हल्ली मलाही त्या वाटेवरून जाण्याचा छंद जडला आहे तू थांबायचीस त्या वळणावर मोगर्याचा सडा पडला आहे
|
तुझी प्रत्येक नजर देते नवी वेदना आणि उगीचच वाटते वाया जातेय तुला विसरायची माझी साधना! तुला विसरणे शक्य नाही हेच खरे.. विचार न करता प्रेमात झोकुन देणेच बरे, नाहीतर जगु देत नाही ते वेडं मन!!!
|
हरवलेल्या वाटेवर पुन्हा एकदा रेन्गाळताना, मलाच भेटलो मि तुला शोधताना
|
उघड केले माझे मन तर तुला हरवायची शक्यता ओठांत किनार्याची शांतता अंतरी दर्याची ध्वस्तता जास्वन्द...
|
आता मनाच्या पाऊलवाटेवर कुठे तुझे ते थांबणे ? वाजत राहतो पाचोळा फक्त वाजत नाहीत पैंजणे
|
वेड वयात असतानाच आकाश डोळे भरुन पहायच नन्तर त्याच आठवणीवर उमेदिने जगायच
|
वाटेवरच्या फ़ुलांना, उमट्लेल्या पावलांना परत बघतांना, त्याच त्याच आठवणिनी पुन्हापुन्हा मोहरतांना.. मनानेच तुला स्पर्शुन जाते मी माझ्या स्वप्नांच्या गावी जातांना!!!
|
परतल्यावर तू पाहिले मी पाऊलवाट भिजून गेली वरून ढग फ़सवून गेले कि खालून तू बरसून गेलीस जास्वन्द...
|
नेहमिच माझ्या स्वप्नान्मध्ये तु असतेस स्वप्नाना जेन्व्हा स्वप्न पडत तु हसतेस
|
भिजलेली पाउलवाट उमटलेली पाउले त्याच त्या वाटेने कितीकाळ मी चालले माझे मला नाही कळले! सुकलेली फ़ुले, गळलेली झाडे लक्षातच आली नाहीत, आता मी कुठे आहे माझे मलाच नाही माहीत!!!
|
वाजलि नाहित पैन्जणे पण वाजला पाचोळा हळुवार पावलानि चालत आठवणि झाल्या गोळा
|
Amrutabh
| |
| Friday, March 17, 2006 - 5:36 am: |
| 
|
झुळकीत लिहिण्याचा पहीला प्रयत्न, आपल दु:ख सांगु कोणाला एथ प्रत्येक मन दु:खी आहे, पण दु:खाला क्षणभर सुख मानल तर जगात सर्वाधिक सुखी मीच आहे
|
ओन्जळभर सुख आणि दुखाची मुक्त उधळण चुकलय रे देवा.... थोड तुझ समिकरण
|
शहाण्या माणसाला, आपल्या शहाणपणाची जाणिव असते शहाणपणात त्याच्या..... तेव्हढिच एक उणीव असते.
|
Jo_s
| |
| Friday, March 17, 2006 - 6:16 am: |
| 
|
समीकरण चुकत नाही सोडवणारा चुकतो पाहीजे तो रिझल्ट फक्त सी. ए. च आणू शकतो
|
सी. ए. म्हणजे एसीत बसणारा भगवन्त नाहि इन्कमटेक्सचि धाड पडल्यावर पळत सुटतो तोहि....
|
मला प्रत्येकजण वेडा म्हणतो पण मी असाच बरा आहे माझ्या अंगावर आज सुखी माणसाचा सदरा आहे
|
कुणाला कळतं कवीचं मन काळजात काटे सलत असतात त्यांची जरी रिती ओंजळ स्वप्नं वाटत फिरत असतात.
|
माझ्या कवितान्मधे मि कधिच नसतो दोन ओळि वेदनेच्या, दोन प्रेरणेच्या मि फक्त लिहित बसतो
|
वाह सुमती.. रिति ओंजळ.. too good माझ्या रूसव्याला तिची मनवायची खोड गोड आहे सरावाच्या नाविन्यातले हे आता भलतेच वेड आहे जास्वन्द...
|
Shyamli
| |
| Friday, March 17, 2006 - 11:19 am: |
| 
|
वा वा बाहेर जाऊन येई पर्यंत झुळकेत वादळ येऊन गेलय की.... मस्त......
|
हार्ट वर्क खुप छान लिहिता तुम्ही जबरदस्त............ अस्मिता
|
Heartwork
| |
| Saturday, March 18, 2006 - 4:13 am: |
| 
|
धन्यवाद अस्मिता, स्वप्ने दुरावतात तेन्व्हा.... सामान्य माणसे अश्रु ढाळ्तात माझ्यासारखे सामान्य कवि त्याचवेळी कविता करतात!!
|
Shyamli
| |
| Saturday, March 18, 2006 - 4:20 am: |
| 
|
खरच पण अस का होतं दु:खातच का काव्य स्फुरतं? श्यामली!!
|
Heartwork
| |
| Saturday, March 18, 2006 - 4:37 am: |
| 
|
कुणास ठाउक, काय होत वेदनान्च्या व्रुक्षाला मि जेन्व्हा गोन्जारतो ओन्जळित माझ्या हळुच कुणि कवितान्चि फुले टाकतो
|