हा आपला, तो आपला म्हणुन जपला पन म्हणतात ना... कठीन समय येता.. झाला गफ़ला नि सारा आपलेपणा संपला...
|
Jaaaswand
| |
| Wednesday, March 15, 2006 - 5:54 am: |
| 
|
ठाण मांडून बसली रस्ता ह्या नाठाळाची मरगळ तेवढ्यात तुझी ठेच लागली सुटला चैतन्याचा दरवळ जास्वन्द...
|
Devdattag
| |
| Wednesday, March 15, 2006 - 5:59 am: |
| 
|
तुझं हे अव्हेरून जवळ करणंही ख़ूब आहे तुझ्या त्या लटक्या दुराव्यात आपलेपणाची ऊब आहे
|
Shyamli
| |
| Wednesday, March 15, 2006 - 6:02 am: |
| 
|
लटकाच असतो माझा रुसवा अन बळच असतो दुरावा त्यानंतर तु काढतोस ना समजुत तोच क्षण असतो हवा श्यामली!!!
|
Devdattag
| |
| Wednesday, March 15, 2006 - 6:07 am: |
| 
|
ठेच लागून वरवर हसण्याचा प्रकार आता नेहमीचाच झाला आहे पण तो खोलवर झालेला घाव कुठेतरी अजूनही ओला आहे
|
Shyamli
| |
| Wednesday, March 15, 2006 - 6:13 am: |
| 
|
चांदणे होते माझ्या ओटित मी शोधत होते चंद्राला होती हिरकणी हातात अन पाडत होते पैलु काचेला श्यामली
|
Devdattag
| |
| Wednesday, March 15, 2006 - 6:21 am: |
| 
|
चंद्र आणि चांदण्यांचा आज क्रिकेटचा डाव आहे चांदण्याच्या मैदानात किरणांची धाव आहे
|
Shyamli
| |
| Wednesday, March 15, 2006 - 6:32 am: |
| 
|
जमवतिये जगण आता तुझ्या वीना येतात.... आठवणी पुसतीये पुन्हा पुन्हा श्यामली!!!
|
आली वेदना, बघ आला उसासा.... मैफिल जमली वेड्या, चल हास जरासा
|
Shyamli
| |
| Friday, March 17, 2006 - 1:15 am: |
| 
|
वा अनिरुध्द कीती छान लिहीता तुम्ही....
|
श्यामली, देवदत्त, हार्टवर्क...... best आज अचानक तु आठवलास परत गोठल्या संवेदना, परत हलले जग सारे, पुन्हा एकदा तेच वादळ अनुभवले, आणि पुन्हा एकदा मी कोसळले!!!
|
येण्याआधी आर्त , शांत गेल्यानंतर रिक्त , स्तब्ध तरीही तुझे वादळ झेलायला मी सतत वचनबध्द
|
भलत्या वेळी आठवत जावु नकोस! समजले ना? इतका काळ गेला तरी का आठवत राहातोस? सारखा स्वपनातही यायला लागलायस? अशा खुप तक्रारी करायच्यात! खरखर भेटशील?
|
एक सुकलेला गजरा , एक कविता इतकंच (?) ठेवून गेलीस तुला वाटत नाही तुझ्या नकळत तू इथेच राहून गेलीस ?
|
खरोखर भेटायचास तेव्हा तक्रारी असायच्या खोट्या वाटलंच नव्हतं होतील कधी तक्रारी खरया आणि भेटी खोट्या
|
तु इथेच राहुन गेलीस? ........ खरोखर छान मस्तच!!!! मी माझी राहीले नाही माझे जगणं माझं वाटत नाही एकदा माझा होउन भेट.. बाकी काही माझं मागणं नाही!!!
|
विसरले मी तुला अशी तुझ्यासारखीच माझ्या मनाची सुद्धा समजुत होती, मनाला मी खर काय ते सांगीतलेय! आता सत्य समजल्यावर तु काय करणारेस!!!
|
मी वेगळी होते म्हणून आवडले असं नेहेमी म्हणत आलायस तू आता तुझ्यासारखी झाले आहे म्हणून का वेगळा होतोयस तू ?
|
आपल्या माणसांत राहून तुला " आपलं " असं विश्व हवं होतं मला आपल्या विश्वात फक्त " आपलं " असं माणूस हवं होत
|
फ़क्त माझ्या विश्वात ये म्हणण्यातच सगळं आलं का? तुच सांग तुझं विश्व आपलं विश्व कधी झालं का?
|
माझं विश्व तु होतास हे तुलाही माहीत होतं तुझ्यावाचुन गाणं माझं शब्दाशिवाय रीतं होतं विसरायचा बहाणा फ़क्तं तुलाच जमला, माझ्या गाणार्या मनाचा प्रवास मात्र तीथेच थांबला!!!
|
मला कळलच नाहि, कुणाला आपल म्हणाव आणि कशाला आपलेपण मि मनात दोनच क्षण जपले ग जेन्व्हा अखेरचे भेटलो आपण
|
श्यामला, कधिकधि मि सुद्धा तुझ्याप्रमाणे चान्गल लिहितो खरा.... वैभव, लोपा, देव.... झुळुक चान्गलिच दरवळु लागलीय.
|
मोकळ्या माळरानावर हिरव्यागार पानावर.. पाहीली एक कळी! झोंबणार्या वार्यावर पाठवुन दिली काही स्वप्न... मग माझ्यात मी मिसळुन गेले तुझ्या नकळत तुला भेटुन आले!!!
|
मस्त रे मित्रांनो... विश्वात आपल्या रमणारी पाऊलवाट लाजून गेली खूप शोधले तुला जिथे पैंजणे तुझी नाचून गेली जास्वन्द...
|