|
Kiroo
| |
| Tuesday, February 28, 2006 - 1:14 pm: |
| 
|
मला कोणीतरी खालील पटर्न समजावून सांगेल का? हे लहान मुलाच्या बूटाचं पटर्न आहे.मला ४ थ्या ओळीपासून गोंधळ होतोय. INSTRUCTIONS Cast on 33 sts loosely (use a slightly larger needle if you like to cast on and off with). Work a K1,P1 rib for 10 rows. Eyelet row: K1, * YO, K2tog * . Repeat from *'s to end. P next row. Divide for instep: K 22 sts, turn, P back over 11 sts. Continue in Stocking Sticth for the next 14 rows on center 11 sts. Break off yarn Sides: Pick up 7 sts on right side of instep, K 11 sts of instep, pick up 7 sts on left side of instep, K11 sts to complete row - 47 sts. Work 9 rows in stocking stitch. ( It'll be a little tight till you get a few rows up from the instep.)
|
Kiroo
| |
| Friday, March 03, 2006 - 1:55 pm: |
| 
|
मैत्रीणीच्या baby shower साठी बनवलेला स्वेटर, टोपरं आणि बुट. 
|
Karadkar
| |
| Friday, March 03, 2006 - 2:45 pm: |
| 
|
Kiroo, Very very cute. Did you understand the above pattern? I will try my best to give you my understanding of it tonight. Sorry for the delay but really don't have time.
|
Kiroo
| |
| Friday, March 03, 2006 - 3:02 pm: |
| 
|
Thanks minoti.I did not understand that pattern yet.तुला जमेल, वेळ मिळेल तसं सांग.
|
Karadkar
| |
| Monday, March 06, 2006 - 9:22 pm: |
| 
|
A pot with lid - size is about one litre. Hard to make as you need to make 2 peieces together and dry together and fire together. Anything can go wrong in the process. Glazes are - Beige on Bottom and Tenmaku on the lid. 
|
Karadkar
| |
| Monday, March 06, 2006 - 9:27 pm: |
| 
|
Jar for Tea and Sugar - same shape same size. hard to do. I think came out well. 
|
Mita
| |
| Monday, March 06, 2006 - 9:38 pm: |
| 
|
मिनोती, मस्तं गं... हे जार चिनीमातीचे आहेत का?? कुठे मिळाले तुला.. वरच्या गोल बरणीचा आकार काय छान आहे.. good work
|
Karadkar
| |
| Monday, March 06, 2006 - 10:02 pm: |
| 
|
मिता, अग मी pottery च्य क्लास ला जाते. हे जर मि स्वत्: बनवले आहेत आणि त्यावरचे डिझाईन वगैरे पण.
|
मिनोती छान आहेत. स्वतः करण्यात जास्ती मजा असेल ना. कलर मस्त दिसतो आहे. 
|
Mita
| |
| Monday, March 06, 2006 - 11:40 pm: |
| 
|
oh wow .मला वाटले कि तू वरचे color,artwork केले आहेस. खुपच सुंदर. खरच मला खुप आवडले.
|
Chinnu
| |
| Tuesday, March 07, 2006 - 9:05 am: |
| 
|
कराडकर छान आहेत pots . त्यावरची नक्षी पण झकास आहे! किरू, cute आहे स्वेटर नी टोपडं.
|
Nalini
| |
| Tuesday, March 07, 2006 - 9:35 am: |
| 
|
मिनोति, खुपच छान बनवलेस पॉट तु. तुला काय काय येते आणखी? तु बाकिचे फोटो कधी टाकणार आहेस? तु किरुचे वरचे पॅटर्न समजावुन सांग ना. मला तर पुस्तकातले पॅटर्न समजतच नाहित. किरु, तु बनवलेले वरचे स्वेटर, बुट आणि टोपरे पण खुपच छान आहे. मिनोति आणि किरु आम्हाला पुस्तकातील सांकेतिक भाषा समजण्यासाठी काही टिप्स देताल का?
