Meenu
| |
| Wednesday, March 22, 2006 - 1:18 am: |
| 
|
तूझा स्पर्श अलवार माझ्या देहाची सतार दिव्य उमटे झंकार समाधानाचा हुंकार..
|
Devdattag
| |
| Wednesday, March 22, 2006 - 7:51 am: |
| 
|
वाचले येथेच कुठेतरी लिहिली कुणी समिक्षा होती ऐकले घेतलि त्यांनी औरंगजेबाकडूनी दिक्षा होती
|
Milindaa
| |
| Wednesday, March 22, 2006 - 5:24 pm: |
| 
|
प्राचीला गच्ची झालंय रे
|
Himscool
| |
| Thursday, March 23, 2006 - 4:47 am: |
| 
|
उन्हाळ्यात झुळुक अशी थंडावली काय? चारोळ्या लिहिणारे सगळे झोपले की काय?
|
Menikhil
| |
| Thursday, March 23, 2006 - 7:31 pm: |
| 
|
उन्हाळ्यात कधी कधी गोदामाई ही अटुन जाते प्रवाह आपला मिटून घेते तेव्हाच तर "हिम्सकूलची" आठवण येते अन काट्यात अडकलेली नदी प्रवाहित होते....
|
Devdattag
| |
| Thursday, March 23, 2006 - 11:50 pm: |
| 
|
जाहले आम्हांस काय अमुची गात्रे का थंडावली श्वास देई जीवनास ह्या ती झुळूक आहे मंदावली
|
उपभोगा सोनेरी दुनियेस ह्या अरे इथे आपुलेच राज्य आहे ददात ना आपणास कशाची फ़क्त माणुसकी त्याज्य आहे अजब इथल्या गणितातही शुन्यच येते भाज्य आहे इथे वजा बाकीच होते आणि बेरिज पूज्य आहे
|
मौन माझे शब्द आणि मौन माझी साद ही लाजली तेथे पहा ती मौन आहे दाद ही
|
देवदत्त, भासे जरी मंदावलेली आज आपुली झुळुक ही घेऊ दे ऊसळी पुन्हा ती आपुल्या श्वासांतुनी
|
मौन तुझी भाषा असेही हे आधीच होते जाणले भाषेत तुझिया साद द्याया मीही मौन होते बाणले
|
Shyamli
| |
| Friday, March 24, 2006 - 1:01 am: |
| 
|
सही चाललय.... पण तो मिलिंदा काय म्हणतोय?
|
जीवघेणी शांतता मूक सारे शब्द आता आज येशी बोलण्याला श्वास झाले स्तब्ध आता
|
हे पहा ना यायचे तर आज तू येऊ नको भेटणे तू सोडले तर यादही येऊ नको
|
श्यामलि.. मिलिंदाचे बोल माझ्यासाठी होते.. त्या आधिची झुळूक बघ
|
ती इथे नाही तरी आहे कशी अद्यापही ? लोचने मिटताक्षणी दिसतेच का अद्यापही ?
|
याद कुणाची टाळणे आपुल्या हाती नव्हे रे अंगणात येतिल नविन बघ पाखरांचे थवे रे
|
बांधले आहे तिने घरटे इथे वेड्या क्षणांचे माझिया मनपाखराला वावडे आहे दुज्यांचे
|
Shyamli
| |
| Friday, March 24, 2006 - 1:18 am: |
| 
|
आली किति पाखरे ही शोधते मी माझाच रावा सापडेना ओळखिचा काय कामाचा हा थवा श्यामली!!!
|
दिसते खुल्या लोचनी ह्या तोच खरा आभास आहे घेतले तू रूप ज्याचे तो मोगर्याचा वास आहे
|
मिटवेल का मौन हे आपुल्यातील अंतरे उगा लाविशी कराया मौनाची भाषांतरे
|
काय सांगू मी तुम्हाला मोगरा छळतो कसा गंध मी घेण्यास जाता प्राण हा ढळतो जसा
|
Meenu
| |
| Friday, March 24, 2006 - 1:39 am: |
| 
|
नको लावूस जीव त्यात काही तथ्य नाही खूप वाट पाहीली तर सालं मरणही येत नाही.
|
तथ्य पाहून , पथ्य पाळून प्रेम कैसे व्हावयाचे ? आपले माणूस आहे हे कसे विसरावयाचे ?
|
आठवते आम्हास आम्ही काही पथ्ये होती पाळली मैफ़िलीत नाही कधी होती एकातांत आसवे ढाळली
|
Meenu
| |
| Friday, March 24, 2006 - 1:58 am: |
| 
|
तू म्हणशील आपलयं पण त्यानी मात्र मनात दुसयाच कुणाला जपलयं "तस काही नाही गं" म्हणतील शब्द जरी देहबोलीसुद्धा तितकीच असते रे खरी
|