|
हार्टवर्क अरे ते तुझ्या प्रतिक्रियेवर लिहीले नव्हते मी. नाहीतर तुलाच उद्देशून नसते का लिहिले? मला मोठी असूनही कविता आवडली इतकेच म्हणायचे होते.
|
नविन " ती " निर्माण झाली पोकळी जेव्हा श्वास घेतला खोलवर मन झाले सैरभैर क्षणभर! नंतर जाणवले मुक्ततेचे वारे, पाणावले डोळे, तोडले होते जाचणारे जाळे! गेल काळ थंडावला जाळ आता कापत नाहीत पाय.. थरथरत नाहीत हात! केली काळावर मात,उचलली मान घेतली जीवन संगीताची तान.... आवडले नाही त्यांना खपले नाही त्यांना जीवन्संगीत कळले कसे हिला? आम्ही तर एकटेच गात होतो, तीच्या नकळत शिकत होतो तरी ही शिकली कशी, आमच्याशिवाय जगायला लागली कशी? पहिलं पाहीजे शोधलं पाहिजे.. तीला जाणिव झालीच पाहिजे! ती आमच्याशिवाय गाउच शकत नाही, तीला थांबवलच पाहिजे!.... पण त्यांचे प्रयत्न फ़ोल ठरले.. तिचे गाणे थांबले नाही... तिचे गाणे अव्यक्त! उन्मुक्त! नैसर्गीक! तीच्या जीवनाच्या खळाळत्या झर्याला, अवखळ गाण्याला ते बांध घालु शकले नाहीत, तिच्या उस्फ़ुर्त गाण्याकडे तिच्या निरागस सौदर्याकडे ते पहात राहीले, ती लांब गेली, दिसेनाशी झाली, निसर्गात विलिन झाली, ते पहात राहीले... नी पहात राहीले... तिथेच राहीले....!!!
|
धन्यवाद दोस्तस ... शुभांगी , उर्मिला ... स्वस्ती , अभिजात .... लोपमुद्रा ... छान कविता ... कर्पे ... मस्तच दिमडू ... मेल चेक कर ...
|
अधूरी मैफ़ल ... एकवार पुन्हा तुझ्या गीतपंक्ती आठवल्या आसवांच्या पावसात चिंब चिंब भिजलेल्या स्वरास्वरांवर नाचे श्वास माझा थुईथुई शब्द फुलवित गेले आठवांची जाईजुई झुला मोहाचा झुलला छेडताच तू लकेर ठोका मनाचा चुकला हरखले पेर पेर एक वर्ज्य स्वर आला नकाराच्या आडोश्याने गीत तेच जुने तरी सम चुकली नव्याने अजूनही तुझ्याविना जन्म माझा एकसुरी अजूनही तशीच ती एक मैफ़ल अधूरी
|
Shyamli
| |
| Tuesday, March 21, 2006 - 3:56 am: |
| 
|
वैभव अशक्यच आहेस बाबा तु........ खरच वैशाली छाने....
|
हार्टवर्क, अगदी मनापासून मनावर घेतलेलं दिसतंय. अरे, सर्वांचं सर्व लेखन आपल्या मनाला भावेल, असं नाही. वैभव, पाळणाघर हा नविन विषय कव्हर केलास. त्या कवितेला आणखी पैलू पडू शकतात. लोपमुद्रा, कविता छान आहे.
|
Giriraj
| |
| Tuesday, March 21, 2006 - 5:39 am: |
| 
|
वाह् रे वैभव्! तुला एक् कॆनन कॊपिअर् बक्षीस्!
|
Samixak
| |
| Tuesday, March 21, 2006 - 9:18 am: |
| 
|
कवितांच्या या मार्याने गुदमरून गेलो हे. थोड वेल तुमी cease fire केल्यास समिक्षा लिहिता येईल रोज एक कविता लिहिन्यापेक्षा, आथव्ड्यातून किंवा महिन्यातून एकच चाम्गली लिहिन्यावर लक्ष द्या..
|
बाजार भावनांचा मांडला बाजार नही शब्द माझा एवढा लाचार नाही मी स्मशानी राहतो आता सुखाने फक्त त्या जागीच भ्रष्टाचार नाही घाव सारे मी जरी सोसून गेलो सोसला मजला फुलांचा वार नाही का बरे यावे तुझ्या त्या राउळी मी (?) मानतो अस्तित्व पण आकार नाही मी कसे सांगू मला विसरू नको तू तेवढाही राहिला अधिकार नाही आपल्या हाती कसा आला तराजू ? ही असे प्रीती सखे व्यापार नाही छप्पराला दोष मी द्यावा कशाला भिंत आहे पण तिचा आधार नाही माणसे मोजू कशी गावातली ह्या ? राहिला येथे कुणी दिलदार नाही जन्मतः मृत्यूस मी पत्ता दिलेला आजही मी लावलेले दार नाही
|
Mmkarpe
| |
| Tuesday, March 21, 2006 - 10:03 am: |
| 
|
सन्घमित्रा,... निनावि...,हार्टवर्क,...वैभव...धन्यवाद. लोपमुद्रा छान आहे कविता. वैभव!...मस्तच. वैभव एकदम सडेतोड उत्तर दिलय समिक्षकाला तुम्ही.....
|
Ninavi
| |
| Tuesday, March 21, 2006 - 10:15 am: |
| 
|
लोपा, ' नवीन ती' छान आहे. वैभव, मान गये. गज़ल अप्रतीम. मानतो अस्तित्व.. व्वा!! तू अक्षरशः रोज नवीन क्षितीज गाठतोस!! हे असं लिहीता येऊ शकतं हे मला तरी तुझ्या कविता वाचून कळलं. बाकी, तू गद्य पण एवढं छान लिहीतोस हे आजच समजलं. समीक्षक, इथे रोज सातत्याने चांगलं लिहीणारे कवी आहेत. तुम्ही एक चांगली समीक्षा लिहून दाखवाल का? हवं तर इथे येऊ नका थोडे दिवस. म्हणजे न गुदमरता लिहीता येईल.
|
Mmkarpe
| |
| Tuesday, March 21, 2006 - 10:19 am: |
| 
|
शब्द..... कधी शब्द नकोसे कारले कडु कधी लागतो शब्दातुन मधही झडु भांडनात शिव्या शब्द भजनात ओव्या शब्द विरहाची तान शब्द प्रेमाचे गान शब्द कोर्टात कायदा शब्द व्यवहारात वायदा शब्द दुष्टांच्या हाती सुई शब्द आईच्या ओठी अंगाई शब्द नेत्यांच्या मुखी हत्यार शब्द जनतेच्या मुखी लाचार शब्द कविच्या ह्रुदयाचे स्पन्दन शब्द लेखकाच्या जीवनाचे इंधन शब्द कधी हवाहवासा अर्थ शब्द कधी घडविती अनर्थ शब्द म्हणुन वापरण्याआधी घ्यावे ध्यानी थोरांचे बोल वापरतो विनामोल परी असते शब्दांनाही मोल
|
Champak
| |
| Tuesday, March 21, 2006 - 10:55 am: |
| 
|
अरे वा! शब्द हे शस्त्र आहे, जपुण वापरा असे लहाण असताना शिकवले जाई!! वाय वाढले कि अक्कल gradualy कमी होत जाते का? लोपमुद्रा, वैभव, कविता छान आहेत!
|
Divya
| |
| Tuesday, March 21, 2006 - 11:10 am: |
| 
|
वैभव बाजार अप्रतिम झालीये, तुमच्या सग्ळ्याच कविताना वाह वा अशी उस्फ़ुर्त दाद येतेच येते. आणि समिक्षका ला दिलेले उत्तरही जबरीच. ते काय आहे ना दुसर्याला चान्गल म्हणायला मनाचा मोठेपणा लागतो, दुसर्यातली शोधुन शोधुन खुस्पट काढणार्याचे बोलणे दुर्लक्ष च करावे कुत्र्याच्या भुन्कण्यासारखे.
|
मॉडरेटर ... माझी इथली पोस्ट का उडवली ते कळेल का ? तुम्ही ह्या प्राण्याला पाठीशी घालताय का ? हे समीक्षण असतं असलं ? त्याची पोस्ट उडवायची सोडून तुम्ही माझी उडवावीत ? हा माणूस सग़ळीकडे समीक्षणाच्या नावाखाली तद्दन मूर्खपणा करत फिरतोय हे चालतं का तुम्हाला ?
|
vaibhav_joshi आम्ही फ़क्त अक्षेपार्ह भाषा वापरली जाऊ नये याची दक्षता घेत आहोत. टीका नाही आवडली किंवा बोचरी वाटली तरी जर त्यात अक्षेपार्ह भाषा नसेल तर आम्ही ती काढू शकत नाही. तुमच्या पोस्ट मध्ये तशी भाषा आढळली म्हणून ते delete करावे लागले. आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही. जिथे samixak या id ने तशी पोस्ट्स केली आहेत तिथे ही अशी कर्यवाही केलेली आहे.
|
अतिप्रिय समीक्षक .... आपले समीक्षण (?) वाचून मनःपूर्वक आनंद झाला ... आपल्याला भेटून एकदा कडकडून मिठी मारायची आहे .... कुठे भेटाल ? कधी भेटाल ? अणि तोपर्यंत जमलंच तर एखादं खरंखुरं समीक्षण लिहाल का प्लीज ? काय आहे , तुम्हाला ललित , कविता , नाटक , सर्वप्रकारात अगाध ज्ञान आहे हो .. आणि वाटल्याने ज्ञान वाढतं म्हणे .... आजकाल आडात नसलं तरीही पोहरयात येतं म्हणे .. कलियुग आहे ना ! बाय द वे कविता बीबी वरच्या प्रत्येकाच्या वतीने मी हे लिहीत आहे ... काय आहे , इथे आमची एकी आहे आणि प्रत्येकवेळी आपलयाला इथे एकटं वाटणार नाही ह्याची आम्ही खबरदारी घेऊ ... हीच आमच्या पाहुणचाराची पद्धत आहे
|
वैभव, तु " कविता " सोडून कुठेही बघु नकोस, पण एकिबद्दल जे बोललास ते अगदी खरे आहे ह! बाकी तुझ्या कविता नेहमिप्रमाणे छान... कर्पे कविता छान! श्यामली.. , कर्पे, निनावी, शुभांगी,चंपक.. धन्यवाद...
|
सगळिच नाती मोजित नसतात शब्दान्च्या मापाने असतात काही शब्दान्पलिकडली अनामिक बन्दने
|
this was my first message in marathi ,please some one tell me how to write 'dh' dhnushyacha in marathi font
|
वैभव अरे त्या निमित्ताने अजून एका छान कवितेची भर पडली इथे. सुरेख. मी काहीतरी मिस केलं वाटतं वाचायचं. करपे शब्द मस्त जमलीय.
|
Devdattag
| |
| Wednesday, March 22, 2006 - 12:29 am: |
| 
|
वैभव' बाजार' निव्वळ अप्रतिम.. प्रत्येक कडवे म्हणजे' क्या बात हैं' वैशालि.. नविन ती छान शुभांगी.. कर्पे.. अभिजात.. स्वस्ति सगळेच मस्त.
|
मराठीमानसी, dha = ध, ba.ndhane = बंधने
|
वैभव, तुझी 'बाजार' ही रचना आवडली. विशेषत: 'छप्पराला दोष ...', 'मी स्मशानी... हे शेर.
|
Jo_s
| |
| Wednesday, March 22, 2006 - 4:29 am: |
| 
|
तुज काय सांगू आता चंचले तुझ्याच साठी द्रवती आणि किती ते माझे नयन झुरती चल चंद्रमा तू होऊन याच वेळी उजळून टाक सारी नी:शब्द रात्र काळी या स्तब्धतेत कानी वेगळ्याच तव ताना माझीया मनात वाजे झिनि झिनि झिनि विणा या तव अगमनाने नि:शब्दता पळाली शेवटी मनिची मझ्या चित्रं साकार झाली या कवितेतील प्रत्येक ओळीचे पहीले अक्षर एकामागोमाग वाचा सुधीर
|
|
|