|
Karadkar
| |
| Tuesday, March 07, 2006 - 2:56 pm: |
| 
|
INSTRUCTIONS Cast on 33 sts loosely (use a slightly larger needle if you like to cast on and off with). Work a K1,P1 rib for 10 rows. Eyelet row: K1, * YO, K2tog * . Repeat from *'s to end. P next row. Divide for instep: K 22 sts, turn, P back over 11 sts. Continue in Stocking Sticth for the next 14 rows on center 11 sts. Break off yarn Sides: Pick up 7 sts on right side of instep, K 11 sts of instep, pick up 7 sts on left side of instep, K11 sts to complete row - 47 sts. Work 9 rows in stocking stitch. ( It'll be a little tight till you get a few rows up from the instep.) सुयीवर ३३ टाके घाला - जर तुमचे विणकाम खुप घट्ट आसेल तर मग थोड्या मोठ्या सुईने घाला. त्यानंतर १ टाका सुलत १ टाका उलट असे करत १० ओळी घाला. पुढची ओळ - ह्या ओळीमुळे holes तयार होतील. - १ टाका सुलट, * लोकर पुढे घेउन पुढच्या २ टाक्यांचा १ असे सुलट प्रमाणे विणणे. * नंतरचे ओळ पूर्ण होईपर्यंत विणणे. पुढची ओळ पूर्ण उलट टाक्याने विणणे. पुढच्या ओळीत टाके टप्प्याटप्प्याने divide करायचे आहेत. म्हणजे फक्त मधले ११ टाके विणायचे आहेत तो भाग पावलाच्या वरच्या भागाचा होईल. कारण तो भाग बाकीच्या भागापेक्षा मोठा असतो. ते करण्यासाठी आधी २२ ताके सुलट विणा ११ टाके सुईवर तसेच रहातील. परत त्या २२ टाक्यातले फक्त ११ टाके उलट विणा. ते बाजुचे ११-११ टाके आहेत ते मोठ्या सेफ्टी पीन वर काढुन ठेवायला हरकत नाही. मधले ११ ताके १ ओळ उलट १ ओळ सुलट अशी विणत १४ ओळीपर्यंत विणा. इथे लोक तोडा असे सांगितले आहे. खालचा भाग जरा अवघाड आहे समजायला - आता बाजुचे टाके विणायचे आहेत. आणि ते करताना आपण जो १४ ओळीचा पार्ट विणला आही त्याच्या कडेचे पण ७ टाके उचलायचे आहेत. त्यासाठी आधी उजव्या बाजुचे ११ टाके उचला. मग एक आड एक ओळिचा १ असे ७ टाके मधल्या भागातल्या १४ ओळींचे उचलायचे आहेत. मग मधले ११ (जे आपण १४ ओळीपर्यंत विणले आहेत ते) उचला. आता डाव्या बाजुचे ७ टाके - एक आड एक ओळिचा अश्याप्रमाणे उचला. मग राहीलेले डाव्या बाजुचे ११ टाके जे आपण बाजुला काढुन ठेवलेले ते उचला. एकुण ११+७+११+७+११ = ४७ टाके होतील. आता हे ४७ टाके १ ओळ उलट १ सुलट असे विणायचे आहेत ९ ओळी पर्यंत. हे समतेय का? की अजुन काही अडतेय?
|
मला जरा रंगकामात मदत हवि आहे. श्रेयाच्या रूम डेकोर साठी काही (animals) फ़्रेम बनवायचा विचार आहे.. विकतच्या फ़्रेम फ़ारच महाग आहेत. शिवाय नेहिमिचे wall strip लावण्यापेक्शा वेगळे करावे असे मनात आहे. माझी चित्रकल चांगलि आहे.कुनि मला कुठले कलर वापरावे याविशयी काहि सांगु शकेल का? अजुन काहि सुचवलेत तर फ़ारच चांगले.यासाथि वेगळा बिबी उघडणे तितकेसे सयुक्तिक वाटले नाहि म्हनुन इथे विचारत आहे.
|
Kiroo
| |
| Tuesday, March 07, 2006 - 6:23 pm: |
| 
|
Thanks कराड्कर मी असच करत होते पण मला कोठेतरी चुकल्यासारख वाटल म्हणून तुला त्रास दिला.
