगाण.
शेतीच्या अर्थकारणावर लिहित होते प्रभ्रूती
ज्यांनी बापजन्मात पाहिली नव्हती शेती.
वैतागुन उघडले खेळाचे पान शेवटला
त्यातही होता भारत पाकिस्तानकडुन हरला.
घरी पोहचल्या पोहचल्या दिला सौ. ना वाचायला
तिने वाचन्याआधीच त्यावर पोराला बसवला
पाहुन मीही जोरदार सोडला उसासा
म्हटलं .'चला! खर्चाचा काही तरी सदुपयोग झाला.'


Champak
Monday, March 20, 2006 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ha ha ha ha :-)

Milindaa
Monday, March 20, 2006 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खि खि खि करपे

Kalandar77
Monday, March 20, 2006 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

*LOL* karpe!

Storvi
Monday, March 20, 2006 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घ्या करपे! एवढी मोठ्ठी सुरेख कविता लिहिलीत खरी पण काहीही म्हणा पंचलाईन important कसे? केडी मिलिंदा आणि चंपक दिवे घ्या रे :-)

Gs1
Tuesday, March 21, 2006 - 12:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा करपे, मस्त कविता...

Mmkarpe
Tuesday, March 21, 2006 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद

Sarang23
Tuesday, March 21, 2006 - 11:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा क्या बात है कर्पे! जियो!!!

Charu_ag
Wednesday, March 22, 2006 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

करपे, मस्त आहे कविता.

Moodi
Wednesday, March 22, 2006 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्पे झकास कविता आहे हो, मार्मीक!!

अन तुमच्यावर कुणी रागवलेले नाहीये, नगरला जा बघु.


Vaibhav_joshi
Thursday, March 23, 2006 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्पे , मी म्हटलं होतं ना तुम्ही निर्भीड सत्य मांडायला कचरत नाही ? फारच मनावर घेतलं की काय ?

Vaibhav_joshi
Thursday, March 23, 2006 - 1:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ब्रेथलेस ...

टॉप तिचा तो शॉर्ट किती अन किती तोकडी बाही
अन डीप ब्रेथ घेताच तिने ब्रेथलेसच झालो आम्ही

गोड हासली तिथे , इथे ब्लडप्रेशर इन्क्रीज झाले
आजवरी मन निर्मळ होते आता डॅंबिस झाले
च्याक धुमधुम झिंच्याक धुम धुम दिल बिलकुल पागल झाला
हृदयी रुतला बाण तिचा , बिचारा घायल झाला
काय करू नि काय नको रेस्ट्लेसच झालो आम्ही
फासफुस फासफुस श्वास तरी ब्रेथलेसच झालो आम्ही

हळू हळू आमच्याच दिशेने सुंदर ललना आली
हाय अंकल ! एकटेच कसे ? का आंटी नाही आली ?
अंकल झालो कधी ? मनी कल्लोळ दाटुनी आला
रुमाल हातातला भिजुनी टर्किश टॉवल झाला
चवच गेली जगण्याची टेस्टलेसच झालो आम्ही
ब्रेथ असुनी खरोखरी ब्रेथलेसच झालो आम्ही


Himscool
Thursday, March 23, 2006 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव अ..प्र...ति....म!! एकदम सही!!

Kandapohe
Thursday, March 23, 2006 - 8:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव अंकल जबरी!! ...

Kmayuresh2002
Thursday, March 23, 2006 - 10:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खी खी खी करपे आणि वैभव.
लई भारी लिवलय राव तुम्ही:-)


Ajay
Friday, March 24, 2006 - 1:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mmkarpe,
तुमच्या कवितेमुळे मला एका वाक्प्रचारची आठवण झाली ती मी
इथे लिहीली आहे.


Mmkarpe
Friday, March 24, 2006 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना धन्यवाद.
वैभव तुमच्या प्रतिक्रिया प्रोत्साहन देउन जातात आनि मग मला हे असं काहितरि सुचतं
अजय तुमच्या वाक्प्रचारामुळे माझ्या ज्ञानात भर पडली. धन्यवाद.


Dineshvs
Friday, March 24, 2006 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, म्हणजे तु माझ्यापेक्षा म्हातारा आहेस कि काय ? काल भेटायचा योग होता, आशिर्वाद घेतला असता.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators