|
Aparnas
| |
| Thursday, March 16, 2006 - 12:14 am: |
| 
|
मी अपर्णा, पहिल्याच वेळी कविता पाठवत आहे. ग्रीष्माची चाहूल लागते दिवस हळूहळू लाम्बतात मोगर्याच्या कळ्या फुलताना श्वास जागीच थाम्बतात गन्धाची ती निश:ब्द हाक अणि तुझ्य प्रेमाची पखरण मनातल्या उन्हावरती जणू चान्दण्याच शिम्पण उन्ह थोडी कमी होतात, ढगान्च्या कडा काजळू लागतात आभाळ भरुन यायच्या आधीच मनात सरी कोसळू लागतात झाडावरुन गळनार पाणी, मनात पावसाची गाणी सोबत सतत असतातच तुझ्या आठवणी पाउस हळूहळू कमी होतो, वाटा सार्या धुक्यात हरवतात शिशिरामधली सोनेरी उन्ह दवामधे भिजून जातात बोचरी सकाळ आणि उबदार दुपार, सान्जवेळ मात्र तुझीच असते माझ्या मनात तुझ्या आठवणीन्ना वसन्ताची नवी पालवी फुटते दिवस कोणतेही असले तरी तुझी आठवन सोबत असते ऋतुन्च्या या खेळात मी स्वत:लाच हरवून बसते पुन्हा तेच ऊन-वारे आणि गहिरी होणारी नाती ऋतुचक्रासारखीच अक्षय तुझी नी माझी प्रीती
|
Abhijat
| |
| Thursday, March 16, 2006 - 1:30 am: |
| 
|
प्रश्न ती बघते माझ्याकडे आणि बघून हसतेही ती येते, थाम्बते माझ्यापाशी, आणि थाम्बून बोलतेही पण ते बघणं, हसणं सारं असतं निर्हेतूक आणि बोलणंही एकदम निर्व्याज ती दिसल्यावर, भेटल्यावर मला सारं जगच नवीन वाटू लागतं ती निघून गेल्यावर, दिसेनाशी झाल्यावर, मला सतत तिच्या स्वप्नात रमावसं वाटतं वाटतं अनेकदा, जावं आणि बोलावं मनातलं चुटकीसरशी मी जातो तिच्या जवळ बोलायचं काय ते माहीत असतं पण बोलू जातो तेन्व्हा बोलतो काहितरी भलतंच कारण ती माझं पहिलं प्रेम आहे उत्तर ती बघत असेलही तुझ्याकडे, आणि हसत असेलही थाम्बत असेलही ती तुझ्यापाशी आणि बोलत असेलही असेलहि ते बघणं हसणं निर्हेतुक नि बोलणं निर्व्याज पण ती भेटल्यावर नवं वाटणारं जग खरं ती दिसत नसतानाही पडणारं तिचं स्वप्नही तितकच खरं नुसतं नको वाटणं नको नुसतं झुरणं जा आणि बोल मनातलं हो मनातल्या गोष्टीचा वक्ता आणि बनव तिला श्रोता नाही मनातली सदाफूली नसत्या शंकानी सुकू द्यायची कारण.... यातूनच मिळते सोबत व्यक्तीची किन्वा.... आठवणीची
|
अपर्णा, पहीली कविता फारच छान! आता दुसरी लौकरच येउदे. वैभव, निनावी, झाड, प्रभाकर, सुमति.... नेहमिप्रमाणेच सुन्दर कविता!
|
अश्रु.... सोसत नव्हत, तरी सोसल.... सुख अस मी चौफेर भोगल वाटल होत, मिरवता येईल काळ्जात लपवलेल.. छोटस दुख़ केन्व्हातरी पण हाय, दैवाने घात केलेला.. सुखाचा प्याला काठोकाठ भरलेला आता देव जर समोर आला तर तोहि कळवळेल म्हणेल," एक मागण मागतो तुझ्याकडे, बाळ, थोडस रडुन घे, तुझ्या हसण्यापेक्शा मला तुझा अश्रु आवडेल"
|
अपर्णा , अभिजात ... छान , दोन्ही कवितेतला शेवट आवडला ... हार्टवर्क ... मस्त रे !!!
|
एवढंच .... हे बघ , इट्स अ स्मॉल वर्ल्ड कुठे ना कुठे .. समोरासमोर येणारच आपण नको ना ओळख दाखवूस .. क्षणभर डोळे मिटून " तुझ्या " जुन्या आत्म्याला शांती लाभू दे ... एवढी प्रार्थना तरी करशील की नाही ? एवढंच करून पुढे जातो ना आपण ? रस्त्यात एखादं अनोळखी प्रेत दिसलं तर ?
|
एव्हढच छानच रे वैभव
|
अपर्णा, अभिजात छान लिहीलंय. हार्टवर्क खरंच असा अश्रू येणं फार अवघड. वैभव तुझ्या कवितांचं कौतुक करायला योग्य शब्द असते तर तुझ्यासारख्या कविताच करू शकले नसते का मी?
|
हे नित्य हेलकावे मी साहणार नाही नाते पुन्हा नव्याने मी जोडणार नाही वाटेत आज माझ्या भेटेन दु:खितांना मस्तीमध्ये सुखाच्या मी राहणार नाही भलतेच आज येती वारे नव्या दमाने जडशीळ हे सुकाणू मी ओढणार नाही झाले बरेच आता पाठीत वार माझ्या हा भार वेदनेचा मी वाहणार नाही मुक्काम वादळाचा माझ्या घरीच आता घरटे पुन्हा नव्याने मी बांधणार नाही अलवार त्या क्षणांचे राहील मोल आता सहवास नेहमीचा मी मागणार नाही पायास स्पर्शण्या का शत्रू अधीर झाले कलुषित भावनेने मी वागणार नाही त्या ब्रम्हराक्षसाची आहे भिती कुणाला पळत्यास साथ द्याया मी धावणार नाही नादान माणसे ही जमली सभोवताली हृदयास आज येथे मी तोलणार नाही थडग्यात गाडले मी नातेच मखमली ते अश्रूस आज येथे मी रोकणार नाही का आज छेडल्या तू हृदयातल्या सतारी घायाळल्या सुरांना मी गुंफणार नाही का आज मंदिरांचे पावित्र्य भ्रष्ट झाले पणत्या तिथे कधीही मी लावणार नाही का आज माणसांची झाली जिवंत प्रेते वस्तीत त्या कदापि मी जागणार नाही
|
Heartwork
| |
| Saturday, March 18, 2006 - 4:28 am: |
| 
|
शुभान्गी, कविता छानच, पण थोडिशी मोठि वाटते. बाकी तुमच्यासारख्या विदुषीला मी एखादी सुचना करणे म्हणजे दखलपात्र गुन्हाच ठरेल.
|
Urmila
| |
| Sunday, March 19, 2006 - 5:35 am: |
| 
|
होळी होळी आली रे, होळी आली रे, राग द्वेश जाळून टाकू, प्रेमाने एकामेकाच्या भेटी घेऊ. चला चला रे सारे जण, हिरवे पिवळे लाल गुलाबी, रंग एकामेकावर उडवू. एक दिवस मजेत घालवू, गोड बोल बोलुनी एकमेका सुखवू, उद्याचा काही नसे भरवसा. आजचा सूर्य पाहू कसा, कसा तेजाने तळपू लागला, कडूलीम्बाला मोहोर आला. मधूर वास कसा दरवळा, पृथ्वीवर जणू स्वर्ग अवतरला उद्या सारे विसरून जाती. आपण मात्र जपूया आठवणी, चला चला रे सारे जण, उधळू आपण सारे रंग. सुमन
|
Mmkarpe
| |
| Sunday, March 19, 2006 - 9:48 am: |
| 
|
खास फक्त मुंबईकरांसाठी........ इशारा.... बंद पडलेल्या गिरण्या... मोडकळिस आलेल्या चिमण्या... थंडावलेले भोंगे... जुनाट विद्रुप चाळी... रोखुन पाहतात माझ्याकडे असहायपणे... शहराची श्रीमंती निर्मिण्यात अख्खी हयात खर्ची घातलेला सुरकुत्या पडलेला निर्विकार चेहरा डोकावतो मधुनच एखाद्या गुदमरलेल्या खोलीतुन... त्याच्या किलकिलणार्या आशाळभुत डोळ्यातील वेदना मन कोरत जातात खोलवर... वाढत जातो त्यांचा आक्रोश प्रत्येक पावलाबरोबर... जागी होते मझ्यातली अपराधीपणाची भावना जाग्या होतात संवेदना... माझे मन धिक्कारते मला आपणही नाहीत का जबाबदार? त्यांच्याइतकेच्;या परिस्थितीला... मग ऐकु येऊ लागतात भयंकर कर्कश आवाज गिरण्यातील बंद यंत्रांचे भोंग्यांचे, चिमन्यांचे, चाळींचे...... ते ओरडुन ओरडुन सांगत असतात 'नेहमिचेच हे तुमचे; आम्हाला काय घेणे' म्हणत करत आहात जाणुन दुर्लक्ष पण लक्षात ठेवा! उद्या कदाचित तुम्हिही बणाल आमच्यासारखेच भक्ष्य.......
|
शुभांगी सुरेख आहे कविता. मोठी असली तरीही उगीच पाणी घालून वाढवल्यासारखी नाही वाटत. करपे अगदी योग्य शब्दांत वर्णन केलेय तुम्ही. जिवंत.
|
हार्टवर्क, संघमित्रा, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. मि. हार्टवर्क, अहो, मी विदुषी वगैरे काही नाही. मी नव्यानेच गझल या प्रांतात जरा चाचपडण्याचा प्रयत्न करतेय, इतकंच. नवे काफिये सापडले, कि नव्या कल्पना शब्दबद्ध कराव्याशा वाटतात. त्यातून अनेक शेर स्वतंत्र आशय घेऊन जन्माला येतात. मला वाटतं, माझ्या रचनांमध्ये अजून गझलीयत आणण्यासाठी दिग्गजांचे मार्गदर्शन हवे आहे. मला वाटतं, मायबोलीकर मला नक्की मार्गदर्शन देतील, हो ना?
|
पाळणाघर .... रोजच येतात माणसं (?) ...... आपली अवखळ , व्रात्य , हट्टी मनं घेऊन आणि इथे ... सांभाळायला सोडून जातात . इतक्या वेगवेगळ्या प्रकारची मनं सांभाळता सांभाळता ... कधीकाळी माझं एकुलतं एक अपत्य धकाधकीत हरवलं होतं हे दुःख विसरून जातो मी .. म्हणूनच तर सुरू केलंय हे पाळणाघर ... नाहीतरी दुसरं काय करू शकतो एक निपुत्रिक ?
|
Deemdu
| |
| Monday, March 20, 2006 - 6:43 am: |
| 
|
वैभव, तुझ्या कविता generally समजायला सोप्या असतात, पण ह्या कवितेचा अर्थच लावता येत नाहीये
|
Abhijat
| |
| Monday, March 20, 2006 - 7:04 am: |
| 
|
मागल्या आठवड्यात झालेल्या धो धो पावसात सुचलेली ही... साजण ध्यानीमनीही नसताना तो अवचित येथे आला गं! तापलेल्या तनूस माझ्या विझविण्या तो आला गं! तृषार्त ऐश्या मनास मनास माझ्या शान्तवून तो गेला गं! ओलेत्या या शरीरी माझ्या शिरशिरी हिरवी आली गं! नकोस शिणवू डोके अपुले सोडविण्या हे कोडे गं! मोहरलेली धरती मी अन पाऊस माझा साजण गं!
|
Vaibhav, पाळणाघराची कल्पना नाविन्यपूर्ण आहे. आवडली. बापू.
|
Ninavi
| |
| Monday, March 20, 2006 - 10:46 am: |
| 
|
व्वा! वैभव!! मस्तच कल्पना आहे. जामच आवडली. कर्पे, मस्त.
|
Swasti
| |
| Monday, March 20, 2006 - 11:40 pm: |
| 
|
तुझ येणं , अचानक , माझ्या ध्यानीमनीही नसताना आणि मग माझी तारांबाळ उडणं स्वत्:ला सावरताना तुझ्या आठवणींचं येणं , मी एकांतात असताना आणि मग मी स्वत्:ला विसरणं , तुला आठवताना अनपेक्षित बरसुन तुझं मला मोहरुन टाकणं दोनचं क्षणं प्रेमाचे , पण जाताना मन त्रुप्त करून जाणं जीव गुदमरतं असताना सुखद शिडकावा करणं जाताना मात्र आठवणींच , मला परत तगमगत सोडणं तुझ येणं , अवेळी आलेल्या परवाच्या पावसासारखं तुझ्या आठवणींचं येणं मात्र , अगदी वळवाच्या पावसासारखं स्वास्ति मार्च २००६
|
Shyamli
| |
| Tuesday, March 21, 2006 - 12:20 am: |
| 
|
>>>>>>जीव गुदमरतं असताना सुखद शिडकावा करणं जाताना मात्र आठवणींच , मला परत तगमगत सोडणं सगळच सुरेख.. .. .. ..
|
सन्घमित्रा, मला असे म्हणायचे नव्हते कि शुभान्गिने कविता पाणी घालुन वाढवलिये. मला फक्त इतकेच म्हणयचे होते कि एकदम इतके शेर(त्याला काफिये म्हणतात का? नाहि मला खरेच माहित नाहि) एकत्र न टाकता दोन भागान्मधे टाकले असते तर बरे झाले असते. कारण लोकाना तुमच्या वेदना वाचण्यात रस नसतो तर, स्वतहाच्या वेदना तुमच्या शब्दात आल्या तरच त्याना त्या आवडतात आणि त्यादेखिल शक्य तितक्या कमी शब्दात! मला वाटत कि आपण सर्व कविनी फक्त स्वतहासाठि न लिहिता लोकाभिमुख व्हवे. लोक कवितान्पासुन दुर जातायत असे आपण म्हणतो पण चन्द्रशेखर गोखले यानी जेन्व्हा सामान्य माणसाच्या सामान्य व्यथा आणि कथा सामान्य शब्दात असामान्यपणे मान्डल्या तेन्व्हा त्याला मिळालेला प्रतिसाद अलौकिक नव्हता का? कविता हा आत्म्याचा अविष्कार असतो असे म्हणतात पण कलेसाठि कला करण्यापेक्षा आपलि वेदना थोडी देखणि करुन मान्डली तर त्यामधे काहि वावगे ठरेल असे मला नाहि वाटत. शुभान्गीने लिहिले ते मला कदाचित कधिच लिहिता येणार नाहि. पण खुप दिवसान्पासुन जे विचार मनात होते ते या निमित्ताने कागदावर उतरले. नहि पटले तर मन्डळी, कागद फाडुन टाका पण समोर मोनिटर असेल तर.... जपुन पाऊल टाका!!
|
वैभव, पाळ्णाघर म्हणजे सुटसुटित शब्दातली गुटगुटीत कविता!! दिमडु, वेगवेगळि मने म्हणजे मुले इतकेच कळणे थोडेसे अवघड होते या कवितेत बाकि कविता वरिलप्रमाणे सुमन, कर्पे, छान कविता!
|
स्वास्ति, सुन्दर आहे कविता!!
|
Giriraj
| |
| Tuesday, March 21, 2006 - 2:24 am: |
| 
|
वैभव,मित्राने म्हटल्याप्रमाणेच रे! -- -- --
|
|
|