Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
लिफ्ट

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » ललित » लिफ्ट « Previous Next »

Gs1
Friday, March 24, 2006 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



लिफ्ट

सध्या लिफ्ट प्रकरण फार गाजतय. साधारण वर्षापुर्वीची गोष्ट आहे. मुंबईची कामे दिवसभरात आटपून पुण्याकडे निघालो होतो, रात्रीचे अकरा वाजले असावेत. एक्स्प्रेसवे झाल्यापासून मी मुंबईला चालक नेणे बंद केले होते, त्यामुळे एकटाच होतो.

चेंबूरच्या मैत्री पार्कजवळ आलो. एवढ्या वर्षात मला कोणी कधी लिफ्ट मागितल्याचे मला आठवत नाही. मागितली असेल तरी माझे लक्ष गेले नसेल. पण त्या दिवशी मला काय वाटले कोणास ठाऊक, पण मी गाडी मैत्री पार्कपाशी थांबवली आणि डावीकडे नजर टाकली. साहेबांना सोडायला आलेले बरेच ड्रायव्हर परत जातांना तिथुन पुण्यात शिटा भरून नेतात. तसेच काही वाटून एक सात आठ लोक गोळा झाले. एक सुखवस्तू मराठी मध्यमवयीन गृहस्थ म्हणाले, 'कोथरूडला चाललाय का ?' त्यांना म्हटले बसा आणि निघालो.

ओळख झाली, जुजबी प्रश्नोत्तरे झाली आणि एका मर्यादेपुढे मी त्यांच्या प्रशांची उत्तरे एका शब्दात देउ लागलो, पण ते गृहस्थ, देशपांडे फारच बोलत होते.
त्यात त्यांचा फोन सारखा वाजत होता आणि तो ते कट करत होते. आठ दहा वेळा असे झाल्यावर मी त्यांच्याकडे एक कटाक्ष टकला.
ते वाटेतच कुठेतरी उतरून जावेत किंवा झोपून जावेत अशी मी आता मनोमन इच्छा करत होतो.

अखेर ते फोनवर बोलले. कुणीतरी पलीकडुन झापत होत आणि हे आपले 'उद्या देतो, नक्की देतो, करतो काहीतरी व्यवस्था' असे सांगत होते.

फोन संपला, 'पेमेंटचा तगादा हो' देशपांडे म्हणाले. त्यांचा एक्सपोर्टचा व्यवसाय होता, एक मोठी शिपमेंट पैसे नसल्याने अडकली होती, पाच एक कोटी रुपयांची. ताबडतोब चाळीस लाखांची व्यवस्था झाली तर त्यांची शिपमेंटही सुटणार होती आणि जुनी देणीही.

'बॅंकेकडे का नाही मागत ? ' मी विचारले.

'अहो आम्ही ऑलरेडी दोन बॅंकांचे बुडीत खाते आहोत, आता बॅंक नाही देणार काही'

एव्हाना लोणावला ओलांडले होते.
'तुम्ही देउ शकाल का.. ? ' त्यांचा काही वेळाने प्रश्न. आता मी गाडीतून खाली पडायची वेळ आली होती. केवळ दीड तासाच्या लिफ्ट देण्याच्या ओळखीवर हा मनुष्य अत्यंत गंभीरपणे मला चाळीस लाख रुपये मागत होता.
'फक्त तीन महिन्याचा प्रश्न आहे, त्या तीन महिन्याचे मी पन्नास टक्के व्याज द्यायला तयार आहे', त्यांचा पुढचा प्रस्ताव.
'हा माझा व्यवसाय नाही', मी म्हणालो.
'पण मग तुमच्या ओळखीत काही...', देशपांडेंची चिकाटी बघुन मी हतबुद्ध झालो होतो.
'हो, माझ्या माहितीत एक खाजगी फायनांसर आहे. महिन्याला आठ ते दहा टक्के घेईल. सांगितल्यावर तासाभरात अक्षरश : पोत्यात भरून पैसे आणुन देईल', एवढ्या अल्प ओळखीवर मला हे सर्व बोलायचे नव्हते. पण मी बोलत होतो.
'तुमच्या शब्दावर मला देईल तो ? ', देशपांडे.
'बहुतेक देईल, पण वेळेवर परत नाही मिळाले तर तुम्हालाही पोत्यात घालून घेउन जाईल. त्यामुळे अशा माणसांकडे जातांना विचार केलेला बरा.' मी विषय संप्वला. देशपांडेही गप्प झाले.

यांनी मला जास्तच बोलायला भाग पाडले का ? मी तरी कसा बोलून गेलो ? मुळात कधी नव्हे ती मी स्वत : हुन शोधुन नेमकी यांनाच लिफ्ट कशी दिली ? विचाराच्या आवर्तात काही क्षण गेले.

काहीतरी विचित्र घडतेय याची जाणीव होत होती, भरधाव चाललेली गाडी, अगदी समोर लोंबकळणारा एक लाल दिवा, माझ्या मानेवर देशपांडेंचा हात, आणि दुरुन आल्यासारखा त्यांचा आवाज...' अहो त्या सळया बाहेर आल्यात'

मी खडबडुन जागा झालो, जिवाच्या आकांताने समोरच्या ट्रकमध्यल्या सळयांपासून अवघ्या काही इंचांवर असलेली माझी गाडी वळवून आणि करकचून ब्रेक मारत दुसर्‍या लेनमध्ये घेतली.

देशपांडेंना वाटले कि त्या बाहेर आलेल्या सळया आणि लाल दिवा मला दिसूनही मी लेन बदलण्यात उशीर करत आहे आणि त्या ट्रकच्या एवढा जवळ का जात आहे म्हणुन त्यांनि आपले मला सहज खांद्यावर हात ठेवून तसे म्हतले होते. मला डुलकी लागली होती, एकदा झोपलो की मला कुठल्याही आवाजाने नाही तर हलवल्यानेच जाग येते, त्यांनी खांद्यावर हात ठेवल्यामुळे आम्ही कुठल्या प्रसंगातून वाचलो हे त्यांना कळालेच नाही.

अर्थात नंतर त्यांना घरी सोडुन माझ्या घरी आलो तरी टक्क जागा होतो.

गाडी चालवतांना लोकांना झोप कशी लागू शकते याचे मला नेहेमी आश्चर्य वाटत आले आहे.
गेल्या दहा वर्षात तीनेकशे वेळा मुंबैला गेलो, केवळ एकदा लिफ्ट दिली आणि निव्वळ योगायोगाने माणसाच्या आयुष्यात काय चमत्कार घडू शकतो याचा अनुभव घेतला.

----
मॉड : शक्य झाल्यास रंगीबेरंगीचा फॉंट बदला फार त्रास होतो वाचायला.




Lopamudraa
Friday, March 24, 2006 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prasa.ng chan!!!.. .. .. ..
savadhee .ekada vachayala suravat kelyavar utsukata vadhu lagate..

Dineshvs
Friday, March 24, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला दिल्लीतले संजय आणि गीता चोप्रा प्रकरण आठवतेय का ?
मला कधीहि कोणाला लिफ़्ट द्यायचे धाडस झालेले नाही, आणि अनोळखी माणसानी ऑफ़र केलेली लिफ़्टहि मी अनेकवेळा नाकारलीय.
पण जे. आर. डी. टाटा मात्र आवर्जुन लिफ़्ट देत असत, असे त्यांच्या कंपनीतले लोक सांगत असत.


Seema_
Friday, March 24, 2006 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भिती वाटली एकदम वाचताना . पण अगदी असाच अनुभव आम्ही माझे वडिल drive करीत असताना पुण्याच्या जरा पुढ आल्यावर घेतला आहे . कुठलीतरी अद्रुश्य शक्तीच आपली अशावेळी सोबत करीत असेल , नाही का?


Chinnu
Friday, March 24, 2006 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जी येस, जरा सांभाळुन हो!

Mita
Friday, March 24, 2006 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बापरे!!!
खरी घटना आहे का हि??
त्या देशपांडेची पण भीती वाटली आणि त्या ऍक्सिडेंटच्या क्षणाची पण.


Kiroo
Friday, March 24, 2006 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच महाराष्ट्र टाईम्स मधे बातमी आली आहे ही...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1463564.cms

Bhagya
Friday, March 24, 2006 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोविन्द हा खरा अनुभव आहे का? जरा जपूनच रहा बरे!
आम्हाला काही वर्षांपुर्वी पुणे मुंबई रस्त्यावर विचित्र अनुभव आला. माझा नवरा आज जगातल्या बर्‍याच ठीकाणी व्यवस्थित गाडि चालवतो. त्याचा कधिही अपघात झाला नाहि किंवा एकहि तिकिट त्याला अजून मिळाले नाही. पण आम्ही वाशिच्या अर्धा तास दूर असताना गाडी एकदम रोड डिव्हायडर कडे जायला लागली. जिवाच्या आकांताने steering wheel वळवण्याचा प्रयत्न करत असताना गाडी अक्षरश : भोवर्‍यात सापडल्याप्रमाणे ३-४ वेळा गोल गोल फ़िरली आमच्या मागच्या गाड्या कशा आमच्यावर आदळल्या नाहित काय माहिती.
आणी हे झाल्यानंतर व्यवस्थित, काही न होता आम्ही मुंबईला पोहोचलो. mechanic च्या म्हणण्याप्रमाणे गाडित काही बिघाड नव्हता.

आपल्या आकलनाबाहेरच्या काहि गोष्टि नक्किच अस्तित्वात असाव्यात.


Admin
Saturday, March 25, 2006 - 12:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS1, रंगीबेरंगी आणि इथले फाँट अगदी सारखे दिसायला हवे (नवीन लिखाणासाठी). तुम्हाला काय वेगळे दिसते आहे याचा screenshot पाठवू शकाल का?

Admin
Saturday, March 25, 2006 - 12:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

If anybody is seeing fonts differently (for new posts) on rangiberangi please send us screenshot so we can correct it. They are supposed to look exactly same as here.

Manuswini
Saturday, March 25, 2006 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भीती वाटली हा प्रसंग वाचताना

अदभुत शक्ती विषयी मला कल्पना नाही
पण असाच एक प्रसंग होता मी रोजची boston ते Nj every friday करायची to meet my parents
एकदा मुसळधार पावुस नेहमीचा रस्ता मी चक्क चुकले अंधारात आणि मलाच काही कळले नाही कुठल्या lane मधे गेले. बरे गाडी थांबवावी तर भीती अचानक मला कळले की मी एका नावडत्या lane वर आहे. नवडती lane मह्णजे NJ ला येताना एक cemetery मधेच रस्ता जातो आणि भाउ नेहमी सांगायचा की अग तु तो short-cut घेवुन येत जाना... काय घाबरते आणि खरे सांगु मला दिवसाही तो रस्ता भयानक वाटायचा जरी आजुबाजुला अमेरिकन वस्ती होती.(हे लोक स्मशानाच्य समोर पण घर घेतात हे एथे मला कळले?)
जवळपास मी माझ्या घराच्या जवळ होते हा अंदाज आला पण भीतीने एकदम कापले होते. आणि suddenly गाडी reverse घेताना 180 degree मधे काही कारण नसताना फिरली दोनदा फिरुन झाली आणी थांम्बली. घामाने डबडबलेली आणि बाहेर नजर गेली तर किंचाळले एक माणुस लहान मुलाबरोबर छत्री घेवुन उभा होता ह्या पावसात आणि हात करत होता मला होते न्हवते ते भान गेले तर ईतक्यात तो जवळ आला काच उघडली नाही तरी त्याच्या lips movement वरुन वाटले की तो विचारत होता are you ok? असे काहीतरी. साधारण ९:३० वाजले होते. ह्या पावसात तो म्हातारा लहान मुलाबरोबर काय करत होता? हे अजुन कळले नाही मला. कुठेही न बघता,गाडी पुन्हा reverse करुन मी देवाचे नाव घेत माझ्य long route ने घरी पोचले.
आज मला बहिण, भाऊ सगळे हसतात की मी भुत बघितले जरी त्यात गाडी rotate झाल्याची चिंता नक्किच वाटली तरी.आणि आजही मी म्हणते भावाला तुच please कधीही जावु नकोस तिथुन.
god promise आज ही कोडे आहे मला. दुसर्या दिवशी लक्ख उजेडात मी आणि भाऊ तिथे गेलो होतो actually अगदी cemetery समोरच दुसर्या बाजुला घरे आहेत. पण रात्रिचा म्हतारा कोण होता हा प्रश्ण आहे seriously? माझी गाडी काहीही कारण नसताना अशी का फिरली, break लावुन ही मला वाटले की गाडी मागे कोणितरी खेचतय? anyways gs1 एथे मला माझी गोष्ट नव्हती लिहायची पण तुमचा प्रसंग वाचुन मला ही गोष्ट आठवली


Ankushsjoshi
Saturday, March 25, 2006 - 11:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डरना मना है !!!! कमजोर दिल वाले इस थ्रेड को न पढे !!!! :-)

Polis
Monday, March 27, 2006 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओ गाववाले काय उगाच घाबरवताय...? आमच्या येरीया मधी कुत्र बि कोकलत नाय, गस्त असती नव्ह पान्डूची!

Rachana_barve
Monday, March 27, 2006 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS1 जरा जपून... take care..