|
Karadkar
| |
| Tuesday, March 07, 2006 - 6:50 pm: |
| 
|
प्राजक्ता, तुझे स्वत:चे घर आहे का? असेल तर अजुन वेगळ्या Idea देते. तुझ्या मुलिला खडुची ड्स्ट ची allergy आहे का? तुला ते काम भिंतीवर डायरेक्ट करायचेय की चित्र काढुन फ्रेम करायचीत. भिंतीसाठी कोणते लागतील ते जरा बघुन सांगते. पण Canvas, पेपर साठी Delta Ceramcoat® Acrylic Paint हे रंग चांगले पडतात. कागदावर करणार असशिल तर Michael's मधुन तु Water color Notebook आण. पण कागद लहान असतात. तुला मोठे काधायचे असेल तर मग तिथेच मोठ्या आकाराचे कागद मिळतात. ते आण. मोठी फ़ुले कापुन छान शेडींग करुन भिंतिवर लाव. नीमो, डोरा चे वगैरे स्केच करु शकतेस. तुझी चित्रकला चांगली आहे तर मग तु थोडे मोठे प्रकार तु करु शकशील - जसे कि एक theme घ्यायची. मोगली, Winnie the Pooh, Nemo अशी theme घेउन मग पूर्ण भींत पेंट करायची. अजुन बाकिचे देतिलच suggestions.
|
Karadkar
| |
| Tuesday, March 07, 2006 - 7:04 pm: |
| 
|
Prajakta, take a look at folloing sites - http://www.wallnutz.com/ http://www.createatoon.com/ Search on Google. You will find good sites. Also try to watch Decorating cents and such programs on HGTV. Debbie Travis also has nice ideas.
|
Prajaktad
| |
| Tuesday, March 07, 2006 - 11:23 pm: |
| 
|
कराडकर!मि apt मधे रहाते त्यामुळे थोडे limitation आहेत मि picture frame लावायचा विचार करतेय, माझ्या घराजवळच art and crafts चे दुकान आहे.धन्यवाद पटकन प्रतिसाद दिलास
|
Seema_
| |
| Wednesday, March 08, 2006 - 12:06 am: |
| 
|
मी स्वताच केलेली माझ्या मुलीची nursery . मी ikea मधुन frames आणल्या . स्वता घरात चित्र काढली . आणि ती त्या frame मध्ये घातली. दर थोडे थोडे दिवसानी मी त्यातली चित्र बदलत असते. michale मधुन water color acrylics colors आणले . paper ही तीथुनच आणले . त्यातली दोन चित्र बघ आवडतात का ! मला ती लहान मुलानी काढल्यासारखी वाटावीत असा effect हवा होता त्यामुळे net वर मी तशीच चित्र शोधुन मग बघुन काढल .

|
Chinnu
| |
| Wednesday, March 08, 2006 - 9:12 am: |
| 
|
वाह सीमा, खुप छान आहे. उर्वीला नक्कीच आवडलि असणार!
|
Karadkar
| |
| Wednesday, March 08, 2006 - 2:49 pm: |
| 
|
सीमा खुपच क्युट आहे ग. किती मस्त दिसत असेल रूम.
|
Prajaktad
| |
| Wednesday, March 08, 2006 - 2:50 pm: |
| 
|
सीमा!छान आलेय चित्र,नक्किच लहान मुलांनी काढल्याचा look आहे. बरिच माहिति मिळाली आता कामाला सुरवात करते. thanks all
|
Karadkar
| |
| Thursday, March 16, 2006 - 2:52 pm: |
| 
|
हा एक vase मधे कधितरि बनवलेला. त्याचा जो रंग (वू ब्लु) आहे तो खडबडित भागावर brown होतो.
|
Bee
| |
| Friday, March 17, 2006 - 3:04 am: |
| 
|
हा बीबी मी पहिल्यांदाच बघतो आहे. मिनोति, सीमा, किरू सगळ्यांची ही आवड खूप वेगळी आहे. मिनोति, तुझी ही कला माहिती नव्हती. अगदी चिनिमातीची भांडी बनवण्यापासून त्यावर रंगकाम करेपर्यंत. बाजारात खूप महाग मिळतात चांगल्या pottory.
|
Milindaa
| |
| Friday, March 17, 2006 - 5:52 am: |
| 
|
हे असं गळ्यात नेकलेस घातल्यासारखं काय दिसतंय ?
|
|
|