Deemdu
Monday, March 27, 2006 - 11:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तरी अस वाटत की त्या देशपांडेची भिती वगैरे वाटण्याच गरज नाही कारण कधीही lift द्यायला न थांबणारा माणुस त्या दिवशी स्वतःहुन lift देतो ह्याचाच अर्थ पुढे येणार्‍या ह्या प्रसंगातुन वाचवण्यासाठी देवानी अशी योजना घडवुन आणली होती. आणि त्याच माणसाने वेळ येताच GS ना जाग केल ह्यातच सर्व आल. ह्यात मला भुताचा कुठे संशय घ्यायला सुद्धा जागा वाटत नाहीये :-)

GS तुमच्या मागे परमेश्वर आहे.

बाकी लिहीण्याच्या पद्धती बद्दल मी काय लिहीणार, तुमच लिखाण नेहमीच ऊच्च असत.


Mi_anu
Wednesday, March 29, 2006 - 12:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जी एस,
तुमचा अनुभव चांगला लिहीला आहात. खरोखर अशी एखादी शक्ती असावी आणि ती आपल्याला पुढच्या प्रसंगातून वाचवत असावी असे वाटते.
(तीच) अनु



Gs1
Wednesday, March 29, 2006 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, अनुभव शब्दश : खरा आहे आणि देशपांडेही खरेच आहेत.
मला मनात कुठेतरी त्यांची अगदी धूसर भीती वाटु लागली होती, हे वाटेत गाडी थांबवून पैसे मागणार नाहीत ना वगैरे, झोपेत स्वप्न पडत होते काहीतरी, त्यांचा हात त्यांच्या हाका या वास्तवातल्या गोष्टी स्वप्नात दिसत होत्या ( स्वप्नात असतांना जर घरात बेल वाजली तर स्वप्नातही बेल वाजते असा अनुभव आला असेल तुम्हालाही ) आणि मग जागा झालो तेंव्हा कळले की खरेच खांद्यावर हात ठेवून ते बोलत होते.




Charu_ag
Wednesday, March 29, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीमडुला अनुमोदन.खरचं होतं अस कधी कधी. अगदी थरारक अनुभव आहे हा.

Samai
Wednesday, March 29, 2006 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

gs please रागाऊ नका हो, हे खर तर ह्या BB वर नको आहे. मॉड हे तुम्हाला हवे तिथे हलव

आमच्या गावाला एक मजेशीर वल्ली आहेत. वय ह्या घडीला किमान ८५ च्या पुढे असेल. आम्ही लहान असताना हे आजोबा आम्हाला गोष्टी सांगायचे. एक दिवस म्हणाले आज मी तुम्हाला माझी स्वतःची गोष्ट सांगतो.
आता अर्थात पुढे सगळीकडे मी म्हणजे आजोबा :-)
मला शिकारीचा अतिशय नाद होता. एक दिवस मी असाच शिकारीसाठी जंगलात गेलो होतो. पहाता पहाता संध्याकाळ झाली. आणि मी जंगलात वाट चुकलो.
वाट शोधत असताना अचनक पणे माझ्या समोर एक वाघ येऊन उभा ठाकला. आता आली का पंचाईत. शिकारीची हौस होती पण वाघ :-( मी जोर जोरात पळायला सुरुवात केली. मी पुधे वाघ मागे, मी पुधे वाघ मागे. करता करता मी खुप दमुन गेलो. पुधे पळण्यची ताकदही उरली नाही. शेवटी एका झाडावर चढायला सुरुवात केली. (वाघाला झाडावर चढता येत हे मला त्यावेळी माहितीच नव्हतं. ). वर चधुन गेल्यावर मी खाली पहील तर तो वाघ खाली माख्याकडेच बघत उभा होता. मी खाली पाहील तसा तो माझ्याकडे बघुन हसला. त्याच ते हसण बघुन मला लागली करंगळीला. आता रात्रीच्या ह्या असल्यावेळी जाणर तरी कुठे? शेवटी डोळे मिटले आणि झाडावर उभाराहुनच हम.......
डोळे उघडून बघतो तो काय तो वाघ माझ्या शु ला धरुन वर येत होता मी पटकन पोट आवरत घेतल, तसा धप्पकन पडला त्याच्या पडण्याच्या आवाजानी मी इतका जोरात दचकलो की पटकन उठुन बसलो, पाहतो तर काय माझी गादी सगळी ओलि झाली होती .

तर मंदळी
झोपेत स्वप्न पडत होते काहीतरी, त्यांचा हात त्यांच्या हाका या वास्तवातल्या गोष्टी स्वप्नात दिसत होत्या
>>>>>
हे अस १००% होत

}

Shyamli
Wednesday, March 29, 2006 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.. .. .. .. ..

Anilbhai
Wednesday, March 29, 2006 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथली कही पोष्ट खालील ठिकाणी मुव्ह केली आहेत
भविष्यातील गोष्टिंची चाहुल




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators